Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23
सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.
सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो, ती अनुश्री सतत रडत असते.
हो, ती अनुश्री सतत रडत असते. कोणी तिला ओरडत असेल आणि ते कोणी आडवत असेल तर आडवणार्यालाच थांबवते. मग तिला तसेच पाहिजे. कोणाला न छळणार्या माणसालाही हिला छळायची ईच्छा होईल असे ती वागते. :|
हो, ती अनुश्री सतत रडत असते
हो, ती अनुश्री सतत रडत असते >>>>>>> सगळीकडे तुपारेची नक्कल चालू आहे. ती अनुश्रीची सायको नणन्द तिला रडक्या चेहर्याला उद्देशून ' एक ठेवून दयावीशी वाटते तिला.' म्हणते.
<<कोणाला न छळणार्या
<<कोणाला न छळणार्या माणसालाही हिला छळायची ईच्छा होईल असे ती वागते>>
हो, ती अनुश्री सतत रडत असते.
हो, ती अनुश्री सतत रडत असते. कोणी तिला ओरडत असेल आणि ते कोणी आडवत असेल तर आडवणार्यालाच थांबवते. मग तिला तसेच पाहिजे. कोणाला न छळणार्या माणसालाही हिला छळायची ईच्छा होईल असे ती वागते. >>>>>>
आता नवीनच. टर्न . आधी दोन
आता नवीनच. टर्न . आधी दोन महिन्यांपूर्वी शंका आलीच होती. ती अनूची वहिनी आपल्या मुलीसाठी सिद्धार्थला नवरा म्हणून पटकावयला बघतेय. साडी काय नेसवली, फोटो काय काढले. आता ही वहिनीसुद्धा अनूलाच गळ घालणार सिद्धार्थला राजी कर म्हणून. अनूला अगदी वधूवरसंशोधनमंडळ करून टाकलंय. सिद्धार्थसाठी एकापाठोपाठ एक स्थळं सुचवतेय.
पण ती मुलगी तर काॅलेजमध्ये
पण ती मुलगी तर काॅलेजमध्ये आहे अजून. वहिनीला असंही पैसा मिळेलच अनुचं त्याच्याशी लग्न झालं तर.
<<अनूला अगदी वधूवरसंशोधनमंडळ
<<अनूला अगदी वधूवरसंशोधनमंडळ करून टाकलंय. >>
हो ना. बिचारी अनु! तिचेहि लग्न व्हावे असे तिच्या आईवडीलांनाहि वाटत नाही? आधीच एकटी, दोन दोन नोकर्या करून भावाला मदत करते. त्यात तिच्यावर एकामागुन एक जबाबदार्या!
अमेरिकेत असती तर एकटी राहिली असती, डेटिंगला गेली असती नि जुळवले असते स्वतःचे स्वतः! पैसे काय, पाठवले असते भावाला मदत म्हणून. पण ही जास्तीची झेंगटे कशाला मागे लावली तिच्या?
किती दिवस असेच आयुष्य काढणार? पूर्वी विधवा बायकांचे केस कापून त्यांना लाल साडी नेसायला लावून, उठता बसता विधवा म्हणून तिचा अपमान करायचा असल्या वाईट्ट चाली होत्या. शंभर वर्षांनी मानसिकतेत काहीच फरक नाही!
तिचेहि लग्न व्हावे असे तिच्या
तिचेहि लग्न व्हावे असे तिच्या आईवडीलांनाहि वाटत नाही?>>> वाटते कि. मागे मुलगा पण बघायला आलेला. पण हिलाच एकटे रहायचे आहे त्याला कोण काय करणार? नेहा-सिद्धार्थ पण खूप समजावत होते कि दुसर्या लग्नाचा विचार कर. पण हि ढिम्म!! सिद्धार्थ किती लाईन देतोय तिला तर हि अजूनच ढिम्म!! माझा फक्त चांगला मित्र म्हणे.
पण ती मुलगी तर काॅलेजमध्ये आहे अजून.>> १८ वर्षांची आहे. कधी कॉलेजला जाताना दाखवली नाही. अभ्यास तर करतच नाही. आत्या पैसा कमावून घर चालवते पण आपण तिच्यासारखे शिकावे, कमवावे असे काही नाही. कसलीच समज नाही पण खायला पिझ्झा, अंगावर टॅटू आणि श्रीमंत नवरा पाहिजे.
तिची आई कशी आहे बघा ना!
तिची आई कशी आहे बघा ना!
सोनालीन
सोनालीनेे म्हटल्याप्रमाणे अनुला कोणी दु:खातून बाहेर काढत असेल तरी तिला ते नकोय. आईवडिल सांगत असतात लग्न करायला पण तिच नाही म्हणते आणि वहिनीला तिचा पगार हवा असतो, त्यामुळे ती मोडता घालते. लग्न करून, नोकरी करून, माहेरी मदत करू शकते पण नाही. अजून एक वर्ष तरी सहज लागेल अनुला हो म्हणायला. त्यापुढे सासरी, माहेरी आणि होणा-या सासरी संघर्ष, त्यातही अनु कितीवेळा माघार घेईल कोणाला दुखवायचं नाही म्हणून.
मालिकेत असले तरी दुर्गाबाईंचे विचार ऐकून थक्क व्हायला होतंं, मुलगी कसली, बाई आहे ती, विधवा आहेे, सिदपेक्षा मोठी आहेे वगैरे. दुर्गाबाई स्वत:ही विधवा असतात, नव-याच्या मागे त्याचा बिझनेस सांभाळतात आणि हे असे विचार त्यामानाने आजी-आजोबा बरेच प्रगत विचारांचे असतात. अनुची सासूतर त्याहून भयानक आहे. अशा बायका दाखवून काय मिळतं.
<<अशा बायका दाखवून काय मिळतं.
<<अशा बायका दाखवून काय मिळतं.>>
आणि माझ्या नवर्याची बायको मधली गुरुची आई? राधिका? त्यांची तिसरीच तर्हा!
तिची आई कशी आहे बघा ना!>> हो,
तिची आई कशी आहे बघा ना!>> हो, मुलीचे लाड करते पण बाकीकडे दुर्लक्ष्य. आज अनुच्या बोलण्यातून कळले कि ती(मुलगी) दहावी पण झाली नाही.
आधी एकदा दाखविले होते कि काकाने लंडनहून दोन घडयाळ आणले होते. मिलिंदला दिलेले घड्याळ संयुक्ता परत देते आणि सिद्धार्थसाठी आणलेले घेते. तेव्हा दुर्गाबाई आपल्या मुलाला सेकंडहँड वस्तू द्यायची नाही असे तिला बजावतात. होणार्या सूनेबाबत तर खूपच अपेक्षा आहेत त्यांच्या. फार मोठा पचका होणार आहे.
ती विशु ज़रा बावळट च दाखवली
ती विशु ज़रा बावळट च दाखवली आहे.
आधी एकदा दाखविले होते कि
आधी एकदा दाखविले होते कि काकाने लंडनहून दोन घडयाळ आणले होते. मिलिंदला दिलेले घड्याळ संयुक्ता परत देते आणि सिद्धार्थसाठी आणलेले घेते. तेव्हा दुर्गाबाई आपल्या मुलाला सेकंडहँड वस्तू द्यायची नाही असे तिला बजावतात. >>>>>>>>>>> मुला बद्दल अती प्रेम , आणि मुलीला दुय्यम वागणुक हे चालात का दुर्गाबाईंना . एरवी तर आदर्श आई बनायच असतं ना त्याना?
मागे मुलगा पण बघायला आलेला.
मागे मुलगा पण बघायला आलेला. पण हिलाच एकटे रहायचे आहे त्याला कोण काय करणार? >>>>>>>> तिने एकटे राहावे का लग्न करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. एकट राहण हा तिचा चॉईस असू शकतो. तिच्यावर लग्नाची जबरदस्ती करण चुकीच वाटत मला. बिनलग्नाच पुरुषाशिवाय राहणे चूक नाही. पण तिने रडक्या चेहर्याने राहू नये ह्याच्याशी मात्र सहमत आहे. हा, तिला जर खरच सिदबद्दल प्रेम वाटत असेल तर तिने लग्न कराव त्याच्याशी.
सिदपेक्षा मोठी आहेे >>>>>>>>>> मला तरी मृणाल शशान्कपेक्षा मोठी वाटत नाही.
आधी एकदा दाखविले होते कि काकाने लंडनहून दोन घडयाळ आणले होते. मिलिंदला दिलेले घड्याळ संयुक्ता परत देते आणि सिद्धार्थसाठी आणलेले घेते. तेव्हा दुर्गाबाई आपल्या मुलाला सेकंडहँड वस्तू द्यायची नाही असे तिला बजावतात. मुला बद्दल अती प्रेम , आणि मुलीला दुय्यम वागणुक हे चालात का दुर्गाबाईंना . >>>>>>>>>> पुढे जाऊन संयुक्ता व्हिलन बनण्याची शक्यता आहे.
त्या संयुच्या लग्नात अनुने
त्या संयुच्या लग्नात अनुने नक्की काय केलं होतं मी आत्ता पहायला लागलेय सो माहिती नाही. नक्की काय झालं होतं?
बिनलग्नाच पुरुषाशिवाय राहणे
बिनलग्नाच पुरुषाशिवाय राहणे चूक नाही. पण तिने रडक्या चेहर्याने राहू नये ह्याच्याशी मात्र सहमत आहे>>+१ तेच ना सतत रडत असते. त्यापेक्षा लग्न करुन सुखात रहा म्हणावेसे वाटते.
संयुच्या लग्नाच्या पत्रिका काकाने छापायची ऑर्डर दिली आणि ऐनवेळी रद्द करुन त्याचे पैसे दिले नाही. ते सिद्धार्थच्या बहिणीचे, दुर्गाच्या मुलीचे लग्न आहे याचा अनुला आणि तिच्या भावाला काहीच पत्ता नव्हता. मग लग्नाच्या मुहुर्तावर अनू आणि तिचा भाऊ त्यांच्या घरी पैसे मागायला गेले. नेमके त्यावेळी सिद्धार्थ नवरदेवाला आणायला बाहेर गेला होता. काकाने तेव्हा तिला खोटे पाडले त्यात आपल्या घरच्यांचेच बरोबर म्हणून दुर्गाबाई भांडल्या. शेवटी तात्या-आजी मधे पडले आणि त्यांनी दुर्गाला शांत केले.
नंतर सिदला सगळे कळल्यावर त्याने काकाला कायमचे बँगलोरला पाठवले.
सानवी ला व्हिलनचे काम छान
सानवी ला व्हिलनचे काम छान जमलं आहे. मृणाल अमेरिकेतील मुलाशी लग्न केले म्हणून आधीची सिरियल अर्धवट सोडून गेली होती व आता या सिरियलसाठी नवऱ्याला तिकडेच ठेवून परत भारतात आली. असं मागे दाखवलं होतं.
सानवीपेक्षा मोठी सायको वंदना
सानवीपेक्षा मोठी सायको वंदना गुप्ते दिसते. अनूचं नुसतं नाव जरी काढलं की तिचा चेहरा विकट आणि विकृत होतो.
दुर्गा बाईंना अनू आवडत नाही
दुर्गा बाईंना अनू आवडत नाही हे मान्य आहे (तसही तिच्यात आवडण्यासरखं काय आहे ) पण सानवी त्यांना नकी का आवडते हे मात्र समजलं नाही
त्यांना सिध्दार्थ पेक्षा
त्यांना सिध्दार्थ पेक्षा कमीतकमी दोन वर्षांनी लहान मुलगी सुन म्हणून हवी आहे. अनु मोठी आणि विधवा सुध्दा आहे.
'सानवीपेक्षा मोठी सायको वंदना
'सानवीपेक्षा मोठी सायको वंदना गुप्ते दिसते'. अगदी अगदी. दिसते आणि वागतेही तशीच. कारस्थानी. तिकडे सिद्धार्थने खोटे न बोलण्याची आणि आईपासून काही न लपवण्याची शपथ घेतलीय अनूच्या सांगण्यावरून आणि ही आई आपल्याच मुलाविरुद्ध कारस्थाने रचतेय.
अनूसुद्धा फारच दुबळी आणि सज्जन दाखवलीय. सिद्धार्थसारख्य व्यवहारी आणि कठोर निर्णय घ्यायला न घाबरणार्या माणसाला कशी साथ देईल? की नुसतं 'सिद्धार्थ प्लीज, सिद्धार्थ प्लीज' करून दरवेळी त्याला अडवत राहील? त्यामुळे सगळेच तिला ब्लॅक मेल करू लागलेत.
सान्वी घरी गेल्यावर डायरेक्ट
सान्वी घरी गेल्यावर डायरेक्ट शॉवरखाली का उभी राहत नाही? दरवेळी डोक्यावर पाणी ओतून घरभर पाणी करते. म्हातारा म्हातारीने तरी किती आवरायचे.
पण सिद्धार्थ च्या आईने
पण सिद्धार्थ च्या आईने जान्हवी ची बाजू एखादा वकील काय मांडेल इतक्या प्रभावीपणे मांड्ली. वाटायला लागते की बिचारी लहाण वयाची जान्हवी, खरोखरच अनुला नुसता त्रास द्यायचे तिच्या मनात होते!!
मी अनूला ठार मारीन असे तिने तीनचारदा तरी म्हंटले असेल पण सिद्धार्थच्या आईने ते ऐकले नाही. ज्यांनी ऐकले ते, लहान आहे मुलगी, रागाच्या भरात बोलते, असे म्हणून सोडून देतात.
नंद्या भाय जान्हवी का सानवी.
नंद्या भाय जान्हवी का सानवी.
आताचा एपिसोड फारच विनोदी होता
आताचा एपिसोड फारच विनोदी होता . बघताना खोखो हसायला येत होतं. आधी सिद सानवीला हाताला धरून ऑफिसमधून हाकलून देतो. मग ती घरी येऊन पंख्याला लटकून जीव द्यायचा प्रयत्न करते. अनुचे साबासाबु फारच टरकतात. तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. अनुला व दुर्गाला फोन करतात. तर तिथे दुर्गाची ती असिस्टंट बाई म्हणे- सुसाईड नोटमध्ये सिद्धार्थचं नाव असेल तर आपली बदनामी होईल अनु तिथे पोचते. अनु आणि तिचे सासरे सानवीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्या झटापटीत तो पंखाच खाली पडेल असं मला वाटलेलं. शेवटी अनु कसंबसं सानवीला खाली उतरवते आणि मग तिला एक ठेवून देते
झटापटीत तो पंखाच खाली पडेल
झटापटीत तो पंखाच खाली पडेल असं मला वाटलेलं. >>
अनु फक्त हसताना चांगली वाटते
अनु फक्त हसताना चांगली वाटते . इतरवेळी चेहरा सपाट,कोरा असतो.
पुढे जाऊन संयुक्ता व्हिलन
पुढे जाऊन संयुक्ता व्हिलन बनण्याची शक्यता आहे.>>>>>>>>> सुरवातीला काकुच्या आहारी जाउन ती आइच्या विरोधातच जात असते. काकु कायम मनात भरवत असते आईच्या विरुद्ध.
काकू नाही ती मामी आहे. संयु
काकू नाही ती मामी आहे. संयु अचानक कशी बदलली आणि ती नेहमी माहेरीच असते. मामी सारखी पैसे वसूल करायला जात असे ते सिदला कळलं होतं, पुढे काय झालं.
Pages