Submitted by शिवाजी उमाजी on 11 December, 2018 - 12:33
अफवा
असते झटकन पसरणारी
हातपाय नसलेली अफवा,
होत्याचं नव्हतं करणारी
गैरसमज पसरवते अफवा !
अंधश्रद्धेला कारण होते
दंगल घडविते ती अफवा,
बऱ्याचदा स्वार्थासाठीच
पसरविली जाते अफवा !
मुलांची चोरी, देव देवस्की
म्हणणारी खोटीच अफवा,
मना मनात किंतु परंतू व
केवळ भ्रम वाढवी अफवा !
निरपराधाचा जीव घेणारी
पसरू देऊ नका अफवा,
वेळीच करून सर्व खात्री
मोडूनच काढा या अफवा !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खरं आहे.. खूप छान.
खरं आहे..
खूप छान.
खुप खूप धन्यवाद
खुप खूप धन्यवाद
सामाजिक कविता, छान!
सामाजिक कविता, छान!
आभार पाटील जी
आभार पाटील जी