उकड -
3 कप पाणी
2 कप तांदळाची पिठी
अर्धा चमचा मीठ
एक चमचा तूप
खाण्याचा लाल व हिरवा रंग
सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
एक चमचा तूप
३ वेलच्यांचे दाणे कुटून किंवा पूड करून
ही पाककृती माझी नाहीय. फेसबुकवर कोणीतरी फोटो दिले होते ते पाहून प्रयत्न केला. तिनेही असेच कुठेतरी पाहिले होते. मूळ पाककृती वाल्या व्यक्तीचे आभार.
तुम्हाला ही आवडले तर तुम्हीही प्रयत्न करा व इतरांना शिकवा.
मोदकाचेच सारे काही करायचेय फक्त आकार फुलांचा द्यायचा. खूप वेळखाऊ काम आहे पण झाल्यावर बघायला छान वाटतं त्यामुळे वेळ असेल तर नक्की करा.
उकड - मी सध्या OPOS - One Pot One Shot च्या प्रेमात आहे त्यामुळे त्यांची आटालिसीस पद्धत वापरली. त्याने उकड शेवटचे फुल होई पर्यंत छान मऊ होती. फुले व मोदक पण सात आठ तासांनंतरही मऊ होते. माझे नेहमी एवढ्या वेळाने वातड व्हायचे.
3 कप पाणी, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप कुकरात घालून 1 शिट्टी करायची. गॅस बंद करून कुकरची वाफ काढून टाकायची नी त्यात 2 कप तांदळाची पिठी घालून फोर्क ने ढवळून घ्यायचं, गुठळ्या फोडायच्या. मग कुकरला झाकण लावून 10 मिनिटे तसाच ठेवायचा. मग उघडून पीठ काढून घेऊन मळायचं.
पिठाचे 2 भाग करा
एक भाग तसाच पांढरा राहूदे
दुसऱ्या भागातून थोडा भाग काढून त्यात खाण्याचा हिरवा रंग चमचाभर पाण्यात कालवून मिसळा तर उरलेल्या भागात तसाच लाल रंग मिसळा. हो दोन्ही पीठे नीट मळून रंग एकजीव करा
सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
एक चमचा तूप
3 वेलच्यांचे दाणे कुटून
खोबरं, गूळ नी तूप एकत्र करून शिजवून घ्या. हे पण कुकरात घालून एक शिट्टी करून करता येईल. मग त्यात वेलची पूड / कूट टाका.
फुलं बनवायची कृती :
एका वेळी दोन फुले होतात. त्यासाठी 3 पांढरे, 2 लाल व दोन लहान हिरवे गोळे लागतात. अगदी लहान लहान गोळ्या करून घ्या.
आता बोटांनीच गोल गोल दाबून लाल व पांढऱ्या गोळ्यांचे गोल पुऱ्यांसारखे आकार करा. सगळीकडून सारखा दाब देऊन समान जाडीची पुरी असूदे. छोटीच असल्याने लगेच जमते. हिरव्या गोळ्या मधे दाबून वाटीसारख्या बनवा.
मला लिहिताना हे कठीण वाटतय पण फोटो बघून समजेल की हे फार सोपं आहे.
आता पांढऱ्या नी लाल पुऱ्या पाणी लावून एक आड एक ठेवा. मध्यभागी बोटाने दाब देऊन थोडं चिकटवा.
सुरीने त्यांचे समान दोन भाग करा.
आता या दोन्ही भागांची दोन फुले होतील. चमच्याने या भागांच्या कापलेल्या भागाकडे सारण ठेवा. एका बाजूला थोडीशीच तर दुसऱ्या बाजूला जास्त जागा रिकामी ठेवली की फुल गुंडाळायला सोपं जातं.
जिकडे कमी जागा ठेवलीय तिथून गुंडाळायला सुरुवात करा. हा फुलाचा खालचा भाग दाबत दाबत जा. शेवटाच्या मोकळ्या भागाला पाणी लावून फुल चिकटवा.
असेच दुसरे फुल.
आता त्या हिरव्या वाटीला आतून थोडे पाणी लावून त्यात हे फुल ठेवा आणि वाटी चिकटवा.
ही झाली दोन्ही फुले तयार.
मोदकांसारखे उकडून घ्या.
हे फुल
मोदक नी फुले
सारण भरण्याच्या आधीच गुंडाळून फुलाचा आकार किती होतो ते पाहून घ्या म्हणजे गोळ्या केवाढया करायच्या ते ठरवता येईल.
फोटो येताहेत
फोटो आले
छान. फुलात मकरंद म्हणून २
छान. फुलात मकरंद म्हणून २ चमचे भरून गावठी तुप. आहाहाऽऽऽऽऽ
काय सुंदर दिसताहेत!
काय सुंदर दिसताहेत!
मस्त दिसतायत पण काम नक्कीच
मस्त दिसतायत पण काम नक्कीच वेळखाऊ..
भारी कल्पना आहे!
भारी कल्पना आहे!
मस्त दिसताहेत.
मस्त दिसताहेत.
भारीच!
भारीच!
'बाप्पाचे नैवद्य' मधे फोटो
'बाप्पाचे नैवद्य' मधे फोटो पाहून मी रेसेपी विचारणारच होतो तुम्हाला पण तुम्ही न सांगताच दिली. आभारी आहे.
काय नाजूक आणि सुंदर दिसत आहेत फुले. खाण्यासाठी फुल मोडायचं जरा जीवावरच येईल.
फुलात मकरंद म्हणून २ चमचे भरून गावठी तुप. आहाहाऽऽ>>>ही कल्पना भारी आहे. तोंडाला पाणी सुटले अगदी.
तोंपासु.
तोंपासु.
तुपासोबत थोडं मध घाला. जास्त खल्लास लागतं
रच्याकने:
रच्याकने:
चुकुन शिफ्ट्+कंट्रोल+एम दाबलं गेल्यावर फायरफॉक्समधे हे पान उत्पन्न झाले.
मोबाईलवर पेज कसे दिसेल त्याचे चित्रण दिसते आहे अन सगळे कंट्रोल्सही काम करीत आहेत.
माबो फॉर्मॅटिंगमधे हा काय लोचा आहे? की हे फाफॉचे दिवे आहेत? @अॅडमिन्/वेमा.
अहा! वाफवलेले मोदकफूल एकदम
अहा! वाफवलेले मोदकफूल एकदम तोंपासु' एक शंका आहे.बंद मोदकाच्या डब्यात संध्याकाळी गुळाचे पाणी जमा होते,कुठलाही मोदक न फुटता.तर अशा फुलांबाबत कसे काय?
२ चमचे भरून गावठी तुप.>>> हा काय प्रकार आहे.घरी कढवलेले साजूक तूपच ना!
मस्त दिसत आहेत !
मस्त दिसत आहेत !
पण पोळपाटावर पिठी का दिसतेय? उकडीची पारी करायला पीठ लावावे लागत नाही खरंतर.
मस्त कल्पना!
मस्त कल्पना!
हो देवकी ते घरचे साजूक तूपच
हो देवकी ते घरचे साजूक तूपच आहे. बाहेरचे सो काॅल्ड भेसळीचे नको म्हणून गावठी ही शब्दयोजना केली.
मस्त जमली आहेत फुल!
मस्त जमली आहेत फुल!
फार सुंदर !
फार सुंदर !
सुंदर.
सुंदर.
आमच्या भागातही साजूक तुपाला
आमच्या भागातही साजूक तुपाला गावठी तुपच म्हणतात.
सुंदर!!!
सुंदर!!!
सुरेख दिसताहेत फुले
सुरेख दिसताहेत फुले
अहाहा मस्तच आहेत फुल.. मी आता
अहाहा मस्तच आहेत फुल.. मी आता पर्यंत कलर वापरला नाहीये सो ही फुले करायला उकडलेल्या बीट च गुलाबी पाणी आणि वाफवलेल्या पालकाचं हिरवं पाणी वापरले तर....
वा खुपच कलात्मक पध्दतीचे मोदक
वा खुपच कलात्मक पध्दतीचे मोदक... छानच मिहि प्रयत्न करेन नक्की
काय मस्त दिसतंय ते फायनल फुल.
काय मस्त दिसतंय ते फायनल फुल.
मस्तच पाकृ.
धन्यवाद धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद.
मी 12-15 फुले / मोदक खाते. प्रत्येकावर 2 चमचे तूप म्हणजे जास्तच होईल
एक दोन थेंब तूप वा मध छान वाटेल नक्कीच.
बंद मोदकाच्या डब्यात संध्याकाळी गुळाचे पाणी जमा होते,कुठलाही मोदक न फुटता.तर अशा फुलांबाबत कसे काय? >>
यावेळी मोदक वा फुलेही गळली नाहीत / पाणी सुटले नाही संध्याकाळ पर्यंत. आटालिसीस ची कमाल असावी. पीठ मळू नये, त्यात पाणी मुरू द्यावं असं ते म्हणतात. चपातीचं पीठ ही असच भिजवलं तर चपात्या छान होतात.
https://m.youtube.com/watch?v=ppObIbz8mJI
पण पोळपाटावर पिठी का दिसतेय? उकडीची पारी करायला पीठ लावावे लागत नाही खरंतर. >>
मी पाहिलेल्या फेसबुक फोटोत तिने लाटण्याने लाटल्या होत्या पुऱ्या त्यामुळे पीठ वापरलं होतं. मी तसं केलं तर भलं मोठ्ठ कमळ झालं. मग हातानेच छोट्या छोट्या पुऱ्या केल्या.
फुले करायला उकडलेल्या बीट च गुलाबी पाणी आणि वाफवलेल्या पालकाचं हिरवं पाणी वापरले तर.... >>
गोडाला भाजीचा वास येईल असं वाटतय पण प्रयत्न करून बघा.
हे भाजीचे रंग वापरून खरं तर तिखट मोदक छान होतील खिमा घातलेले. व्हेज हवे असेल तर मोमो चे सारण करून.
मी नेहमी गोड्या मोदकांबरोबर चिकन खिमा किंवा कोलंबी घालून थोडे तिखट मोदकही करते, अती गोड होऊ नये म्हणून. यावेळी रात्री मुलांसाठी कोलंबी फ्राय करायची ठरलेली असल्याने माझ्या मोदकांसाठी नाही मिळाली कोलंबी. फुलांनी इतका वेळ घेतला की चिकन खिमा करायला नाही जमले. त्यामुळे दिवसभर नुसतं गोड गोड चरत होते.
फार सुरेख दिस्ताहेत फुलं !
फार सुरेख दिस्ताहेत फुलं ! मस्तच !
क रुन बघावेसे वाटले..
क रुन बघावेसे वाटले..
एकदम तोंपासु दिसतायत..
एकदम तोंपासु दिसतायत.. कोणी करुन दिली तर नक्की खाईन
उकडीच्या सहित्यात पीठ लिहायचं
उकडीच्या सहित्यात पीठ लिहायचं राहिलंय.
वेळखाऊ आहेत पण सुंदर दिसतायेत
वेळखाऊ आहेत पण सुंदर दिसतायेत,
उकडीच्या सहित्यात पीठ लिहायचं
उकडीच्या सहित्यात पीठ लिहायचं राहिलंय.>>
अरे हो की! लिहिते.
Pages