Persephone :
Daughter of Demeter and Zeus. She is Greek Goddess of Spring and also the Queen of the Underworld. Her story is one of abduction, love, grief, and celebration.
===
ओसाड रस्ते, रिकामे मॉल, ग्राफिटी केलेल्या भिंती, तुरळक कुठेतरी दिसणारी, वारा घेत बसलेली एखाददुसरी व्यक्ती. अशा सुनसान गावातुन दोन लहान मुली स्केटिंग करत चालल्या आहेत. एक टॉमबॉईश आहे हॉटपॅन्ट-टीशर्ट, छोटेछोटे केस. दुसरी अगदी तिच्या उलट, नाजूक फुलासारखी, फिकट रंगाचा फ्रॉक, दोन बो वगैरे. ती विचारते "आपण घराबाहेर हुंदडत फिरतोय हे आईच्या लक्षात नाही ना येणार?". पहिली बेफिकरीने म्हणते "Better hope not".
लपतछपत हळूच दार उघडून त्या घरात येतात. आई स्वैपाकघरात मग्न आहे. वडील काहीतरी वाचतायत. आवाज न करता जिना चढून त्या एका खोलीत जातात. बाकीच्या व्हिक्टोरियन वाटेल अशा खोल्यांपेक्षा ही खोली वेगळी आहे. सामान अस्तव्यस्त पसरलं आहे, भिंतीवर ओबामाचे चित्र आहे, बाथरुमदेखील मॉडर्न वाटतेय. पलीकडे बेडरूममध्ये एक बाई गाढ झोपलीय. टॉमबॉय मुलगी खिशातून पेपरक्लिप काढते आणि त्या बाईच्या हाताला जोरात टोचवते. आणि कमिल प्रिकर खडबडून जागी होते. ते स्वप्न होतं कि बालपणीची आठवण? कि भविष्याची चाहूल??
कमिल (Amy Adams) ही सेंट लुईस शहरात क्रोनिकलमधे गुन्हेवार्ताहर म्हणून काम करणारी, ३३ वर्षांची अविवाहित स्त्री आहे. ऑफिसात पोचल्यावर लगेच तिचा संपादक तिला बोलावून घेतो आणि जन्मगाव विंडगॅपबद्दल माहिती विचारतो. सहज गुगलून मिळेल अशी माहिती ती सांगते. गेल्यावर्षीच तिथे ऍन नॅश या १३ वर्षाच्या मुलीचा खून झाला आहे आणि आता काही दिवसांपूर्वी दुसरीएक त्याच वयाची मुलगी नताली किन हरवली आहे. कमिलला याबद्दल काहीही माहिती नाही. सीरिअल गुन्हे असतील, इतर कोणतेही वर्तमानपत्र ही बातमी कव्हर करत नाहीय, कमिल काहीतरी स्थानिक-वैयक्तिक रंग देऊन लिहू शकेल असे वाटल्याने बॉस तिला विंडगॅपला जायला सांगतो. ती फार अनुत्सुक आहे जायला पण मग दुसरा पर्याय काय?
जवळपास आठ वर्षांनी कमिल जन्मगावी जातेय. विंडगॅपमधे पोहोचल्यावर ती सर्वप्रथम मुख्य पोलीस अधिकारी व्हिकरीला भेटते. त्याला खात्री आहे कि ऍन आणि नताली दोन्ही केसमधला गुन्हेगार गावाबाहेरचा, पुरुष आहे. विंडगॅपला लागून असलेल्या जंगलात नताली शोधमोहीम चालू आहे तिकडे कमिल जाते. तिथे तिला तीन हॉट टीनेजर मुली भेटतात. ऍनचा खुनी शोधण्यास मदत करायला कॅन्सस सिटीहून आलेला FBI अधिकारी भेटतो. आईची बालपणापासूनची मैत्रीण भेटते. इतर ओळखीचे लोक भेटत राहतात. कमिलदेखील शोधकार्यात सामील होते. बऱ्यापैकी रात्र झाल्यानंतर ती घरी जायचे ठरवते.
कमिलची आई अडोरा (Patricia Clarkson) ही गावातली पोर्क मुघल आहे. विंडगॅपमधील गरिबांकडे कामाचे दोनच पर्याय आहेत. मूठभर श्रीमंताकडे घरकाम करायचे किंवा अडोराच्या पिगफॅक्टरीत हॉग बुचरिन्ग. अडोरा म्हणजे विसंगतीचा, विरोधाभासाचा मूर्तीमंत नमुना. दिसायला, वागायला, बोलायला एकदम खानदानी, नाजूक वगैरे. पण कमिलशी/बद्दल बोलताना मात्र तिला काय होत कळत नाही. दोघींचे नाते फार तणावग्रस्त आहे. कमिलचे सावत्र वडील ऍलन हे गाणी ऐकणे आणि बायकोला उगीउगी करणे याखेरीज काही करत नाहीत. त्यांची १३ वर्षांची मुलगी, कमिलची सावत्र बहीण ऍमादेखील घरात आहे पण सुरवातीला तिचे फक्त अस्तित्व कमिलला जाणवत राहते.
२ दिवसांनी पोलिसस्टेशनच्या मागच्या गल्लीतच नतालीचा मृतदेह सापडतो. कमिल तेव्हा तिथे जवळपासच्या भागातच असते. ऍनसारखेच नतालीचेदेखील सगळे दात काढून घेतलेले असतात.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी अडोराच्या घरात असताना नाजूक फुलासारखी, फिकट रंगाचा फ्रॉक घातलेली ऍमा (Eliza Scanlen) कमिलला दिसते आणि तिला आश्चर्याचा धक्का बसतो.
• त्यामागे काय कारण आहे?
• अडोरा कमिलचा एवढा तिरस्कार का करते?
• पहिल्या सिनमधे स्केटिंग करत जाणाऱ्या मुली कोण होत्या?
• ऍन आणि नतालीचा खून कोणी केला?
आणि सगळ्यात महत्वाचे
• कमिल ही अशी बेवडी, दुखावलेली, जगाचे ओझे खांद्यावर असल्यासारखे चालणारी/वागणारी का आहे?
या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर Sharp Objects बघा.
===
जिलियन फ्लिन ही एक अतिशय खत्रुड लेखिका आहे. तिचे लेखन कुरुप असते, हिडीस असते. आपल्या कथेतील स्त्रीव्यक्तीरेखांचा वाचकाने तिरस्कार करावा, त्यांना घृणा वाटावी, बाब्बो असली कुठे बाई असते का असे म्हणत त्यांनी तोंडात बोटं घालावीत असे तिला वाटते. गॉन गर्ल वाचलेल्या/बघितलेल्या लोकांना माहित असेल फ्लिनच्या नायिका सोनेरी केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या, श्रीमंत घरातल्या, सभ्य, सुसंस्कृत वगैर असतात. बाहेरून. आतून बघितल्यास त्या फिरल्या डोक्याच्या, नैतिकतेच्या-तर्काच्या ट्विस्टेड कल्पना असलेल्या, गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व असलेल्या असतात. या असल्या लेखिकेचे शार्प ऑब्जेक्टस् हे पहिले पुस्तक. २००६ साली प्रकाशित झाले. त्यातले काही संवाद बघा:
• I am trash, from old money.
• My demons are not remotely tackled. They are mostly mildly concussed.
• You loooove dead girls.
• You survive.
• She paid for the sins of a mother she never met.
• If I say yes, you will think less of me or feel sorry?
• She is delicate, a rose but not without thorns.
• Good tree, bad apple.
• I never loved you.
• I thought you liked it rough.
या अशा पुस्तकावर तब्बल १२ वर्षांनी ही आठ भागांची मालिका आलीय. आणि माझ्या देवा! प्रतीक्षा खरंच worthwhile होती!!
जीन-मार्क वालेने अक्षरशः सोनं केलं आहे कथेचं. फ्लिनने स्वतः काही भाग लिहीले आहेत. मार्टी नॉक्सऑनने इतर भाग तेवढ्याच ताकदीने लिहीले आहेत. एडिटिंग स्वतः वालेने काही सहाय्यक वापरून केलं आहे. सगळ्यांचा अभिनय अतिशय उत्तम झाला आहे. एमी ऍडम्सबद्दलतर कितीही बोललं तरी कमीच पडेल.
कमीतकमी एकतरी कणखर स्त्री व्यक्तीरेखा असणारे, स्त्रियांची दुःखं, त्यांचा धुमसणारा राग, स्त्रीवाद वगैरेबद्दल भाष्य करणारे बरेच चित्रपट, मालिका आजकाल बनत असतात. They try to make some grand statement about woman and womanhood. शार्प ऑब्जेक्टसमधे तसं काहीही नाही. अडोरा, कमिल आणि ऍमा या तीन ठराविक बायका, त्यांची स्वतःची मानसिकता, जडणघडण, त्यांची एकमेकांसोबतची ट्विस्टेड नाती याबद्दलच भाष्य आहे.
वाचलेल्या अनेक लेखांपैकी एकातला समर्पक परिच्छेद देऊन थांबते.
Sharp Objects is outwardly realistic in every aspect, from its lived-in performances and atmospheric location shooting to its prismatic sound design and its nonlinear editing, which strives to replicate how the brain remembers and suppresses trauma. But in its heart, it’s a tragedy, a doom spiral about a damaged person slowly coming to terms with her damage, immersing herself in hell one last time and emerging, if not stronger, then alive, at least.
ओळख नाही वाचली.. सुरुवातच
ओळख नाही वाचली.. सुरुवातच इतकी कॅची आहे कि लगेच लिस्टित टाकुन ठेवते मालिका..
काही वाचनीय लिंका (यासगळ्यात
काही वाचनीय लिंका (यासगळ्यात स्पॉयलर अर्थातच आहेत)
• http://www.vulture.com/2018/07/sharp-objects-recap-episode-1-vanish.html
Next वर टिचकी मारून आठही भागांचे समीक्षण वाचू शकता.
• http://www.vulture.com/2018/08/sharp-objects-finale-ending-explained.html
शेवटाबद्दल.
• http://www.vulture.com/2018/08/sharp-objects-jean-marc-vallee-editing-me...
स्मृती, मेंदू आणि एडिटिंगबद्दल काही.
• http://www.vulture.com/2018/07/sharp-objects-led-zeppelin-songs.html
संगीताबद्दल.
• http://www.vulture.com/2018/08/sharp-objects-all-the-hidden-words-you-mi...
दडलेले शब्द/ क्लू, दृकश्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर.
• http://www.vulture.com/2018/07/sharp-objects-bll-jean-marc-vallee-evolut...
दिगदर्शकबद्दल.
बघणार वेळ मिळेल तेव्हा.
बघणार वेळ मिळेल तेव्हा. ओझार्क पण लिस्टवर आहे.
बापरे, डेंजर दिसतेय मालिका.
बापरे, डेंजर दिसतेय मालिका.
आधी पुस्तक वाचेन.
कादंबरी वाचलेय पण सिरीज नाही
कादंबरी वाचलेय पण सिरीज नाही बघणार. मनाला फार थकवा येतो .
अॅमी खूपच भारी.
अॅमी खूपच भारी.
गॉन गर्ल वाचल्यावर जिलियन फ्लिनचा फॅन झालो, पण शार्प ऑब्जेक्टस वाचायचं राहून गेलं, आता सिरीज पण आली, अॅमी, तुम्ही वाचलेल्या इंग्रजी कादंबऱ्यांबद्दल नियमित लिहीत जा, तुमच्या आधीच्या धाग्यात सुचवलेल्या सगळ्या कादंबऱ्या मी वाचल्या आहेत.
कुड यू प्लिज रेकमेंड मी सम न्यू मिस्ट्री, सस्पेन्स इंग्लिश नोव्हेल्स...
टीना, लेख वाचला नाही तरी
टीना, लेख वाचला नाही तरी चालेल. पण पुस्तक वाच आणि/किंवा मालिका पहा. आणि कशी वाटली ते सांग
===
सायो, नक्की बघ मालिका
===
mi_anu, हो आधी पुस्तक वाचून नंतर मालिका बघणं कधीही चांगलं
===
स्वाती२, थकवा येतो खरा. पण मला तेच हवं असतं
===
चैतन्य, अर्रे वाह! तूपण जिलियन फ्लिनचा फॅन का
इंग्रजी कादंबऱ्यांबद्दल/चित्रपट/मालिकेबद्दल नियमित लिहायची माझीपण फार इच्छा असते. खासकरून ज्याने भारावून वगैरे जातो त्यांच्याबद्दल. पण 'लिहणे' मला सहजपणे जमत नाही. काल्पनिक तर दूरच, विचारदेखील करू शकत नाही; पण हे असले ओळख/समीक्षण टाईपचे काही लिहायलादेखील मला भरपूर मेहनत घ्यावी लागते . तेवढ्या वेळात अजून २ पुस्तक वाचून होतील किंवा ४ मिनिसिरीज बघून होतील. त्यामुळे मी कमी लिहिते
आधीच्या धाग्यात मी सुचवलेल्या सगळ्या कादंबऱ्या वाचल्यास हे ऐकून आनंद जाहला
नवीन रेकमेंडेशनची यादी थोड्या वेळाने देते.
सध्या फ्लिनची सगळी पुस्तकं वाच हे सांगेन. शार्प ऑब्जेक्टस्, डार्क प्लेसेस आणि द ग्रोनअप.
===
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार _/\_
अरे वा ! ओळख पण मस्तं करून
अरे वा ! ओळख पण मस्तं करून दिलीय. सध्या जमत नाही बघायला काही. पण इतकी जोरदार शिफारस असल्यावर वेळ काढलाच पाहीजे. धन्यवाद.
छान परिचय करून दिलात.
छान परिचय करून दिलात.
कुठे बघता येईल ही मालिका?
Netflix, Prime वर दिसली नाही.
धन्यवाद किरणुद्दीन आणि मानव _
धन्यवाद किरणुद्दीन आणि मानव _/\_
मालिका HBO चॅनलवर आलेली जुलै आणि ऑगस्ट महिन्यात. सध्या कुठे बघायला मिळेल माहित नाही.
@मानव पृथ्वीकर
@मानव पृथ्वीकर
शार्प ऑब्जेक्टस "हॉटस्टार प्रीमियम" वर बघायला मिळेल.
@ अॅमी
पुस्तक परीक्षण नसेल तरी चालेल, तुला आवडलेली पुस्तके सांगत जा.
पुस्तक वाचण्यापेक्षा, "आता कुठलं पुस्तक वाचू?" हे शोधण्यामध्येच सगळा वेळ जातो, रोज त्या गुडरीड्सवर नवीन चांगली पुस्तक शोधत बसतो.
नवीन रेकमेंडेशनची यादी थोड्या वेळाने देते<<<< याची वाट बघतो.
धन्यवाद चैतन्य.
धन्यवाद चैतन्य.
बरीच सबस्क्रिप्शन्स आहेत, तूर्तास हॉटस्टार प्रीमियम घ्यायचा विचार नाही. प्राईम किंवा नेटफलिक्सवर येईल अशी आशा करतो.
चैतन्य,
चैतन्य,
मी गुडरीड्सवरूनच मिळवते रेक्मेन्डेशन्स. त्यांचे फेसबुक पेज लाइक केले आहे. तिथे दर शुक्रवारी भारतीय वेळ संध्याकाळी ६-७ वाजता What you are reding this weekend? प्रश्न विचारतात. तो मी दुसऱ्या दिवशी पहाटे ५-६ दरम्यान बघते. म्हणजे जास्तीतजास्त Like मिळालेल्या पोस्ट आपोआप सॉर्ट होऊन टॉपला आलेल्या असतात. ती पुस्तकं वाचायची. हे असे सॉर्ट करायचा दुसरा काही सोपा मार्ग असल्यास माहित नाही.
===
एनिवे ही यादी थरार, रहस्य पुस्तकांची मी वाचलेल्याच्या रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमधे (सगळीच मला फारफार आवडली आहेत असे नाही. पण इतर भरपूर लोकं ही पुस्तकं वाचताय्त)
Then she was gone
The woman in the window
The hate you give
In the woods series (recommended)
Everything i never told you
(recommended)
I see you
Pretty girls
Mr Mercedes series (recommended)
The woman in cabin 10
In a dark dark wood
Behind closed doors (recommended)
We were liars
I let you go (recommended)
Before i go to sleep (recommended)
Thirteen reasons why
Cormoron strike series (recommended)
Along came a spider
Women's Murder Club series
The thirteenth tale
(recommended)
Big little lies
The lovely bones
What alice forgot
Husband's secret
A stranger is watching
अॅमी , तुमच्या यादीतील वुमन
अॅमी , तुमच्या यादीतील वुमन इन द विंडो नुकतच वाचून संपवलं. वाचता वाचता एक वेळ अशी आली की पुस्तक खाली ठेववतही नाहीये आणि पुढे वाचायचे त्राणही नाहीत.
@स्वाती२
@स्वाती२
वूमन इन द विंडो मध्ये दोन मोठे ट्विस्ट आहे, एक नायिकेबद्दल आहे आणि दुसरा प्लॉट ट्विस्ट शेवटी येतो, पण पुस्तकात बाकी जास्त काही घडत नाही.
बरोबर चैतन्य. मला मधला काही
बरोबर चैतन्य. मला मधला काही भाग जरा फाफटपसारा वाटला.
@अॅमी
@अॅमी
Then she was gone
वाचलं आहे
The woman in the window
वाचलं आहे
The hate you give
याचा विषय माहित आहे, हे वाचावंसं वाटत नाही.
In the woods series (recommended)
तारा फ्रेंच ची ना? रिव्हयुज खूप छान आहेत
Everything i never told you
(recommended)
ओके.. हे लिस्ट मध्ये ऍड करतो
I see you
हे लिस्ट मध्ये ऍड करतो
Pretty girls
यात खूप जास्त हिंसाचार आहे, मी कॅरीन स्लॅटरचं "गुड डॉटर" वाचत होतो, त्यात सुद्धा इतकी हिंसा आहे की, मला पुढे काही वाचवलं नाही.
Mr Mercedes series (recommended)
या सिरीज मधली तीनही पुस्तके वाचून झाली, आता सिरीज बघतोय, तुम्ही द आउटसायडर वाचलं का? यातली बरीच पात्र द आउटसायडर मध्ये पण येता,
The woman in cabin 10
या पुस्तकाबद्दल साशंक आहे
In a dark dark wood
या पुस्तकाबद्दल साशंक आहे
Behind closed doors (recommended)
हे ठीक ठाक होतं
We were liars
आय अडोअर धिस बुक, साधाच ट्विस्ट आहे पण ओळखता आला नाही.
I let you go (recommended)
यातले ट्विस्ट भारी आहेत, वाचणार आहे
Before i go to sleep (recommended)
वाचायचं आहे
Thirteen reasons why
सिरीज बघितली
Cormoron strike series (recommended)
या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा कळालं, याबद्दल शोधतो
Along came a spider
सिनेमा बघितला
Women's Murder Club series
या पुस्तकाबद्दल मी थोडा साशंक आहे, बहुतेक नाही वाचणार
The thirteenth tale
(recommended)
यात पण भारी ट्विस्ट आहेत, वाचणार आहे
Big little lies
सिरीज बघितली
The lovely bones
सिनेमा बघितला
What alice forgot
हे वाचावंसं वाटत नाही.
Husband's secret
हे लिस्ट मध्ये आहे
A stranger is watching
याबद्दल माहित नव्हतं
मनापासून धन्यवाद
Woman in the window मला
Woman in the window मला ठिकठाकच वाटलेलं पण
The Woman in the Window is an upcoming thriller film directed by Joe Wright, from a screenplay by Tracy Letts. It stars Amy Adams, Julianne Moore, Gary Oldman, Wyatt Russell, Brian Tyree Henry, Fred Hechinger, and Anthony Mackie. The film is scheduled to be released on October 4, 2019, by 20th Century Fox.
∆ याच्यामुळे वाचलेलं.
===
> In the woods series (recommended)
तारा फ्रेंच ची ना? रिव्हयुज खूप छान आहेत > ताना फ्रेंच. Dublin Murder squad series नाव आहे खरंतर मी in the woods लिहिलं
> Pretty girls
यात खूप जास्त हिंसाचार आहे, मी कॅरीन स्लॅटरचं "गुड डॉटर" वाचत होतो, त्यात सुद्धा इतकी हिंसा आहे की, मला पुढे काही वाचवलं नाही. > हो खूप हिंसा आहे. मला फारसे आवडले नव्हते पुस्तक.
> Mr Mercedes series (recommended)
या सिरीज मधली तीनही पुस्तके वाचून झाली, आता सिरीज बघतोय, तुम्ही द आउटसायडर वाचलं का? यातली बरीच पात्र द आउटसायडर मध्ये पण येता, > तीन पुस्तकं वाचली आणि पहिला सीझन पाहिला. आउटसायडर वाचायचे आहे.
> The woman in cabin 10, In a dark dark wood, what alice forgot > नाही वाचले तरी चालेल. ठीकच होते.
> Cormoron strike series (recommended)
या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा कळालं, याबद्दल शोधतो > ऑ जे के रोलिंग लेखिका आहे की! कसं काय माहित नाही?
> Women's Murder Club series
या पुस्तकाबद्दल मी थोडा साशंक आहे, बहुतेक नाही वाचणार > Cormoron सिरीज वाचून झाली आणि आवडली तर यातले फक्त पहिले पुस्तक वाच.
The Cuckoo's Calling माहित
The Cuckoo's Calling माहित होतं, पण सिरीज मधल्या पुढच्या पुस्तकांबद्दल दुर्लक्ष केलं, आता वाचायला घेतो.
हां मग ठिकय
हां मग ठिकय
तुझी सगळ्यात आवडती पुस्तकं पण सांग या जॉन्रमधली.
टीना, लेख वाचला नाही तरी
टीना, लेख वाचला नाही तरी चालेल. पण पुस्तक वाच आणि/किंवा मालिका पहा. आणि कशी वाटली ते सांग Happy>> मलापन नेटफ्लिक्स वर नाही दिसली.. मोठ्या आतुरतेने शोधायला नाव टाकल पण त्यावर नाहीए म्हणुन भ्रमनिरास झाला माझा..
सगळ्यात आवडती तर खूप आहेत, पण
@अॅमी
सगळ्यात आवडती तर खूप आहेत, पण या वर्षी वाचलेली सांगतो
१. Behind her eyes
हे खूप आवडलं, कारण प्लॉट ट्विस्ट भारी आहे, वाचताना अजिबात ओळखता येत नाही.
२. Final Girls
हे पण खत्राड आहे, पण मध्ये साधारण सत्तर ऐंशी पानं, मनाचे कंगोरे अँड ऑल याचं वर्णन आहे, थोडक्यात काहीच होत नाही, पण मग शेवट मस्त केलाय, मस्ट रीड
३. Stillhouse Lake ४. Killman creek
ही सिरीज आहे, ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तिसरं शेवटचं पुस्तक पुढच्या वर्षी येईल, यातली हिरॉईन तिच्या मुलांबरोबर घरी येते, तिच्या गॅरेज मध्ये एकाने गाडी ठोकली असते, तर पोलीस हिलाच अटक करतात, कारण गॅरेज मध्ये एक डेड बॉडी सापडते, कारण तिचा नवरा सिरीयल किलर असतो, आपल्या हिरॉईनला काहीच माहित नसतं, इथून सुरुवात होते, मला खूप आवडलं.
५.YOU
हे पण भारी आहे, मजा आली, यावर सिरीज पण आली आहे.
६. The Dispatcher
हे नॉव्हेला आहे, पण हे सायन्स फिक्शन आहे, मला प्लॉट आवडला म्हणून वाचायला घेतलं, हे पण वाचू शकते.
७. The Girl before
लोकं म्हणत होते, याला ट्विस्ट आहे, म्हणून वाचायला घेतलं, वाचून पण संपवलं, पण ट्विस्ट काय मिळाला नाही, फारच भंगार.. बिग नो..
YOU वाचलं आहे. एकदम क्रिपी.
YOU वाचलं आहे. एकदम क्रिपी. सिरीज बघायची आहे अजून.
बाकीची ऍड करते टूरिड यादीत. धन्यवाद _/\_
मस्त लिस्ट अॅमी!
मस्त लिस्ट अॅमी!
धन्यवाद मॅगी
धन्यवाद मॅगी
जीन-मार्क व्हॅलीने अक्षरशः
जीन-मार्क व्हॅलीने अक्षरशः सोनं केलं आहे कथेचं. >> c'est जाँ मार्क वाले svp
आडनाव बदललं नाव तसंच राहू
आडनाव बदललं नाव तसंच राहू दिलय. धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल
धन्स.. आम्च्याच गावातला आहे
धन्स, आमच्याच गावातला आहे म्हनुन जरासा आगाउपणा.. merci बाकि शार्प ऑब्जेक्टस् बद्दल खुपच छान ..पुलेशु
पुस्तकांच्या यादीबद्दल
पुस्तकांच्या यादीबद्दल धन्यवाद.
अशाच याद्या येत राहू द्या.
स्टार वर्ल्ड प्रीमियरवर आत्ता
स्टार वर्ल्ड प्रीमियरवर आत्ता शार्प ऑब्जेक्ट्स नावाच्या मालिकेचा season 1 episodd 3 चालू आहे.
Richard is frustrated when Vickery disregards his pool of suspects.
ही तीच आहे का?
टेलिकास्टची वेळ आठवड्यातून एकदा, शनिवारी रात्री ११ ची दिसतेय.
Pages