Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23
सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.
सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मामी नाही. तो काकूच म्हणतो
मामी नाही. तो काकूच म्हणतो तिला. बँगलोरला पाठवलेल्या काकाची बायको.
सिदला कळलं होतं, पुढे काय झालं.>>> दुर्गाबाईंनी त्यांची बाजू घेऊन सिदला गप्प केल. मग त्याने काकाकडे पाठवायची धमकि दिली.
काकूच की ती. विजय पटववर्धनची
काकूच की ती. विजय पटववर्धनची बायको. संयोगिता आणि सानवी. यातली सानवी आत्तेकडे असते. सिध्याची काकू सारखी सारखी अनूच्या घरी जाऊन अनूच्या वहिनीकडे पैसे मागते आणि चेक आपल्या खात्यात जमा करत अस्ते. एक दिवस वहिनी सिद्धार्थला फोन करून हे सांगते. तो वहिनीच्या अकाउन्टची स्टेटमेंट्स काढतो आणि आई -वहिनीपुढे ठेवतो. मग दुर्मा मॅडम तिची तासंपट्टी करते आणि असं काही रुपड्यांसाठी दुसर्याच्या दारावर जाणे आपल्यासारख्याला शोभते का म्हणून तिचे जाणे बंद करते.
असं काही रुपड्यांसाठी दुसर्
असं काही रुपड्यांसाठी दुसर्याच्या दारावर जाणे आपल्यासारख्याला शोभते का म्हणून तिचे जाणे बंद करते.>> त्यानंतर काकूला दुसर्या कामाला लावते. ती वहिनीला पैसे देऊन सिद आणि अनुची मैत्रि तोडायचे काम देते.
सानवी नक्की कोणाची मुलगी असते
सानवी नक्की कोणाची मुलगी असते. अनूची सासू म्हणते की अनूला आता बांधून ठेऊया, वेडी आहे का ती. अनू म्हणते की सासू बदलली आहे आणि छान वागतेय तिच्याशी, अनू ठोंबी आहे का
महाठोंबी दाखवलंय तिला. जुन्या
महाठोंबी दाखवलंय तिला. जुन्या मराठी चित्रपटात सोशिक सून दाखवायचे तशी अनू आहे. सानवी अनूच्या सासूची भाची म्हणजे भावाची मुलगी आहे.
अनु ची वहिनी एकदा बरोबर
अनु ची वहिनी एकदा बरोबर बोललेली अनुला "वन्सं तुम्ही ज्यांच्यावर चालतं त्यांचावर खुप गाजवता," ( जेव्हा सिध्दार्थ माफी मागत असतो अनुची आणि ही जाम तयार नसते माफ करायला तेव्हा)
अनूची भावजयी दिसायला
अनूची भावजयी दिसायला चारचौघींसारखी असली तरी चेहऱ्याने अभिनय भारी करते.
माधवी जुवेकर आहे ती, चांगली
माधवी जुवेकर आहे ती, चांगली अभिनेत्री आहे.
अनुची वहिनी, माधवी जुवेकर
अनुची वहिनी, माधवी जुवेकर उत्तम अभिनेत्री आहे, कोणतीही भूमिका समरसून करते. विशेषतः काॅमेडी एक्सप्रेस, काॅमेडीची बुलेट ट्रेन आणि फुबाईफुमध्ये तर धमाल उडवून दिली होती. तिची विनोदी भूमिकांवर जेवढी पकड आहे तेवढीच नकारार्थींवरही आहे. मात्र तिला तेवढी प्रसिद्धी भेटली नाही. माझ्या मते अनेक वर्षांनंतर मोठ्या भूमिकेत दिसत आहे. एक-दोन वर्षांपूर्वी झी मराठीवरील 'जागो मोहन प्यारे' मालिकेत मोलकरणीच्या भूमिकेत सुरूवातीच्या 2-3 दिवस दिसली होती. नंतर हिचे सुप्रीया पाठारेशी भांडण होते आणि ही धमकी देत काम सोडून जाते. पुढे हिच्या जागी श्रूती मराठे कामावर येते.
मी कुठे तिला वाईट म्हटलं. उलट
मी कुठे तिला वाईट म्हटलं. उलट अशोक, लक्ष्या यांच्यासारखी दिसायला साधी आहे व त्यांच्या सारखा अभिनय भारी करते असं म्हणायचं होतं. I mean to say her body language is good for acting.
सानवी तर ठोंबी आहेच पण
सानवी तर ठोंबी आहेच पण सगळ्यात ठोंबेश्वर म्हणजे अनु आहे. सिद्धार्थ हिच्यावर खरं प्रेम करतोय ते ह्या ठोंबेश्वराला समजत नाहीय आणि सासू खोटं खोटं प्रेम करतेय हेसुद्धा.
धनुडी तुम्ही
धनुडी तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वभाव असल्याने अनु बहुतेक सिद्धार्थ ला फारच अनुनय करायला लावत आहे. तेव्हा मात्र कठोरपणे वागू शकते ती.
माधवी जुवेकर हिने टिंग्या नावाच्या मराठी चित्रपटातही फार सुंदर काम केले आहे.
सगळ्यांबद्दल लिहिलंय पण
सगळ्यांबद्दल लिहिलंय पण सिध्दार्थ च्या आजी बद्दल कुणीच लिहिलं नाही. मस्त काम करतात.
ती नयना आपटे आहे. (
ती नयना आपटे आहे. ( तुमच्यासाठी लिहीते - चुकभुल द्यावि घ्यावी मधे दिलीप प्रभावळकरची ९० की १०० वर्षाची आई झाली होती) जुनी अभिनेत्री फार्सीकल नाटकात हुकमी एक्का आहे ती . कधी कधी लाउड होतं पण मला आवड्ते.
हो तिकडे पण छान काम करायची.
हो तिकडे पण छान काम करायची. अर्थात इथे एवढं लाउड नाही.
सानवी तर ठोंबी आहेच पण
सानवी तर ठोंबी आहेच पण सगळ्यात ठोंबेश्वर म्हणजे अनु आहे.>>> +१
हिचा प्रेम विवाह झाला होता. मुलाने प्रपोज केल्याचा अनुभव आहे तिला. तरिही आता हा कसा बघतो, कसा बोलतो, काय सांगायचा प्रयत्न करतो यातले काही कळत नाही.
आधि सान्वीसाठी त्याला विचारते आता विशुसाठी विचारले तर धन्य!
सिद्धार्थ सारख्या मुलाच्या
सिद्धार्थ सारख्या मुलाच्या मागे इतर कुणि मुली लागत नाहीत का?
सानवी? ती यडपट सायको?
एव्हढे प्रसिद्ध लोक, श्रीमंत, मग इतर कुणाच्या नजरेत भरत नाही का तो? अनूपेक्षा जास्त चांगली मुलगी सहज मिळेल त्याला!
नि त्याची आई तरी अनू नको तर सानवीच का पाहिजे? इतर मुली नाहीत?
स्वयंवर करत होते त्याचं मागे
स्वयंवर करत होते त्याचं मागे पण त्याला बहुतेक ते आवडलं नाही आणि तो निघून गेला तिथून. हे टोक नाहीतर ते टोक, मध्ये काही नाहीच.
सगळे पात्रांना नावे ठेवत आहेत
सगळे पात्रांना नावे ठेवत आहेत. पण अहो सुज्ञ जण लेखकाने जे लिहिले तसेच ती वागणार हे आपण विसरतो.
लेखाने पात्रे जशी लिहीली आहेत
लेखाने पात्रे जशी लिहीली आहेत, त्याला नावे ठेवत आहेत. पात्रांचा दोष नसतोच. लेखकाने ज्या उद्देशाने एखादे पात्र लिहीले, दिग्दर्शकाला काय वाटले, तो उद्देश पात्राचे काम करणार्या नटाच्या/नटीच्या अभिनयातून जे साकार होतं ते आपल्याला दिसते.
जे दिसते ते आवडले की नाही एव्हढेच लिहितात लोक. ना पात्राला कुणि वैयक्तिक स्तरावर दोष देत नाहीत ना अभिनेता/अभिनेत्रीला.
दुर्गाबाईला तरी किती करारी
दुर्गाबाईला तरी किती करारी दाखवावं? स्वतःच्या मुलालाच धडा शिकवायला निघाली? आणिती संयूसुद्धा विसरली का की तिच्या लग्नालाही आईचा विरोध होता तेव्हा सिद्धार्थनेच समजूत घातली होती? संवाद लेखक आणि कथावाले काय झोपा काढतात की काय? तीन चार एपिसोड्सपूर्वी सानवीला अनूला स्विमिन्ग पूलमध्ये पाडण्याच्या प्रयत्नाचा जाब विचारतात तेव्हा ती सांगते की अनूची वहिनी येऊन आत्तूला अपमानास्पद बोलली म्हणून राग येऊन तिने हे कृत्य केलं. पण अनू पडल्यामुळे तिला उशीर होतो आणि आत्तू तिला घरात घेत नाही तेव्हा वहिनी येते आणि तेव्हा आत्तूशी भांडून अनूला घरी नेते. म्हणजे या भांडणापूर्वीच सानवीने ते सगळं केलेलं असतं.
ते सोडा पण आजच्या एपिसोडमधला शशांकचा अभिनय खूप छान झालाय.
या सगळयात सुखाच्या सरी कुठे
या सगळयात सुखाच्या सरी कुठे आहेत???
फक्त मालिकेच्या नावातच का ??
सानवी इतकी मारधाड का करते,
सानवी इतकी मारधाड का करते, आधीही तिने त्या नळीला मारहाण केली होती. मारधाड परवडली पण अनुचे खोटे बोलणे आणि सिडपासून लपवणे डोक्यात जाते.
आता बेघर झाल्यामुळे अनुला
आता बेघर झाल्यामुळे अनुला विचारण्याचा विचार पुढे ढकलला जाईल. त्यातून तो बेघर का झाला हे अनुला कळणार नाही. त्याच्याकडे काहीच नाही म्हणून वहिनी त्याला जावई करायचा विचार सोडून देईल. पण महान अनु त्याला शून्यातून वर यायला मदत करेल. तिकडे काकूचा मुलगा घरी येईल आणि कंपनीचा ताबा घेईल. मुलगा अनुला मिळला म्हणून दुर्गा सैरभैर होईल. महान अनु तिलाही बरे करेल.
पण त्यापूर्वी तो दारू पिऊन
पण त्यापूर्वी तो दारू पिऊन देवदास सारखी रडकी गाणी म्हणेल. मग रस्त्यावरचा भिकारी त्याचा अपमान करेल, उपाशी असल्याने रस्त्यावर पडलेला ब्रेडचा तुकडा खाईल! त्यात तीन चार दिवस गेले की अचानक अदृश्य नवरा असलेली अनूची ऑफिसातली मैत्रिण त्याला बघेल नि चक्रे फिरून परत अनूची भेट होईल. मग भावाच्या संसाराबरोबर ती सिद्धार्थलाहि पोसेल. कारण ती अनू आहे. स्वतः उपाशी राहील पण इतरांना खायला घालेल. मग सिद्धार्थ टॅक्सी ड्रायव्हरचे काम करेल (आठवा माझ्या नवर्याची बायको नि पुढचे प्रसंग!)
नि आपण ते सगळे बघत बसू!
शशांक दिसतो मात्र राजबिंडा.
शशांक दिसतो मात्र राजबिंडा.
शशांक दिसतो मात्र राजबिंडा. >
शशांक दिसतो मात्र राजबिंडा. >>> हो ना. मी प्रोमोज बघते bb बघताना. डोळेपण सॉलिड आहेत आणि अभिनय सहज. दुसरी कोणी हवी होती अनु. ह्या उदासवाण्या अनुमुळे नको वाटतं बघायला.
शशांक दिसतो मात्र राजबिंडा...
शशांक दिसतो मात्र राजबिंडा..... तो पडद्यावर दिस्तो त्या पेक्शा खुप छान प्रत्यक्शात दिसतो, त्याच्या लग्नात तो आला तर आम्हाला आधी वाटल यान किति तो मेकअप केलाय, पण तो विना मेकअप च सुन्दर आहे.
अनूने विधवेचं बेअरिंग मात्र
अनूने विधवेचं बेअरिंग मात्र छान सांभाळलंय. फार खळखळून हसत नाही, आनंदाने वेडीपिशी होत नाही. रागसुद्धा बेताचाच. अगदीच संतापली तर प्लीज म्हणते की बस्स. अशा वागतात आजकालच्या विधवा?
ते सोडा पण आजच्या एपिसोडमधला
ते सोडा पण आजच्या एपिसोडमधला शशांकचा अभिनय खूप छान झालाय. >>> + १२३
Pages