केस नं एक.
विजय आणि वैशाली हनिमूनला अमेरिकेत जातात. पंधरा दिवसांचा मोठा टूर असतो. दरम्यान ते लास वेगासला एका हॉटेलमध्ये उतरलेले असतात. दिवसभर बाहेर भटकंती केल्यावर संध्याकाळी ते हॉटेलात परततात. तिथे कसिनोमध्ये बसतात. खेळायला सुरुवात करतात. जिंकण्याहरण्याची मजा येऊ लागते. दोघेही दोन वेगवेगळ्या टेबलवर बसून जुगाराची मौज लुटत असतात... हळू हळू कसिनो त्यांना लुटायला लागतो. दोघेही भानावर यायच्या आधीच त्यांच्याकडचे सर्व पैसे संपून गेलेले असतात. पुढचा सगळा टूर आता कसा बिनपैशाचा करायचा ह्याचे दोघांना टेन्शन येते.... ते आपल्या खोलीत जातात.. वैशाली झोपते.. पण विजय विचारात पडलेला, विवंचनेत अडकलेला, आता पुढे काय करायचे.. हताश बसलेल्या विजयची नजर एका छोट्याशा वस्तूवर पडते. ती म्हणजे त्याच्या बायकोने इथली आठवण म्हणून घेतलेली पाच डॉलरची छोटीशी लाकडी मूर्ती असते... अंधारात त्या मूर्तीतून काही प्रकाशकिरणे निघताना विजयला दिसतात.. त्या प्रकाशकिरणामुळे काही एक आकडा अस्पष्ट दिसू लागतो. विजय जरा डोळे चोळून बघतो.. त्याला तो १७ हा आकडा असल्यासारखे वाटते. कदाचित त्याचा भ्रमही असू शकतो.. काहीतरी ठरवून तो उठतो. खिसे, पाकिटे परत धुंडाळतो. त्याला एक शेवटचे पाच डॉलर सापडतात... तडक निघून खाली कसिनो गाठतो.
पाच डॉलर... एकच आकडा... 'लाव सतरा वर'...
रोले फिरतोय... गर गर गर.... सुळसुळ सर्र आवाज करत ती गोळी अचूक थांबते... ती बरोबर सतरा आकड्यावर... jackpot!
विजय मिळालेली सगळी रक्कम परत लावतो. आता नशीब जोरावर आहे मग काय..? सटासट एका नंतर एक गेम खेळतोय जिंकतोय, खेळतोय जिंकतोय...पहाट व्हायला अजून थोडा अवधी आहे आणि विजय ने पाच मिलियन डॉलर जिंकले... आता तो पेटलाय, त्याने ते पाच मिलियन परत लावायचे ठरवले, तेव्हढ्यात कसिनोचा मालक धावत आला. म्हणाला, 'साहेब साहेब, जरा थांबा, इतकी बेट घ्यायची ह्या कसिनोची ऐपत नाही, तुम्ही शेजारच्या कसिनोमध्ये जा, तिकडे कोणतीही लिमिट नाही..' विजयला लगेच सहा सात बॉडीगार्ड देण्यात आले, रोल्सरॉयसमधून दुसऱ्या कसिनोत नेण्यात आले. सेव्हनस्टार अनुभव...
पाच मिलियन घेऊन बसला हा नव्या कसिनोत. लगाव.. सतरा....
गरगर फिरत परत एकदा ... jackpot!!!
आता रक्कम नऊशे मिलिअन डॉलर्स....!!!
जाळ अन धूर संगती..... विजयाची नशा विजयच्या डोळ्यात चढली.. "सगळे नऊशे मिलिअन लाव सतरा वर... अरे मूर्तीने आशिर्वाद दिलाय आज आपल्याला..."
रोले चे गोळी सरासर फिरली.... गप्पकन थांबली.....
आकडा होता.. ३०.
एका फटक्यात. नऊशे मिलियन सफाचट.
विजय उठला. चालायला लागला परत आपल्या हॉटेल रूम कडे. आता ना रोल्स रॉयस ना बॉडी गार्ड.. पैसे होते तेव्हा सगळे, पैशाच्या सुरक्षेला. ह्या निरंक माणसाला कशाला हवे चोचले....
आपल्या खोलीत विजय परत आला तेव्हा वैशाली जागीच होती... तिने विचारले कुठे गेला होता? त्याने सांगितले, 'परत गेलो होत कसिनोत...'
"काय झाले मग?"
"काही नाही, गमावले पाच डॉलर्स..."
______________________
आता सांगा तुम्ही वाचकहो.
विजयने पाच डॉलर गमावले की नऊशे मिलियन.?
रूममधून निघाल्याचा रेफरन्स
रूममधून निघाल्याचा रेफरन्स पॉइंट धरला तर पाचच डॉलर्स. पण पहिल्या कॅसिनोतून बाहेर पडण्याचा रेफरन्स पॉइंट धरला तर नऊशे मिलियन्स. बायकोसाठी पाच डॉलर्स हेच उत्तर बरोबर.
विजयने झोप गमवली...
विजयने झोप गमवली...
विजयने झोप गमवली...+१११
विजयने झोप गमवली...+१११
डोकेदुखी , निराशा कमावली
हनिमून
हनिमून
वाह, नानकळा इस बॅक☺️
वाह, नानकळा इस बॅक☺️
मस्त
मस्त
एक करेन्शन
एक करेन्शन
- पाच जर नंबर वर लावले रोले मध्ये आणि जिंकला तर मोस्टली 35 काही ठिकाणी 36 टाईम्स असतात जरी तरी मिळून 180 होतील की. 900 कसे झाले.
विजय ने 5 मिलियन गमावले, कारण पहिल्या कॅसिनो मध्ये त्याने कलर इन करून ते पैसे कमावले होते ( actual money)
दुसऱ्या कॅसिनो मध्ये जे 900 मिलियन झाले ते वर्चुअल मनी होती, आधीचे कॅश आऊट पैसे 5 मिलियन होते जे तो हरला.
जिंकायला लागल्यावर तो
जिंकायला लागल्यावर तो थांबायला तयारच नव्हता. अंत जिंकले तेवढे हरण्यातच होता.
तेव्हा हरला पाच डॉलर.
नऊशे मिलियन हरण्याआधी
नऊशे मिलियन हरण्याआधी त्याच्या हातात कमवलेले होते. ती 'संभाव्य मिळकत' नसून 'हातातली रक्कम' होती. परंतु 'जिंकली' असल्याने त्याचे महत्त्व त्याला वाटले नाही. कोणताही पैसा पैसा असतो, तो पाच डॉलर असो कि नऊशे मिलियन, त्याची किंमत ठरवण्याची दृष्टी तो कसा मिळाला ह्यानुसार बदलत असेल तर असा दृष्टीकोन चुकीचा असतो. पुढच्या भागात हे व्यवस्थित उलगडत जाईल.
(किश्शात दिलेले आकडे गृहीत धरण्यासाठी आहेत, आपण पैशाकडे कसे पाहतो हे समजण्यासाठी रचलेली कथा आहे)
मस्त आहे गोष्ट!
मस्त आहे गोष्ट!
>>त्याची किंमत ठरवण्याची
>>त्याची किंमत ठरवण्याची दृष्टी तो कसा मिळाला ह्यानुसार बदलत असेल तर असा दृष्टीकोन चुकीचा असतो.<<
इझि कम, इझि गो. हे काहिसं जेंव्हा पैसा तुमच्यासाठी काम करतो (गँबलिंग, इन्वेस्टमेंट्स इ.) तेंव्हा लागु होउ शकतं. अशा परिस्थितीत लॉस इन प्रॉफिट इज नॉट रियली ए लॉस - हि खुणगाठ (मनाची समजुत) घालुन घेतलीत कि मग पुढे त्रास होत नाहि...
नऊशे मिलियन हरण्याआधी
नऊशे मिलियन हरण्याआधी त्याच्या हातात कमवलेले होते. ती 'संभाव्य मिळकत' नसून 'हातातली रक्कम' होती. परंतु 'जिंकली' असल्याने त्याचे महत्त्व त्याला वाटले नाही. कोणताही पैसा पैसा असतो, तो पाच डॉलर असो कि नऊशे मिलियन, त्याची किंमत ठरवण्याची दृष्टी तो कसा मिळाला ह्यानुसार बदलत असेल तर असा दृष्टीकोन चुकीचा असतो. पुढच्या भागात हे व्यवस्थित उलगडत जाईल.>>>>
अर्रर्रर्रर्रर्ररर हे तर शिक्षकांनी विद्यार्थाला प्रश्न विचारावा, आणि नंतर तू चूक, तू चूक, तू चूक करत स्वतःच उत्तर बाहेर काढाव असं झालं...
नऊशे मिलियन हरण्याआधी
नऊशे मिलियन हरण्याआधी त्याच्या हातात कमवलेले होते. ती 'संभाव्य मिळकत' नसून 'हातातली रक्कम' होती. परंतु 'जिंकली' असल्याने त्याचे महत्त्व त्याला वाटले नाही. कोणताही पैसा पैसा असतो, तो पाच डॉलर असो कि नऊशे मिलियन, त्याची किंमत ठरवण्याची दृष्टी तो कसा मिळाला ह्यानुसार बदलत असेल तर असा दृष्टीकोन चुकीचा असतो. पुढच्या भागात हे व्यवस्थित उलगडत जाईल.>>>>>
सॉरी, पण मला हे वाटत नाही. हातात आलेल्या पैशाची एक युजेबिलिटी वेळ +परिस्थितीजन्य + मानसिक असते, आणि ती या तीन गोष्टींनुसार बदलते.
या गोष्टींमध्ये ती वेळ, कसिनोची परिस्थिती आणि मूर्तीमधील किरणांनी केलेली त्याची मानसिक अवस्था, यातला परिपाक म्हणजे, ९०० मिलियन डॉलर हरण्यात झालेली परिणिती. तो पैसा जिंकलाय, की कमवलाय किंवा कसा, हे त्याच्या लेखी महत्वाचं वाटत नाही, मूर्ती आज जिंकवणारच ही मानसिक अवस्था+हातात असलेला पैसा लावून कितीही पैसा जिंकण्याची सोय+ती वेळ यातून तो पैसे लावत जातो.
'गेले पाच डॉलर' हा दृष्टिकोन मला आवडला. एखादा ९०० मिलियन गेले, तर वेडाच झाला असता. पण या वाक्यातून त्याने परिस्थिती शांतपणे स्वीकारलीय असं ध्वनित होतं. लेखात कुठेही त्याची अवस्था बिघडल्याचं वर्णन नाहीये. शेवटीही, तो चालू लागला, असं लिहिलंय. सैरावैरा धावू लागला असं नाही.
म्हणून त्याच्या लेखी पाच डॉलर गेले, आणि त्याने तेच मानावं हेच उत्तम!
म्हणून गेले पाच डॉलर!!!!!
सैरावैरा धावू लागला असं नाही.
सैरावैरा धावू लागला असं नाही.
म्हणून त्याच्या लेखी पाच डॉलर गेले, आणि त्याने तेच मानावं हेच उत्तम!
म्हणून गेले पाच डॉलर!!!!!>>
किती खोल आणि बरोबर विश्लेषण केलंय.. छान
गोष्ट छान आहे.
गोष्ट छान आहे.
विनोदी कथा.
विनोदी कथा.
<<< लॉस इन प्रॉफिट इज नॉट रियली ए लॉस - हि खुणगाठ (मनाची समजुत) घालुन घेतलीत कि मग पुढे त्रास होत नाहि >>>
Prospect Theory बद्दल एकदा वाचून बघा जरा.