गव्हाचं पीठ/ कणिक ३ मोठे चमचे
बेसन १ मोठा चमचा
जीरे चिमूटभर
ओवा चिमूटभर
तीळ चुटकीभर
चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखटाची पूड/ हिरव्या मिरच्या बारिक चिरून
बटर अमूल ची अर्धी वडी
चीझ क्युब २-३ किसून
मोठे कांदे किसून ४ / पातीचा कांदा घेतला तरी चालतो, अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुन
कोथिम्बीर अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुन
तेल
पिण्यायोग्य पाणी
औंध मध्ये एकदा हा पराठ्याचा प्रकार खाल्ला होता. मला प्रचंड आवडला होता. हे पराठे कसे बनवावे ह्याचा चवीवरून अंदाज घेऊन आज थोड्या व्हेरिएशन सह घरी स्वतः प्रयत्न केला. मस्त जमलाय (मला तरी आवडला :फिदी:). जुन्या मायबोलीवर पराठे पाकृ चा संग्रह बघून आले. चीझचं व्हेरिएशन दिसलं नाही. आधीच असा धागा असेल तर कृपया रेफरन्स द्या.
- कणकेत तिखट/ हिरव्या मिरच्या बारिक चिरून, मीठ, हळद, ओवा , जीरे, तीळ, बेसन घालून मिक्स करावे
- आता वरील मिश्रणात कांदा(पात घेणार असाल तर चिरलेली कान्दा पात), कोथिम्बीर घालून हलक्या हाताने कोरडेच मिक्स करून घ्यावे
- मिश्रणात किसलेले चीझ घालावे, हाताला तेल लावुन कणिक मळण्यास घ्यावी. चीझ मुळे पीठ चिकट होते.
- बेताने पाणी घालत मऊसूत कणिक मळून घ्यावी
- अर्धा तास झाकुन ठेवावी
- नेहमीप्रमाणे पराठे लाटून तापलेल्या तव्यावर बटर लावुन भाजुन घ्यावेत
- भाजताना बटर न लावता गरम पराठा ताटात घेतल्यावर त्यावर बटर घालू शकता. असे केल्यास भाजताना तेलाची बोटे लावुन पराठे उलटसुलट भाजुन घ्यावेत
प्रकाशचित्रे:
भिजवलेला कणकेचा गोळा:
कच्चा लाटलेला पराठा:
तयार पराठा बटरी बटरी :
हापिसात न्यायचा डब्बा, पराठे विथ टमाटे लोणचं:
अजुन चांगल्या चवीसाठी स्टफ करून पराठे बनवु शकता.
तसे करताना सारण म्हणून किसलेला कान्दा, चीझ, किन्चीत मिरेपुड, थोडीशी कोथिम्बीर असे घ्यावे
आज सोमवार उर्फ मंडे असल्यामुळे मी एव्हढे धाडस केले नाही
भारी वाटतेय पाकृ! मला आवडणार
भारी वाटतेय पाकृ! मला आवडणार हे पराठे.
एकसे एक पाकृ देताय.
Sahi
Sahi
टीपांत दिलेल्या पद्धतीने
टीपांत दिलेल्या पद्धतीने नेहमी करतो पराठे.
मस्त प्रकार. पातीच्या
मस्त प्रकार. पातीच्या कांद्याचे पराठे हा प्रकार नवीनच वाचला.
आई चीज पराठा (कुठल्याही प्रकारचा मसाला असेल तर) जरा वेगळ्या पद्धतीनं करते. सगळा चवीचा मालमसाला पिठांत घालायचा आणि पीठ नेहेमीप्रमाणे मळून तयार ठेवायचं. आता, पराठा लाटतांना किसलेल्या चीज चा लहान बॉल घेऊन स्ट्फ पराठे बनवायचे. पराठ्यांच्या आत चीज वितळतं आणि आवरणं खरपूस होतं
मस्त!
मस्त!
योकू यांच्या पध्दतीने करतात घरी. मधे चिज स्टफ करायचे. असे चिज स्टफ केलेले राईस बॉलही मस्त लागतात. शिळ्या भाताचे हमखास करतो.
मस्त!
मस्त!
मी आलू पराठे करताना सारणात चीज किंवा पनीर पण घालते. कांदापात छान लागेल.
मस्त!
डबल पोस्ट
आजी/सासू मोड : चीज, क्रीम
आजी/सासू मोड : चीज, क्रीम घातल्या चांगलं न लागायला काय झालें.... आॅफ मोड ... करून बघण्यात येईल थोडे मिक्स हर्ब्ज घालून...
तोमपासू!! मस्त रेसिपी किल्ली
तोमपासू!! मस्त रेसिपी किल्ली आणि योकू तुमचीही
इंटरेस्टिंग!
इंटरेस्टिंग!
स्टफ्ड पराठ्यांपेक्षा मला असे एकदाच-काय-ते-सगळं-घालून-पीठ-मळा-आणि-लाटा पराठे आवडतात.
हे करून बघणार, नक्की!
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना चीज वितळुन तव्याला चिकटत नाहीत का पराठे?
रेस्पी चांगली आहे. कांदापातीचे करुन बघणार. मी स्ट्फ पराठे करते.
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना चीज वितळुन तव्याला चिकटत नाहीत का पराठे?+ १
छान.
छान.
मस्त पाककृती आहे.
मस्त पाककृती आहे.
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना चीज वितळुन तव्याला चिकटत नाहीत का पराठे? >>>> हो ना. मला वाटतं की बाकी मालमसाला पीठ मळताना घालून फक्त ग्रेटेड चीझ लाटताना स्टफ केलं तर जास्त सेफ राहील आणि वर कोणी लिहिलं त्याप्रमाणे पराठे खुसखुशीत होऊन लेअर्स पण येतील.
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना चीज वितळुन तव्याला चिकटत नाहीत का पराठे?>> नाही.. बटर, तेल असतचं भाजताना
आणि हो , भसाभसा चीझ घालायचं नाही
मग काय मज्जा?
मग काय मज्जा?
मी एवढ्या प्रमाणाला ३-४ अमूल
मी एवढ्या प्रमाणाला ३-४ अमूल चे क्युब्स घातले होते, नाही चिकटले पराठे... चव पण आली होती..
चीज मळतानाच घेतल्यावर भाजताना चीज वितळुन तव्याला चिकटत नाहीत का पराठे?>>> ही शक्यता घडली नाही, कोणी करून पाहिलं तर सान्गा.. जास्त चीझ घातल्यावर असं होतं का ते..
पराठा तव्यावर गरम असताना वरून
पराठा तव्यावर गरम असताना वरून किसलेलं चीज भसाभसा घालायचं पराठा उतरवण्यापूर्वी.
तीन पराठ्यांना तीनचार क्यूब्ज
तीन पराठ्यांना तीनचार क्यूब्ज म्हणजे बक्कळ झाले. किसल्यावर ते केवढंतरी वाटतं.
नाही चिकटत हे छानच आहे.
जास्त चीज घातल्यावर असं होतं
जास्त चीज घातल्यावर असं होतं असं नाही तर चीजचा वितळणे आणि चिकटपण हा गुणधर्म आहे त्यामुळे ते होते.
मी चीज पराठा किंवा आलू पराठ्यात चीज घालुन स्टफ पराठे करते. पण कधी लाटताना पराठा थोडा जरी फाटला असेल तर चीज बाहेर येते
आणि चिकटते.
हे चिकटत नाहीत ते बरंय की मग.
धन्यवाद मानव पृथ्वीकर , राजसी
धन्यवाद मानव पृथ्वीकर , राजसी, भरत, योकु, शाली, वावे, मन्जुताई, वेडोबा, ललिता-प्रीति , सस्मित, जागु, मीरा
सगळा चवीचा मालमसाला पिठांत घालायचा आणि पीठ नेहेमीप्रमाणे मळून तयार ठेवायचं. आता, पराठा लाटतांना किसलेल्या चीज चा लहान बॉल घेऊन स्ट्फ पराठे बनवायचे. पराठ्यांच्या आत चीज वितळतं आणि आवरणं खरपूस होतं>>> ही कृती छान आहे, करून बघेन..
पण मला स्ट्फ करणे हा खटाटोप वाटतो... म्हणून वीक्डेला नव्हे तर वीकान्ताला करून बघेन
असे चिज स्टफ केलेले राईस बॉलही मस्त लागतात. शिळ्या भाताचे हमखास करतो.>>> कृती द्या प्लीझ
स्टफ्ड पराठ्यांपेक्षा मला असे एकदाच-काय-ते-सगळं-घालून-पीठ-मळा-आणि-लाटा पराठे आवडतात.>>> मला पण
किसल्यावर ते केवढंतरी वाटतं.>>> बारिक किसणी वापरली होती.. चहासाठी आलं किसतो ती
छान पाकृ.
छान पाकृ.
पण कांदयाचा वास आवडत नसल्याने नाही करणार.
पिठात असेच सगळे मिसळुन आम्ही मेथीचे पराठे करतो. अन चिज किंवा बटर घालायचे असेल तर पिठाच्या गोळ्यात लाटण्यापुर्वीच भरुन हलक्या हाताने लाटायचे अन तुप लावुन शेकायचे. अप्रतीम चव येते.
धन्यवाद VB
धन्यवाद VB
पिठात असेच सगळे मिसळुन आम्ही मेथीचे पराठे करतो>>> हो तेही छान होतात, त्यात चीझ बटर इ घालत नाही मी, थोडेसे तुप्/तेल लावुन भाजते फक्त.. घरातील एका नाकं मुरडणार्या व्यक्तीच्या पोटात मुळा जावा म्हणून असेच मुळ्याचे पराठे करून पाहायचे आहेत..
छान पाककृती .
छान पाककृती .
नक्की, करून बघणार !
धन्यवाद सामी
धन्यवाद सामी
मुळ्याचे होतात ना छान! पिठातच
मुळ्याचे होतात ना छान! पिठातच मुळा किसून घालायचा किंवा वेळ असेल तर मुळ्याचा कीस परतून तिखट मीठ मसाला घालून त्यात पनीर चुरा करून घालायचं आणि ते सारण भरून पराठे करायचे.
दोन्ही कल्पना छान आहेत वावे,
दोन्ही कल्पना छान आहेत वावे, करून बघेन धन्स