सूर राहु दे

Submitted by Akku320 on 1 October, 2018 - 10:41

सुर राहु दे -झी युवा
१आक्टोबर पासुन सोम ते शनी संध्याकाळी ७ वाजता
फक्त झी युवा वर.

काथ्याकुट करण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यातली जोडी आवडलीय मला. गौरी नलावडे, संग्राम साळवी आवडतात. पहिला भाग लावला पण सलग बघितला नाही. मंदार देवस्थळी ची आहे, त्यामुळे बघू का नको विचार करतेय. गौरी संग्रामसाठी बघितली तर बघेन.

फुलपाखरु मी नाही बघत. मला मेन जोडी नाही आवडत. मला मं दे वाचलं की होणार सुन मी या घरची आठवतं फक्त. मी बघायचे नाही पण माबोवर वाचायचे. सुरुवातीला बघितली होती.

अन्जूताई, बघू पण नको. लय बोअर. त्या चॅनेलच्या धाग्यावर लिहिलंय. मंदेने ती पण वाट लावलीय. त्याने फक्त झीसाठी सिरियल कराव्यात.

आधी बघायचो मी फुलपाखरु सिरीयल काँलेज कट्टामध्ये जाम आवडायची सगळ्यांना
मानस वैदेही कपल भारी आवडायच पण आता बघायची सोडली मित्रांकडुन अपडेट्स घेतो फक्त.

झीम च्या अतिआदर्श सूना झी युवावर पण आल्या की काय? Uhoh इथे सुद्दा 'प्रेमाने सगळ जग जिन्कता येत' वाली नायिका आहे. Lol बाकी सन्ग्राम साळवीचा वेगळा लूक छान झालाय. Happy नेहमीच गावरान, रावडी लुक्समध्ये दिसायचा तो. इथे मात्र डिसेन्ट दिसतो.

नाही.

प्रवाह channel फेसबुक पेजवर कधी शॉट बघितला तर बघते. त्याचा, विठूमाऊलीचा. आवडला तर लिहिते. वि मा मध्ये भाची काम करतेना, तिच्यासाठी जाते कधी channel पेज वर पण सिरियल्स दोन्ही बघत नाही. सध्या प्रवाहवर काही बघत नाही.

प्रवाह channel फेसबुक पेजवर कधी शॉट बघितला तर बघते. त्याचा, विठूमाऊलीचा. आवडला तर लिहिते. वि मा मध्ये भाची काम करतेना, तिच्यासाठी जाते कधी channel पेज वर पण सिरियल्स दोन्ही बघत नाही. सध्या प्रवाहवर काही बघत नाही. >>>>> मी बघते. नकळत सारे घडले आणि छत्रीवाली.

Nsg जोडी अपील नाही झाली, मूळ हिंदी काही दिवस बघितल्याने हे दोघे पुचाट वाटले. Nsg मध्ये नायिका थोराड वाटली नायकापेक्षा. हिंदी दोघे अप्रतिम होते.

धागा ज्याचा आहे ती मालिका बघतेय. ते एक आजोबा आगाऊ वाटले. राहुल बोडस नायिकेचा मित्र दाखवलाय बहुतेक, वरद नाव.

संग्राम गौरी दोघे छान काम करतायेत, अमिता खोपकर पण.

सूर राहू दे अस नाव आहे, सुर नाही.

ह्याची कथा पटकथा चिन्मय मांडलेकरची आहे आणि संवाद मुग्धा गोडबोलेचे आहेत, जी भेटी लागी जीवा मध्ये काम करते. आज नीट नावं बघितली.

गौरी नलावडे व कादिपवाली गौरी ह्यात मी गल्लत केली.
२ एप् पाहिले व हिचा, कादिपवालीचा अभिनय एवढा कसा सुधारला असं वाटत होतं..नंतर लक्षात आलं.
काल गौरीने मारलेली रिक्षावाल्याच्या कानाखाली हिरोची आई आधीच करु शकली असती.. वाट कशाची बघत होती..मग हिरोईन पुढे आल्यावर तू मधे पडली नसतीस तरी चाललं असतं म्हणायचं..!!

गौरी नलावडे व कादिपवाली गौरी ह्यात मी गल्लत केली.
२ एप् पाहिले व हिचा, कादिपवालीचा अभिनय एवढा कसा सुधारला असं वाटत होतं..नंतर लक्षात आलं. >>>>>> Rofl

बरी चाललीय का, मी दोन भाग बघितले त्यानंतर नाही.

गौरी नलावडे व कादिपवाली गौरी ह्यात मी गल्लत केली. >>> Lol

छान चालु आहे. मेन हिरोईन नाहि आवडत पन मालिका छान आहे सो फ़ार. तन्वी चे काम करणारी जी actress आहे तिची गाणी फ़ार सुरेख आहेत. मला असे वाटते कि त्य actress ने स्वत:च ती गणी म्ह्ट्ली आहेत. नक्की माहित नाही. पण ती एक सिंगर आहे हे नक्की.

ओहह मी विसरूनचं गेले ही सिरीयल, पहिले दोन भाग बघितले होते. आत्ता इथे वाचून लक्षात आले की ही सिरीयल डोक्यातून पार निघून गेली. अपडेट द्या कोणीतरी मग बघायचा प्रयत्न करेन नाहीतर काही कळणार नाही.