रगडा पॅटीस by Namrata's CookBook :१०

Submitted by Namokar on 16 July, 2019 - 03:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

ragada ptis 2.jpg
पांढरे वाटाणे
उकडलेले बटाटे
पोहे
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो/ टोमॅटो प्युरी
आलं+लसून पेस्ट
चिंचेचा कोळ
चाट मसाला
गरम मसाला
हळद
लाल तिखट
कोथिंबीर
तेल
मीठ

क्रमवार पाककृती: 

१. पांढरा वाटाणा साधारण ८ तास भिजत ठेवा
२. बटाटे उकडून घ्या ( २ शिट्ट्या)
३. आता वाटाणे कूकरमध्ये घेउन हळद , चवीनुसार मीठ घालून एकत्र करुन घ्या आणि २ - ३ शिट्ट्या करुन घ्या
Ragda1 (1).png
४. वाटाणे शिजेपर्यंत पॅटीसची तयारी करु,
उकडलेले बटाटे मॅश करुन घ्या
५. आता त्यामध्ये थोडी हळद ,काळे मीठ /चाट मसाल , आलं+लसून पेस्ट ,पोहे भिजवून घालून एकत्र करुन घ्या
Screenshot_2019-07-16-12-52-09-009_com.google.android.youtube.png
६. आता पॅटीसला आवडीप्रमाणे आकार द्या
Ragda1 (2).png
७. एका पॅनमध्ये थोड तेल घेउन पॅटीस शॅलो फ्राय करुन घ्या
Ragda1 (4).png
८. एका बाजूने लालसर रंग आलाकी दुसर्या बाजूनेसुध्दा लालसर रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करुन घ्या
Ragda1 (5).png
९. वटाणे शिजलेकी रगड्याची तयारी करु ,
एका कढई मध्ये तेल घ्या ,तेल गरम झालेकी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान रंग बदलेपर्यंत परतून घ्या
१०. आता त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून शिजवून घ्या
Ragda1 (8).png
११. आता त्यामध्ये शिजलेले वाटाणे थोडे मॅश करुन घाला
१२. आता त्यामध्ये गरम मसाला , लाल तिखट , थोडी हळद (नाही घातली तरी चालेल) , मीठ घालून एकत्र करा
Ragda1 (9).png
१३. त्यामध्ये पाणी घालून एक उकळी काढू
Ragda1 (10).png
रगडा आणि पॅटीस दोन्ही तयार आहेत
सर्व्ह करतान त्यावर चिंचेच पाणी,कथिंबीर , कांदा घालून सर्व्ह करा
ragada patis1.jpg

अधिक टिपा: 

**जर तयार रगडा पॅटीस लगेच खाणार असालतर कमी पाणी घातले तरी चालेल
थोड्यावेळानी खाणार असाल तर जस्त पाणी घालावे ,कारण जस जसा वेळ जाईल तसा रगडा घट्ट होईल
पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://youtu.be/tCmddbGmlZo

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान पाककृती.
आम्ही ही असाच करतो. पण रगड्या मध्ये पण थोडा चाट मसाला घालतो.
असाच रगडा आम्ही त्या चपट्या क्रिस्पी पुर्या वर घालुन ही खातो.
यावर पुदिन्याचीही चटनी आणी शेव घालुन ही छान लागते.

शेवटचा फोटो एकदम भारी. >>>> खरंच मस्त यम्मी दिसतो आहे. इतके जबरदस्त क्रेविंग आले आहे की इथे प्रतिसाद टाइप करण्याअगोदर उबर इट्स वर कल्याण मधून रगडा पॅटिस ऑर्डर केले. बाहेर जबरी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे डिलिव्हरी बॉय साठी वाईट वाटतं आहे

Me udya karnaar Ragda Patice.... but me Ragda without oil karte.. Mhanje Phodni det nahi direct masale ragdyamadhe.. n patice madhe thoda hing takte.. digestionsathi.

मस्त रेसिपी!

थोड्याफार फरकाने घरी बनवली जाते ही डिश.रगड्यात हि.मि वगैरे असते.चिंचगूळाची चटणी याबरोबर मस्त लागते.

मस्त रेसिपी!

थोड्याफार फरकाने घरी बनवली जाते ही डिश.रगड्यात हि.मि वगैरे असते.चिंचगूळाची चटणी याबरोबर मस्त लागते.>>>>>>>++१११

छान रेसिपी. मला रगडा पॅटिस खूप आवडते पण कामाचा इतका रगडा कोण घालणार Happy Happy विकतची डिश हातात आली की बरे वाटते.

वटाणे शब्द वाचून गम्मत वाटली होती. आमच्याकडे उच्चार वटाणे असाच करतात.