२६ जानेवारी. करीता एक ग्रुप डान्स स्कूल मध्ये बसवायचा आहे. तरी कोणते गाणे (हिंदी, मराठी) व स्टेप योग्य ठरतील? 2/3 वर्षां च्या मुलांसाठी!
१५ Aug.२०१८ ला नर्सरी च्या मुलांचा 'नन्हा मुन्ना राही हूं !' डान्स बसवला होता.त्यामुळे आता तो प्रिंसिपल स्विकारणार नाहीत.
नाच रे मोरा - ला माझी पहिली पसंती होती,जी प्रिंसिपल & इतर टिचर ना पसंत पडली नाही,म्हणून तर हा अट्टाहास!!!!
हो "छोटीसी आशा - " ला प्रिन्सिपॉल नी थोडीशी सहमती दर्शवली आहे खरी ---- तरीही त्यांच्या मते स्लो ,शांत गाणे नको ----
नविन,जोशपूर्ण, बालमनाला साजेल असे गीत हवे आहे.
तशी मायबोलीवर मायबोलीकर भरपूर सल्ले देत आहेत, त्यामुळे आशा निर्माण झाली आहे.पालक लोकही बरीच तयारी दाखवत आहेत.अन् त्याहून ती बारकी,बोबडी,गोड मुल उत्साहाने स्टेप बाय स्टेप लयीत हालचाल (व चेहऱ्यावरचे हावभाव सहीत) करत आहेत.साहजिकच मला हायसे वाटत आहे.
तशी आमची स्कूलची मुलं त्यातही प्लेग्रुपची मुलं एक नं.active आहेत.सध्या ती मोठ्यांचे अनुकरण करण्यात पुढे आहेत.मग ते रोजचा संवाद /डायलॉग असो,एखादी रोजची क्रिया/कृती असो,की poem with action & meaning आणि आता हा डान्स with song काय मस्त करून दाखवतात!!!! ( गाणे कोणते बसवले असेल हे तुम्ही ओळखले असणारच------)
मी तर स्वत:वर प्रचंड खुष आहे.
कारण हे सार मुलं स्वखुषीने, आनंदाने, एनर्जी सह एन्जाय( enjoy) करतायत.
आणखीन काय पाहिजे?
या छोटुकल्यांकडे बघून, पुन्हा एकदा,'लहान व्हावेसे' कुणाला वाटणार नाही!
"लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा !"
Playgroup च्या मुलांचा डान्स कसा बसवावा?
Submitted by Mi Patil aahe. on 1 December, 2018 - 23:32
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अगदी सोप्या छोट्या छोट्या
अगदी सोप्या छोट्या छोट्या स्टेप्स बसवू शकता त्या छोटुल्यांना जमू शकतील अशा. बडबडगीतं म्हणताना असतात तशा. त्यांना जेवढ जमेल ते गोडचं दिसेल.
All the best!
मुले खूपच लहान आहेत.
मुले खूपच लहान आहेत. त्यांच्या ओळखीचे, मस्त बीटस् असलेले सोपे गाणे निवडा. गाण्याशी जुळले की मुलं आपोआप नाचतील.
नन्हा मुन्ना राही हूं गाणे आठवले लगेचच.
स्टेप्स सोप्या म्हणजे फक्त कमरेवर हात ठेवून डुलणे, स्वतःभोवती गोल गोल फिरणे, टाळ्या वाजवून डुलणे अश्या देऊ शकता. एकाच जागी उभे राहून नाचायच्या स्टेप्स द्या.
नन्हा मुन्ना राही हूं गाणे घेतलेत तर मार्चिंगची स्टेप आणि जयहिंद च्या वेळी सॅल्युट करु शकतील मुले.
तुम्हांला शुभेच्छा.
१५ Aug.२०१८ ला नर्सरी च्या
१५ Aug.२०१८ ला नर्सरी च्या मुलांचा 'नन्हा मुन्ना राही हूं !' डान्स बसवला होता.त्यामुळे आता तो प्रिंसिपल स्विकारणार नाहीत.
त्यांच्या ओळखीचे, मस्त बीटस्
त्यांच्या ओळखीचे, मस्त बीटस् असलेले सोपे गाणे निवडा. >>>>> +१.
लहानग्यांसाठी देशभक्तीपरच नको असेल तर नाच रे मोरा पहा.
जरा छान हिट गाणे निवडा
जरा छान हिट गाणे निवडा
देभपर ची अट नसेल तर खलीबली पण चालेल
प्लेग्रुप ची मुलं नाचतील, उभी राहतील, स्टेज वर रडतील किंवा पळून आईबाबा कडे जातील हे सर्वांना माहीत असते
जरा लोकप्रिय बीट वाले गाणे घेतले तर आपोआप नाचतात मुलं आणि शांत बसतात आईबाप.
किलबिल किलबिल पक्षी बोलती
किलबिल किलबिल पक्षी बोलती
नाच रे मोरा - लागले माझी
नाच रे मोरा - ला माझी पहिली पसंती होती,जी प्रिंसिपल & इतर टिचर ना पसंत पडली नाही,म्हणून तर हा अट्टाहास!!!!
बम बम भोले बुगी वुगी सॉंग
बम बम भोले
बुगी वुगी सॉंग
इतनीसी हंसी
छोटीसी आशा
जुबीडुबी
इंग्रजी गाणी चालणार असतील तर उषा उत्थपची काही मस्त गाणी आहेत लहान मुलांसाठी.
karadi tales सर्च करा युट्युबवर.
अगं बाई ढग बाई गाण्यावर पण
अगं बाई ढग बाई गाण्यावर पण छान डान्स बसेल
हो छोटीसी आशा - लागले
हो "छोटीसी आशा - " ला प्रिन्सिपॉल नी थोडीशी सहमती दर्शवली आहे खरी ---- तरीही त्यांच्या मते स्लो ,शांत गाणे नको ----
बम बम भोले
बम बम भोले
बुगी वुगी सॉंग
इतनीसी हंसी
जुबीडुबी
ही सारी गाणी आधिच्या वर्षी sr.kg & jr.kg लागले बसवून झाली आहेत.
Gallan goodiyaan
Gallan goodiyaan
दिल धडकने दो.. मस्त बीटस आहेत. सर्व वयोगट एंजॉय करतात हा अनुभव.
https://youtu.be/jCEdTq3j-0U
सिनोरिटा, खलीबली,हिंदुस्तानी
सिनोरिटा, खलीबली,हिंदुस्तानी(ते संजय दत्त चं बीट्स वालं.)
इंडियावाले,रंग दे बसंती
नवीन गाणे घ्या. आजकाल मुले
नवीन गाणे घ्या. आजकाल मुले घरी मोबाईल आणि TV वर नवीन गाणी स्वतःच लाऊन ऐकत असतात
Sunshine in my pocket -
Sunshine in my pocket - Trolls
https://youtu.be/oWgTqLCLE8k
नविन,जोशपूर्ण, बालमनाला साजेल
नविन,जोशपूर्ण, बालमनाला साजेल असे गीत हवे आहे
Its a summer summer time..
Its a summer summer time..
एक विनंती कम सल्ला,
एक विनंती कम सल्ला,
बॉलीवूड वा फिल्मी वगैरे गाणे घेणार असाल तर त्याचा विडिओ लहान मुलांच्या लेव्हलने पाहता वल्गर वा आचरट नाही हे चेक करा. भले तुम्ही केवळ ऑडिओ ट्रॅक त्यांना वाजवून दाखवणार असला तरीही.. कारण कुठेतरी ते विडिओ बघण्याची शक्यता राहणारच.
फना सिनेमात देस रंगीला गाणे
फना सिनेमात देस रंगीला गाणे आहे. काजोल व मैत्रीणी दिल्लीत सादर करतात ते घ्या प्रसंगास उचित ठरेल मुलींना छानसे परकर पोलकी ओढणी व मुलांना चुडीदार कुर्ता छान दिसेल.
परदेस सिनेमातही सुरुवातीला एक मुलांचे गाणे आहे. ये मेरा इंडिया ते ही छान आहे मुलांना नाचायला.
महाराष्ट्रातच नाच बसवायचा व शाळा असेल तर जयोस्तुते वर करा. अभिवादन स्वरूप नाच नव्हे. एका मुलीला भारत माता करून बाकीचे वंदन करताहेत असे. सोबर व गंभीर.
गुगलबाबाला विचारलंत का?
गुगलबाबाला विचारलंत का?
१ स्कूल चले हम
२ नानी तेरी मोरनी को मोर ले गए
कसली गोड मुलं आहेत.
२ नानी तेरी मोरनी को मोर ले
२ नानी तेरी मोरनी को मोर ले गए
कसली गोड मुलं आहेत.>>>>>.+१.
यही उमर है कर ले गल्ती से
यही उमर है कर ले गल्ती से मिस्टेक
बजरंगी भाईजान मधलं चिकन
बजरंगी भाईजान मधलं चिकन कुकडुकु गाणं पण मस्त आहे.
नानी तेरी मोरनी पण मस्त.
Tik Tik Plastic
Tik Tik Plastic
मी तर बालवाडीच्या मुलामुलींचा
मी तर बालवाडीच्या मुलामुलींचा 'ढिंक चिका ढिंक चिका ' पण बघितला आहे. एका आईला विचारले तर ती म्हणाली, 'बीट छान आहे ना.. मग झालं....'
नॉन देशभक्ती
नॉन देशभक्ती
१. गलती से मिस्टेक (कान पकडून उड्या मारणे) माझ्या मुलाचा बसवला होता डान्स या गाण्यावर ... युट्युब्वर डान्स विथ गॅव्ही म्हणून सर्च करा.
२. चोगाडा (टिपर्या घेऊन करता येईल)
३. जाऊ दे ना नवं (नाळ)
अवांतरः एका आईला विचारले तर
अवांतरः एका आईला विचारले तर ती म्हणाली, 'बीट छान आहे ना.. मग झालं....'>>>>>> बर्याच आयांना लिरिक्स्/हावभाव्/वल्गरपणा याच्याशी काही देणंघेणं नसतं हे आता गेले २-३ वर्ष मुलांचे डान्स बसवल्यामुळे कळत आहे. त्यांना फक्त काहीतरि ढिनचॅक हवं असतं.
या वर्षीच्या दिवाळी पार्टीसाठी एका मातेने 'दिल चोरी साड्डा हो गया' ज्यात पिली रेड वाईन मैने पुरानी तत्सम लिरिक्स होते ते सुचवलं
खरं सांगायचं तर अगदी चोली के
खरं सांगायचं तर अगदी चोली के पिछे नसेल तर लिरीक आणि व्हलगर चा फार विचार करू नये
चिकणी चमेली अजय अतुल संगीत पुण्याई ने लोकांना लक्षात असेल आणि टाळ्या मिळवून पब्लिक चा उत्साह वाढवणार असेल तर ऍक्शन थोड्या सौम्य करून बसवायलाही हरकत नाही
(मुलांपर्यंत फिमेल ऑब्जेक्टिव्हिजम जाऊ नये हे मलाही पटतं, वाटतं, बट नोबडी गिव्ह्ज अ डॅम. निम्म्या पालकांना आपलं पोर कोणत्या गण्याबर नाचलं तेही 2 दिवसांनी आठवत नाही.पुढे जागा मिळाली नसेल तर आपलं पोर 3ऱ्या रांगेत नाचलं की पाचव्या हे संभ्रम नंतर सीडी विकत घेऊन झूम करून मिटवावे लागतात.
अगदी चोली के पिछे किंवा सैया ने बॉलिंग करी वगैरे फुल्ल ठरक डायरेक्ट अर्थ नसेल तर चांगल्या बीट चे लोकप्रिय गाणे थोड्या ऍक्शन बदलून(मुलांचा उत्साह आणि टाळ्यांसाठी) कॅश करून घ्यावे असे वाटते.
जंगल प्राणी डान्स उत्तम जर
जंगल प्राणी डान्स उत्तम जर देश भक्ती गाणं नको अदेल तर.
जंगल्च्या प्राण्याची पुर्वी भरली सभा गाणं आहे.
प्रत्येकाला तसा प्राण्याप्रमाणॅ रंग फासायचा व कपडे द्यायचे. मुखवटे नको.
२-३ वर्षाच्या मुलांना उगाच फालतु गाणी देणं टाळावे, एकतर त्यांनाच कळत नाही आणि स्टेप्स काय कप्पाळ देणार?
Submitted by mi_anu on 4
Submitted by mi_anu on 4 December, 2018 - 09:12>>>> +१
हट जा रे छोकरे .. तेरी टयाँ
हट जा रे छोकरे .. तेरी टयाँ टयाँ फिस्स्स
गलती से मिस्टेक
बम बम बोले,,मस्ती मे डोले
रोल नं २१ कार्टुन ची गाणी पण छान आहेत. १)बल्ले बल्ले शावा शावा चक दे फटे २) उल्लु बनायेटीस बडा मज्जा आये फिर सध्या आमच्याकडे फेमस आहेत.
स्वदेस मधल >> ये तारा वो तारा हर तारा , देखो जिसे भी लगे प्यारा.फक्त १ पॅरा.
बेबी को बेस पसंद है
डीजे वाले बाबु मेरा गाणा चला दो
आमच्याकडे सध्या स्वॅग से
आमच्याकडे सध्या स्वॅग से करेंगे सबका स्वागत वर डान्स सुरु आहे.
मैने कहा फुलोसे ---खुप जुनं
मैने कहा फुलोसे ---खुप जुनं गाणं आहे पण मुलांना खुप आवडत...मला वाटतं मिली चित्रपटातलं आहे.
"दिल दोस्ती दुनियादारी" सिरीअल चं टायटल ट्रॅक + यारा यारा (दुनियादारी मधलं ) मेडली करुन
मन सुद्ध तुझं गोष्ट आहे - नवीन डबल सीट चित्रपट..मस्त बीट्स दिलेत आणि फास्ट आहे गाणं
केवळं गाण्याचे बीट्स छान आहेत म्हणुन काहीही शब्द असलेल्या हिन्दी चित्रपट गीतावर लहान मुलांना नाचवणं मला तरी योग्य वाटत नाही.
बाकी तुमचे प्रिन्सिपल काय म्हणतात बघा.
केवळं गाण्याचे बीट्स छान आहेत
केवळं गाण्याचे बीट्स छान आहेत म्हणुन काहीही शब्द असलेल्या हिन्दी चित्रपट गीतावर लहान मुलांना नाचवणं मला तरी योग्य वाटत नाही.>>>> +१
आता खेळा नाचा नावाचा बालगीतांच्या कार्यक्रमात खूप छान गाणी होती. सीडी मिळाली तर बघा.
वयोगटाला योग्य, सुरेल गाणी आहेत.
https://youtu.be/LigdzUJlWO4
https://youtu.be/LigdzUJlWO4
हे चेक करा
जंगल बुकचं शीर्षक गीत- चड्डी
जंगल बुकचं शीर्षक गीत- चड्डी पहन के फूल खिला है
लबाड लांडगं ढोंग करतंय
लकडी की काठी
केवळं गाण्याचे बीट्स छान आहेत
केवळं गाण्याचे बीट्स छान आहेत म्हणुन काहीही शब्द असलेल्या हिन्दी चित्रपट गीतावर लहान मुलांना नाचवणं मला तरी योग्य वाटत नाही.>>>>+1
लहान मुलांना घंटा कळतात
लहान मुलांना घंटा कळतात लिरीकस? चांगले बिट्स चे आयटम सॉंग असावे, म्हणजे आवडेल.
उगाच लहान मुलांवर तरी निर्बंध घालू नका, आवडेल ते करू द्या.
उगाच लहान मुलांवर तरी निर्बंध
उगाच लहान मुलांवर तरी निर्बंध घालू नका, आवडेल ते करू द्या. +११
केवळं गाण्याचे बीट्स छान आहेत
केवळं गाण्याचे बीट्स छान आहेत म्हणुन काहीही शब्द असलेल्या हिन्दी चित्रपट गीतावर लहान मुलांना नाचवणं मला तरी योग्य वाटत नाही.>>>> +१
गाणे कोणतेही असो. लहान मुले स्टेप्स विसरतात.
त्यामुळे सोप्या स्टेप्स घ्या.
https://youtu.be/c0U0zQHYCdA
हा व्हिडिओ पहा .
Anu +1
Anu +1
घरात - गाडीत तुम्ही चॉकलेटचा बंगला आणि नानी तरी मोरनी अशी गाणी कायम, नोट कायम ऐकता का दिल चोरी सडडा आणि तत्सम? मुलांना नाचाची आवड निर्माण करणे, मजा करणे हा उद्देश आहे संस्कार करणे करा की घरात. शेपटी वाल्या प्राण्यांची वर नाच किती वर्षे करायचा?
केवळं गाण्याचे बीट्स छान आहेत
केवळं गाण्याचे बीट्स छान आहेत म्हणुन काहीही शब्द असलेल्या हिन्दी चित्रपट गीतावर लहान मुलांना नाचवणं मला तरी योग्य वाटत नाही.>>>> +१
Bhayanak vatate.
Ekada lekichya preschool madhe dance baghayala gelyavar eka ganyachya wording madhe "sexy radha" shabd aikun mala chakkar yayachi baki hotee.
Mee jaun feedback dilyavar mhane " Amhi action kahi Tasha basavalalelya nahit. Ani oalakanna avadale te gane".
Attachi shala mast ahe.age appropriate karyakram asatat.
मुलांना नाचाची आवड निर्माण
मुलांना नाचाची आवड निर्माण करणे, मजा करणे हा उद्देश आहे संस्कार करणे करा की घरात. शेपटी वाल्या प्राण्यांची वर नाच किती वर्षे करायचा? >> shepati valya tumhee hajarada pahil asel, mul paholyandach karatay. S/he enjoys it.
There are thousands of well meaning songs even from bollywood. No need to take songs with bad meaning and to kill their childhood.
अहो किती मस्त गाणे आहे.. माझी
अहो किती मस्त गाणे आहे.. माझी पुतणी या गाण्यावर खूप नाचते लाहंगा घालून - 4 वर्षची आहे.
Radha on the dance floor
Radha likes to party
Radha likes to move that sexy Radha body !!
नानबा +१.
नानबा +१.
आमच्या पोट्याच्या शाळेत
आमच्या पोट्याच्या शाळेत वॉकथॉन मध्ये एड शिरीनचं 'आय लव्ह युर बॉडी... लास्ट नाईट युआर इन माय रूम, नाऊ माय बेड शीट समेल्स लाईक यु' गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा के च्या मुलांच्या मनावर एकदम विपरीत परिणाम होईल छाप विचार डोक्यात आलेले. पण मुलं-शिक्षक मस्त मजेत ट्रॅक वर धावत होते, पालक स्प्रे बॉटल्स मधून मुलांच्या अंगावर पाणी उडवत होते आणि प्रिन्सिपल डीजे बनून गाणी लावत होते... आणि मी बावळट सारखा मारे सोवळे विचार करत बसलोय पण खरेतर वाईट विचार फक्त माझ्याच डोक्यात आहेत बाकी सगळे त्या मोमेंटची मजा घेत आहेत हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा ट्यूब पेटली.
सर्वात छान मुद्दा मांडला
सर्वात छान मुद्दा मांडला अमितव
+अगणित १
अमितव प्लस वन्न हंड्रेड.
अमितव प्लस वन्न हंड्रेड. शिवाय असा विचार करून बघा. एक स्त्री व पुरु ष एक मेकांना प्रथम बघतात तिथून पुढ ची सर्व प्रोसेस ते बाळ जन्माला येउन त्याने केजीत नाच करावा ह्याच साठी असते. तुम्ही प्रेम म्हणा कि वा हार्मोनल स्त्राव किंवा आमचे जरा हटके आहे म्हणा. मग
त्या बचुडी कचुडी ला ही सर्व प्रोसेस काहीतरी वाइट वंगाळ, अपवित्र, लज्जा स्पद आहे असे फीलिन्ग का येउ द्यायचे. इन फॅक्ट इट इज अ जॉयस सेलिब्रेशन ऑफ लाइफ . लाइफ दॅट गोज ऑन. तुम्ही भोजपुरी गाणे म्हणा, राधा म्हणा की एड शीरन म्हणा. पिल्ली दोन मिनिटॅ नाचणार फोटो अपलोड की विसरून परत पुढ् चे काही सुरू होते. व्हाय स्वेट अन नेसेसरीली.
दहा अकरा वर्शे हे गॅदरिंगचे नाच स्किट प्रकरण करावे लागते दर वर्शी. लाइट ले लो. युनि वर्सिटीत गेले की मुलांना हे सर्वच हास्यास्पद वाट्ते
व आपण फोटो बघत बसतो. हसतो. टेक चिल पिल.
अमित मुद्दा आवडला, (या
अमित मुद्दा आवडला, (या धाग्यावर काही लिहीन असे वाटले नव्हते :P)
पण माझ्या मुलींच्या शाळेत "मुन्नी बदनाम हुई" वर वगैरे गाणे बसवले तर मला पचवायला जड जाईल, पण हा प्रतिसाद आठवून विचार बदलायचा प्रयत्न करेन
लहान मुलांना घंटा कळतात
लहान मुलांना घंटा कळतात लिरीकस? >> ----१
अजिबात सहमत नाही...नवीन शब्द ऐकला की "म्हणजे काय ?" असा प्रश्न येतो लगेच....
असो..ज्याचं त्याचं मत...
Pages