साहित्य :
मिक्स भाज्या ( फरसबी, गाजर { मध्यम आकारात चिरून}, फ्लॉवरचे तुकडे, मटार )
2 मध्यम कांदे ( उभे चिरून )
2 मध्यम बटाटे ( साल काढून चौकोनी कापालेले )
नारळाचे दूध - एक पाकीट ( घरी केलेले किंवा रेडीमेड, {होममेड ब्रँडचे मिळते} )
आलं पेस्ट - 1 चमचा
लसूण पेस्ट - 1 चमचा
बारीक चिरलेली हिरवी मिरची
कढीपत्ता
खडा मसाला - वेलची, काळी मिरी (अख्खी), दालचिनी
काजू पेस्ट ( 8 - 10 काजू)
खाण्याचे तेल ( edible कोकोनट ऑईल )
मीठ
कृती : प्रथम एका पॅनमध्ये थोडं खाण्याचे तेल गरम करूव घ्यावे. त्यामध्ये खडा मसाला घालून चांगले परतावे. त्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालून परतावा. तो गुलाबीसर झाल्यावर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक चमचा आल्याची पेस्ट, एक चमचा लसूण पेस्ट घालून छान परतून घ्यावे.
नंतर पॅनमध्ये सर्व (मिक्स) भाज्या व चौकोनी चिरलेले बटाटे घालून परतून घ्यावे. नंतर त्यात सर्व भाज्या बुडतील इतपत पाणी घालून पॅनवर झाकण घालून भाज्या अर्ध्या कच्च्या शिजवाव्यात. नंतर त्यामध्ये नारळाचे दूध घालून ढवळावे आणि त्याला एक उकळी आल्यावर काजू पेस्ट व मीठ घालावे. सर्वात शेवटी त्यावर कढीपत्ता बारीक चिरून घालावा आणि सर्व मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यावे.
टीप :
* आमच्याकडे मिक्स भाज्यांचे तयार पॅकेट मिळते, सो मी त्याच वापरते. भाज्यांच्या प्रमाणानुसार नारळाचे दूध कमी-अधिक प्रमाणात वापरावे.
* काळी मिरी अख्खीच घालावी, त्याचा स्वाद छान लागतो आणि उगाच तिखट लागत नाही.
* हे स्ट्य़ू तुम्ही नुसते खाऊ शकता अथवा गरमामगरम पोळी किंवा आवडत असल्यास वाफाळत्या भातासोबतही याचा आनंद घेऊ शकता. मी तर हे नुसतंच ओरपते
(No subject)
छान दिसतय.
छान दिसतय.
फोटो हेडर मध्ये ठेवा ना !
मस्त दिसतंय!
मस्त दिसतंय!
मस्तं करून पाहीन
मस्तं
करून पाहीन
धन्यवाद, पण मला फोटो टाकता
धन्यवाद, पण मला फोटो टाकता येत नव्हता वरती, म्हणून प्रतिसाद मध्ये टाकला. कसा टाकायचा सांगाल का कोणी?
व्हेज स्ट्य़ू आणि नीर दोसा
व्हेज स्ट्य़ू आणि नीर दोसा किंवा अप्पम हे जगातलं बेस्ट फूड आहे.
मीनाक्षी, रेसिपी बेस्ट. सोपी पण वाटते आहे. यापुढे दोशाबरोबर नेहमी करणार.
मस्तच! व्हेजिटेबल स्ट्यू आणि
मस्तच! व्हेजिटेबल स्ट्यू आणि अप्पम् >> आहाहा!