हे मन बावरे - कलर्स मराठी

Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23

सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.

सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!

Group content visibility: 
Use group defaults

बाकी कुणी काही म्हणोत मला तरी या दोघांची जोडी खूप आवडते. फायनली त्याने प्रपोझ करावं अनुला त्यावेळी तिचे expressions बघायला आवडतील मला. आणि मनमोकळी हसते तेव्हा गोड दिसते अनु.

त्यावेळी तिचे expressions बघायला आवडतील मला.>>+१
मागे एकदा त्याने सान्वी आवडत नाही असे सांगितल्यावर त्याला समजावत होती कि असेल एखाद्याचे आपल्यावर प्रेम तर त्या व्यक्तिला तोडून न टाकता त्या प्रेमातून बाहेर पड्यायला मदत करायला हवी.

अनुसाठी सिद्धार्थने घर सोडलं, नोकरी करतो etc etc. सगळीकडे अनुशी लग्न करायचं सांगत फिरतो पण त्या अनुला माहीतेय का, तिला कोणी विचारलं का की तिला लग्न करायचं आहे का त्याच्याशी. सगळं हाच ठरवणार का. तिच्या मनाचा विचार करायचा आहे की नाही. तिला रहायचं असेल तर राहूदेकी नवऱ्याच्या आठवणीत, वेळ लागत असेल एखाद्याला, पण म्हणून दुसरीकडून लग्नाची जबरदस्ती कशाला. >>>>>>>>>> +++++++११११११११११ त्याची आई एक दिवस अनुच्या घरी तिचा हात मागायला येईल हे सुद्दा त्यानेच ठरवल!

त्यादिवशी पावसात तिला तिचा नवरा आठवत होता बघितलं. >>>>>>>>> मी सुद्दा बिबॉ सुरु होण्याआधी हे बघितल. मला होमिसुयाघमधले पावसाचे सिन्स आठवले. खुप सुन्दर सिन्स होते ते. Happy

आता सिद्धार्थ खूप आवडायला लागलाय. अनुच्या आईबाबांना सगळं सांगून टाकतो तेव्हा किती गोड दिसतो आणि सिन्सीअरली बोलतो.
अनुचं त्याच्यावर प्रेम असावं कारण ती त्याच्यासाठी किती काय काय करत असते.

एकंदरीत म्हणजे अनुला गृहीत धरणे सुरू आहे सगळीकडून Lol

काहीतरी मागे प्रॉमिस घेतो आणि मी नंतर सांगेन म्हणतो ते वचन माझ्याशी लग्न कर असं सांगून पूर्ण करून घेणार.

सिदने अनुला प्रपोज करून टाकलं . तिने त्याला साफ नकारदेऊन त्याचं ह्रदय अगदी चकनाचूर करून टाकलं. बरीच पटापट पुढे सरकतेय स्टोरी.

हो. आता काकाने त्यांना घराबाहेर काढायचे बाकी आहे.
मग यांची शून्यातून सुरुवात होईल तेव्हा न रहावून अनु येईल मदतीला Happy

नवीन प्रोमो बघितला. सिद्धार्थ अनुची शेवटची भेट घेतो, जाण्याआधी तिला शेवटचा प्रश्न विचारतो, " आपल्यामध्ये मैत्रीशिवाय आणखी काही होत का? खर सान्ग? तेव्हा अनु गप्प बसते. सिद ' मला माझ्या प्रश्नाच उत्तर मिळाल' बोलून निघून जातो. म्हणजे तिच्याही मनात आहे तर.

कसल्या हॉरीबल आया दाखविल्यात एक सिद्धार्थची आणि दुसरी ती वहिनी अनुची.
अनुची वहिनी तरी अशिक्षित दाखविली आहे आणि पहिल्यापासून नाटकी. पण ही तर कंपनीची मालकीण विचारपुर्वक पावले उचलणारी!

तर काय . ती दुर्गा म्याड तर डोळे मिचकावत संयूला सांगते की सिद्धार्थला हो म्हणायला लावण्याचा एक अंतिम जालिम उपाय आहे माझ्याकडे. तो उपाय म्हणजे चक्क ब्लॅक मेलिंग असते. कोणतीही आई इतक्या टोकाला जाईल काय?
आता साखरपुड्याच्या वेळी बाँब फुटणार आहे. पण तोपर्यंत किती एपिसोड्स पाहावे लागणार कुणास ठाऊक.

कसल्या हॉरीबल आया दाखविल्यात एक सिद्धार्थची >>>>>>>> एक प्रोमो बघितला . अनुच्या फोटोचे तुकडे करुन ती आपल्याच मुलाच्या तोण्डावर फेकते. कोण लिहित असले सिन्स?

शेवटी बाँब फुसकाच निघाला. वेडेपणाच दाखवलाय. काकांनी घर आणि संपत्ती आपल्या नावावर करून घेतली ते म्हणे कायदेशीर नव्हतं. सिद्धार्थने सगळी मालमत्ता आधीच आजोबांच्या नावाने करून ठेवली होती म्हणे. हे दुर्गा मॅडमला माहीत नव्हतं? आणि सिद्धार्थच्या नावाने प्रॉपर्टी कोणी केली? खुद्द आजोबांनाही ठाऊक नाही की ते मालक आहेत. एव्हढा लीगल घोळ कसा होऊ शकतो?

भले आइला अनु आवडत नसेल पण आपल्या मुलाला सान्वी आवडत नाहिये हे माहित असुन बळच सापु कशाला? वर ती मन्द सान्वी पण मी सापु करणारच म्हणते, एवढ काय त्या सिद्धार्थच वय वाया चाललय घाइ करायला तेच कळत नाही
मेलोड्राम्याचा कहर आहे.

सतत त्याच त्याच धमक्या त्याच त्याच माणसाकडून ऐकण्याचा कंटाळा आला. आता एक तर धमक्या तरी बदलू देत किंवा धमक्या देणारा माणूस तरी दुसरा कोणी असू देत.
ब्लॅक मेलिंग मध्ये सुद्धा नावीन्य नको का?

मृणाल दुसानिस धृतराष्ट्रासारखी वरती का बघते?

Submitted by बोकलत on 25 June, 2019 - 01:38
पूर्वी मृणाल चकणी दिसायची. त्यामुळे साइड्वेज बघणे टाळत असे. आता तो दोष तितकासा लक्ष्यात येत नाही. पण जुनी सवय शिल्लक राहिली आहे बहुतेक.

Submitted by हीरा on 25 June, 2019 - 02:27
>> मलाही असंच वाटायचं. आता कळलं खरंच आहे.

Submitted by बोकलत on 25 June, 2019 - 01:38
पूर्वी मृणाल चकणी दिसायची. त्यामुळे साइड्वेज बघणे टाळत असे. आता तो दोष तितकासा लक्ष्यात येत नाही. पण जुनी सवय शिल्लक राहिली आहे बहुतेक. >>>>.
पूर्वी मला हे फार वाटायचे कि ती चकणीच आहे पण असे लिहिल्याने बॉडी शेमीन्ग का काय म्हणतात तसे वाटायचे. पण खरंच ती तिरळी आहे आणि धृतराष्ट्रासारखीच बघते अजूनही.

मेलोड्राम्याचा कहर आहे.>+१
आता त्याच्या संपर्कात राहून विशूसाठी पटवणार का?
स्वत:च्या दिवंगत नवर्याला आतापर्यंत विसरु शकली नाही. आता सिदशी मैत्री ठेऊन त्याला प्रेमातून बाहेर काढणार म्हणे. काहीही!

खलनायक हे पुर्वापार आहेतच. वाईट आणि चांगल्याची, सत्य आणि असत्याची लढाई असतेच. पण चार वर्षाची सिरियल असो की चार महिन्यांची - फक्त शेवटचा भाग हिरो हिरॉईनला काम करायला वाव मिळतो. बाकी सगळी नेगेटिव्हिटीच असते. हे चित्र बदलायला हवे. चांगले घडताना दाखवणे ही सकारात्मकता आहे आणि ती काळाची गरज आहे. सिरियल्स नकारात्मक भुमिका सातत्याने दाखवून चुकीचे संदेश देत आहेत.

सिध्दार्थने आईला मस्त सुनावलं आणि तिचं नाटक ओळखलं. तो सगळ्यांना बरोबर ओळखून आहे. पेपर्स आधीच तात्यांच्या नावावर केले होते.
आता सिदला अपघात होणार आहे.

पण मला एक कळलं नाही, पेपर्स आपल्या नावावर नाहीत, हे दुर्गामॅडमला माहीत नव्हतं ? सरळ सही करून टाकली. की माहीत होतं म्हणूनच बिनधास्त सही केली? आणि ते कागद सिद्धार्थच्या नावावर आहेत, हे काकाला माहीत नव्हतं? मूळ कागद बघितल्याशिवायच सगळं कारस्थान रचलं?
अर्थात सीरियलमध्ये काहीही घडू शकतं म्हणा. आणि ती दुर्गामॅडम सगळ्यांना ह्याच्या त्याच्या शपथा घालत सुटते त्याचाही अतिरेक झालाय.

Pages