नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .
इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला
पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?
शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?
संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा .
पुर्वी दहा मधील नऊ सिनेमात
पुर्वी दहा मधील नऊ सिनेमात तरी शा.खा.चे नाव 'राहुल' असायचे.
Submitted by अनिरुध्द.. on 30 November, 2018 - 17:26
>>>>
सर्वप्रथम आपण शाहरूखचे बरेच चित्रपट पाहिलेत याबद्दल अभिनंदन
मी स्वत: शाहरूखचा जबरा फॅन असलो तरी त्याचे सारे चित्रपट बघणे होत नाही. त्यामुळे माझ्या माहितीसाठी जाणून घ्यायला आवडेल की किती पैकी किती चित्रपटात त्याचे नाव राहुल होते. दहापैकी नऊमध्ये राहुल हे फॅक्ट आहे की आतिशयोक्ती?
त्याने आपले हात पसरले की धावत
त्याने आपले हात पसरले की धावत जाऊन त्याला मिठी मारायचा मोह झालाच पाहिजे. >>> आता न्यायालयानेही संमती दिलेली आहे. हरकत नाही.
मी पण नाही पाहिला डीडीएलजे.
मी पण नाही पाहिला डीडीएलजे. तो जबरदस्तीने मराठा मंदीरला चालवला म्हणून पहावासा वाटला नाही.
>>>>
हे एखादा चित्रपट न बघण्याचे कारण ईण्टरेस्टींग वाटले
असो, मराठा मंदिरला अजूनही आहे की काढला?
साधारण किती वर्षे होता तो तिथे?
आता न्यायालयानेही संमती
आता न्यायालयानेही संमती दिलेली आहे. हरकत नाही.
>>>>
कसली संमती? शाहरूखला मिठी मारायची??
असो, मराठा मंदिरला अजूनही आहे
असो, मराठा मंदिरला अजूनही आहे की काढला?
साधारण किती वर्षे होता तो तिथे? >>>>> तुम्हाला गुगल वापरता येत नाही कि गुगलवाल्यांनी हाकलून दिलेय ? तसे असेल तर मराठा मंदीरचा मॅनेजर ही सगळी माहिती देईल. नसेल जायचं तर माझं काही जात नाही.
मिठी वरून आठवले, एक kbc मध्ये
मिठी वरून आठवले, एक kbc मध्ये इक बाई अली होती जिने शाखा ला hug करायला नकार दिला होता.
जिने शाखा ला hug करायला नकार
जिने शाखा ला hug करायला नकार दिला होता.
>>>>
आणि शाखाने ते अफाट स्पोर्टींगली घेतले होते ज्यासाठी तो ओळखला जातो...
आणि गंमत म्हणजे शेवटी त्याने त्या वाईच्या आईला हग केले
आणि गंमत म्हणजे शेवटी त्याने
आणि गंमत म्हणजे शेवटी त्याने त्या वाईच्या आईला हग केले>>>>>> म्हणजे आपले तेच खरं केलं!
वाईच्या आईला - वाई ची आई कोण
वाईच्या आईला - वाई ची आई कोण महाबळेश्वर का?
आणि शाखाने ते अफाट स्पोर्टींगली घेतले होते ज्यासाठी तो ओळखला जातो... ऋन्मेष तू पण किती स्पोर्टींगली घेतोस रे सगळे!
शिवाय तुझे सगळेच खरे असते ते वेगळेच
वाक्य जरा चुकले हर्पेन.
वाक्य जरा चुकले हर्पेन.
सगळे तुझेच खरे असते असे म्हणा.
वाईच्या आईला - वाई ची आई कोण
वाईच्या आईला - वाई ची आई कोण महाबळेश्वर का?>>>>
कसलं सिरीयसली वाचत होते मी. आणि हे वरचं वाचलं आणि कसली जोरात हसले.
हो हो माझे चुकलेच.
हो हो माझे चुकलेच.
वाईची आई पाचगणी आणि बाबा महाबळेश्वर
वाईची आई पाचगणी आणि बाबा
वाईची आई पाचगणी आणि बाबा महाबळेश्वर>>
मग सातारा आजोबा का?
वाईच दमाने घ्या मंडळी.
वाईच दमाने घ्या मंडळी.
ब च्या मधला काना उमटला नाही त्याचा ईतका गैरफायदा घेऊ नका. विषय शाहरूखचा आहे तर त्यावरच बोला.
हर्पेन मी शाहरूखकडूनच शिकलो आहे. तुम्ही जसे आदर्श ठेवता तसे बनता. म्हणून नेहमी असे चांगले आदर्श ठेवायचे. आणि त्यांच्या चांगल्या गोष्टी तेवढ्या उचलायच्या..
हो हो माझे चुकलेच.
हो हो माझे चुकलेच.
वाईची आई पाचगणी आणि बाबा महाबळेश्वर
>>>>
का चुकले?
पांचगणी स्त्रीलिंगी आणि महाबळेश्वर पुल्लिंगी म्हणून?
स्थळांचेही लिंग शोधायला गेले तर ते सबरीमाला जिथे मंदिरात महिलांना प्रवेश नाही ते मंदिर एका स्त्रीलिंग स्थळी बांधलेच कसे?
शाहरुख आणि वाईच कनेक्शन आहेच
शाहरुख आणि वाईच कनेक्शन आहेच की
शाहरुख वाई मधे स्वदेसचे शुटिंग करायला आला होता
ऋन्मेष, मी तर तुलाच आदर्श मानून चालायचे ठरवत आहे, तुला चालणार आहे का? परवानगी देशील का?
महाबळेश्वर पुल्लिंगी?
महाबळेश्वर पुल्लिंगी?
महाबळेश्वरला पोचला की महाबळेश्वर आला असं म्हणतोस का तू?
मला तर आवडेल कोणी मला आदर्श
मला तर आवडेल कोणी मला आदर्श केल्यास. मी माझ्यातल्या चांगल्या गोष्टी आणि विचार लोकांना देण्यास नेहमीच उत्सुक असतो.
फक्त सगळ्यांनीच माझ्यासारखे वा कोण्या एकासारखेच बनायला जाऊ नये. जग एकसुरी होईल. मग मजा जाईल या जगात जगण्यातली...
मानवमामा, व्याकरणातले लिंग
मानवमामा, व्याकरणातले लिंग आणि शारीरीक लिंग हे दोन भिन्न प्रकार असतात. याचाच गैरफायदा घेत मास्तर आले म्हणजे मास्तर नपुसकलिंगी असे टवाळ विद्यार्थ्यांचे विनोद बनतात.
ऋन्मेष अरे धागा शाहरुख
ऋन्मेष अरे धागा शाहरुख बद्दलचा आहे स्वतःबद्दल काय सांगत सुटलायस
असे कोणी विचारत नाही तोवर तुझ्यातले कोणकोणते चांगले गुण देण्यास उत्सुक आहेस ते तरी सांग
अजून एक वेगळा धागाच काढ
शाहरूखच्या धाग्यात
शाहरूखच्या धाग्यात माझ्याबद्दल चर्चा अलाऊड आहे ..
राहिला माझ्यातील देण्यायोग्य गुणांचा प्रश्न.. तर ते एकाच धाग्यात मावणारे नाहीत.. सिलॅबस मोठा आहे.. तर वेगवेगळे चाप्टर बनवावे लागतील..
जसे मागे मी माझ्या वाईट सवयी आणि दुर्गुण म्हणून पाच सहा लेखांची मालिका बनवली होती..
चांगले गुण कोणी विचरल्याशिवाय सांगू नये म्हणून थांबलो होतो
अर्थात हुमायून नेचरचा विचार करता लोकांना एखद्याच्या दुर्गुणांबद्दल वाचायला आणि चवीने चर्चा करायला आवडते, तेच चांगल्या गुणांबद्दल नाही. त्यामुळे टीआरपीचाही प्रश्न आहेच.
केदार जाधव, हा धागा ग्रुप
केदार जाधव, हा धागा ग्रुप पुरता मर्यादीत करता येईल का ? प्लीज ??
ऋन्मेष, मी तर तुलाच आदर्श
ऋन्मेष, मी तर तुलाच आदर्श मानून चालायचे ठरवत आहे, तुला चालणार आहे का? परवानगी देशील का?>>>>>>
फिलींग हाय मै मर जावा
फिलींग हाय मै मर जावा
फिलींग हाय मै मर जावा Happy >
फिलींग हाय मै मर जावा Happy >>>
तोच हेतू असला तर
असं कुणी म्हणू नका प्लीज
पण हर्पेन, दिल्लीला चांगले
पण हर्पेन, दिल्लीला चांगले मेथीचे आणि डिंकाचे लाडू कुठे मिळतील माहिती आहे का?
माझ्यामते शाखा प्रचन्ड हुशार्
माझ्यामते शाखा प्रचन्ड हुशार्, हजरजबाबी, उत्तम डोक असलेला पण खुप्च लिमिटेड अभिनयक्षमता असलेला एक अहकारी नट (अभिनेता म्हणवत नाही त्याला) आहे ज्याला अवास्तव महव्त देवुन मिडियानेच जास्त मोठ केलय.
Submitted by प्राजक्ता on 29 November, 2018 - 05:22 >>>>> +1111111111111
मिडीयाने शाहरूखलाच का मोठे
मिडीयाने शाहरूखलाच का मोठे केले?
यात मिडीयाचा काय फायदा?
शाहरूख पाकिस्तानी
शाहरूख पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करतो म्हणुन काही लोकांना त्याचा राग येतो हे एक नवे कारण 'झिरो' च्या धाग्यावर कळाले.
ऋन्मेऽऽष ह्यांनी त्याला फार छान मुद्देसूद आणि सडेतोड उत्तर दिले आहे.
जरूर वाचा सगळ्यांनी.
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=u1LlX_w7r5M
Pages