तुरीच्या शेंगा १/२ किलो
लहान कांदा १
लहान टोमॅटो १
कोथिंबीर बारीक चिरलेली
आले लसूण पेस्ट १ चमचा
लसूण ४-५ पाकळ्या
हिरव्या मिरच्या १-२
जिरे १ चमचा
तेल फोडणीसाठी
हळद १ चमचा
मीठ चवीनुसार
मळलेली कणीक
हाताशी भरपूर वेळ
प्रथम शेंगा सोलून तुरीचे दाणे काढून घ्या. (हे फार कंटाळवाणे काम आहे तसेच शेंगा सोलताना नखे व बोटांची पेर काळी होतात. योग्य ते खबरदारी घेणे)
कुकरमध्ये मीठ आणि किंचित हळद (हळद ऑपशनल) घालून २-३ शिट्या देऊन वाफवून घ्या. (मी सरळ अख्या शेंगा मीठ-हळद घालून कुकरला उकडून घेते आणि मग दाणे काढते. फारच पटकन निघतात.)
यानंतर दाणे चाळणीवर घेऊन पाणी निथळून घ्या.
पॅनमध्ये एक लहान चमचाभर तेल गरम करून त्यात जिरे लसूण आणि मिरचीवर तुरदाणे चांगले खमंग परतून घ्या.
थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या (हवे असल्यास किंचित पाणी घालावे)
आता परत एकदा पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आलेलसूण पेस्ट घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतून घ्या. आता त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.
यानंतर वाटलेले तूरदाण्यांचे मिश्रण घालून थोडे थोडे पाणी टाकत साधारण बटाट्याच्या सारणासारखी कंसीस्टंसी येईपर्यंत वाफेवर छान शिजवून घ्या.
तयार सारण थंड झाले की नेहमीप्रमाणेच पराठे बनवा.
चटणी/ केचप/ दही बरोबर गरम गरम सर्व्ह करा.
मस्त आहे प्रकार!
मस्त आहे प्रकार!
शेंगा दिसतायेत बाजारात आणून हा प्रयोग करण्यात येईल!
वाव खूप छान दिसताहेत। उसळ
वाव खूप छान दिसताहेत। उसळ नेहमी होते आता पराठे करून बघेन।।
तों पा सु रेसीपी कल्पना छान
तों पा सु रेसीपी
कल्पना छान
पाकृ करता करता उकडलेल्या शेन्गा खाता येतील उचलुन ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही तुरीच्या शेन्गांच्या दाण्यांची आमटी करतो नेहमी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो खुपच छान आलेत..
शेवटच्या फोटो मधली रन्गसन्गती एकदम झकास
भारी! कुणी आयता करून घालावा
भारी! कुणी आयता करून घालावा अन आपण हाणावा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नविन प्रकार. आमच्याकडे आमटी
नविन प्रकार. आमच्याकडे आमटी होते या दाण्यांची.
मस्त!
मस्त!
मस्त!
मस्त!
भारी! कुणी आयता करून घालावा
भारी! कुणी आयता करून घालावा अन आपण हाणावा!!>>> +१.
आमच्यात या शेंगा नुसत्याच
आमच्यात या शेंगा नुसत्याच मिठाच्या पाण्यात उकडून डायरेक्ट दाणे खाल्ले जातात. कधीतरी रिकामपणी याचे पराठे करण्याचा कुटाणा करण्यात येईल.
बाकी हा पराठा = दाल-रोटी खाण्याची वेगळी पद्धत.
(दिवे घ्या)
हिरवी चटणी कसली आहे? छान पोपटी रंग दिसतोय.
मस्तं
मस्तं
तुरीच्या शेंगात कीड अळ्यांचे
तुरीच्या शेंगात कीड अळ्यांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे डायरेक्ट उकडू नये शाकाहारी सावधान
मस्तच.
मस्तच.
वा. मस्तच. नक्की करुन बघेन.
वा. मस्तच. नक्की करुन बघेन.
धन्यवाद सर्वाना.
धन्यवाद सर्वाना.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<<पाकृ करता करता उकडलेल्या शेन्गा खाता येतील उचलुन>>
अगदी अगदी
<<हिरवी चटणी कसली आहे? छान पोपटी रंग दिसतोय>>
ती चटनी खोबरे कोथिम्बिर मिरची जीरे आणि मीठ दह्यात एकत्र वाटून केली आहे
छान
छान
<<वा. मस्तच. नक्की करुन बघेन.
<<वा. मस्तच. नक्की करुन बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 November, 2018 - 12:05>>
जागु ताई नक्की कर आणि तुझा अभिप्राय सांग इथे
मस्त! तिखट मीठाच्या
मस्त! तिखट मीठाच्या पुरणपोळ्याच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीच कुटाणा अहे हा.
भारीच कुटाणा अहे हा.
तीन वेळा तुरीचे दाणे शिजवायचे.
आणि मग पुन्हा पराठ्यात.
<<भारीच कुटाणा अहे हा.
<<भारीच कुटाणा अहे हा.
तीन वेळा तुरीचे दाणे शिजवायचे.
आणि मग पुन्हा पराठ्यात.
Submitted by सस्मित on 22 November, 2018 - 15:36>>![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कुटाणा तर आहेच. but its worth it
हिच पद्धति वापरून केलेले
हिच पद्धति वापरून केलेले सोयबीनचे पराठे
ताटात उजवीकडे सोयाबीनच्या उकडलेल्या शेंगा आहेत