असतील त्या अॅसॉर्टेड भाज्या.
पनीर, लिंबू-मीठ मिरे लावून मॅरिनेट.
दही - तंदूरी टेस्टसाठी.
आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, मीठ, मसाले.

↓

↓

↓
↓
↓
एयरफ्रायरमधे केलेत. १२-१४ मिन्टात मस्त क्रिस्पी/सॉफ्ट झालेलं.
सब कुछ एकत्र करून एयरफ्रायर स्वाधीन करणे.
एयरफ्रायरचे भांडे सच्छिद्र असते. खाली बेकिंग पेपर अंथरला आहे. नाही तर दह्याचे मॅरिनेट खाली गळून साफसफाई वाढते.
रेस्पित करण्यासारखे काही विशेष नाही, म्हणून मुद्दाम काहीच लिहिलं नाहिये वरती.
एक उकडलेलं अंडं पडलं होतं, ते नंतर आठवण आली म्हणून ढकलंलय, म्हणून फोटोत आहे. नाही ढकललं तर प्युअर व्हेज रेस्पी होते.
* महत्वाच्या टीपा.
१. माझ्या सर्व टेप्रेचर्स सेल्सिअसमधे आहेत, असे एफ्रा चे मॅन्युअल वाचून लक्षात आलेले आहे. आधी जिथे कुठे फॅरनहाईट लिहिलं असेल तिथे क्षमस्व.
२. मी वापरतो तो एयरफ्रायर मला 'त्याह्यांच्याकडूनगिफ्ट' मिळालेला आहे. तेव्हा बी अॅश्युअर्ड, की तो बल्क मधे पर्चेस केलेला, स्वस्तातला, अॅब्सोल्यूट चायना मेकचा, पण किमान काही दिवस तरी चालणारा, असा प्रकार आहे. ( हे "आरारा कोणता एफ्रा वापरतात?" या प्रश्नाचे उत्तर आहे.)
मस्त! अत्यंत आवडता प्रकार आहे
मस्त! अत्यंत आवडता प्रकार आहे हा! हे रेस्टॉ मधल्या मेनूज मधे au gratin पासून इतर अनेक नावांनी पाहिलेले आहे.
तेवढे जरा पनीर शिवाय इतर काही घालता येइल का सांगा
ती बर्यापैकी घट्ट ग्रेव्ही कशाने होते?
सही दिसते आहे! तुम्ही
सही दिसते आहे! तुम्ही टाकलेल्या रेसिपीज अन फोटो पहाता 'त्याह्यांची' गिफ्ट फुल्ल चतुर ,पैसा वसूल ठरलेली आहे म्हणायला हरकत नाही
ती बर्यापैकी घट्ट ग्रेव्ही
ती बर्यापैकी घट्ट ग्रेव्ही कशाने होते?
<<
व्हेज ऑ ग्रातिनमधे तो वरून घातलेला घट्ट ग्रेव्ही हा व्हाईट सॉस असतो.
व्हाईट सॉस = मेल्टेड बटर + थोडी कणीक भाजून, त्यात आधी दूध, मग त्यात थोडी मिरपूड अन मीठ.
मी दही घातलंय म्हणून व्हाईट सॉस ची गरज नाही. दह्याचा तंदूरी टेस्टचा ओलसर थर/कोटिंग बनतो.
मस्त दिसत आहे.
मस्त दिसत आहे.
फा ला ऑ ग्रातीन का आठवलं असावं ह्यावर विचार करत आहे
त्या ह्यांच्या गिफ्टा युज्वली
त्या ह्यांच्या गिफ्टा युज्वली युस्लेस अस्तात.
त्या अॅक्चुअली वापरणारे माझ्यासारखे लोक फार कमी. नॉर्मली लोकांकडे माळे/स्टोरेज रूम्स हा कचरा जमवायला वापरल्या जातात.
त्या ह्यांनी उदा. वाय्रलेस हेडफोन दिला तर त्यातला एकच कान 'चालेल' याची खात्री. पेनड्राईव्ह दिला तर तो आउटडेटेड अन स्लो असेलच. वगैरे..
सुरेख! आरारा च्या रेस्पीज आर
सुरेख! आरारा च्या रेस्पीज आर टेंपटींग टू बाय अॅन एअरफ्रायर...
दही गाळणीत जरावेळ ठेवून सॉर्ट ऑफ चक्काटाईप्स (किंवा सरळ चक्काच) वापरलं तर अपेक्षित जाडसर कोटींग जमेल. यात चवीचा मालमसाला असल्याने हे सुपरटेस्टी असतं.
आजून एक प्रकार करता येण्यासारखाय - घट्ट दही + जरासं बेसन भाजून + लिंबू हे मिश्रण कोट म्हणून वापरायचं यात भाजकं बेसन असल्यानी अजूनच खमंग लागतं. ही टीप आपल्या त्या ह्या शेफांची आहे.
मी दही घातलंय म्हणून व्हाईट
मी दही घातलंय म्हणून व्हाईट सॉस ची गरज नाही. दह्याचा तंदूरी टेस्टचा ओलसर थर/कोटिंग बनतो. >>> सही. थॅंक्स.
दही गाळणीत जरावेळ ठेवून सॉर्ट
दही गाळणीत जरावेळ ठेवून सॉर्ट ऑफ चक्काटाईप्स (किंवा सरळ चक्काच) वापरलं तर अपेक्षित जाडसर कोटींग जमेल.
<<
एयर फ्रायरसाठी एक्स्ट्रा टिप.
नुसतं मावेत करायचं असेल तर दह्याचा चक्का करा. एफ्राने फार कोरडी होते वस्तू. थोऽडं पाणी शिल्लक ठेवलेलं बरं.
गाळणीत दही ठेवायची टिप कुठेतरी लिहिलीय मी आधी बहुतेक.
भारी दिसतेच .
भारी दिसतेच . डायटिंगवाल्यासाठी चांगला पर्याय
मस्त दिसतंय.... नक्की करणार.
मस्त दिसतंय.... नक्की करणार.
छान दिसतंय पण au gratin
छान दिसतंय पण au gratin प्रकरण अजिबात आवडत नाही त्यामुळे पास.
आरारांच्या फोटोत आपण बार्बेक्युचं मॅरिनेट करतो तेच आहे म्हणजे चालेल.
भारी आहे. एअरफ्रायर नाही
भारी आहे. एअरफ्रायर नाही आमच्याकडे.
नुसतं मावेत करायचं असेल तर दह्याचा चक्का करा. एफ्राने फार कोरडी होते वस्तू. थोऽडं पाणी शिल्लक ठेवलेलं बरं. >>> मावेत असं खरपुस नाही होणार पण. करुन बघेन.
मस्तच. एअर्फ्रायर घ्यायचा
मस्तच. एअर्फ्रायर घ्यायचा आहेच लवकर. धन्यवाद, एक कारण दिल्याबद्दल. फारेंड, आमच्या पनीराला का नावं ठेवतोय बरं?
भारी दिसतेय!
भारी दिसतेय!
छान दिसतंय हे. गर्मागरम
छान दिसतंय हे. गर्मागरम असताना एकदम बढिया लागलं असेल.
मला हे आणि ऑग्रेटिन
मला हे आणि ऑग्रेटिन (उच्चाराबद्दल शिव्या घालू नका
) दोन्ही पण खूप आवडतात.
मस्त पाकृ
मस्त पाकृ
मावे आणि एफ्रा नसेल तर कसे करावे?
मावे आणि एफ्रा नसेल तर कसे
मावे आणि एफ्रा नसेल तर कसे करावे?
<<
नॉनस्टिक पॅन मध्ये भाजून.
नॉनस्टिक पॅन मध्ये भाजून.>>
नॉनस्टिक पॅन मध्ये भाजून.>> ओके.. करुन पाहिन.. धन्स
क्रिस्पी होते असेल ना ही रेसीपी?
यम्म्म!
यम्म्म!
मस्त!
मस्त!
शेवटला फोटो जाम रसरशीत आहे.
शेवटला फोटो जाम रसरशीत आहे. कृती पण सोपी आणी झकास. माझी मर्यादा पोटॅटो वेजेस करण्यापुरतीच आहे. हे कन्वेक्शनला ( ग्रिल ) जमेल असे वाटतेय. मी नेहेमी बटाटे सालासकट अर्धवट उकडुन ते लांबट कापुन तव्यावर बटर मध्ये फ्राय करते, वर मग त्याच बटर मध्ये मीठ व मीरेपुड घालते. मस्त लागतात पण वजन वाढतेच. पण हे ग्रिल करणे भारीये !
आरारा,
आरारा,
मस्त दिसतंय,
रेसिपी लिहायचा फॉरमॅट आवडला
त्या शेवटच्या फोटो आधी एअर फ्रायर चा एक फोटो टाका, म्हणजे चित्रमय रेसिपी पूर्ण होईल
{{{ मी वापरतो तो एयरफ्रायर
{{{ मी वापरतो तो एयरफ्रायर मला 'त्याह्यांच्याकडूनगिफ्ट' मिळालेला आहे. तेव्हा बी अॅश्युअर्ड, की तो बल्क मधे पर्चेस केलेला, स्वस्तातला, अॅब्सोल्यूट चायना मेकचा, पण किमान काही दिवस तरी चालणारा, असा प्रकार आहे. ( हे "आरारा कोणता एफ्रा वापरतात?" या प्रश्नाचे उत्तर आहे.) }}}
गिफ्ट मिळाला नसता / गिफ्ट मिळालेला बिघडला तर - कुठला विकत घ्याल? कुठला विकत घ्यावा असे सुचवाल?
ही पाक्रु मी कनव्हेकशन
ही पाक्रु मी कनव्हेकशन ओव्हनमध्ये करून बघितली.
20 mins@150 C. मस्त झाली!
मस्तय,
मस्तय,
हल्ली बरेच दिवसांत चांगले व्हेज खाल्लेले नाहीय तर करून बघावं म्हणतेय. परवाच अर्धा लिटर दुधाचं पनीर करून ठेवलय ते असं करून खाते.