लसणाच्या पातीची चटणी

Submitted by मनस्विता on 12 February, 2019 - 04:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
लसणाची पात
जिरे - १/२चमचा
लाल तिखट - १ चमचा
मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

ह्या रविवारी आठवडी बाजारात भाजीखरेदीला गेलो होतो तेव्हा लसणाची पात दिसली. तेव्हा अर्थातच विकत घ्यायचा मोह टाळता नाही आला. घरी आणली खरी, पण पुढे काही करायला आजचा मुहूर्त लागला. काय केलं तर पातीची चटणी. त्याचीच कृती इथे देत आहे.

कृती:
१. पात स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यावी.
२. पातीचे जाडसर काप करून घ्यावेत म्हणजे बारीक करायला सोपे जाईल.
३. जाडीभरडी चिरलेली पात आणि इतर साहित्य दगडी खलबत्त्यामध्ये घेऊन बारीक करावे.

अत्यंत झणझणीत अशी चटणी तयार आहे. लसणाची स्वतःची चव आणि तिखट ह्याने जी चव येते ती झटका देणारी असते.

दगडी खलबत्त्यामध्ये चटणी बारीक केल्याने त्यात पाणी अजिबात घातले नाहीये, त्यामुळे ही चटणी बरेच दिवस टिकते.
मिक्सरमध्ये करता येईल का? तर अर्थातच हो. पण एकूण साहित्य कमी असल्याने बारीक करताना कदाचित पाण्याचा वापर करावा लागेल.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by शाली on 12 February, 2019 - 15:26 >> अजून जमत नाहीये. थोड्या वेळाने पाहते.

लाल तिखट घालायच्या ऐवजी मी यात वाळलेल्या लाल मिरच्या घालते. दगडी खलबत्ता आणि पाटा नाहीये इथे दिल्लीत माझ्याकडे. पण चिरलेली लसणीची पाट, लाल मिरच्या ( त्यांचा तिखटपणा कमी वाटला तर थोडं लाल तिखट आणि जरा छान रंग येण्यासाठी देगी मिर्च पुड ) घालते आणि मीठ. मिक्सरमध्ये पण होते चांगली. फक्त पात थोडी चिरून घालावी लागते. पाणी लागत नाही.
या दिवसात माझ्या टेबलावर एका सटात नेहेमी ठेवलेली असते.

वाह..छान रेसिपी व फोटो.
मला प्रचंड आवडते ही चटणी.
माझी मावशी सॅन्डविचमध्ये ही चटणी घालते त्यामुळे हे बघून तिचीच आठवण झाली. पांढरा ब्रेड, ही चटणी, बटर, हवं असल्यास चीझ , काकडी टोमॅटो चकत्या, सोबत आल्याचा चहा = स्वर्ग!
यात कोथिंबीरही थोडी घालावी.
मी करते तेव्हा यात दाण्याचे कूट घालते. त्याने texture अजून छान होते.