- एक मोठं मक्याचं कणीस (मधुमका/ स्वीट कॉर्न)
- २ मोठ्या शिमला मिरच्या (साधारणपणे २५० ग्रॅम)
- २ मध्यम टोमॅटो
- २ मध्यम कांदे
- ४/६ लसणीच्या पाकळ्या
- धणेपूड + जिरेपूड + हळद + लाल तिखट मिळून १ ते १.५ टेबलस्पून
- मीठ, चवीला जराशी साखर
- फोडणीकरता तेल आणि जिरं
अशीच कुठेतरी पाहीलेली रेस्पी पण एकंदरीत प्रकरण चवीला फार जमलंय म्हणून शेअर करतोय इथे.
- सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. सिमला जरा मध्यम आकारात चिरावी.
- तेलाची फोडणी करून जिरं फुलवावं आणि त्यात लसूण - कांदा जरा सोनसळू द्यावा; तो तसा झाला की मगच टोमॅटो घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतावं
- यात आता कोरडे मसाले घालून मिनिटभर होऊ द्यावं. त्याचा कचवट वास निवला की मक्याचे दाणे घालावे आणि जरा परतावं
- मसाला दाण्यांना नीट माखला की यात पाव वाटी पाणी घालून वर झाकण घालावं आणि मक्याचे दाणे जरा शिजू द्यावे; लागेल तसं पाणी घालावं पण नंतर अजिबात पाणी राहाता कामा नये.
- मका ऑलमोस्ट शिजला की यात चिरलेली मिरची, मीठ आणि अगदी हवीच असेल तरच चिमटीभर साखर घालावी (मी साखर वापरली नव्हती); सगळं नीट हलवून झाकण घालून भाजी पूर्ण शिजवून घ्यावी.
- शेवटी जरा मोठ्या आचेवर ठेवून खरपूस करावी सारखी परतत राहून
- गरमागरम भाजी फुलक्यांसोबत सुरेख लागते.
- कांदा टोमॅटो ची वेगवेगळी पेस्ट करूनही वापरता येइल. पण पेस्ट वेगवेगळी करणं आणि वेगवेगळी परतणं आवश्यक आहे
- तिखट जरा चढं हवं कारण कॉर्न ची गोडी
- हिंग; आलं आणि कसूरीमेथी, आपले हे ते; ते हे आणि इतर मसाले वापरायचे नाहीत
फोटो का उलटले
फोटो का उलटले
स्वीट कॉर्न चिल्ली असं नांव
स्वीट कॉर्न चिल्ली असं नांव द्या. मग ढाब्यावरची चखन्याची डिश म्हणून खपेल पट्कन.
थोडा सोया सॉस, चिल्ली सॉस, विन्नेगर वगैरे मारा वर्तून बीटीडब्ल्यू
छान दिसतेय.
छान दिसतेय.
भाजी मस्त दिसतेय योकु.
भाजी मस्त दिसतेय योकु.
ह्यात रंगीत सिमला मिरच्या, काजू अर्धे करून आणि बेबी कॉर्न घातले की मस्त रॉयल भाजी होते. पार्टीसाठी मस्त.
लसूण कधी घालायचा?
लसूण कधी घालायचा?
फायनल फोटो मस्त दिसतोय.
फायनल फोटो मस्त दिसतोय.
लसुण घालायचा राहिला.
चपात्या पण तुम्हीच करता का?
केलाय वर बदल. कांद्यासोबतच
केलाय वर बदल. कांद्यासोबतच लसूणही घालायचाय.
नाही सस्मित, चपात्या करायला
नाही सस्मित, चपात्या करायला मावशी येतात.
छान लागते अशी भाजी.
छान लागते अशी भाजी.
चपाती बरोबर खायची नसेल तरमसाल्यात फेरफार करून मी त्यात पास्ता मिसळून गट्टम करते
हो मस्त लागते हि भाजी !! फोटो
हो मस्त लागते हि भाजी !! फोटो आणि पाकृ मस्त
चपाती बरोबर खायची नसेल तरमसाल्यात फेरफार करून मी त्यात पास्ता मिसळून गट्टम करते>> हो ते हि भारी लागतं
सही!
सही!
मस्त ! धन्यवाद योकु. कालच
मस्त ! धन्यवाद योकु. कालच केली. मुलीला जाम आवडली. नेहेमीच बेसन पेरलेली भाजी खात असल्याने मस्त हटके चवीची भाजी आवडली. फक्त गडबडीत लसुण घालायचा राहीला.