Submitted by manasi0987 on 14 July, 2019 - 05:54
पत्रिका ही कितपत विश्वासार्ह आहे लग्ना मध्ये किंवा इतर आयुष्यातील प्रश्नांमध्ये ? अनुभव असल्यास कृपया सांगावे.म्हणजे माझ्या भावाची आणि मुलीचे १३ गुण जुळतात पण तिला मंगल आहे व त्याला नाही तसेच त्याचे आश्लेषा नक्षत्र आहे व भाकूत मध्ये ०\७ गुण आहेत.ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असं पण असतं ना कि जितक्या
असं पण असतं ना कि जितक्या भीती, टोचण्या काळज्या भविष्याबद्दल विचार करून आपण रात्र रात्र जागून वेळ व झोप वाया घालवतो ते
काही फारसे घडत नाही. वेगळेच घडते. एक लॉ ऑफ अॅवरेजेस पण असतो. खूप खूप चांगले होत गेले कि एक तडाखा मिळतो. माणूस जाग्यावर राहतो. सत्तर वर्शाचे अॅक्टिव्ह जीवन पकडले तर मेजॉरिटी लोकांच्या आ यु श्यात टर्न व ट्विस्ट कॉमन येतात. व शिक्षण होणे किंवा खंड पडणे, मनाजोगता पार्टनर, नोकरी , पैसा हे मिलणे किंवा न मिळणे ह्याची ग्रिड काढली तर आपण किंवा जातक कुठेतरी असतोच. जीवनानुभवातून
साधारण प्रेडिक्ट करू शकतो.
त्यात मोठ्या पदावर घटना मॅनिप्युलेट कर णारे उच्च पद स्थ व्यक्ति असतात ते अनेक जीवने अफेक्ट करतात जसे हिटलर,
किंवा मोठ्या घटना भूकंप पूर वगैरे. ह्यात जीव जातात. पोरे हरवतात इत्यादि. ह्याला ज्योतिषी च्या ज्ञानाची गरज नाही. काळाच्या समुद्रात प्रत्येकाची एक रेघ ओढलेली अस्ते. ती संपली की झाले किस्सा खलास.
मानसी,
मानसी,
भकुट मधे गुण असणे महत्त्वाचे मानतात पत्रिकेत. शून्य गुण असेल तर लग्न करत नाही. पण हे स्थळ जर अॅरेन्ज असेल तर मग दुसरे निवडा.
उदाहरणार्थ मीन राशीच्या व्यक्तींचे सिंह, कन्या व तूळ राशीबरोबर फारसे जमत नाही. त्यामुळे मीनवाल्यांनी वरील ३ राशीच्या व्यक्तींशी विवाह करू नये.>> इथे शडाष्टक योग निर्माण होतो.
जेंव्हा अमक्याशी लग्न करायचे असते पण पत्रिक जुळत नाही तेंव्हा फार वाईट वाटत. पण आपल्या शास्त्रात प्रत्येक गोष्टीवर उपायसुद्धा सांगितलेले आहेत. ते उपाय विचारुन बघा.
. प्रत्येक गोष्टीवर
. प्रत्येक गोष्टीवर उपायसुद्धा सांगितलेले आहेत.
या श्रद्धेवरच जग चालतय.
या श्रद्धेवरच जग चालतय.>>>
या श्रद्धेवरच जग चालतय.>>>
हो गं बरोबर आहे. आपली मानसिकता अशी आहे की अमूक पूजाविधी केली की आपले प्रश्न खरेचं मिटतील वा कमी होतील ह्यावर आपला विश्वास आहे. आपण भटांचं खरे मानतो. ते आपल्याला मग लुबाडतात. ज्योतिषशास्त्र मला खरे वाटते पण त्यावर काही उपाय आहे ह्यावर नाही. माझा साडेसाती वगैरेवर विश्वास आहे पण मला वाटतं आपलं आयुष्य बरचंस हे आपल्या हाती असतं. आपणचं आपल्या हातून निसटतं गेलो कि आपले वाईट होणारचं ना. शक्य तेवढं सन्मुख व्ह्यायचं.
पत्रिका मी कधी दाखवली नाही पण
पत्रिका मी कधी दाखवली नाही पण पुर्वी म. टा. मध्ये बेजन दारूवालाचं दैनिक भविष्य यायचं ते माझ्याबाबतीत तंतोतंत खरं व्हायच, इतकं की रोज उठून ब्रश देखिल करायच्या आधी मी ऑनलाईन म टा बघायला लागले. शेवटी एप्रिल पासून बेजन दारूवालाऐवजी दुसरे कोणीतरी भविष्य लिहायला लागले तेव्हा कुठे ती सवय सुटली. आता मी भविष्य वाचायलाच जात नाही.
आपली मानसिकता अशी आहे की अमूक
आपली मानसिकता अशी आहे की अमूक पूजाविधी केली की आपले प्रश्न खरेचं मिटतील वा कमी होतील ह्यावर आपला विश्वास आहे. आपण भटांचं खरे मानतो. ते आपल्याला मग लुबाडतात>>>
ही मानसिकता नाहीशी करा ना.... ती नाहीशी करणे फक्त तुमच्या हातात आहे.
तुम्ही लुबाडायला संधी दिली की लोक तुम्हाला लुबाडणारच. पोट सगळ्यांना आहे, ते कसे भरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
तुमचे प्रश्न का निर्माण झाले ह्याच्या मुळाशी न जाता तुम्हाला एक पूजा करून ते प्रश्न मिटवून हवेत. आणि ही पूजा भटाने तुम्हाला रुचेल त्या किंमतीत करून द्यावी ही अपेक्षा आहे. त्याने जास्त घेतले म्हणजे त्याने लुबाडले.
ही मानसिकता नाहीशी करा ना....
ही मानसिकता नाहीशी करा ना.... ती नाहीशी करणे फक्त तुमच्या हातात आहे.... ...अगदी बरोबर,
तुम्ही लुबाडायला संधी दिली की लोक तुम्हाला लुबाडणारच. पोट सगळ्यांना आहे, ते कसे भरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.... ...अमान्य. हे विचार सुध्दा बदलायला हवे.
माझ्या घरातले ३ किस्से!
.
ही माझ्या धाग्याची रिक्षा आहे
ही माझ्या धाग्याची रिक्षा आहे.
मला भविष्य जाणून घेण्याचा छंद
मला भविष्य जाणून घेण्याचा छंद आहे. हजारो रुपये घेणारे ते रस्त्यावरचे कुडमुडे पाटी लावून बसलेले ज्योतिषी असे सगळ्या लोकांना मी भेटलो आहे. कित्येकदा भविष्य ऐकल्यावर अजिबात विश्वास बसला नाही तरीही ठरलेली फी देतो कारण ते आपल्याला बोलावत नाहीत आपणच त्यांच्याकडे जात असतो. काहींचा हा व्यासंग आहे, काहींना करेक्ट भविष्य सांगता येते याचा माज आहे. तर काही फक्त पोटभरू ( लुटारू) आहेत.
माझ्या ओळखीच्या स्रीला आलेला अनुभव -- वयस्कर ज्योतिषी, थोडाफार प्रसिद्ध ही, कॅन्सरने आवाज गेला म्हणून गळ्याला माईक सारखं यंत्र लावून बोलणारा. खेकसणारा, रूममध्ये एकावेळी एकाला आत घेणारा. तर ही भाबडी स्री पहिल्यांदा गेली होती. बुढ्यानं अंगावरील लक्षणं पहायचे म्हणून एकदम जवळ बोलावले व इकडे तिकडे बघायचं नाटक करीत तिचे स्तन दाबले.
तिथून कशीतरी बाहेर पडली, पुढे मानसोपचार घ्यावे लागले बिचारीला. असे या क्षेत्रात सुध्दा सर्व प्रकारचे नमुने आहेत.
काहींना करेक्ट भविष्य सांगता
काहींना करेक्ट भविष्य सांगता येते याचा माज आहे. >>हे मीही अनुभवलंय. माझ्या प्रकृतीस आराम न मिळत असल्याने (कित्येक डॉक्टरआना दाखवूनही )मी एका ज्योतिष्याकडे गेले होते. त्यांनी मला थोडेसे मार्गदर्शन केले. त्यामुळे मला फार नाही पण बऱ्यापैकी relief मिळाला. नंतर मी परत काही कारणासाठी त्यांच्याकडेच गेले. तेव्हा मी त्यांना अगदी कृतज्ञता पूर्वक सांगितलं की तुम्ही दिलेल्या guidance मुळे मला आता पूर्वीपेक्षा बर वाटतंय. Thanks for guidance. तेव्हा त्यांनी "ह्या ह्यात काय एवढा मला माहितीय की मी बरोबरच सांगतो "टाईप भाव केले आणि तुच्छतापूर्वक "ठीकय ठीकय "असं म्हणाले. मला ते वागणं भलतंच खटकलं. पण मी फार विचार केला नाही. जी लोकं खूप हुशार असतात त्यांना काही वाटत नाही केलेल्या कौतुकाचं. त्यांच्यासाठी ती नेहमीची गोष्ट असते /असावी.
तुम्ही वर लिहिलेला अनुभव कितीही प्रयत्न केला तरी विश्वास ठेवणं कठीण आहे.
अगदी शंभर टक्के खरा अनुभव आहे
अगदी शंभर टक्के खरा अनुभव आहे तो.
Pages