आज सकाळची गोष्ट.रस्त्यानं जात असताना एका काॅर्नरवर एक स्कूल बस थांबली होती.तो त्यांचा थांबा असावा.तिथं अनेक मुलं थांबली होती.त्या सोबत काहीच्या आया ही होत्या. पाॅश ड्रेस,शूज,टाय.स्कूलबॅग्जस् पाठीवर ....आता सरकारानं किती ही दप्फतराच्या ओझ्याचं टेन्शन घेऊ दया .पालक आणि त्यंचे टिचर..हे मात्र गंभीर होत नाहीत .ते होणार पण नाहीत .दप्फतर हा विषय फक्त मुलांशी संबधीत राहिलेला नाही .तो पालकांच्या आणि शाळांच्या प्रिस्टेजचा प्रश्न झालेला आहे. असो.त्य सोबत पुन्हा टिपिन बॅग्स ....त्या बाॅटल....
. . त्यात मुलांच्या घोळक्यात एक फारच लहान मुलगा होता.अडीच -तीन वर्षाचं मुलगा असेल तो..त्यला शाळेत जायचं नव्हतं.त्यानं अंदोलन पुकारल होतं.तो रडत होता. आरडत होता.तिथं कुणीचं त्याच दखल घेणार नव्हतं.ती घेतली ही जाणार नव्हती. आमच्या काळात आजी नावाच एक जबरदस्त सरकार असे.तिथं आपले कसले ही लाड पुरवले जायचं. नातवाला मारणं सोडा .साध धमकावनं ही शक्य नसायचं. आजी आजोबा आता घरातून हद्यपार झाले.त्यानं जी बापाच्या पॅन्टीला मिठ्ठी मारली ते सोडत नव्हत. त्याच्या मम्मीला त्याचा फोटो काढयाचा असेल .हातात मोबाईल घेऊन ती धडपडतचं होती. एखादा अप्रतिम व असा दूर्मीळ क्षण चिडणं सोपं काम नसते.असावा लागतो एकादा फोटो असा लेकराचा .फेसबूकला पोस्ट करता येते नाहीतर डीपी वगैरे करता येते किंवा व्हाॅटस अपला स्टेटस् ठेवता येते पण ते लहानग्य काही रडायचं थांबत नव्हतं.उलट त्यंनी अंदोलनाचा जोर व गती वाढवली .त्याची कुणी दखल घेत नव्हतं. ते अंदोलन चिरडून टाकण्यासाठी डायव्हर आला .त्याला कवळीत उचललं आणि जोरात नेऊन बसमधी मधल्या सीटवर टाकल नि एक हाग्या दम टाकला. "आवाज करायचा ना... आवाज आला तर एका एकाला गाडीच्या खाली फेकून देत असतो."सा-या बस मध्ये गंभीर शांतता पसरली.सन्नाटा छा गया .त्या क्षुद्र जीवानं केवीलवाणा प्रयत्न केला .ती सर्व लूडबूड व्यर्थ ठरली.
"सायेब,कशाचा लाड करायचा .किती ही लाड करायचा पण साळाचा अजिबात लाड करायचा नाही ."
"लहान अजून ...!" बाप
"लहान आहे पण शिकायला पण पायजे.घडी हुकली म्हणजे पिढी हुकली ."
"तसं लय्यी हुश्शार .ए बी सी डी लिहतोय.वन टू येत .घरी फार मेहनत घेते." इति मम्मी.
"आता तुम्ही एवढया मोठया पोस्टवर म्हणल्यावर तुमचं नाव राहिल पायजे.उग लेकरानं साळातच यायच नाय म्हणजे ...फर्स्ट स्टॅंड्रर पर्यंत त्याच बेसिक पक्क व्हायला पायजे."
"मी नाय लाड करत .यांचाच फार लाड असतो." सजग माता पालक.मम्मी.
हे सार संभाषण चालु असतानी ते लहानगं काही गप्प नव्हतं.त्याला शाळेत जायचंच नव्हतं.त्यानं तिथचं काचावर बुक्या मारायला सुरू केल.आत मध्ये त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न झाला .त्यानं अधिकच वेग वाढवला.शांततेत चाललेल्या अंदोलनाला हिंसक वळण लागायला काय लागतं? ते लहानगं अधिक आक्रमक झालं.आता मात्र सा-यांचाच संयम सुटला .बापातला भंयकर डॅडी जागा झाला.ते पुढ सरसावले.लच्चा लच्चा त्याचं गाल लुचले.एक दिली ठेवून .आता तो मार नव्हता.ती ट्रिटमेन्ट होती.मारा भेणं भूत पळतं.ते लहानगं गप झाल.त्यानं "मम्मी ..मम्मी "म्हणून आर्त किंकाळया ठोकल्या.मम्मीच्या खुशीत दडायची तीव्र अपेक्षा केली. गाडी चालू झाली.ती क्रूर मम्मी तिथचं उभी होती .त्याला बाय बाय करत होती. त्या चिमुकल्याचं एक स्कूलबसमध्ये असतानाच क्षण त्या कॅमे-यात टिपू शकली.त्याच्या मम्मीच्या चेह-यावर एक अनोख समाधन पसरलं होतं.त्या लहानग्याच्या भविष्याची असंख्य स्वप्न तिच्या डोळयात दाटली होती.स्वप्नांची नशा सर्वात भंयकर नशा असते.त्यामुळेच आईचं वात्सल्य आटून तिची मम्मी होते आणि बापाचा डॅडी ... सारेच खलनायक !!
. . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
...9527460358
या खलनायकांच करायचं काय?
Submitted by Prshuram sondge on 24 June, 2019 - 10:19
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम खलनायक????
एकदम खलनायक????
प्रसंग अतिरंजित वाटला.
आज मुल रडतयं पण उद्या शाळेत गट्टी जमली की हसत हसत जाईल.
>>बापातला भंयकर डॅडी जागा झाला.ते पुढ सरसावले.लच्चा लच्चा त्याचं गाल लुचले.एक दिली ठेवून>>>
>>त्यामुळेच आईचं वात्सल्य आटून तिची मम्मी होते आणि बापाचा डॅडी ... सारेच खलनायक !!>>>
हे मात्र अजिबात पटलं नाही. आई/ ममा,/ माय/अम्मी आणि बाबा/ पप्पा/ अण्णा/ डॅडी काहीही म्हणा त्यांची माया कधी आटत नाही .
छान लिहिलंय. छोट्यांचे जग आणि
छान लिहिलंय. छोट्यांचे जग आणि त्या मुलाच्या भावना फार प्रगल्भपणे मांडल्यात.
त्या त्या वेळी त्या मुलांसाठी ही सर्व मंडळी कुठल्याही व्हिलनपेक्षा कमी नसतात !
शिस्त प्रेमानेही लावता येते,
शिस्त प्रेमानेही लावता येते, माझ्या घरातलं उदाहरण आहे समोर.. माझा भाचा खेळायला लागला की त्याच्याइतका दंगा कोणीच करत नाही, आणि त्या खेळण्यासाठीचा वेळ त्याचा असतो, त्यात तो कुणाचंही ऐकत नाही.. मात्र त्या ठराविक वेळेतच. Screen time पण फिक्स आहे, घड्याळ कळत नाही पण त्याला समजा 9.30 वाजता सांगितलं की छोटा काटा 10 वर येईपर्यंत study time आहे तर बसतो अभ्यासाला.. आणि त्यात किती pages भरायचे हे पण माहीत असतं. नीट केलं सारं तरच खेळता येणार हे माहीत असतं म्हणून चुकत नाही. Icecream day आणि चॉकलेट डे ठरले आहेत, शनिवार - रविवार, म्हणून इतर दिवस तो मागत पण नाही. खूप गोड कोकरू आहे! त्याला मारायचं म्हणजे ताईला मनाची फार तयारी करावी लागते.. मूलच ते, कधीतरी चुकतं.. पण एकाच गोष्टीसाठी 2 वेळा शिक्षा द्यायची गरज पडत नाही!
थोडक्यात काय, आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला फटकावण्याशिवाय आमच्या आईबाबांकडे दुसरा पर्यायच नव्हता, आता बरेच पर्याय आहेत..
मस्त लिहिलंय. शाळेचा पहिला
मस्त लिहिलंय. शाळेचा पहिला दिवस.
मला मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी बालभारतीमधला आज शाळेचा पहिला दिवस. जगन भेटेल. कमल भेटेल धडा आठवतो.
एकांगी लेखन !
एकांगी लेखन !
अगदीच अतिरंजीत वाटतोय लेख
अगदीच अतिरंजीत वाटतोय लेख
अडीच-तीन वर्ष वय शाळेत जायचं
अडीच-तीन वर्ष वय शाळेत जायचं खरच न पटणारा बदल. कालाय तस्मै नमः.
मी लहान असताना गावी ७ वर्षाचं पोर शाळेत जायला खूष नसायचं. सात वर्षांचा होईपर्यंत भरपूर उंडरायचे मग शाळा म्हणजे बंधन वाटायचं. बाप खांद्यावर उचलुन घ्यायचा पण काही धटींगण पोरं खांद्यावरून उडी टाकायची. पण नंतर लिबर्टी विषयी वाचन झाले आणि पटले जेव्हा खरं स्वातंत्र्य म्हणजे काय हे नीट कळत नाही तेव्हा त्याच्यावर चांगल्या हेतूने आणलेले बंधन कल्याणकारी असते .
उठसूट फोटो काढणे जरा अतीच होतयं.
लेख वास्तववादी . आवडला. पण कथा विभागात कसा ?
क्षमस्व! परंतू जराही सहमत
क्षमस्व! परंतू जराही सहमत नाही.
आमच्या घराशेजारीच नर्सरी, के जी वगैरे लहान मुलांची शाळा आहे. मुलं तर रडतातच, पण त्यांच्याशी अशी क्रूर वागणूक कोणीच करत नाही.
याऊलट मला शिक्षिकांचीच दया येते...
पद्म सहमत. शिक्षकांची खरोखर
पद्म सहमत. शिक्षकांची खरोखर कसोटी लागते. पण त्यांचा संयम सुटलेला मी पाहिला नाही सहसा. शिक्षक छान सावरुन घेतात मुलांना. मुलंही सुरवातीचे काही दिवस त्रास देतात पण नंतर त्यांना रविवारीदेखील शाळेत जायचे असते.
बाकी पहिल्या दिवशी लहान मुलं जो प्रकार करतात, म्हणजे रडणे, आई बाबांच्या इमोशन्सला हात घालने (हो, मुलं हे करतात) ते सगळं पाहून पोटात कालवाकालव होते अगदी. मरो ती शाळा असे वाटून जाते क्षणभर.
आमच्या वेळी उजव्या हाताने
आमच्या वेळी उजव्या हाताने डोक्यावरुन डाव्या कानाला स्पर्श केला की ॲडमिशन मिळत असे.
आई वडील शिक्षक असल्याने मी शाळेत कधी जायला लागलो ते आठवत नाही.
लेख एकदम आवडला. हे मम्मी
लेख एकदम आवडला. हे मम्मी पप्पा वाले, इंग्लिश मिडीयम वाले पालक खलनायक असतातच. त्यात नोकरी करणारी आई तर एकदम बकवास. या लेखात पिझ्झा बर्गर चा उल्लेख नाही हे मात्र खटकले, अशा लेखात तो असायलाच पाहिजे. त्यामुळेच आपली संस्कृती धोक्यात आहे. पुढच्यावेळी लक्षात ठेवा
ड्राय्व्हर काकाला पाल्कांच्या
ड्राय्व्हर काकाला पाल्कांच्या स्टेटस आणि पोरांच्या बेसिक पक्कं/ भविष्याची फार काळ्जी लागून रैलीय.
मुलगा रडतोय म्हणून त्याचे गाल
मुलगा रडतोय म्हणून त्याचे गाल गुचकुन थोबाडावर मारणारी आई बघितलीय आताच गेल्या आठवड्यात.
शिक्षकांचा संयम कमाल असतो.
लसावी बिंगो
लसावी बिंगो
<<<लेख एकदम आवडला. हे मम्मी
<<<लेख एकदम आवडला. हे मम्मी पप्पा वाले, इंग्लिश मिडीयम वाले पालक खलनायक असतातच. त्यात नोकरी करणारी आई तर एकदम बकवास. या लेखात पिझ्झा बर्गर चा उल्लेख नाही हे मात्र खटकले, अशा लेखात तो असायलाच पाहिजे. त्यामुळेच आपली संस्कृती धोक्यात आहे. पुढच्यावेळी लक्षात ठेवा
Submitted by लसावि on 25 June, 2019 >>>
नेहमी पिझ्झा बर्गरच का बरं दोषी? पास्ता, मंचचूरियन, फ्रेंच फ्राईज किंवा अगदीच गेला बाजार मॅगी नूडल्स का नाहीत?
सिरियसली विचारते आहे.
मॅगी तर मराठमोळा पदार्थ आहे
मॅगी तर मराठमोळा पदार्थ आहे मी लहान असल्यापासून.
अगदीच अतिरंजीत वाटतोय लेख >>
अगदीच अतिरंजीत वाटतोय लेख >> + ११११, नाही आवडला, ईतके कोणीच क्रुर नसतो, अन ईतक्या लहान मुलाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी त्याला स्कुल बस ने न जाऊ देता, आई-वडील स्वत: जातात, किमान आई तरी नक्कीच
<<<.फेसबूकला पोस्ट करता येते नाहीतर डीपी वगैरे करता येते किंवा व्हाॅटस अपला स्टेटस् ठेवता येते>>> हेही नाही पटले, फोटो म्हणजे काही फक्त फेस्बुक अपडेट किंवा डिपी नसतो, त्या आठवणी देखिल असतात, आपण त्याच्याकडे कसे बघतोय त्यावर ते अवलंबुन आहे म्हणतात न द्रुष्टी तशी स्रुष्टी.
<<<आई/ ममा,/ माय/अम्मी आणि बाबा/ पप्पा/ अण्णा/ डॅडी काहीही म्हणा त्यांची माया कधी आटत नाही .>>> ममो+१११११
थोर महात्मे बोलून गेले मुले
थोर महात्मे बोलून गेले मुले देवाघरची फुले, आणि याच देशात ही भयंकर घटना घडावी? खरोखरच संस्कृती धोक्यात आहे, हे थांबलं नाही तर मानवजातीचा विनाश अटळ आहे.दोषींवर कडक कारवाई व्हावी तसेच मुलांना शाळेत न पाठवता शिक्षकांनी मुलांना घरी जाऊन शिकवावे अशी मागणी मी सरकारकडे करत आहे.जेणेकरून या देशात जास्तीत जास्त रोजगार संधी उपलब्ध होतील आणि भारत महासत्ता बनेल.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=c06wJ56bPbk
मॅगी तर मराठमोळा पदार्थ आहे
मॅगी तर मराठमोळा पदार्थ आहे मी लहान असल्यापासून.
>> हे एकदम बरोबर.माझ्या शाळेत बऱ्याच मुलांच्या डब्यात म्यागी असायची.
(No subject)
Whatsapp वर टाका लय वायरल
Whatsapp वर टाका लय वायरल होईल
सर्वांचे मनस्वी धन्यवाद
सर्वांचे मनस्वी धन्यवाद
मी तरी असलं चित्र आजपर्यत
मी तरी असलं चित्र आजपर्यत पाहीलं नाहीये.
पण मला तरी नाही वाटत पालक मुलांच्या बाबतीत इतकी टोकाची भुमीत घेत असतील.
आई वडीलांच प्रेमाच्या बाबतीत
आई वडीलांच प्रेमाच्या बाबतीत शंका नाही. ते सारं करतात ते आपल्या मुलांसाठीच.पण 2-3 वर्षाच्या मुलाला शाळेत टाकून त्याला रेस का घोडा समजणा-या काही पालकाची ही कथा आहे. त्याच्याच बालकांची ही व्यथा आहे. सर्वानाच ही कथा आवडायची असं नाही.प्रतिसादाबद्दल सर्वांचे शतशः आभार.
अजुन लेख येऊद्या, पटला नाही
अजुन लेख येऊद्या, पटला नाही तर टिका करनार आणि आवडला तर कौतुकही करनार.
>> 2-3 वर्षाच्या मुलाला शाळेत
>> 2-3 वर्षाच्या मुलाला शाळेत टाकून त्याला रेस का घोडा समजणा-या काही पालकाची ही कथा आहे.
लेख आणि या प्रतिसादाशी सहमत आहे. लेखकाने थोडेफार अतिरंजित वर्णन केलं आहे असे क्षणभर मानले तरीही तो अतिरंजितपणा सोडला तरी काही पालकांचा कल मुलांना मारहाण करण्याकडे असतो हे वास्तव सुद्धा मनस्वी चीड आणणारे आहे. अनेक पालक असे आहेत अजूनही. असे पालक हरलेले असतात. मुलांना समजून घेण्यात ते अपयशी झालेले असतात. किंवा मुलांची मानसिकता जाणून त्यांना समजवायचे कसे हे शिकायची त्यांची वृत्ती नसते. अनेक कुटुंबांमध्ये मोबाईलचे व्यसन (हो व्यसनच) किंवा अन्य ताणताणाव यामुळे आजकाल पालक चीडचिडे झालेले दिसतात. "कुठे ह्याच्या रडण्यावर वेळ घालवायचा? त्यापेक्षा एक रट्टा हाणला कि झाले" असा हिशेब करतात. "शाळेत टाकले कि काम झाले" असा शॉर्टकट विचार करणारे पण खूप आहेत. दुर्दैव म्हणायचे!
पूर्वी एक दिवस माझा मुलगा सुद्धा शाळेत जायला तयार नव्हता. रडून गोंधळ घातला. व्हॅनवाला ड्रायवर म्हणाला, "अशी करतातच मुले. तुम्ही खांद्याला धरा मी पाय पकडतो. गाडीत कोंबून दार बंद करू". अर्थात हा (अघोरी) प्रकार त्याने त्यापूर्वी कधीतरी इतर काही मुलांना त्यांच्या पालकांच्या सहमतीने केला असणार. म्हणूनच मला सांगायचे धाडस केले. मी म्हणालो, "काही गरज नाही. तो आज शाळेला जाणार नाही. आणि उद्यापासून तुम्ही त्याला घ्यायला येऊ नका". त्या दिवशी त्याची शाळा बुडाली. पण त्याच दिवशी तो खूप काही शिकला सुद्धा. मी त्याला फिरायला घेऊन गेलो. त्याच्याशी खेळलो. गप्पा मारल्या. पण त्यानंतर पुन्हा त्याने असा प्रकार कधीच केला नाही. मुलांना समजून घेऊन त्यांच्यात प्रेम आणि विश्वास निर्माण करून त्यांच्यात बदल घडवणे तसे अवघड नसते. पण आजकाल "वेळ नसतो" अनेक पालकांना त्यासाठी!
अतुल खूप धन्यवाद. असे समंजस,
अतुल खूप धन्यवाद. असे समंजस, प्रेमळ पालक असतील तर मुलं कधीच हट्टी, दुराग्रही, गुन्हेगार होणार नाहीत.
अतुलजी प्रतिसाद आवडला.
अतुलजी प्रतिसाद आवडला.
अतुलदा तुमचं म्हणणं अगदी पटल.
अतुलदा तुमचं म्हणणं अगदी पटल..
Pages