मुगा घशी/ मुगा मोळो

Submitted by मेधा on 15 October, 2008 - 12:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोड काढलेले मूग ४-५ वाट्या ( साले पण काढायची असतात )
ओलं खोबरं - अर्ध्या नारळाचं कमीतकमी
८-१० बेडगी मिरच्या
२ टीस्पून धणे .
मूठभर काजू, सहा आंबाडे, शेवग्याच्या शेंगांचे दीड्-दोन इंच लांब तुकडे पंधरा सोळा - यातलं काहीतरी एक.

क्रमवार पाककृती: 

थोड्या तेलावर मिरच्यांचे तुकडे व धणे परतून घ्यावेत - करपू देऊ नये.
गॅस बंद करून त्यात पाव चमचा हळद घालावी.
गार झाल्यावर खोबरे, मिरची , धणे, सगळं अगदी बारीक वाटावं. अजिबात खरबरीत लागता कामा नये. काही जण यात एक चमचा तांदूळ पण वाटतात . मी नाही घालत.

मोड आलेले मूग थोडं मीठ घालून पातेल्यात थोड्या पाण्यात शिजत लावावेत.
( असे शिजवून घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रीज मधे आठ दहा दिवस रहातात )काजू/ शेंगा वगैरे घालायचे असले तर तेही यातच घालावेत.

मूग शिजत आले की ( अगदी गचका होऊ नये ) वाटलेला मसाला व मिक्सरचे भांडे धुतलेले पाणी मुगात घालावे, मीठ चवी प्रमाणे घालावे. आमटी फार पातळ नसते. ( पाहिजे तर शिजलेले मूगच चमचाभर वाटणात घालता येतात.)
एक-दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करावा. मसाला घालून जास्त उकळू नये.
मसाला घातला की दुसर्‍यागॅसवर फोडणी करायला घ्यावी
तेल तापले की मोहरी, ती तडतडली की सुक्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग, थोडी हळद घालून आमटीला उकळी आली की फोडणि त्यावर घालून लगेच झाकण लावावे.
गरम गरम भाताबरोबर लगेच खावे ! फोडणी घालून झाकण लावले की भांडे जेवणाच्या टेबलवर गेले पाहिजे.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांदाठी पुरेल
माहितीचा स्रोत: 
आई, मावश्या, आत्या इत्यादी व 'रसचंद्रिका'- सारस्वत स्वैपाकाचे जॉय ऑफ कूकिंग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुगा गाठी माझ्यो एकदम फेवरेट.
गाठी आणि पुर्‍यो. वा वा वा.
- अनिलभाई

मी करुन पाहिलं आज, खुप आवडलं. रेसिपीबद्दल धन्यवाद!!

मी हे नेहमी करते पण मिरच्या आणि धणे कधी भाजुन घेत नाही. आई, मावशी, सासुबाई पण कधी भाजुन घेत नाहित. पण आता असे करुन बघिन. माझी लेक तर ही उसळ असली की खुश असते. बहुतेक वेळा मी गुरुवारी करते कारण मासे खायचे नाहित म्हटले की माझ्या लेकीचा थयथयाट सुरु होतो.

बायदवे, शोनु, हे रसचंद्रिका नवाचे पुस्तक आहे का?

आज (पुन्हा) केलं. भारीच एकदम. आज काल मी दोन वेळेला पुरेल एवढा मसाला वाटून ठेवते कोरडा. ऐनवेळी नारळात घालून मिक्सरमध्ये फिरवायचा.

मी आज हे पहिल्यांदा केलं, एकदम यम्मी. माझ्याकडे अंबाडे वगैरे नसल्याने मी आमसूल घातलं. सहीच लागलं. थँक्यू मेधा Happy

माझा घोव ह्याला खोबरेल तेलाची फोडणीचं पाहिजे असा हट्ट करतो.. चांगली लागते ही मुगा मोळो.. खोबरेल तेलाचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो..:)

mastch receipe.. amchyakade sasubainkade udya asel.. aashadhi ekdashicha upvas sodayala.

मी हे नेहमी करते पण मिरच्या आणि धणे कधी भाजुन घेत नाही.>>>>> मी पण मिरची पावडर(तिखट)+धणे न भाजता घालते.ओल्या खोबर्‍याबरोबर चिंच,तिखट,धणे एकत्र वाटून घेते. खोबरेल तेलात राई,हिंग्,कढीपत्त्याचीफोडणी घालायची.
खोबरेल तेलाची फोडणी मस्ट आहे.आमच्याकडे मूगागाठी म्हणतात.

mi hi mugachi sale nahi kadhat.. ektar tevdha vel nasto.. n manat kuthetari salimadhala vitamin consciousness yeto.

Pages