१. पत्ताकोबी - चिरुन, २ वाट्या
२. एक टोमॅटो - चिरुन
३. हिरव्या मिरच्या - चिरुन, चवीनुसार
४. मीठ - चवीनुसार
५. जिरेपूड - चिमूटभर
६. ओवा - चिमूटभर
७. कोथिंबीर - चिरुन
८. तेल
९. गव्हाचे पीठ / कणिक - २ वाट्या
नेहमी आपण साधी धिरडी करतो, त्याचा हा एक प्रकार आहे. साधी धिरडी माहित असतील तर ही कृती सोपी जाईल.
१. चिरलेला कोबी, चिरलेले टमाटे आणि मिरची एकत्र बारिक वाटून घ्या. वाटताना जरुरीनुसार पाणी घाला.
२. ह्या वाटणात कणिक सोडून इतर चवीचे साहित्य घालुन व्यवस्थित मिसळून घ्या.
३. शेवटी ह्या वाटणात बारिक चिरलेली कोथिंबीर, कणिक घालुन मोठा डाव वापरुन धिरडीच्या पीठाप्रमाणे होईल असे बनवा. हे मिश्रण सुमारे ४ तास भिजवावे.
४. ४ तासानन्तर नॉन स्टिकच्या तव्यावर पळी ने धिरडी घाला. त्यासाठी तव्याला थोडेसे तेल लावून त्यावर पळीभर पीठ ओतावे आणि डोश्याप्रमाणे
गोलाकार पसरवून घ्यावे
५. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी उलथण्याने खरपूस भाजून घ्या.
दाण्याच्या चटणीबरोबर गरम गरम खा.
ही धिरडी मस्त खमंग होतात, दीर्घकाळ जीभेवर चव रेंगाळते
- ही धिरडी दाण्याच्या चटणीबरोबर खावीत
- पत्ताकोबी न आवडणारी मंडळीसुद्धा आवडीने खातात.
- लहान मुलांसाठी उत्तम पदार्थ आहे, आवडीने खातील.
डब्यात नाही देता येणार कारण थंड झाल्यावर मजा नाही येत, हा गरम खाण्याचा पदार्थ आहे
मस्तच
मस्तच
फोटो तव्यावर धिरडे असतानाच
फोटो तव्यावर धिरडे असतानाच घेतला आहे, डिशमध्ये घेतल्यावर धिरडे खाण्यात मन रमल्यामुळे फोटो काढला नाही
कणिक मुळात चिकट असते, त्यामुळे धिरडी गोल गरगरीत जमली नाहीत
मला आवडेल का नाही ते माहीत
मला आवडेल का नाही ते माहीत नाही. धिरडी प्रकाराची फारशी फॅन नाहीये मी पण कधी वाटलं तर करुन बघेन
छान दिसतयं
छान दिसतयं
छान दिसतयं
छान दिसतयं
प्रतिसादात दिलाय तो फोटो
प्रतिसादात दिलाय तो फोटो टाकताना, प्रतिसाद सेव्ह करण्याच्या आधी जे कोड येते, ते कॉपी पेस्ट केल्यास पाकृ मध्ये फोटो देता येईल.
छान! पण कोबी चिरून शिवाय
छान! पण कोबी चिरून शिवाय वाटायची कशाला? बारीक चिरलेली नुसती पण चांगली लागेल की!
धन्स वावे,आ.रा.रा.,, आसा,
धन्स वावे,आ.रा.रा.,, आसा, रीया , mr.pandit
वाटायची कशाला> > धिरडी प्रकार मुळात नाजुक असतो, जास्त खरबरीत घटक असतील तर धिरडी फाटतील ना..
ह्यात मला तवा सेट करणे हेच कठिण काम वाटते , सुरुवातीची १-२ धिरडी चिकटतातच! असं होउ नये म्हणून काय करावं बरं?
पिठात तेल घालून नीट ढवळली /
पिठात तेल घालून नीट ढवळली / ब्लेंड केली / मिक्सरमधून काढली तर चिकटत नाही. तवा गरम असेल तर पिठ पसरायचे नाही. धिरडी माझी all time favorite आहेत. आणि मला कोणत्याही पिठाची धिरडी चालतात. कालपासून इथे मी केलेल्या धिरड्याचा फोटो load करतेय पण होत नाहीये.
@ राजसी: धन्यवाद
@ राजसी: धन्यवाद
पुढच्या वेळेस लक्षात ठेवीन हे उपाय
कोणत्याही पिठाची >> अजुन कोण्कोणती पीठे वापरली जातात?
बेसन, तांदूळपिठी, नाचणी,
बेसन, तांदूळपिठी, नाचणी, राजगिरा, शिंगाडा, जोंधळा, बाजरी, पोहे, रवा, millet flour, ओट्स इत्यादी पीठे आत्ता आठवत आहेत आणि धिरडी केली आहेत. अक्षरशः पाचव्या मिनिटाला काहीतरी चविष्ट, चांगलं आणि पोटभरीच पोटात जातं.
फक्त कणकेची करायची असतील तर ताकात भिजवायचे मस्त चव येते
बेसन, तांदूळपिठी, नाचणी,
बेसन, तांदूळपिठी, नाचणी, राजगिरा, शिंगाडा, जोंधळा, बाजरी, पोहे, रवा, millet flour, ओट्स>> हे नव्हत माहित! भारीच!
माहितीबद्दल धन्स
रच्याकने नेकी और पुछ पुछ, पाकृ टाका ना
किल्ली, तुम्ही घेतलेत तसेच
किल्ली, तुम्ही घेतलेत तसेच सगळे घटक घेते
मिळतील त्या भाज्या घालते 
ओके राजसी, धन्स
ओके राजसी, धन्स

तुम्ही मत कहो ना, तू म्हटलं तरी चालेल
किल्लीतै तोंपासु धिरडी! काय
किल्लीतै तोंपासु धिरडी!
काय एकेक भारी बनवतेस गं! यायलाच हवं एकदा! 
छान आहेत. मी पण धिरड्यांची
छान आहेत. मी पण धिरड्यांची पंखा आहे. आई लहानपणी बेसनाचे धिरडे करायची ते अजूनही फेव्हरीट आहे. बेसनात तिखट अथवा बारीक चिरलेली हिरवी मिर्ची, मीठ कोथिंबीर आणी ठेचलेला लसुण घालायचा. आणी सरसरीत भिजवुन धिरडी करायची.
धन्स जुई, रश्मी..
धन्स जुई, रश्मी..
कोबीचे धिरडे करत असताना
कोबीचे धिरडे करत असताना तव्यावर टाकले की छान पसरले जात होते पण परतून /पालटून टाकताना तुटत होते. एकच धिरडे अखंड निघाले.. एरवी असं कधी होत नाही माझ्याकडून.. तवा सेट झाला की 3ऱ्या धिरड्यापासून सरसर निघतात.. पण ह्यावेळेस सारा मामला टुकडो मे बीखर गया.. माझं काय चुकलं?
पीठ पातळ असणे,
पीठ पातळ असणे,
तवा नीट तापलेला नसणे,
नॉनस्टिक तवा नसल्यास पुरेसे तेल नसणे,
एकदा धिरडे चिकटल्यावर दुसऱ्या धिरड्याला तवा साफ न करता फक्त पुसून वापरणे,
धिरड्यावर झाकणी ठेऊन ती व्हायची वाट न बघणे,
आधीच उलथने खुपसून पलटायचा प्रयत्न,
ही सगळी किंवा यातले कोणतेही एक कारण असू शकते.