हे मन बावरे - कलर्स मराठी

Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23

सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.

सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!

Group content visibility: 
Use group defaults

मलाही आवडते आहे. झीच्या वासरांमध्ये कलर्सची लंगडी गाय शहाणी. मला कलर्सच्या सीरिअल्स झीपेक्षा आवडतात. बाळूमामा तर हिट आहेच. जीव झाला वेडापिसासुद्धा बघणेबल वाटतेय.
सुखाच्या सरींनीमध्ये ती अनू सारखं सारखं प्लीज म्हणते ते मात्र आवडत नाही. बाकी शशांक ग्रेट. आणि अनूला थोडं हसतं खेळतं दाखवावं. अगदीच गंभीर आणि प्रौढ वागायला लावलंय.अर्थात तिचं कॅरॅक्टर् तसंच लिहिलंय म्हणा.

झीच्या वासरांमध्ये कलर्सची लंगडी गाय शहाणी. मला कलर्सच्या सीरिअल्स झीपेक्षा आवडतात. बाळूमामा तर हिट आहेच. जीव झाला वेडापिसासुद्धा बघणेबल वाटतेय.>>>+१११११
अन आता तर बिबॉ पण चालू झालेय

मी पण पाहतो कधीतरी ...मला सविता हे कॅरेक्टर साकारणार्या अभिनेत्रीचं विशेष कौतुक वाटतं. ..भारी अभिनय करतात त्या ..

वंदना गुप्ते खुपच बोअर करतात राव..सारखं आपलं माझा मुलगा, माझ्या मुलाला असेच डायलाॅग असतात त्यांचे...

सध्या ही एकच मालिका पाहिली जाते. मृणाल 'माझीया प्रियाला.." पासूनच आवडते, त्यामुळे.. !
सगळेच कलाकार आपापली भूमिका छान निभावतायत. अनु, सिद्ध्या आणि या दोघांची मैत्रिण ही तिन्ही पात्रं विशेष आवडतात.
मध्यंतरी सिद्ध्या-संयु दोघांचा बहिण भावाचा ट्रॅक मस्त चालू होता.

मी पण बघते रोज. आवडते. झी बघण सध्या बंद केलय.

ती अनू सारखं सारखं प्लीज म्हणते ते मात्र आवडत नाही. बाकी शशांक ग्रेट. आणि अनूला थोडं हसतं खेळतं दाखवावं. अगदीच गंभीर आणि प्रौढ वागायला लावलंय.अर्थात तिचं कॅरॅक्टर् तसंच लिहिलंय म्हणा. >>> हो ना. सारख सगळ्यांना प्लीज म्हणायच. एका भागात ती १५-२० वेळा प्लीज म्हणत असेल. ती (म्रुणाल दुसानीस ) मला अजिबातच आवडत नाही. संथ, गंभीर, रडक्या चेहर्याची आणि बुळी वाटते.

कालचा भाग मस्त होता. त्या वहीनीने मस्त ऐकवल त्या दोघींना.

मी ही मालिका मृणाल दुसानीस आवडत नाही म्हणून बघत नाही, शशांक जाम आवडतो. पण ती सारखी उदास उदास भाव घेऊन नेहेमी वावरते. यात कॅरॅक्टर असेल उदास भाव असलेलं पण आधीच्या सिरीयलमधे मोठ्या इंडस्ट्रीची मालकीण होती तरीही तसंच. स्माईल छान तरीही भाव उदास. पर्सनल मत.

सिदध्याची मैत्रीण फार मजा आणते. मला आवडतं ते कॅरॅक्टर. सविताचं अ‍ॅक्टिन्गसुद्धा आवडतं. सगळ्याच मालिकांमध्ये हे उपव्हिलन लोक का भाव खाऊन जातात कळत नाही. घाटगे अँड सून मध्ये ती वसुधा काकू एक तशी.

काल खूप टाईप केलं होतं पण चुकून बॅॅक बटण दाबलं गेलं. ही नेहा कोण. सविता म्हणजे मामी का जी राखेचा मधे होती. मृणाल दुसानिस म्हणजे टीव्हीवरची अलका कुबल आहे, अति सहनशील आणि सोशिक. ती एवढी उदास असते की समोरच्याचा जीवनरस शोषून घेईल. जो नवरा मरून गेलाय त्याच्या आईचं एवढं ऐकायची काय मजबूरी आहे. तिची नणंंद फुलराणीमध्ये आहे. छान आहे ती.

कालचा भाग मस्त होता. त्या वहीनीने मस्त ऐकवल त्या दोघींना.>>+१ तिचा फोकस स्पष्ट आहे. प्रसंगी नणंद घराबाहेर पडली तरी चालेल आणि वेळ आली तर तिचे पाय धरुन माफी मागून तिला घरी आणायलाही तयार.
दुसानिस म्हणजे टीव्हीवरची अलका कुबल आहे, अति सहनशील आणि सोशिक. ती एवढी उदास असते की समोरच्याचा जीवनरस शोषून घेईल. जो नवरा मरून गेलाय त्याच्या आईचं एवढं ऐकायची काय मजबूरी आहे. >> +१ अधी तर तिची सासू तिला जाम झापायची. नंतर ती सोडून जाईल या भितीने स्वत:च घाबरून तिच्याशी बरी वागायची. पण हि फक्त मुळूमुळू रडत बसायची.

मी सगळ्या मालिका पाहते colors च्या. Better than zee.
अनु सिद्धार्थ छान आहे. सगळेच छान अभिनय करतात. अगदी सिद्धार्थ च्या घरी स्वयंपाक साठी असलेल्या मावशॊ पण छान अभिनय करतात.
जीव झाला वेडापिसा पण चांगली चालूये परंतु दोघांचा एकमेकांविषयी असलेला गैरसमज खुप दिवस ताणून धरू नये अशाने खुप irritated होते. Colors मध्ये अल्मोस्ट सगळ्या सिरीयल मध्ये गैरसमज base आहे. अनु सिदार्थ चा पण असच दाखवला सुरुवातीला कि तो हरी आहे.

<<कालचा भाग मस्त होता. त्या वहीनीने मस्त ऐकवल त्या दोघींना.>>
मला पण आवडला. मला त्या वहिनीचे पात्र आवडते. ती जे काय करते, बोलते ते लिहिणार्‍याची धन्य. आणि ती भूमिका करणारी वहिनीपण योग्य आहे त्या भूमिकेला.

जीव झाला वेडापिसा कधीतरी बघते मधेच, परवा तो तिच्या माहेरी जातो, सिलेंडर बदलून देतो, ती पोहे करणार असते तो बघितला. विकली वन्स बघते एखादा भाग.

अनुच्या माहेरी ती वहिनीच एक जाळ आहे, बाकी सगळे मुळुमुळु. लोभी आहे ती पण प्रॅक्टीकल बोलते. बाकी सगळे चांगुलपणाचा कहर आहेत. एवढे चांगलेे की मुर्ख वाटावेत, कर्तृत्व तर नाहीच पण लबाडी करण्याचीही तयारी नाही. दुर्गाबाई खूप हुशार दाखवायच्या होत्या पण त्या तशा वाटत नाहीत. हलक्या कानाच्या आणि उथळ वाटतात. स्वत:चेे भाऊ-भावजय ईतकी वर्ष फसवत असतात ते कळत नाही आणि म्हणे मोठा व्यापार आहे त्यांचा Uhoh
अनुची आॅफिसातली मैत्रिण बघितली आहे कशाततरी. ती अनुही किती दिवस हरी हरी करत होती. एवढ्या मोठ्या क्लबमध्ये जी रिसेप्शनिस्ट आहे, तिला ट्रेनर कोण हे माहित असू नये, काहीही दाखवतात. गूगल वगैरे नाही का अनुकडे.

अरे वा! आहेत की ही सिरीयल बघणारे!

आता चांगला ट्रॅक सुरु होईल , कारण अनुलाही सिद्धया आवडायला लागेल. म्हणजे आवडतोच पण आता कदाचित ती पझेसिव्ह होईल.

धन्स सोनाली. नलीची भूमिकाही तिने छानच केली होती. अनुचा लंपट बाॅस गोठमध्ये होता. अनुची भाची फुलपाखरूमध्ये आहे.

मी ही बघते असच.
नेहा मस्त acting करते आणि अनुची नणंंद दाखवली आहे तिने negative character मस्त रंगवलय.
पण ती अनु बिचारी कित्ती रडते....दोन-चार बादल्या भरतील तिच्या आसवांनी.

नेहा 'चूक भूल द्यावी घ्यावी' या मालिकेत नली वन्सच्या भूमिकेत होती>>>>> अरे हो .
स्वत:चेे भाऊ-भावजय ईतकी वर्ष फसवत असतात ते कळत नाही आणि म्हणे मोठा व्यापार आहे त्यांचा >>> exactly
माधवी जुवेकर (अनू ची वहिनी) ‌‌‌मस्तच.

हो ती सविता वहिनी भारीये एकदम , तरी आताशा आइ-मुलात भान्डन आहे म्हणून प्रेमाचअतिररेक नाही दाख्वत नाहितरी सुरवातिच्या एपिसोड्मधे आइच्या अतिव प्रेमाचा कहर दाखवला होता, सिद्दार्थला सिद्ध्या म्हणायच नाही, त्याचे रोजचे कपडे आइच काढुन देणार, तो काय खाणार हे पण आइच ठरवणार, त्याला बहिणिच्या वाटितल (उश्ट नाही ह) पण द्य्यायच नाही आनी हे सगळ का तर म्हणे प्रिमॅच्यर बेबी होता , आइ बहुधा नाळ कापायची विसरली असच वाटायच.
एकदम डेन्जर.

Pages