बाबा, तुमी आकाशकंदिल कधी करणाराय?
आई, कानवल्याना सुर्वात कधी होणाराय?
ओऽ गॉड ! बाबा रोजच येतात उशीरा
कोण जाणे आईचा आळस कधी जाणाराय ! १
आजोबानाच सांग्ते आता कंदिल करायला
जग्गात त्तस्सा कुण्णाचाच नको असायला
सुचित्राच्या बाबानी विकत आणलाय, ईऽऽ
आजोबांचा कंदिल नंबर व्वन असणाराय ! २
आणि आई, माझा ड्रेस अजुन आला नाई
त्याच्यावर मॅचिंग पर्स पण हवी मला बाई
तुझ्यासारखी नथ पण घेशिल का ग मला?
मी पण घालुन नाकात ती मिरवणाराय ! ३
चकल्या करणारैस, पुडाच्या वडयांचं काय?
आजोबांच्या फेवरिट त्या, तुला पण माइताय
कोतंबीर निवडायला तुला मदत मी करीन
बघ हंऽ? केल्या नाईस तर मी कट्टी करणाराय ४
आणि आई, बाबांसाठी घे न काय तरी
तुला पाडव्याला ते देणारायत जुवेलरी
बाबा आपले बिचारे कधीच नाहीत मागत
सांग न त्याना तू यावेळी काय देणाराय? हं? काय देणाराय? ५
(बाबानी वेळात वेळ काढून डिझाईन केलेला आणि आजोबानी बनवलेला बनुताईंचा आकाशकंदिल)
बाबांचं दु॒:ख बनीताईंनी बरोबर
बाबांचं दु॒:ख बनीताईंनी बरोबर जाणलंय की !
मस्त आहे मुकुंददा
छानच , आवडली ओऽ गॉड ! बाबा
छानच , आवडली
ओऽ गॉड ! बाबा रोजच येतात उशीरा
कोण जाणे आईचा आळस कधी जाणाराय
व्वा छानच तयारी चालु आहे
व्वा छानच तयारी चालु आहे बनुताईंची.... आणि आजोबांनी पण कवितेतून निरोप पोहचवलाकी पुडाच्या वडयांचा
चकल्या करशील पण पुडाच्या वडयांचं काय?
आजोबांच्या फेवरिट त्या, तुला पण माइताय
मस्त आहे खर तर मी वाट बघत
मस्त आहे

खर तर मी वाट बघत होते ह्या कवितेची आणि नक्की येईल अस वाटल होत
खुप छान ...
खुप छान ...
प्रकाश, नूतन, वर्षा, स्मिता,
प्रकाश, नूतन, वर्षा, स्मिता, नितीन,
थँक यू ऑल.
-मुकुंददा
वा मस्तच बनवलाय आजोबांनी
वा मस्तच बनवलाय आजोबांनी कंदील. सॉलिड पेशन्स लागतो हं.
मुकुंदजी, मस्त आहे. आजोबा
मुकुंदजी, मस्त आहे. आजोबा कंदील हे नाव ठेवा ब्रॅंडचे.
कंदील छानच आहे
कंदील छानच आहे
छान........
छान........