Submitted by aschig on 2 April, 2019 - 02:53
'आजचा सुधारक' हे नियतकालीक अनेक वर्षे सातत्याने चालल्यानंतर बंद पडले होते. त्याचे या महिन्यापासून पुनरुज्जीवन होते आहे. थोडेफार डावीकडे झुकणारे लिखाण असले तरी जगभरातील आजच्या राईट वींग प्रवृत्तींना ते टक्कर देऊ शकतील का ते पहायचे. निवडणुका जवळ आल्यामुळे हा अंक राजकारणावर आहे.
अस्मादिकांचाही एक लेख या पहिल्या अंकात आहे. भल्या बुऱ्या प्रतिक्रिया जरुर द्या
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मायबोलीवरही विज्ञान
मायबोलीवरही विज्ञान संकल्पनांची ओळख करून देणारे, त्या उलगडून दाखवणारे लिखाण बंद पडलंय. त्याचे पुनरुज्जीवन व्हायला हवे.
अरे वा फारच चांगली बातमी
अरे वा फारच चांगली बातमी दिलीस आशिष. आसुचे जे आजीव वर्गणीदार होते त्यांना पुन्हा सुरू झालेला आसु मिळणार की नवीन सभासदत्व घ्यावे लागेल हे विचारायला पाहिजे.
ओह, ऑनलाइन असणार आहे. असो, पुन्हा सुरुवात झाली हे नसे थोडके.
बाकी पहिल्या अंकातील लेखकांची यादी पाहून (प्रभाकर नानावाटी, राजीव जोशी, दिवाकर मोहनी) वाचणार्यांपेक्षा लिहिणार्यांची संख्या अधिक असलेले एकमेव नियतकालिक ही आसुची परंपरा अबाधित राहील असे दिसते
लिंकसाठी धन्यवाद. जुने लेख
लिंकसाठी धन्यवाद. जुने लेख आधी वाचणार.
काही लेख वाचले, बाळबोध व तेच
काही लेख वाचले, बाळबोध व तेच तेच आहे. लिखाणाची खाज भागवल्या सारखे लेख वाटतात. स्वत: चे योगदान काय आहे हा प्रश्न लेखकांनी स्वत: ला विचारावा.विचारजंतू खूप आहेत या देशात.
लेखातील मते इथे अनेक पुरोगामी
लेखातील मते इथे अनेक पुरोगामी मंचावरून व्यक्त होत असतात. या मतांशी सहमती असली तरी इथे त्यात नावीन्य राहिलेले नाही. आणि अशी मते व्यक्त करणे हे अरण्यरूदनच ठरेल कारण इथल्य उन्मादाच्या वातावरणात कोणीही ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. तरीही ' ऊर्ध्वबाहुर्विरोम्य' कोणी काही प्रामाणिकपणे सांगत असेल तर त्याचा कधी ना कधी आणि काही ना काही परिणाम होईलच.
८९ साली दाभोलकरांनी चळवळीला
८९ साली दाभोलकरांनी चळवळीला आवश्यक अशा विवेकवादी विचारश्रेणीची ओळख करुन घेण्यासाठी हे मासिक आवश्यक असल्याचे सांगून आम्हाला त्याची सवय लावली. पहिल्या अंकापासून शेवटच्या अंकापर्यंत माझ्याकडे अंक आहेत.
http://mr.upakram.org/node/1208
लिंकसाठी धन्यवाद. चांगली
लिंकसाठी धन्यवाद. चांगली बातमी
लिंकसाठी धन्यवाद. >>>> +१.
लिंकसाठी धन्यवाद. >>>> +१.
धागाकर्त्याचा लेख वाचला.सुरेख आहे.