अमानवीय म्हणजे काय ? असे सदस्य आहेत का ?

Submitted by पाटलीण बोवा on 21 January, 2019 - 05:12

अमानवीय म्हणजे काय ?
मायबोलीवर अमानवीय सदस्य आहेत काय ? असल्यास ते त्यांचे अनुभव कसे लिहीतात ? ते कोण वाचू शकते ?
काही भूताखेतांचे धागे आहेत. त्यावरचे किस्से खरे किंवा खोटे आहेत हे कसे ओळखतात ?
यातले अनेक जण जिवंत वाचले आहेत. पण कुणी कुणी वाचले नसतील. ते त्यांचे किस्से लिहीतात का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋ सर !!

आदरणिय सदस्यांना सर संबोधणे हा या आयडीचा मोठाच गुण म्हटला पाहीजे. काही धाग्यांवर सरांना काही लोक घालून पाडून बोल लावताना दिसले. आता नवे सदस्य आले असल्याने आणि त्यांचे कर्तृत्व मोठे असल्याने जुन्या सदस्यांचे कर्तृत्व झाकोळले जाऊन आता ते बरे असे वाटू लागले आहे. जसे काँग्रेस जावी असे वाटून लोकांनी मोदीला आणले आणि आता काँग्रेसच बरी होती असे वाटू लागले आहे.

सरांचा विजय असो !!

मायबोलीवर अमानवीय सदस्य आहेत काय ? >>>>>>
आहो आहेत ना मायबोलीवर च , "फक्त स्वत:लाच योग्य मायबोलीकर समजणारा (री) म्हणजे (तशा भ्रमात वावरणारी) अमानवीय आहेत ",अन् ते सदैव 'स्वत:चे अस्तित्व' त्यातही नसलेले शहाणपण दाखवण्यात मग्नही असतात, निदान मायबोलीवर तरी! अन् तेही दुसय्रांच्या धाग्यात घुसून घुसून, ते त्यांचे अनुभव लिहीतात!!!!!!!वर फालतू सल्ले,समज ही देतात.विनोदबुद्धिला चालना देण्याचे काम, ते जवळ रीकामा वेळ नसताना, आवडीने, हिरीरीने, पुढे होवून, करत असतात.

या अमानवीयाला पृथ्वीतलावर मानवी रुपात पाठवून मानव पृथ्वीकर नाव देण्यात आले आहे. माझे अमानवीय प्रताप मी एवढ्या साळसूदपणे करतो की कुणाला थांग पत्ता लागत नाही. आणि मी स्वतः हे सांगितले तरी कुणी विश्वास ठेवत नाही, एवढे बेमालूमपणे वठवायचे असते अमानवीयपद.

मानवजी, तुम्ही अमानवीय आहात माहीत नव्हते. त्या दुसऱ्या एका धाग्यावर पुड्या सोडण्याची स्पर्धा चालू असते, तिथे तुम्ही कधी दिसला नाहीत. खरंच थांग पत्ता लागू दिला नाही .

खरंच, हे थांगपत्ता लागू न देणे कसे जमते?
मला आजवर माझ्यातल्या अमानवीय शक्ती कधीच लपवता आल्या नाहीत. लपवायचा प्रयत्न करत नाही असे नाही पण एखादी गोष्ट सहज करून जातो आणि जेव्हा लोकं अवाक होतात तेव्हा अचानक जाणवते की अरे कंट्रोल कर ऋन्मेष, सामान्य मानव हे नाही करू शकत. पकडला गेलास Sad

माझ्या मते पृथ्वीवरील मानव जेव्हा मायबोलीवरील 'मायबोलीकर' ही उपाधी स्वत: ला ज्याक्षणी लावतो;त्याचक्षणी, तो 'अमानवीय' सदरा'स' प्राप्त होतो-----

मूळच्या आशुचँप यांच्या अमानवीय धाग्याला कुलूप लागलेले आहे. हेरीटेज धागा म्हणून पहायला गेलो होतो.
https://www.maayboli.com/node/12295
दक्षिणा यांचा धागा २ ने सुरू न होता १ ने सुरू झाला. हे ही अमानवीय परंपरेला अनुसरूनच दिसते. हा धागा बहुतेक प्रस्तावना किंवा अनुक्रमणिका असावा.

अंबोली घाट दिवसा सुंदर असला तरी रात्री या घाटातून गाडी न्यायला काळीजच लागतं.
कितीतरी तास ना मागून वाहन ओवरटेक करून गेलेलं ना समोरून कुठलं वाहन दिसलं. आजूबाजूचे डोंगर मिट्ट अंधारात काळ्या गडद सावल्या धरून बसले होते आणि त्या सावल्यात करपल्यासारख्या आकृत्या होत्या त्या झाडांच्या, पानांच्या होत्या. अंधाराला चिरत फक्त गाडीच्या हेडलाईट्सचा उजेड अंग चोरत उंडारत चालला होता..

दिवसा न येणारे रातकिड्याचे आवाज बसच्या आवाजात विरून जात असले तरी पिंगळ्याचा आवाज मात्र येत होता. त्यामुळे अशुभतेत भर पडली होती.. चंद्र साक्षीला फक्त नावापुरताच. गडद झाडी आणि डोंगराच्या पलिकडे असल्याने त्याच्या प्रकाशाने सावल्यांच्या कडा ठळक करण्याचे काम केलेले होते. रामसेंच्या सिनेमात रस्त्याच्या उतारावरून धुके आणि त्या धुक्यामागून प्रकाशाचे लोट एव्हढे जेमतेम यावेत कि भयाणतेत भर पडली पाहिजे तसे झालेले होते.

गाडीत विचित्र शांतता होती.
"नेमके कुठे थांबायचेय ?"
कुणी तरी विचारलेच. बसमधली शांतता डचमळल्याने इतरांना अस्वस्थ झाले. पण कुणीतरी हे विचारणे भागच होते.
जीपीएस, गुगल मॅप्स काहीही चालत नव्हते. आजूबाजूच्या डोंगरांमुळे नेटवर्क गेले होते.

कुठून वळण घ्यायचे हे ड्रायव्हरला सुद्धा कळत नव्हते.
उजव्या बाजूला दरी असल्याचे जाणवत होते. अर्थात दरी आणि रस्त्यामधे जमिनीचा पट्टा होता त्यावर अधून मधून ढाबे दिसत होतेजे आता बंद होते.

घुर्र घुर्र घुर्र घुर्र
इंजिन मधून आवाज आला. झटके बसले आणि गाडी थांबली.
अंधार मी म्हणत होता..
ड्रायव्हरने खटाटोप केल्यावर नकारार्थी खांदे उडवले. हेडलाईट मुळे ते प्रत्येकाला दिसले.

त्याबरोबर गाडीतले पुरूष आयडी खाली उतरले.
" उगीच आलो आपण "
" हो ना. अशा ठिकाणी कुणी बोलवतं का ?"
" हो, पण आपणच होकार दिला होता ना ?" एक स्त्री आयडी उद्गारली.
" अरे म्हणजे कुणी असं फसवेल असं वाटलं होतं का ? "
" काय फसवलं ? "
" बोलवणार्‍याने ही जागा निर्जन आहे हे सांगायला नको का ?"
" अंबोली घाट सांगितल्यावर पुन्हा आणखी काय सांगायचे ?"
" वाद नको. आदिवासी वस्ती असेल आजूबाजूला तर मेकॅनिक मिळेल"
" बरोबर आहे"
"अनुमोदन"
"सहमत आहे"
" +१००"
हे सर्वांनाच पटले.

सगळे खाली उतरले तेव्हां लक्षात आले कि जिथे गाडी बंद पडली आहे तो तिठा आहे. तीन रस्ते एकत्र आल्याने रस्ता थोडा प्रशस्त होता. कडेला एक चहाची टपरी होती जी बंद होती. पंक्चरचं दुकान सुद्धा होतं. ते ही बंदच.
इथे जागा खुली असल्याने चंद्रप्रकाश थेट खाली पोहोचत होता.
खरं तर इतक्या वेळात डोळे अंधाराला सरावले होते. त्यात चंद्रप्रकाश एक हजार वॅटच्या बल्बसारखा भासत होता.
नजर फिरली तसे लक्षात आले कि टपरी आणि गॅरेजच्या मागे दगडी कट्टा आहे.

सगळे पाय मोकळे करत कट्ट्यावर बसायला निघाले.
गॅरेजच्या बाजूने मोकळ्या जागेत कट्ट्यावर बसावं आणि खाली दरीत बघत सिगारेटचे झुरके मारावेत असा बेत होता.
गॅरेजच्या रस्त्याला काटकोनात असलेल्या भिंतीला एक बाकडे ठेवल्याचे दिसले आणि..

त्यावर एक मनुष्याकृती बसलेली होती.
निरखून पाहिल्यावर ती स्त्री असल्याचे समजत होते.
यांना पाहून ती स्त्री आकृती जागची उठून यायला लागली.

( पुढचा भाग लवकरच )

आदल्या रात्री सुद्धा अशीच एक कार नेमक्या क्षणी बन्द पडल्यामुळे ह्या कट्टयावर काल एक बिहारी जोडपे बसलेले होते. "स्त्री कल आना" असे त्यांनी स्पष्टपणे उच्चारल्याने आणि ती तर वेळेची पक्की असल्याने आज पुन्हा आलेली असणार.

ज्या कोणी हा धागा काढलेला आहे त्यास , आशुचॅम्प ने अमानवीय धागा सुरु केला खर तर तो त्यांच्या ट्रॅकिंग मधल्या आलेल्या अनुभवाने सुरुवात करून यात पुढे अनेकांनी भर घातली धाग्याने २००० टप्पा ओलाडून पण नवीन धागा तितक्याच जोमात सुरु राहिला , लोकांनी वाद घातले भांडले पण धागा सुरु राहिला यात बरेच जुने मायबोलीकर होते ( भांडणात नव्हे धाग्यात भर घालण्यात )अमानवीय , अमानवीय-१ अमानवीय -२ कदाचित तिसरा धागा सुरु असावा ... पण अमानवीय -२ धाग्याच्या शेवटी बोकलत या आयडीने पूर्ण वाट लावली , मग इतरांनी आपापल्या परीने वाट लावायलाय सुरुवात केली आणि या धाग्याला कॉमेडीचा रूप आले , उत्तम चालला धागा कसा बिघडवावा याचे उत्तम उदाहरण या आयडीने दाखवले त्यांना अनेकांनी समज दिली पण काहीही उपयोग झाला नाही . आता तर वाचायला पण नको होते त्यांचा गोधळ. पण ज्यांना खरच trill अनुभवायचे आहे त्यांनी नक्की पूर्वीचे धागे वाचा
१. http://www.maayboli.com/node/12295
२.https://www.maayboli.com/node/49229?page=21
या दुसऱ्या धाग्यावर पुढची लिंक मिळेल

अमानवीय म्हणजे काय ?
-> जे मानवीय नाही

मायबोलीवर अमानवीय सदस्य आहेत काय ?
-> आहेत की

असल्यास ते त्यांचे अनुभव कसे लिहीतात ?
-> कीबोर्डवर टाईप करतात

ते कोण वाचू शकते ?
-> वाचता येणारं कोणीही

काही भूताखेतांचे धागे आहेत. त्यावरचे किस्से खरे किंवा खोटे आहेत हे कसे ओळखतात ?
-> सगळे किस्से खोटे आहेत

यातले अनेक जण जिवंत वाचले आहेत. पण कुणी कुणी वाचले नसतील. ते त्यांचे किस्से लिहीतात का ?
-> नाही

काही भूताखेतांचे धागे आहेत. त्यावरचे किस्से खरे किंवा खोटे आहेत हे कसे ओळखतात ?
-> सगळे किस्से खोटे आहेत
अपवाद मी लिहिलेले किस्से.

जोड्या लावा

१ बोकलत .................१ मन की बात
२ अमानवीय .................२ विनोदी लेखन
३ खोट्या गोष्टी .................३ भुताच्या गोष्टी