चिकन बनी चाओ (Chicken Bunny Chow)

Submitted by .......... on 23 June, 2019 - 14:32
chicken buny chow
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

४०० ग्रॅम चिकनचे तुकडे
धने पावडर एक चमचा
जीरे पावडर अर्धा चमचा
घरचा मसाला आवडीप्रमाणे
लाल तिखट आवडीप्रमाणे
हळद अर्धा चमचा
जीरे पाव चमचा
बडीशेप पाव चमचा (हवीच)
दालचीनीचा तुकडा: दिड इंच
चार लवंगा
चार पाच भरडलेले मिरे
दोन तमालपत्रे
दोन बटाटे (ऐच्छीक)
दोन लहान कांदे
दोन चांगले पिकलेले टोमॅटो
आलं लसुन पेस्ट दोन चमचे
कोथिंबिर, कढीपत्ता
दोन हिरव्या मिरच्या बी काढून, तळून
मिठ
तेल एक चमचा, तुप एक चमचा. (शक्यतो तुप वगळू नये)
स्लाईस न केलेला ब्रेड

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका वाटीत धने-जीरे पावडर, लाल तिखट, चिकन मसाला, हळद हे एकत्र करुन त्याची पाण्यात पेस्ट करुन बाजूला ठेवावी.
पॅनमध्ये तुप व तेल टाकून जीऱ्याची व बडीशेपची फोडणी करावी. त्यात लवंग, दालचीनी व तमालपत्र टाकावे. जीरे चांगले फुलून आले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतुन घ्यावा. कांदा परतल्यावर त्यात आलं लसुन पेस्ट टाकून चांगले परतावे. बियांचा भाग काढून बारीक चिरलेले टोमॅटो परतावे व पाच मिनिट झाकण ठेवावे. टोमॅटो शिजुन कांद्याबरोबर मिळून आले की त्यात तळलेल्या मिरच्या टाकून चमच्याने चुरडून घ्याव्यात. तेल सुटू लागले की त्यात सर्व मसाल्यांची केलेली पेस्ट टाकावी. तेल सुटेपर्यंत परतावे. मसाला परतुन झाल्यावर त्यात चिकनचे व बटाट्याचे तुकडे टाकावेत व रंग बदलेपर्यंत परतुन घ्यावे. चिकन परतुन झाल्यावर त्यात प्रमाणात गरम पाणी घालावे. काही कढीपत्याची पाने हाताने चुरडुन घालावीत. मिरपुड आणि मिठ घालावे व एक चमचा तुप घालून मंद गॅसवर चिकन शिजू द्यावे. चिकन शिजून रस्सा हवा तेवढा घट्ट झाला की गॅस बंद करावा व वरुन गरम मसाला पावडर टाकून, व्यवस्थित हलवून दहा मिनिटांसाठी झाकण ठेवावे.

स्लाईस न केलेला अर्धा ब्रेड लोफ घेवून त्याच्या आतील मऊ भाग काढून जागा करावी. त्यात वरील चिकनचे पिस ठेवून वरुन घट्ट मसाला (रस्सा) टाकावा. आतील निघालेल्या मऊ तुकड्यावरही रस्सा टाकावा. गरम असतानाच खायला घ्यावे.

१.
1.jpg
२.
2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. चिकनचा रस्सा पातळ न करता अगदी अंगाबरोबर करावा.
२. ब्रेडमधे रस्सा शोषला जातो तसतसे त्याची चव छान होत जाते.
३. फोटो काढायचा असल्याने रस्सा वरुन टाकला नाहीए.
४. मुळ पाककृतीत मी मला हवे तसे बदल केले आहेत. तुम्हाला हवा तसा बदल तुम्ही करु शकता. गार्निशिंगसाठी वरुन उकडलेले अंडे किसुन टाकले की छान दिसते.
५. ही पाकृ माझा नवरा उत्तम करतो. घरी एकटा असला की त्याची ही आवडती डिश आहे
______________________________
नवऱ्याच्या साऊथ अफ्रिकेत असलेल्या एका मित्राने ही रेसेपी शिकवली होती. त्यात मला हवे तसे थोडेसे फेरफार करुन मी आम्हाला आवडेल अशी बनी चाऊ ही पाककृती बनवली. मुळ पाककृतीमधे मटनच घ्यायला सांगितलेय पण मला ब्रेडसोबत चिकन जास्त आवडते. हा पदार्थ व्हेजही छान लागतो. मटार आणि बटाटा घेऊन, बाकी कृती सेम ठेवायची. ब्रेड जसजसा घट्ट रस्सा सोक करतो तसतसा बनी खायला मजा येते.

पुर्वी हॉटेलमधे काम करणारे लोक मालकाने दिलेले कोरडे ब्रेड खाऊन दिवस काढत. त्यातल्याच कुणीतरी जरा डोके चालवून ब्रेड आतुन पोखरला आणि त्यात लॅम्बचे पिस लपवून बाहेर न्यायला सुरवात केली आणि या पाककृतीचा जन्म झाला. अर्थात ही माहिती मित्राकडून कळालेली.
------------------------------------

माहितीचा स्रोत: 
.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपूर्ण पाककृती छान, प्रचंड तोंपासू.
ब्रेड न वापरता करून बघेन, आणि प्रॉपर भाकरी अथवा कडक तेल लावलेल्या चपातीबरोबर खाईन!

मस्त रेसिपी आहे.

अनकट ब्रेड आता सर्रास मिळतो का माहीत नाही, अय्यंगार बेकरीत मिळेल बहुतेक. त्या मऊ ब्रेडसोबत खायला तर बहार येईल.

स्लाइस असल्या तरी पोखरता येईल.

काहीतरी तसेही करतात , एक स्लाइस पोखरायची, ती दुसर्यावर ठेवायची, त्यात मसाला घालायचा आणि अजून एक स्लाइस ठेवून बंद करायचे, 1 रूम स्टुडिओ अपार्टमेंट

सगळ्यांना धन्यवाद!
मी पोस्ट केलेली पहीलीच पाककृती आहे ही.

महाश्वेता मी ही रेसेपी केली की माझ्यासाठी दोन पोळ्या करते वेगळ्या. Happy

maitreyee एका ब्रेडचे साधारण तिन पिस होतात. प्रत्येकाला एक एक पिस चिकन भरुन वरुन ग्रेव्ही टाकुन देता येते. एकत्र खायला तर छानच वाटते. Wink

साधनाताई आमच्या बेकरीवाल्याला सांगीतले की तो एक लोफ घरी पोहचवतो कट न करता. बऱ्यापैकी गरम असतो. एकदम फ्रेश. मी ब्रेड नेहमी अनकटच घेते. घरात जाड स्लाईस आवडतात म्हणून.

'सिद्धि' नक्की करुन पहा. बाहेर पाऊस असेल तर मजा येते हे खायला. जरा मेसी प्रकरण आहे पण छान वाटते. फोटो नक्की द्या.

मस्त ... भूक लागली ना Happy

वैशाली हरिहर...वाचून काहीतरी कळल्यासारखे वाटले...नंतर एकदम शालीजी आठवले Happy

एकदम तोंपासु रेसीपी आहे.

ही पाकृ माझा नवरा उत्तम करतो. घरी एकटा असला की त्याची ही आवडती डिश आहे
>>>> बर झालं सांगितलत, कंपनी द्यायला जाईन मी Proud

आबा मी एकटा असलो की मगच करतो. सोबत कुणी असले की पाककलेतले माझे ज्ञान एकदम शून्य होते. Lol
पण तू ये खरच. करूयात आपण.

पल्लवी नक्की करून पहा. छान लागते. आतला लुसलूशीत पार्ट खायला मजा येते.
मी तर याचे काहीही करतो. एकदा ब्रेड पोखरून त्यात फरसाण भरले व वरून रात्रीचा उरलेला मटकीच्या उसळीचा रस्सा टाकला. चिकनपेक्षा भारी लागले.
आमच्याकडे मिळणारा ब्रेड जरा गोडसर असतो. मला आवडतो त्यामुळे.

ह्या असल्या पाककृती लिहून लोकांना आज सोमवारी चिकन खाण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध!!!!
पण मनावर कंट्रोल करून उद्या खाईन!!!
Lol
अज्ञातवासी @ कुणी चिकन देता का रे चिकन!

एकदा ब्रेड पोखरून त्यात फरसाण भरले व वरून रात्रीचा उरलेला मटकीच्या उसळीचा रस्सा टाकला. >> मिसळ बनी चाऊ Happy मस्त लागतं.

Misal Bunny Chow small.jpg

वैशाली मस्त पाककृती. फोटो सॉलिड आला आहे. पुढच्या रविवारी नक्की करून बघेन.
ब्रेड लोफ चा फोटो एकदम यम्मी

मनिष भारीच फोटो. चिकनपेक्षा हे खुप छान लागते. मला वाटले हा प्रकार माझ्याच वेड्या डोक्यातुन आला असावा. पण या पध्दतिनेही मिसळ बनी खाणारे आहेत हे पाहुन मस्त वाटले. Happy
आता उद्या करणे आले.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे खुप आभार.

पल्लवी व्हेज करुन पहा एकदा.

पलक थँक्स ग तुझे. मला अगदी आक्का करुन टाकलेस. Happy

मनीष फोटो खुपच छान. आम्ही एकदोन वेळा असंही केले होते फरसान टाकून.

सामी आप्पा सांगत होते तू येणार आहेस हे खान्यासाठी. कधी येतेस सांग?

विनिता खुप धन्यवाद प्रतिसादासाठी. वर्षा तुमचेही आभार.

काय अफलातून फोटो आहे.एकदम मस्त.
वैशाली हरिहर...वाचून काहीतरी कळल्यासारखे वाटले..>>> काल ही पाकृ वाचाताना हेच डोक्यात आले होते.कही वो तो नहीं म्हणून!

धन्यवाद देवकी! फोटो शालींनी काढले आहेत. Happy

'शाली' हे अगोदर माझे खाते होते पण पासवर्डच्या गोंधळामुळे आप्पांनी (शालींनी) ते वापरायला सुरवात केली. नाव बदलायला विसले ते. Wink नंतर त्यांच्या खात्याचा पासवर्ड कसाबसा मिळवून मी त्यांचे खाते प्रोफाईलमधे बदल करुन माझ्यासाठी घेतले. त्यामुळे मी नुकतीच मायबोलीवर येऊनही सदस्य असल्याचा काळ ७ वर्ष दिसतो आहे. Happy

मस्त फोटो! चिकनची पाकृ आवडली मात्र ब्रेड मोजकाच खायला परवानगी आहे त्यामुळे मिसळ बनी करेन . चिकनसोबत ब्राऊन राईस. .

Pages