मायबोलीवर असा एक काळ होता जेव्हा प्रत्येक धाग्यावर कथा / ललित /चर्चेचा विषय कुठलाही असला तरी चर्चा फक्त 'शाहरूख खान' ह्या एकाच व्यक्ती आणि विषयाभोवती फिरत असत. तसे हट्टाने घडवून आणण्यात ऋन्मेऽऽष सर्वाधिक उत्साही होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माझ्यासह अनेकांनी ह्यावरून आपल्या नाराजी ते राग अशा विविध भावना वेळोवेळी व्यक्त केल्या. ह्या अनाकलनीय हट्टाचे पर्यवसान अनेक चांगले धागे भरकटण्यात होत असे.
मग एका मोठ्या वाद विवादानंतर (बहुतेक रसप ह्यांचा धागा) जे सांगायचे होते ते सांगून संपल्यानंतर मी हा नाराजी व्यक्त करण्याचा pursuit सोडून दिला.
माझ्या आकलनशक्ती प्रमाणे ऋन्मेऽऽष ना सुद्धा कुठे तरी 'आपण ह्या नाराजीचा विचार करावा' ह्याची जाणीव झाली असावी असे वाटते. कारण त्यानंतर माझ्या निरीक्षणानुसार 'शाहरूख' विषयावरून इतर धागे भरकटणे थांबले.
बाकी त्यांचे स्वत:चे 'इतर' धागे निखळ करमणूक करणारे असतात हे तर कोणीही मान्य करेल.
सगळ्यांना अपेक्षित असणारा हा positive बदल घडवून आणण्यासाठी माझ्या मते ऋन्मेऽऽष खरोखर कौतुक आणि अभिनंदनास पात्र आहेत.
पण एवढ्यात ज्या धाग्यावर 'शाहरूख' संदर्भात बोलणे/लिहिणे हे विषयाला धरूनच आहे तिथे सुद्धा ऋन्मेऽऽष ह्यांच्यावर क्लेशदायक वैयक्तिक टीका टिप्पणी होतांना पाहून वाईट वाटले. खासकरुन त्यांनी घेतलेल्या समंजस भूमिके नंतर.
तेव्हा प्रश्न पडला लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग राग का करतात?
एखाद्यापाशी तो करत असलेल्या एखाद्या कृतीचा निषेध म्हणुन नाराजी, मतभेद, राग व्यक्त करणे वेगळे (मैत्री मध्ये हे हमखास होते म्हणुनच वाद, भांडणानंतर सुद्धा आपण मित्र राहतो) आणि
एखाद्याने काहीही कृती केली तरी तिचा कायम राग राग करणे वेगळे. (इथे त्या व्यक्तीप्रती तुमच्या नजरेत तिरस्कार कायम वास्तव्याला आहे हे कळून येते).
ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना?
कारण अशी आकसाची, तिरस्काराची भावना आपल्या एक समंजस आणि सहृदय व्यक्ती बनण्याच्या प्रवासात एक मोठा अडथळा आहे.
सचिन पिळगांवकरांचा लोकांना का
सचिन पिळगांवकरांचा लोकांना का राग येतो?
बहुदा त्याच कारणांसाठी ऋन्मेषचा राग येत असावा लोकांना!
पण एक फरक नक्की आहे.... त्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे.... इथे सगळेच धेडगुजरी.... 'निष्कर्षला उत्कर्ष' म्हणणे काय किंवा 'वावरणारे ला वाबरणारे' म्हणणे काय.... दोन उदाहरणे इथल्या इथेच आहेत!
असो..... मला त्याचा राग येत नाही.... खरतर इथल्या आभासी वावरात कुणीच कुणाचा राग राग करु नये!
हे शाहरूख कोण आहेत ? काय
हे शाहरूख कोण आहेत ? काय करतात ?
Submitted by किरणुद्दीन on 3 December, 2018 - 17:43
>>>>
जर आजही माबोवरील काही सक्रिय सभासदांना साधे शाहरूख कोण आहे हे माहीत नसेल तर मी त्याच्याबद्दल जिथे तिथे लिहितो हा आरोप स्वत:च संशयाच्या घेरयात येतो.
सचिन पिळगांवकरांचा लोकांना का
सचिन पिळगांवकरांचा लोकांना का राग येतो?
बहुदा त्याच कारणांसाठी ऋन्मेषचा राग येत असावा लोकांना!
>>>>
का येतो?
सचिनसारखा चतुरस्त्र कलाकार आज मराठीत दुसरा नाही या कारणामुळे राग येत असेल तर अवघड आहे.
पण एक फरक नक्की आहे....
पण एक फरक नक्की आहे.... त्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे.... इथे सगळेच धेडगुजरी.... 'निष्कर्षला उत्कर्ष' म्हणणे काय किंवा 'वावरणारे ला वाबरणारे' म्हणणे काय.... दोन उदाहरणे इथल्या इथेच आहेत!
>>>>>>
निष्कर्शला उत्कर्श बोलणे हा विनोद होता.
वाबरणारे ही टायपिंग मिस्टेक. V आणि B शेजारी शेजारी आहेत.
मुळात धेडगुजरी भाषा हा गुन्हा आहे का जे राग करावा?
मागे कुठेतरी वाचलेले की धेडगुजरी हा शब्दही अशुद्ध की चुकीचा आहे.
ऋन्मेSSष नि हायझेनबर्ग
ऋन्मेSSष नि हायझेनबर्ग कुठल्या निवडणुकीला उभे रहात आहेत का? खूप काही (तरीच) लिहून स्वतःचे नाव सतत मायबोलीवर दिसत राहील असे करतात.
>>>>>
नंद्याजी, हायझेनबर्ग यांचे माहीत नाही पण मी वयात आल्यापासून असाच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'निष्कर्श आणि उत्कर्श' नाही
'निष्कर्श आणि उत्कर्श' नाही रे.... निष्कर्ष आणि उत्कर्ष'
'बोलणे' नाही रे 'म्हणणे'!
असो!
तुझे चालू दे.... तू काय कुणाला ऐकणार आहेस?
कशाला हवी शुद्ध मराठी-
कशाला हवी शुद्ध मराठी- समोरच्याला म्हणणे पोचतंय ना- मग कशाला लोड घ्यायचा. मी तर मुद्दाम इंग्रजी आणि हिंदी शब्द घुसवतो बोलताना मराठी माहीत असले तरी.
ऋन्मेष हा एक यशस्वी ट्रोल आहे
ऋन्मेष हा एक यशस्वी ट्रोल आहे. इतरांना उचकावून मजा बघायला त्याला आवडतं. लोकांनी प्रतिसाद (चिडून दिलेले जास्त चांगले) देणं यातच त्याच्या आंतरजालीय अवताराचे सौख्य सामावले आहे.
a troll (/troʊl, trɒl/) is a person who starts quarrels or upsets people on the Internet to distract and sow discord by posting inflammatory and digressive,[1] extraneous, or off-topic messages in an online community with the intent of provoking readers into displaying emotional responses[2] and normalizing tangential discussion whether for the troll's amusement or a specific gain.
जर आजही माबोवरील काही सक्रिय
जर आजही माबोवरील काही सक्रिय सभासदांना साधे शाहरूख कोण आहे हे माहीत नसेल तर मी त्याच्याबद्दल जिथे तिथे लिहितो हा आरोप स्वत:च संशयाच्या घेरयात येतो. >>> या उत्तरात शाहरूख कोण आहेत याचा खुलासा आढळला नाही. रच्याकने, आपण कुठे कुठे लिहिता आणि काय लिहीता हा प्रश्न नव्हता. प्रश्नाचे उत्तर मिळाले तर आवडेल.
या उत्तरात शाहरूख कोण आहेत
या उत्तरात शाहरूख कोण आहेत याचा खुलासा आढळला नाही.
>>>
कसा आढळणार? तो मी दिलाच नव्हता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसा देणार? शाहरूख नेमका काय कोण आहे हे मलाच माहीत नाही
- ईंग्लिश पोस्ट -
- ईंग्लिश पोस्ट -
Submitted by व्यत्यय on 3 December, 2018 - 22:01
>>>
भाषांतर प्लीज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठीक आहे. शाहरूख कोण आहेत हे
ठीक आहे. शाहरूख कोण आहेत हे सांगणे लाजिरवाणे असेल तर आग्रह नाही. समजून घेतो आपली समस्या. शुभरात्री.
स्वरुप, मी नेहमीच कबूल करत
स्वरुप, मी नेहमीच कबूल करत आलोय की माझी मराठी व्याकरणाची बोंब आहे. दहावीत मला सर्वात कमी गुण ईंग्लिशनंतर मराठीत होते.
च्रप्स, सहमत आहे. उलट माबोमुळे मी मित्रांशी नेहमीच्या नॉर्मल चॅटमध्येही काही भारी मराठी शब्द वापरू लागलो आहे ज्यावरून ते मला चिडवतात. त्यांना ते झेपत नाहीत. पुस्तकी बोलणे वाटते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठीक आहे. शाहरूख कोण आहेत हे
ठीक आहे. शाहरूख कोण आहेत हे सांगणे लाजिरवाणे असेल तर आग्रह नाही.
>>>>
अहो मला माहीतच नाही बोलतोय तर त्यात लाजिरवाणे काय मध्येच?
बाकी तुम्हाला कोणी सांगितले की मलाच ते माहीत आहे. ईतर सुद्धा कोणीच तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत नाहीये म्हणजे बघा न काहीतरी रहस्यमय व्यक्तीमत्व दिसतेय.
उलट आता तुमची उत्सुकता आणखी चाळवली गेली पाहिजे आणि तुम्ही जाऊ दे काय बोलता आहात. थांबा. कोणीतरी सांगेलच त्या क क क.. काय त्याचे नाव.. हं किंग खान शाहरूखबद्दल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रश्न १ – मोदी सरकारने
प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का.
उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो. कोठल्याही वाटाघाटी करायच्या आधी एक कार्य समिती ‘किमतीचा अंदाजे आकडा’ म्हणजेच ‘बॉलपार्क प्राइस’ किंवा ‘बेंचमार्क प्राइस’ तयार करते. असल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची किंमत बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे वेगवेगळ्या माहितीवर व समितीच्या अनुभवावर एक किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस ठरवला जातो व त्याला मध्य मानून वाटाघाटींना सुरवात करतात. जेव्हा केव्हा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचतात तेव्हा अशा ठरलेल्या किमतीच्या वैधतेचा काल करारात नमूद करतात. आता युपिएच्या सरकारात २०१४ पर्यंत रफाल बाबत करारच झाला नसल्या कारणाने अर्धवट वाटाघाटींची अर्धवट किंमत व अशा वैधता नसलेल्या अर्धवट किमतीला काही अर्थ नाही, ना त्याचा काही उपयोग
साभार, राफेल बद्दल बरेच काही. रणजित चितळे
असू दे, असू दे.
असू दे, असू दे.
कळतंय ते लाजिरवाणे काही असावे ते. मी म्हणालो ना, आग्रह मुळीच नाही.
वाडग्यात थोडे बेसनचे पीठ,
वाडग्यात थोडे बेसनचे पीठ, चिमुटभर हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पूड, अर्धा चमचा धणा पावडर व चवीनुसार मिठ घेऊन पाणी घालून ते जाडसर एकत्र कालवून भिजवून घेतल .
साभार, जागु प्राजक्ता
किरणुद्दीन, तर एण्ड ऑफ द डे
किरणुद्दीन, तर एण्ड ऑफ द डे तुम्हाला शाहरूखबद्दल एक गोष्ट तरी कळली याचा मला आनंद आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजिंक्यराव, तुम्ही दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे. पण लोकांना व्यक्त होऊ द्या माझ्याविरोधात. मनात साचलेले बाहेर आले की निचरा होतो. माझी काळजी करू नका. वर जो बसला आहे तो सारे बघतोय. त्याला खरे खोटे सारे माहीत आहे.
किरणुद्दीन, तर एण्ड ऑफ द डे
किरणुद्दीन, तर एण्ड ऑफ द डे तुम्हाला शाहरूखबद्दल एक गोष्ट तरी कळली याचा मला आनंद आहे >>> मला कुठली गोष्ट समजली हे मी लिहीले नव्हते आणि मलाही त्याबद्दल ठाऊक नाही. तर मग मला कुठली गोष्ट कळाली ? आणि मला ती कळाली हे आपणास कसे काय कळाले ?
खुलासा अपेक्षित.
नाही.
आपलं हेच, शाहरूख एक लाजिरवाणं
आपलं हेच, शाहरूख एक लाजिरवाणं प्रकरण आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धागा शाखा वर कसा घसरला??
धागा शाखा वर कसा घसरला??
रूनमेश तुम्ही या दोन वाक्यांशी सहमत आहात का? असाल तर यापुढे वाद होणार नाहीत-
१. 90 दशकातील शाखा एक जबरदस्त कलाकार होता, लोकांची नस पकडली होती त्याने आणि त्याला कोणीच कॉम्पितिशन नव्हती ( जशी सचिन तेंडुलकर ला नव्हती )
२. 90 दशका नंतर चा शाखा हा केवळ एक साधा ऍक्टर आहे, चित्रपट निवड चुकीची, ओव्हर अकटिंग चा अति वापर.
एक्सप्रेशन्स देखील चांगले नाहीत.
अमीर ,सलमान पुढे गेले आणि हा मागे राहिला.
आपलं हेच, शाहरूख एक लाजिरवाणं
आपलं हेच, शाहरूख एक लाजिरवाणं प्रकरण आहे >>> हा तुमचा जबाब आहे. मी कुठे असं काही म्हणालो ? माझं असं विधान नाही कुठेही.
माझा प्रश्न होता की शाहरूख साहेब कोण आहेत ? काय करतात ते ?
तुम्ही तुमच्या धाग्यावर शाहरूख हा विषय नको म्हणून इथे त्यावर बोलत आहात यावरून मी काही तर्क केले आहेत.
अतिवास, मी पण म्हणूनच आ ले.
अतिवास, मी पण म्हणूनच आ ले. धागाकर्ते कुठे गायब झाले ?
च्रप्स,
च्रप्स,
मै हू ना, कल हो ना हो, कभी खुशी कभी गम, मोहोब्बते, चक दे, स्वदेश, माय नेम ईझ खान, चेन्नई एक्सप्रेस हे कोणत्या दशकातील चित्रपट आहेत?
बरं, शाहरूखची एक्टींग आधी छान होती, पण नंतर खराब झाली का? कि जशी भुमिकेची वा दिग्दर्शकाची डिमान्ड तसे त्याने केले?
तसेही मी शाहरूखच्या अभिनयावरून वाद नाही घालत. कारण ते मोजायचे प्रमाण नसते. पण त्याचा स्टारडन खरेच कमी झाला आहे का? त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकांच्या उड्या पडतात, लोकं त्याचे ईंटरव्यू सुद्धा आवडीने बघतात, फिल्मफेअर पुरस्कारांत आजही तोच चमकत असतो, जाहीरातीतही तोच आजही सर्वात मोठा ब्रांड आहे, पेज थ्री न्यूज आणि मॅगझिनमध्ये आजही तोच सर्वात जास्त आवडीने वाचला जातो.. त्याचे नव्वदीच्या दशकातले स्टारडम आणि आजचे स्टारडम याकडे आपण कसे बघता?
धागा शाखा वर कसा घसरला??
धागा शाखा वर कसा घसरला??
>>>>>>>
किरणुद्दीन यांना खालील प्रश्न पडला..
हे शाहरूख कोण आहेत ? काय करतात ?
Submitted by किरणुद्दीन on 3 December, 2018 - 17:43
पण मुळात धागा माझ्या शाहरूखप्रेमाच्या अनुषंगाने निघाला आहे. तर शाहरूखची चर्चा तशी गैर नाही.
मी मात्र किरणुद्दीन यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळले. कारण जर मी कोणाला शाहरूख कोण आहे आणि काय आहे हे समजवायला घेतले तर पोस्टचा ईतका रतीब पडेल की माबोवर सैलाब येईल मदन चोपरा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी उत्तर दिले असते पण ज्या
मी उत्तर दिले असते पण ज्या मुद्द्या साठी हाब यांनी धागा काढलाय, त्या विषयाशी धरून प्रतिसाद देऊया.
च्रप्स, जसे आस्तिक नास्तिक,
च्रप्स, जसे आस्तिक नास्तिक, शाकाहार मांसाहार, स्त्रीपुरुष हे विषय नेवर एण्डींग आहेत तसाच शाहरूख हा विषय आहे हे सर्वांनी मान्य केले पाहिजे.
माझ्यापुरते सांगायचे झाल्यास, लोकं मला शाहरूखच्या टुक्कार चित्रपटांचा संदर्भ देत त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दाखवत तो आता कसा मागे पडलाय वा संपलाय हे पटवून द्यायचा प्रयत्न करतात पण मुळात मी शाहरूखला मानतो वा मला तो आवडतो ते त्याच्या ईतर कैक गुणांसाठी, आणि ते आजही कायम आहेत, नव्हे आणखी चकाकत आहेत. तो एक युथ आयकॉन आहे आणि माझाही आदर्श आहे.
तरी तुम्ही जमल्यास त्या
तरी तुम्ही जमल्यास त्या किरणुद्दीन यांना उत्तर द्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कारण माझ्यामते जसे सचिन क्रिकेटचा देव आहे तसे शाहरूख बॉलीवूडचा देव आहे. मी असे सांगितले तर त्यांना पटणार नाही
troll (/troʊl, trɒl/) is a
troll (/troʊl, trɒl/) is a person who starts quarrels or upsets people on the Internet to distract and sow discord by posting inflammatory and digressive,[1] extraneous, or off-topic messages in an online community with the intent of provoking readers into displaying emotional responses[2] and normalizing tangential discussion whether for the troll's amusement or a specific gain.
>> so that is bokalat and people supporting him.
Hope they recognize themselves as one.
लोकांचा गैरसमज होतोय का?
लोकांचा गैरसमज होतोय का?
धाग्यात रुन्मेश चे नाव असले तरी धागा ऋण्मेश बद्दल नाहीये.
तेव्हा प्रश्न पडला लोक काही आयडींचा/ व्यक्तींचा सदैव राग राग का करतात?
एखाद्यापाशी तो करत असलेल्या एखाद्या कृतीचा निषेध म्हणुन नाराजी, मतभेद, राग व्यक्त करणे वेगळे (मैत्री मध्ये हे हमखास होते म्हणुनच वाद, भांडणानंतर सुद्धा आपण मित्र राहतो) आणि
एखाद्याने काहीही कृती केली तरी तिचा कायम राग राग करणे वेगळे. (इथे त्या व्यक्तीप्रती तुमच्या नजरेत तिरस्कार कायम वास्तव्याला आहे हे कळून येते).
ह्या निमित्ताने प्रत्येकानेच स्वतःला दोन मिनिटे देत आपल्या आत डोकावत स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ज्या व्यक्तीशी माझे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत/ होते त्या मुद्द्यांपलिकडे जाऊन मी त्या व्यक्तीचा द्वेष, आकस, मत्सर, तिरस्कार अशा भावानेतून कायम रागराग, अपमान तर करत नाही ना?
हा धाग्याचा विषय आहे.
पुढील चर्चा विषयाला धरून व्हावी हि अपेक्षा.
Pages