“किती वाजले?”
“नक्की नाही माहिती, पण १० वाजले असावेत.”
“हम्म … जॉन-हेनरी गेल्यापासून वेळेची फारच पंचाईत होते.”
साल 1856 मध्ये हा संवाद जणू रोजच व्हायचा. अशातच मारियाला ऐयरी साहेबांचा निरोप मिळाला. लंडनच्या गोठवणाऱ्या हिवाळ्यात मनाला ऊब देणारी बातमी होती ती. त्यांनी मारियाला जॉन-हेनरीचे काम पुढे चालू ठेवायला परवानगी दिली होती! पण एका अटीवर - जॉन-हेनरी प्रमाणे तिला ते नोकरीवर ठेवणार नाहीत, तिने आपल्या मेहनतीचा मोबदला म्हणून व्यापाऱ्यांकडून वर्गणी घेतली तर त्याला त्यांची ‘ना’ नव्हती पण नोकरी देणार नाही. मारियाला ते अगदी मान्य होते.
हल्ली डोअर स्टेप सबस्क्रीप्शन सर्व्हीसेस किंवा घरपोच सदस्य सेवा उत्तर अमेरिकेतच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. अगदी आज आपल्यापैकी कुणी स्टीचफ़िक्स, कुणी ब्ल्यू एप्रन, तर कुणी ऍमेझॉन अशा कंपन्यांच्या सेवेचा लाभ घेतला असणार. कुणी “बॉक्स डावीकडे ठेवावा. उंबऱ्यावर ठेवायला ते काही माप नव्हे” अशा पाट्याही दारावर लावल्या असतील. कदाचित इंटरनेट द्वारे सभासद झाला नसाल पण किमान दूध, वर्तमानपत्र अशा परंपरागत घरपोच सदस्य सेवांचा लाभ घेत असाल. आजही असे व्यवसाय सुरु करणे धाडसाचे आहे. मग त्याकाळात तर दूध, वर्तमानपत्र ही घरपोच सर्रास मिळत नसे. १८५६ मध्ये मारियाला अशा व्यवसायाला परवानगी मिळाली ही मोठी नवलाईची गोष्ट होती.
त्या काळी ‘बिग बेन’ घड्याळाचे बांधकाम अजून पूर्ण झाले नव्हते आणि ‘घड्याळांचे कारखाने’ म्हणजे नुसती कविकल्पना ठरली असती. घड्याळजीं (क्लॉकमेकर्स) मंडळी हाताने घड्याळे बनवत. सरकारी किंवा दरबारी लोकं करार करून महागामोलाचं घड्याळ बनवून घेत. विरोधाभास असा की घड्याळजींकडे एखादे घड्याळ असेलंच असं नाही. शिवाय कुणी घड्याळाला किल्ली द्यायला विसरलं की ती मागे पडत. कुणीतरी अचूक वेळ सांगणारं हवं.
ग्रीनविच रॉयल ऑब्सर्व्हेटरी मधले संशोधक कालमापन करत त्याला अचूक वेळ मानले जात असे. (पुढे 1884 साली ग्रीनविच प्रमाण वेळ म्हणून तिला मान्यता मिळाली). रॉयल ऑब्सर्व्हेटरीच्या दाराजवळ अचूक वेळ सांगणारं घड्याळ होतं. त्यामुळे वेळी-अवेळी सारखं सारखं घड्याळजीं किंवा त्याच्या हाताखालची मुले येऊन वेळ विचारत. रॉयल ऑब्सर्व्हेटरी मधले कर्मचारी त्रासून जात. जॉन-हेनरी बेल्व्हील ग्रीनविच रॉयल ऑब्सर्व्हेटरी मध्ये सहाय्यक होता. खरंतर विविध संशोधनासाठी मदत करणे ह्यासाठी त्याला नेमले होते. पण ऐयरी साहेबांनी आता त्याला लंडनच्या साप्ताहिक फेरीवर नेमले. दर आठवड्याला लंडनमधल्या घड्याळजींना “जॉन अर्नोल्ड” ह्या घड्याळातील प्रमाण वेळ सांगणे एवढंच त्याचे काम. २० वर्षे नियमितपणे सेवा केल्यावर जॉन हेनरी १८५६ साली वारला. मारिया जॉन हेनरीची पत्नी!
मारियाचे बालपण लंडनजवळच्या सफोकं परगण्यात गेलं. पुढे तिने भाषा विषयाचा अभ्यास केला. लंडनच्या शाळांमध्ये भाषातज्ञ म्हणून तिला मान होता. जॉन हेनरीशी तिने 1851 साली लग्न केलं. जॉन हेनरीची पहिली बायको बाळंतपणात वारली तर दुसरीचा बळी टायफॉईडच्या साथीने घेतला. त्याच्या मुली लग्न होऊन संसारात मग्न होत्या. वेळ सांगायच्या साप्ताहिक फेरीवर असतांना त्याची आणि मारियाची गाठ पडली. लग्नानंतर लवकरच मारियाला दिवस राहिले आणि “रूथ” चा जन्म झाला. मारिया रूथच्या संगोपनात मग्न होती. तशातच जॉन हेनरीची तब्बेत वरचेवर बिघडू लागली. शेवटी रूथ दोन वर्षाची असतांना जॉन हेनरीचे निधन झाले.
घर कसे चालवावे हा प्रश्न मारियाला भेडसावू लागला. जॉन हेनरी चाळीस वर्ष ग्रीनविच रॉयल ऑब्सर्व्हेटरीच्या सेवेत होता. तेव्हा मारियाने ऐयरी साहेबांना पत्र लिहून काही पेंशनची व्यवस्था करावी अशी विनंती केली. जॉन हेनरीची संशोधनाची हस्तलिखिते ऑब्सर्व्हेटरीने विकत घ्यावी असेही सुचवले. पण ऐयरी साहेबाने तिला उलट ‘अशी पद्धत नाही’ कळवले. मारियाला नकार मान्य नव्हता. तिने लहान मुलीसाठी तरी काही सोय करावी म्हणून विनंती केली. पण ऐयरी साहेबांनी तुम्ही भाषातज्ञ आहात तर तुम्हीच अर्थार्जन करा असे सुनावले. त्या काळात स्त्रियांनी नोकरी करण्याच्या फार प्रघात नव्हता. त्यात पुन्हा रूथला सांभाळायचा प्रश्न, मग नोकरी कशी जमणार ह्याची मारियाला काळजी पडली. तिने घरीच काही मुलामुलींना शिकवायला सुरुवात केली. पण शिक्षकी व्यवसायात फार पैसे मिळत नव्हते.
पैसे मिळत नसले तरी शिक्षिका म्हणून मारियाला समाजात मान होता. तिने फ्रेंच, इंग्रजी शिकवलेले विद्यार्थी आता घड्याळ व्यवसायात उत्तम नाव मिळवून होते. लंडनमधल्या घड्याळाजींचा वेळ सांगण्यासाठी जॉन हेनरीवर विश्वास होता. आता तो नव्हता तर मारियाने वेळ सांगावी असे त्या सर्व घड्याळजींचे मत पडले. दोनशे घड्याळजींना नकार देणं ऐयरी साहेबांना परवडणार नव्हते. पण स्त्रियांनी त्याकाळात ऑब्सर्व्हेटरीमध्ये नोकरी करण्याचा प्रघात नव्हता. म्हणून त्यांनी मारियाला सदस्य सेवा सुरू करायला परवानगी दिली. ही सदस्य सेवा आणि शिक्षिकेचे मानधन दोन्ही मिळून मारियाचे घर सुरळीत चालू झाले.
लहानग्या रूथला सोबत घेऊन मारिया आठवड्यातून एकदा ऑब्सर्व्हेटरीला जात असे. मग “जॉन अरनॉल्ड” घड्याळ तिथल्या वेळेशी जुळवून घेत असे व ऑब्सर्व्हेटरी तिला त्याचे सर्टीफिकेट देत असे. घोळदार झगा, रूथ, आणि घड्याळाची हॅन्डबॅग सांभाळत सुमारे दोनशे सदस्यांना वेळ सांगत असे. पुढे रेडियो, बिगबेन इ अनेक मार्ग उपलब्ध झाले तरी मारियाचा व्यवसाय बंद पडला नाही. तिचा नियमितपणा वाखाणण्याजोगा होता. लंडनमध्ये जॅक दि रिपरने ह्या कुप्रसिद्ध गुन्हेगाराने महिलांवर अत्याचार सुरू केले तेव्हा स्त्रिया एकट्या-दुकट्या बाहेर जायला धजावत नव्हत्या. त्या काळातही मारियाने कधी साप्ताहिक फेऱ्या चुकवल्या नाहीत. चिकाटी आणि सचोटी ह्यांच्या जोरावर तिने 35 वर्षे वेळ सांगायचा व्यवसाय केला.
वयाच्या 81 व्या वर्षी नजर अधू होवू लागली म्हणून मारियाने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही जवळ जवळ १०० सदस्य वर्गणीदार होते. काही सदस्य घड्याळजी होते तर काही श्रीमंतांना तिची सेवा “स्टेट्स सिम्बॉल” म्हणून हवी होती. गंमतीचा भाग म्हणजे ह्या सदस्यांच्या विनंतीवरून मारियाच्या लेकीने, रूथने हा व्यवसाय पुढे चाळीस वर्ष चालवला. मारिया वयाच्या 88 व्या वर्षी वारली. पण आजही तिचे (आणि रूथचेही) हॉरॉलॉजिस्ट म्हणून नाव आदराने घेतले जाते.
मारियाच्या वेळ सांगायच्या व्यवसायात आज कुणीही नाही पण सदस्य सेवा हे एक मोठं बिझनेस मॉडेल झाले आहे. मारियाची गोष्ट तशी खूप साधी पण तरी खूप विचार करायला लावणारी. आपल्या कामाचा पूर्ण आणि दूरगामी परिणाम कदाचित आपल्याला कधीच समजणार नाही, पण पाट्या न टाकता आज काम करणे एवढं आपल्या हातात नक्कीच आहे.
(संदर्भ: दि हँडलर्स ऑफ टाईम - जॉन हंट 1999)
रोचक, रंजक आणि माहितीपुर्ण.
रोचक, रंजक आणि माहितीपुर्ण.
नविन माहिती मिळाली. सुंदर आहे
नविन माहिती मिळाली. सुंदर आहे लेख.
नवीन माहिती,याबाबत काहीही
नवीन माहिती,याबाबत काहीही माहित नव्हतं.
धन्यवाद सीमंतिनी!
रोचक, रंजक आणि माहितीपुर्ण.
रोचक, रंजक आणि माहितीपुर्ण. >>>>. +१
माझ्यासाठी अगदी नवीन माहिती. या छानशा माहितीपूर्ण लेखासाठी आभार
भारीच व्यवसाय!
भारीच व्यवसाय!
छान लेख व माहिती. अजून लिहीत
छान लेख व माहिती. अजून लिहीत का नाहीस गं. पूर्वी लँ डलाइन फोन्स होते तेव्हा एका नंबर वर कॉल करून करेक्ट टाइम कळत असे.
ऑटोमेटेड सर्विस होती. डिरेक्टरीत सुरुवातीला हे नंबर्स व इतर सर्विसेस चे नंबर्स देत असत. घड्या ळे, हातातली किल्लीची किंवा टोले देणारी भिंतीवरची , ही बंद पडली की किल्ली देउन चालू करताना फोन वरून करेक्ट वेळ विचारून घेत असू.
वेगळीच माहिती. धन्यवाद
वेगळीच माहिती. धन्यवाद
सुंदर आणि माहितीपूर्ण आहे लेख
सुंदर आणि माहितीपूर्ण आहे लेख.
तुमच्या, 'मरीन', 'अगाथा' आणि आता 'मारिया' खुप आवडल्या ..!
शीर्षक पण आवडलं .!!
वा! किती मस्त आणि वेगळंच
वा! किती मस्त आणि वेगळंच आहे हे.
अजून लिहीत का नाहीस गं. > +१
अजून लिहीत का नाहीस गं. > +१
लेख आवडला! वेगळ्याच व्यवसायाची ओळख!
शीर्षक पण आवडलं
नविन माहिती मिळाली. सुंदर आहे
नविन माहिती मिळाली. सुंदर आहे लेख. >>>>> +9999
आहह अप्रतिम
आहह
अप्रतिम
छान लिहिलय , माहिती रोचक आहे
छान लिहिलय , माहिती रोचक आहे
रोचक आणि माहितीपूर्ण!
रोचक आणि माहितीपूर्ण!
अर्रे मस्त लेख आहे. नवीनच
अर्रे मस्त लेख आहे. नवीनच माहिती कळाली.
> अजून लिहीत का नाहीस गं. > +१
एकदम नवीनच माहिती.
एकदम नवीनच माहिती.
मस्त लिहिले आहे.
भाषातज्ज्ञ असूनही केवळ स्त्री असल्याने त्याचा अर्थार्जनाला काही उपयोग नाही.
आणि तेव्हा सदस्य सेवा status symbol होती आणि आता नको म्हणावे लागते बर्याचदा. काळाचा महिमा.
मस्त लिहिलय!!!
मस्त लिहिलय!!!
रोचक, रंजक आणि माहितीपुर्ण.>>> १२३
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय. आवडलं.
छान माहिती. पण हे वेळ सांगणे
छान माहिती. पण हे वेळ सांगणे प्रकरण काही कळलं नाही.
पण हे वेळ सांगणे प्रकरण काही
पण हे वेळ सांगणे प्रकरण काही कळलं नाही. >> अॅनलॉग/किल्लीचे घड्याळ कधीच वापरले नसेल तर संदर्भ समजायला जरा अवघड जाईल. रेडियो/टी.व्हि/इंटर्नेट अशी दूरसंचरणाची साधने नसतील तर वेळेचे वितरण (time distribution) ही समस्या निर्माण होईल. अॅनलॉग घड्याळ मागे पडले तर कळणार कसे? वेळेचे वितरण करण्यासाठी (वेळ सांगण्यासाठी) सोपा उपाय म्हणजे माणूस नेमणे. अर्थात लोकसंख्या वाढते, तसा हा उपाय निरूपयोगी ठरतो. आता वेळ रेडियो/टी.व्हीवर कळते.
सर्व आय.डी. >> थँक्यू. शेयर करण्याजोगे काही ध्यानामनात आले तर नक्की लिहीन.
<<<पण हे वेळ सांगणे प्रकरण
<<<पण हे वेळ सांगणे प्रकरण काही कळलं नाही.>>>
हा प्रश्न माझ्या चार वर्षाच्या नातीने विचारल्यासारखा वाटतो आहे.
१८५६ सालच्या बर्याच गोष्टी आपल्या आजोबांना सुद्धा कळत नसतील, इतका जुना काळ.
नाही. तेंव्हा इंटरनेट, आयफोन, साधा फोन, रेडियो, टीव्ही, बॅटरीवर चालणारे घड्याळ असले काही नव्हते. तरीपण ब्रिटिशांना अगदी वेळेवर सगळी कामे झालीच पाहिजेत असा आग्रह होता. विशेषतः दुपारचा तीन वाजताचा चहा, म्हणून मग असे काहीतरी उद्योग.
भारी झालाय लेख. मस्त ओळख
भारी झालाय लेख. मस्त ओळख
मस्त. वेगळीच माहिती.
मस्त. वेगळीच माहिती.
विशेषतः दुपारचा तीन वाजताचा
विशेषतः दुपारचा तीन वाजताचा चहा, म्हणून मग असे काहीतरी उद्योग. >>
जॉन-हेनरीने रॉयल ऑब्सर्व्हेटरीचा कर्मचारी म्हणून १८३६ साली वेळ वितरण सुरू केले. तेव्हा नुकतीच लंडनमध्ये रेल्वे सुरू झाली होती. तसेच कारखन्यात निर्माण झालेल्या विविध वस्तू जगभर वितरण करण्यासाठी नौदलाचे काम वाढले होते. त्यामुळे प्रमाण वेळेची गरज वाढली होती.
छान लेख!
छान लेख!
इंटरेस्टींग माहिती! छान
इंटरेस्टींग माहिती! छान लिहीलय.
Amazed
Amazed
मस्त रंजक आणि रोचक माहिती.
मस्त रंजक आणि रोचक माहिती.
मस्त लेख.रंजक माहिती.
मस्त लेख.रंजक माहिती.
सुंदर, माहितीपूर्ण आणि
सुंदर, माहितीपूर्ण आणि संक्षिप्त लेख. खूप आवडला!
आणि लेखाचं नाव तर अगदी क्रियेटिव्ह!
Pages