कस्टर्ड क्रिम बिस्किट् ही खास ब्रिटीश डेलिकसी आहे आणि खरच ती बिस्कीटं ना भारतात चांगली मिळतात ना अमेरिकेत. अगदी लहानपणी कोणी कोणी लंडनहून आणलेली कस्टर्ड क्रिम बिस्किटं खाल्ली आहेत आणि नंतर बरीच वर्ष बहिण युकेला असल्याने ती दरवेळी न चुकता घेऊन येते. परवा ब्रिटीश बेकींग शोमध्ये ही बिस्कीटं बघितली आणि करून बघायचा मोह झाला. स्नो-डे मुळे घरात अडकून पडलेलो असताना वेळही मिळाला.
बिस्कीटांसाठी:
१. मैदा - १.५ कप
२. कस्टर्ड पावडर - ०.५ कप
३. बटर - १.५ स्टीक (मी सॉल्टेड बटर वापरलं)
४. पिठीसाखर - ०.५ कप
५. बेकींग सोडा - ०.२५ टीस्पून
क्रीमसाठी:
१. बटर - ०.२५ स्टीक
२. पिठीसाखर - ०.५ साखर
३. व्हॅनिला इसेन्स - ५-६ थेंब
१. मैदा, कस्टर्ड पावडर आणि बेकींग सोडा चाळणीतून चाळून घेतला. ह्यामुळे मैद्यात हवा जाऊन बिस्कीटं हलकी होतात.
२. बटर आणि पिठीसाखर हँडमिक्सरने एकत्र करून गुळगुळीत पेस्ट बनवली.
३. वरची दोन्ही मिश्रण एकत्र करून बॅटर बनवलं. हे केकच्या बॅटर इतकं पातळ होत नाही. पोळ्यांच्या कणकेपेक्षाही घट्ट असतं.
४. बॅटरचे छोटे गोळे करून ते बेकींग ट्रे वर दाबून चपट करून बिस्कीटांचा आकार दिला. त्यावर काट्याने रेघा ओढून थोडसं डेकोरेशन केलं. बिस्कीटं कुकीकटर वापरून पण करू शकता. आमच्याकडे कुकीकटर नाहीये त्यामुळे ह्या पद्धतीने केलं.
५. ३५० डिफॅ तापमानाला ओव्हनमध्ये १५ ते २० मिनीटं बिस्कीटं बेक करून घेतली. तळाच्या बाजूने रंग बदलायला लागल्यावर झाली असं समजावं. वरून थोडसं ओलरस लागलं तरी गार झाल्यावर नीट होतात.
६. बिस्कीटं बेक होत असताना एकीकडे बटर, साखर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र फेटून त्याचं क्रीम बनवलं.
७. बेक केलेली बिस्कीटं जरा निवल्यावर दोन बिस्कीटं क्रिमचा थर देऊन एकमेकांवर चिकटवून घेतली. अगदी 'टेस्को'च्या तोडीची कस्टर्ड क्रिम बिस्कीटं तयार !! बिस्कीटं एकदम खुसखुशीत, तोंडात विरघळणारी वगैरे झाली आहेत!
*
*
*
१. माझ्यामते ह्या प्रमाणानुसार जरा जास्त गोड झाली. क्रीममधली किंवा बिस्कीटामधली साखर कमी केली असती किंवा बिस्कीटांमधली साखर पूर्णच वगळली असती तरी चाललं असतं.
२. प्लेन कस्टर्ड पावडरच्या ऐवजी बाकी कुठल्या फ्लेवरची कस्टर्ड पावडर घातली तरी चालू शकेल. तसच व्हॅनिला इसेन्स ऐवजी क्रिममध्ये दालचिनी, जायफळ वगैरेही घालून करून बघता येईल.
३. मला गोळा किती मोठा घ्यावा आणि किती चपट करावा ह्याचा अजिबात अंदाज आला नाही. त्यामुळे बेक केल्यावर बिस्कीटं एकदम गोलमटोल झाली! कस्टर्ड क्रिम "नानकटाई" असा हायब्रीड पदार्थ म्हणूनही खपू शकेल!
वा! तोंपासु ! काय मस्त प्रयोग
वा! तोंपासु ! काय मस्त प्रयोग करता तुम्ही. खूप आवडलीत ही बिस्कीटे. मस्त कलर आलाय आणी खुसखुशीत दिसतायत.
पण स्टीक म्हणजे केवढे बटर? अमुलचे आपण ब्रेड साठी छोटे पाकिट आणतो ते का? ते साधारण १०० ग्रॅमचे आहे. मी आताच बघीतले त्यावर.
सुंदर आणि सुबक दिसताहेत.
सुंदर आणि सुबक दिसताहेत.
बटर वजनात लिहा.
मस्तच दिसतायत. करून बघायचा
मस्तच दिसतायत. करून बघायचा मोह होतोय. पण बटरचं प्रमाण वजनात लिहा +१
सोप्पी वाटतेय रेसेपी.
सोप्पी वाटतेय रेसेपी.
1 stick = 1/2 a cup
1 stick = 120g
1 stick = 120ml
1 stick = 4 ounces>≥>>> मलई बर्फी च्या बाफवरची सिंडरेला ची पोस्ट
छान दिसतायत बिस्कीट.भारतात
छान दिसतायत बिस्कीट.भारतात याला नानकटाई सँडविच असे नाव देऊन विकता येईल.
छान दिसतायतं!
छान दिसतायतं!
अमेरीकेत जी बटरची स्टिक असते ती १/२ कप असते. त्यावर मापाच्या खुणा असतात त्यानुसार माहिती-
१/२ कप = ८ टे. स्पून= २४ टी स्पून
१/४ कप = ४ टे स्पून
१/३ कप = ५ टे स्पून + १ टी स्पून
मस्त दिसतायेत बिस्किट्स
मस्त दिसतायेत बिस्किट्स
( खाली प्रेरणेचा स्रोत :- संजीव कपूर अस ऍड कर )
मस्त दिसत आहेत बिस्किटं.
मस्त दिसत आहेत बिस्किटं.
धन्यवाद अल्पना आणी स्वाती २
धन्यवाद अल्पना आणी स्वाती २
अर्रे भारी दिसतंय हे प्रकरण.
अर्रे भारी दिसतंय हे प्रकरण.
कस्टर्ड पावडरचा बेकिंगमध्ये असा उपयोग पहिल्यांदाच पाहिला. नाईस!
तोपासू...
तोपासू...
पण आपला पास.. पिष्टमय पदार्थ जास्त आहेत.
छान दिसताहेत. श्रुसबेरी
छान दिसताहेत. श्रुसबेरी बिस्किटांची आठवण झाली आणि काळजात कळ उठली.
भार्री दिसतायत!!
भार्री दिसतायत!!
धन्यवाद सगळ्यांना..
धन्यवाद सगळ्यांना..
बटर वजनात लिहा. >>>> हो. काल लिहायला विसरलो. वर अल्पना आणि स्वाती२ ने दिलेलं माप बरोबर आहे. नंतर मूळ रेसिपीत हलवीन.
संजीव कपूर अस ऍड कर >>> तो जुना झाला आता. नवीन कोणीतरी सांग.
एकदम खुसखुशीत दिसताहेत. मस्त!
एकदम खुसखुशीत दिसताहेत. मस्त!
वा, मस्त दिसतायत. रंगही छान
वा, मस्त दिसतायत. रंगही छान आलाय. बिस्कीटांचं टेक्श्चर नानकटाईसारखं लागतं का?
मस्तच दिसताहेत.
मस्तच दिसताहेत.
मस्त रेसीपी व फोटो झिंदा बाद
मस्त रेसीपी व फोटो झिंदा बाद.
वॉव! भारी दिसतायत!
वॉव! भारी दिसतायत!
वा, छानच दिसत आहेत!
वा, छानच दिसत आहेत!
लहानपणी (= भारतात असेपर्यंत) कस्टर्ड पावडर घालून केलेलं कस्टर्ड खूप आवडायचं. आता अमेरिकेत येऊन शिंगं फुटल्यावर त्या कस्टर्ड च्या चवीत खूप कृत्रीमपणा जाणवतो. तर पराग, कस्टर्ड पावडर घालून केलेल्या कुकीज् मध्येही ही कस्टर्ड ची टेस्ट (त्यातल्या त्या पर्टिक्युलर इसेन्स ची चव) लागते का?
कस्टर्ड ची टेस्ट (त्यातल्या
कस्टर्ड ची टेस्ट (त्यातल्या त्या पर्टिक्युलर इसेन्स ची चव) लागते का? >>>> कस्टर्डची टेस्ट नाही लागली तर त्याला कस्टर्ड क्रीम बिस्कीट का म्हणावं ? चव लागते आणि मला ती आवडते म्हणून तर केली.
थँक्यु!
थँक्यु!
>> कस्टर्डची टेस्ट नाही लागली तर त्याला कस्टर्ड क्रीम बिस्कीट का म्हणावं ?
मला काय माहित. बर्याच रेसिपीज् मध्ये काही गोष्टी केवळ टेक्स्चर इम्प्रूव्ह करायलाही वापरलेल्या असू शकतात.
आज केली ही बिस्किटं. छानच
आज केली ही बिस्किटं. छानच झाली. आकाराने मोठी झाली मात्र माझीपण.
मी अमूलचं सॉल्टेड बटर वापरलं. पिठीसाखरेऐवजी बुरा शक्कर वापरली ( पिठीसाखर संपली होती आणि बुरा शक्कर संपवायची आहे ). फक्त क्रीमसाठी पिठीसाखरच हवी होती हे नंतर लक्षात आलं. आणि बटरचा खारटपणा जऽरा जास्त झाला. पुढच्या वेळी प्लेन आणि सॉल्टेड निम्मं निम्मं किंवा पूर्ण प्लेन बटर वापरून बघितलं पाहिजे. एकंदरीत पहिला प्रयत्न चांगला झाला.
आणि हो, बटरस्कॉच फ्लेवरची
आणि हो, बटरस्कॉच फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आणि क्रीममध्ये दालचिनी पावडर.
धन्यवाद या पाककृतीसाठी.
वा!
वा!
किती तोंपासु
किती तोंपासु
मी करून बघितली आज. मी
मी करून बघितली आज. मी व्हॅनिला स्वादाची कस्टर्ड पावडर वापरली. बिस्किटांचा रंग जास्त पिवळट आला आहे, जो छान नाही वाटते. आणि पिठुळ चवही मला नाही आवडलीय. पण पटकन झाली, लेकीबरोबर करायला मजा आली.
क्रीम लाऊन सँडविच करायची कृती मी टाळली.