सुरमई, साधारण अर्धा किलो
ओलं नारळ, एक छोटी वाटी
धणे, दोन चमचे (चहाचे)
जिरं, एक चमचा (चहाचा)
लाल सुकी मिर्ची, तिखट सोसण्याच्या आपापल्या कुवतीनुसार
ब्याडगीचं तिखट, (दोन छोटे चमचे, तिखट-मिठाच्या पाळ्यातले)
लाल कांदा, पिटुकला
टमाटा, छोटा,अर्धा
लसूण पाकळ्या, चार-पाच
आलं, अगदी पाव इंचं
हिरवी मिर्ची, एक, चवीपुरता
चिंचं, छोट्या लिंबाएवढी
चिमुटभर हळद
मीठ
पाणी
मासे म्हणजे भयंकर आवडता खाद्यप्रकार. पण कायम आईनेच करून खायला घातल्याने माझ्यावर कधी करायची वेळ आलीच नाही.
आणि नेमका नवराहि सी-फूड बघून तोंड वेंगाडणारा! त्यात सासरी मांसाहारी स्वैपाक सुरु झाला तोच मुळात माझ्यामुळे! अशात मासे वगैरे करायचे म्हणाजे उगाचच फार धाडसाचं काम असा माझा समज होता. बरं मासे म्हटलं कि ते साफ करणं वगैरे प्रकार आले, एवढंच कशाला, बाजारातून मासे आणायचे म्हणजे अजून एक परीक्षा!
अशातच एका मित्राने कट-क्लीन केलेले मासे घरपोच देण्याचा व्यवसाय इथे, पुण्यातच सुरु केला. त्याच्या ऑफिसात मुक्त वावर असल्याने स्वच्छतेबद्दलची काळजी मिटलेली. मग काय, आपण शूरवीरच!
असो, नमनाला घडाभर तेल घातलेलं असलं तरी ह्या पाकक्रुतीमध्ये थेंबहि घालायचा नाहिये!
सोप्पं आहे हे प्रकरण अगदी!
सुरमईचे तुकडे, स्वछ धुतलेले, एका भांड्यात घेऊन त्याला हळद, मीठ आणि एखाद पाकळी बाSSSSSSSSरिक चिरलेला लसूण लावून बाजुला ठेवून द्या.
मिक्सरच्या छोट्या भांड्यात (ज्यात अगदी महीन पेस्ट होऊ शकेल अशा) नारळ, मिर्च्या, आलं, लसूण, कांदा, टमाटा, धणे-जिरे, लाल तिखट, चिंचं, मीठ आणि पाणी असं सगळं अगदी बारीक वाटून घ्या.
एका मध्यम आकाराच्या पातेल्यात ही वाटण घेउन मध्यम आचेवर ठेवा आणि थोडा वेळ परतून घ्या. जरा कोरडा होतोय मसाला असं वाटलं कि त्यात साधारण तीन-चार वाट्या पाणी घाला. साधारण सूपच्या जवळपास जाणारी consistency अपेक्षित आहे.
मस्त उकळी फुटली कि त्यात आधी मेरिनेट करून ठेवलेले माशाचे तुकडे सोडा.
झाकण ठेऊन दहा-बारा मिनिटं उकळू द्या.
मग अवडत असल्यास वरून झक्कासपैकी कोथिंबीर पेरा आणि वाफाळत्या भाताबरोबर खायला घ्या.
विसु: माझ्यासरखं फोटो काढायला विसरु नक!
फोटो टाका जमल्यास!!
फोटो टाका जमल्यास!!
ह्या फिश करी ला तेलाची फोडणी
ह्या फिश करी ला तेलाची फोडणी वगैरे द्यायची गरज नाही का ?
कारण गोवन फिश करी म्हटली कि वर तेलाची तर्री असायलाच हवी.
--
बाकी पाककॄती आवडली.
नाही हो अनिरुद्ध. ह्या करीत
नाही हो अनिरुद्ध. ह्या करीत फोडणी नसतेच. तरी भानुप्रिया फोटो टाक गं पुढच्या वेळी. छान आहे पाकृ.
मला काय ते माश्यांच्या
मला काय ते माश्यांच्या प्रकारातलं कळत नाही पण तरीही सर्वसाधारण पणे ओल्या खोबर्याच्या वाटणांत टोमॅटो नसतो ना?
सर्वसाधारण पणे ओल्या खोबर्
सर्वसाधारण पणे ओल्या खोबर्याच्या वाटणांत टोमॅटो नसतो ना? >>>> माझ्या गोअन कलीगने सांगितलेल्या रेसिपी मध्ये पण टोमॅटो नव्हता आणि चिंचे ऐवजी आमसूल होते. मी ओल्या नारळाबरोबर अमसुलची पण पेस्ट करते आणि थोड्या तेलाच्या जिऱ्याच्या फोडणीत ती पेस्ट परतून घेते. बाकी रेसिपी भानुप्रियाने दिली तशीच.
पुण्यात सध्या कोकणातून आणून 14-16 तासात (फ्रेश) मासे घरपोच पुरवणारे 2-3 जण माहीत झाले आहेत. चांगले मासे मिळतात आणि स्वच्छ करून तुकडे करूनही देतात. विशेषतः प्रॉन्स साफ करून मिळाले की आनंद होतो. हे असं मोठेपणी मासे खायला लागलं की साफसफाई करण वगैरे शिक्षण राहून जातं.
हो, खरं तर नसतो, पण मी
हो, खरं तर नसतो, पण मी आंबटशौकीन आहे, अन्नाच्या बाबतीत, आणि चिंचेची चव कोकामापेक्षा किंचित जास्त आवडती, म्हणून माझं थोडंसं variation!
माहितीचा स्रोत:
माहितीचा स्रोत:
इंटरनेट>>>>> आधी कृती वाचली,त्यावेळी हे काय बुवा खरं नाही असं वाटलं.मग माहितीचा स्रोत वाचल्यावर हुश्श झाले.
तर सुरमईच्या टिपिकल गोवन पद्धतीत टॉमेटो,आले लसूण, जिरे घालत नाहीत.
१) खोबरे(हे ओलेच),कांदा,चिंच,धणे,२-४ मिरी(हे ऐच्छिक) लाल मिरची(पाण्यात भिजत घतलेली)/ तिखट हे सर्व गंधासारखे वाटणे.नंतर त्यात ७-८ तिरफळे घलून जरासा घसरा देणे. तिरफळे बारीक वाटायची नाहीत.ह्या वाटणात मासे शिजवायचे.गॅस बंद केल्यावर वरून कच्च्या खोबरेल तेलाची धार सोडायची.जेवताना गरम करतेवेळी त्या तेलाचा कच्चेपणा जातो.तरीही आमटीवर तेलाची तर्री येत नाही.
२) चमचाभर नेहमीच्या तेलात कांद्याची फोडणी देऊन(कांदा डार्क ब्राऊन झाला पाहिजे) वरच्यासारखे वाटण(तिरफळे न घालता) घालायचे.त्यात मासे सोडायचे.नो खोबरेल तेल.
वरील दोन्ही पद्ध्तीत अजून थोडे नारळाचे दूघ घातले की अजून चांगले लागते.मग मात्र खळखळ उकळायची नाही.
सर्वसाधारण पणे ओल्या खोबर्याच्या वाटणांत टोमॅटो नसतो ना?>>>>+१.
खोबरे(हे ओलेच),कांदा,चिंच,धणे
खोबरे(हे ओलेच),कांदा,चिंच,धणे,२-४ मिरी(हे ऐच्छिक) लाल मिरची(पाण्यात भिजत घतलेली)/ तिखट हे सर्व गंधासारखे वाटणे.नंतर त्यात ७-८ तिरफळे घलून जरासा घसरा देणे. तिरफळे बारीक वाटायची नाहीत.ह्या वाटणात मासे शिजवायचे.गॅस बंद केल्यावर वरून कच्च्या खोबरेल तेलाची धार सोडायची.जेवताना गरम करतेवेळी त्या तेलाचा कच्चेपणा जातो.तरीही आमटीवर तेलाची तर्री येत नाही.>> माझ्या चुलत साबा अशीच करत. तिरफळे घालून. टोमाटो नाही. आमसोले नाहीतर चिंच. आमसोलेच जास्त करून.
मी आता नारळ खोवायला विळी घेत आहे स्पेशली.
वाॅव, छान आहे, ट्राय करीन
वाॅव, छान आहे, ट्राय करीन नक्की च
छान आहे गोवन करी. पुन्हा
छान आहे गोवन करी. पुन्हा केलीस की फोटो टाक.
मीही अशीच फिश करी करतो पण
मीही अशीच फिश करी करतो पण मसाले आधी भाजुन मग आधी जिरे, धने, मिरच्या, मिरे पुड करुन घेतो नंतर त्यात लसुण, खोबरे आणि शेवटी कांदा घालुन गिर्रर्रर्र फिरवुन ते वाटण काढुन घेतो. नंतर लसुण, तिखट, मीठाने मॅरिनेट केलेल्या सुरमई तुकड्यांना कढईत कडक तेलावर १-१ मिनिट उलटं-पालटं करुन त्या काढुन घेतो. त्याच कढईतल्या तेलात गिर्रर्रर्र वाटलेला मसाला परतवुन पाणी घालुन उकळवुन मस्त शिजु देतो आणि शेवटी त्यात तळलेल्या तुकड्या अलगद सोडुन १ वाफ काढतो.
आजच या रेसिपीने तिलापियाची
आजच या रेसिपीने तिलापियाची करी केली. मस्त झालेय. धन्यवाद सोप्या रेसिपीबद्दल
आजच या रेसिपीने तिलापियाची
आजच या रेसिपीने तिलापियाची करी केली. >> तिलापिया फिश आहे?
> अशातच एका मित्राने कट-क्लीन
> अशातच एका मित्राने कट-क्लीन केलेले मासे घरपोच देण्याचा व्यवसाय इथे, पुण्यातच सुरु केला. त्याच्या ऑफिसात मुक्त वावर असल्याने स्वच्छतेबद्दलची काळजी मिटलेली. >
> पुण्यात सध्या कोकणातून आणून 14-16 तासात (फ्रेश) मासे घरपोच पुरवणारे 2-3 जण माहीत झाले आहेत. चांगले मासे मिळतात आणि स्वच्छ करून तुकडे करूनही देतात. विशेषतः प्रॉन्स साफ करून मिळाले की आनंद होतो. >
दोघांचे संपर्क क्रमांक मिळतील का?
अँमी, हे घे.
अँमी, हे घे.
अक्षता देशपांडे - 95185 79871 ( हा whatsapp नंबर आहे, इथे तुम्ही ऑर्डर देऊ शकता) तिचाच अजून एक नंबर आहे - 86571 11747 हे नंबर्स तिने सोशल मीडियावर टाकले आहेत त्यामुळे इथे उघड द्यायला मला हरकत दिसत नाही.
बाकी दोन जणांचे नंबर्स शोधून देते, काय नावाने सेव्ह केले आहेत ते सापडत नाहीत. ( नेहमीचा लोचा) आणि मी तिथून कधीही ऑर्डर केले नाहीत. देशपांडे कडून मात्र सुरमई आणि प्रॉन्स घेते, चांगले मिळतात.
आभार मीरा
आभार मीरा
अक्षताकडून तू नेहमी मागवत असशील तर तिलाच संपर्क करेन. प्रॉन्स हवे आहेत ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी. पहिल्यांदाच घरी बनवायचा विचार आहे. चांगले, ताजे वगैरे काही कळत नाही, त्यामुळे ओळख असलेल्यांकडून घेतलेले बरे.
अँमी, माशांमधलं कळत नसेल तर
अँमी, माशांमधलं कळत नसेल तर अक्षता देशपांडे बेस्ट. मी पण त्या विषयात ढ आहे कारण दोन्ही घरी अंड सुद्धा न खाणारे आईवडील असल्याने नॉनव्हेज आणि त्यातही मासे उशिराच खाणं चालू केलं. प्रॉन्स घेणार असशील तर साफ करून घे. सवय नसल्याने आपल्याला जमत नाही.
हो हो साफ केलेले प्रॉन्सच
हो हो साफ केलेले प्रॉन्सच मागवणार आहे
अक्षताला काल संपर्क केला होता
अक्षताला काल संपर्क केला होता. ते फक्त पुण्यातच घरपोच मासे देतात आणि कमीतकमी ५ किलोची ऑर्डर असावी लागते. पिंचि परिसरात नाही देत
पिंचीमध्ये डिलीव्हरी नाही हे
पिंचीमध्ये डिलीव्हरी नाही हे माहीत नव्हतं. आणि हे 5 किलो पर्चेस प्रकरण नवीन आहे की काय? मी नेहमी 1 किलोच ऑर्डर करते, ते दोन जणांसाठी जास्त होतं, पण त्यापेक्षा कमी क्वांटिटी होम डिलीव्हर करत नाहीत.