भाडेकरार आणि Address प्रूफ

Submitted by कच्चा लिम्बू on 5 October, 2018 - 06:54

भाडेकरार हा पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकारला जातो, मात्र हा भाडेकरार कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावे केलेला असतो. अशा वेळी इतर सदस्यांनी ऍड्रेस प्रूफ म्हणून कोणती कागदपत्रे ठेवावीत?
तसेच हा भाडेकरार एकाच कुटुंबातील ४ सदस्यांच्या नावे (जे त्या घरात राहणार आहेत)करण्यात कोणते कायदेशीर अडथळे येऊ शकतात? असे करणे preferable आहे का? जेणेकरून address प्रूफ साठी इतर कोणत्याही document ची गरज भासणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सोसायटीच्या सेक्रेटरीकडून अमक्या फ्लॅटमध्ये अमकी फॅमिली रहाते आणी तिचे सदस्य अमके आहेत, असे प्रमाणपत्र घेऊन सादर करता येते. असे प्रमाणपत्र मी पासपोर्टसाठी वापरले आहे.

>>अमक्या फ्लॅटमध्ये अमकी फॅमिली रहाते आणि तिचे सदस्य अमके आहेत>>

??
सोसाइटीचा सेक्रट्री पत्र देतो. तो आइ आणि जे नोंदणीवहीतील नोंदीवरून कसं काय अधिकृत प्रमाणपत्र देईल की अमुक सभासद आहेत म्हणून?

१) मालकाच्या नावे मिळालेल्या प्रमाणपत्राला रेशन कार्ड/ मुलांचे जन्म प्रमाणपत्र / पत्नीचं मॅरिज रेजिस्ट्रेशन हे अधिकृत जोडपत्र ठरते. मतदार ओळखपत्र मोठ्यांचे असते.

इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, गॅस कनेक्शन हे सुद्धा घरातील एका सदस्याच्या नावे असते.
ते ज्या इतर सदस्यांकरता ( ज्या नाते संबंधांकरता) वापरता येते त्या सदस्यांकरता रजिस्टर्ड भाडेकरार वापरता येईल जरी एका सदस्याचा नावे असेल.

>>इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, >>

भाडेकरार म्हणजे लीव लायसन्स म्हणायचं असेल तर ही बिले त्यांच्याकडे त्यांच्या नावाची नसणार.

फक्त lease agreement एवढेच address proof आहे का? वर म्हणल्यानुसार सरकारी गॅस, landline connection नाही का? दोन जणांच्या नावानी ( नवरा-बायको) lease agreement करता येते. अजून दोन जण जर मुलं असतील तर फक्त मुलांचे birth सर्टिफिकेट आणि आई-वडील दोघांचे address proof (ithe lease अग्रीमेंट) इतकी docs पुरेत. कधी मुलांची नावं lease agreement वर लावल्याचे ऐकले नाही, dependent status मुळे गरज नसते.

Srd तुम्हाला मुद्दा कळला नाही. मी भाडेकरार ला पर्याय सुचवत नाहीये. ज्याप्रमाणे ते इतर प्रूफ एकाच्या नावे असूनही कुटुंबातील इतर सदस्यांकरता वापरता येतात (पती/पत्नी, अपत्ये) त्याच प्रकारे पंजिकृत भाडेकरार वापरता येईल.