फोटोग्राफ सौजन्य -वेदांत भुसारी
एखाद्या आवडत्या ठिकाणचा गोळा खाण्यासाठी तासंतास रांगेत उभा राहणारा तो खरा खवय्या ! कारण रसरस्त्या गोळ्याची विशिष्ठ गोळेवाल्याकडची चव त्याच्या डोक्यात भिनलेली असते आणि तो अनुभव घेण्यासाठी तो निष्ठेने प्रयत्नही करतो. अशाच प्रामाणिक खाबुगिरांना आणि नवीन अनुभवांना चाखण्यासाठी सज्ज असलेल्यांना आणि त्यासाठी जरा यत्नांची तयारी असणाऱ्यांना आता अनेक रेस्टॉरंट्स खाण्याची आव्हानं पेलवण्यासाठी निमंत्रित करत आहेत!
अशीच २५ विविध खाद्यपदार्थांनी नटवलेली पुण्यातली "हाऊस ऑफ पराठा" मधील "बाहुबली" ही महाकाय थाळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे! ह्या थाळीला अतिशय विचारपूर्वक आणि ३ ते ४ महिन्याच्या अथक प्रयत्ना नंतर इथल्या शेफ सतीश शेठ आणि टीमने सजवले आहे. अशा प्रकारचा प्रयोग करण्यासाठी राहुल राजपूत ह्या हॉटेल मालकांनी सुद्धा पाठिंबा दिला हे विशेष कौतुक! अर्थात ही अजस्त्र थाळी बनवण्याची शेफना "बाहुबली" ह्या चित्रपटामुळे प्रेरणा मिळाली आणि ह्या थाळीलासुद्धा तेच नाव मिळाले तसेच गम्मत म्हणजे काही विशिष्ट पदार्थांना ह्यातील पात्रांची नवे देण्यात आली !ही थाळी अवघ्या ६ महिन्यातच लोकप्रिय झाली आहे ;पण तिला बनवणं ही सोप्पी गोष्ट नाही कारण ह्यात मुळातच पाच चवींचा मिलाफ असलेला "देवसेना " पराठा आहे २० ते २२ इंचाचा पनीर, चिस आणि भाज्यांनी ठासलेला हा आहे त्याला बनवायला विशेष भट्टीची योजना त्यांनी केली आहे आणि त्यात मध्यभागी लोण्यासारखी तोंडात टाकल्यावर विरघळणारी चूर चूर नान आहे. हेच कमी नाही तर रायता ,डाळ जीरा राईस,सलाड,लोणचं, पापड, छोटे पालक पराठे, चपाती, कट्टप्पा दम बिर्याणी, जोडीला दही वडा, भल्लालदेव लस्सी, ताक आणि तीन गोड पदार्थ! ही थाळी एका माणसाला संपवणं शक्यच नाहीये त्यामुळे सहा ते सात लोकांना मिळून ती खाणं सोयीस्कर जातं. तरीसुद्धा सगळे पदार्थ संपतील ह्याची खात्री नाही! ४५मीं ही थाळी संपण्याराला आयुष्यभरासाठी फुकटात इथे जेवण करता येईल हे येथील कर्मचारी सांगतात! अशा प्रकारच्या थळींची संख्या आता वाढू लागली आहे ;कारण ह्या किफायतशीर तर आहेच ,अशा प्रसिद्धीचा फायदा जास्त गिऱ्हाईक मिळण्यासाठी होतो. काहीतरी "मोठं" आणि "वेगळ्या पद्धतीने" मिळतंय ह्यलासुद्धा महत्व आहे आणि त्या प्रकारे ही मंडळी त्यांच्या इतर पदार्थांना एक स्थान मिळवून देत आहेत त्यामुळे त्यांनी शिवगामी ही आकाराने छोटी व काही बदल असलेली थाळी सुद्द्धा सुरु केली आहे. अस्सल पंजाबी जेवणाचे समाधान इथे मिळते आणि जेवण ही जरी एकट्याच्या संवेदेने बरोबर असेलेली क्रिया असली तरी अशा थाळीमुळे एकाच ताटात सगळ्यांच्याबरोबर जेवण्याची नवी अनुभूती मिळते त्यामुळे लवकरच तुमच्या मित्रांबरोबर इथे भेट द्या!
पुढील काही लेख अशाच काही नवीन खाद्य आव्हानांबद्दल असतील!
जहबहरहदहस्तह!
जहबहरहदहस्तह!
मस्त फोटो आहे... थाळीची कल्पना तर अफलातूनच.
कट्टप्पा दम बिर्याणी, भल्लालदेव लस्सी >>
केवढ्याला आहे ही थाळी?
केवढ्याला आहे ही थाळी?
₹ १५०० ला आहे.
₹ १५०० ला आहे.
आम्ही ६ जण गेलो होतो, पूर्ण संपवता नाही आली. छान होती थाळी.