नमस्कार मंडळी,
तर या वर्षी आपण श्रावणमासात आदर्श पती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत लग्नात किंवा लिव्ह ईन रिलेशनशिप मधे असलेल्या सर्वांना भाग घेता येईल. प्रश्न तयार करताना व्हॉट्सअप्प/ फेसबूक वर ढकलल्या जाणार्या सर्व पाणचट विनोदांचा आधार घेण्यात आला आहे.
स्पर्धा अतिशय सोप्पी आहे. तुम्ही फक्त खालील सर्व मुद्द्यांसमोर लिहिलेल्या मार्कांप्रमाणे स्वतःच्या पतीला अथवा स्वतःला गुण द्यायचे आहेत. ज्यांच्या गुणाची बेरीज जास्त होइल त्यांना विजेते घोषित करण्यात येईल.
सेमी ईंग्रजी वाल्यांसाठी टीपः- ऊणे म्हणजे मायनस आणि अधिक म्हणजे प्लस....
१. तुमच्या लग्नाला/ लिव्ह ईन रिलेशनला किती वर्षे झाली आहेत?
१ वर्षे किंवा कमी:- ऊणे १५, १ ते ३ वर्षे :- ऊणे ५, ५ ते १० वर्षे:- अधिक ५, १० ते १५ वर्षे:- अधिक १५, १५ ते २५ वर्षे:- अधिक २५, २५ ते
३५:- अधिक ३५, ३५ ते पुढे:- अधिक ५०.
२. तुमचे मागील ५ वर्षातील वास्तव्य कुठे आहे? भारताबाहेरः- ऊणे २०, भारतातील एका शहरातः- ऊणे ५, भारतातील एका गावातः- अधिक १०, भारतातील एका खेड्यातः- अधिक २५
३. तुम्ही शॉपिंगला जायचं म्हणता तेव्हा तुम्हाला नवरा तुमच्या कपाटात असलेल्या असंख्य कपड्यांवरुन टोमणा मारतो का? हो:- ऊणे २, नाही:- अधिक ५
४. नवरा तुमच्यासोबत शॉपिंगला येतो का? हो:- अधिक २, नाही:- ऊणे २
५. शॉपिंगला आल्यावर तो शॉपिंगमधे रस दाखवण्याऐवजी एखादा कोपरा पकडून मोबाईल मधे डोकं घालून बसतो की शॉपिंगला आलेल्या दुसर्या बायकांकडे बघत बसतो? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक २
६. शॉपिंग करताना तुमच्याकडे एखाद्या विशिष्ठ रंगाचा ड्रेस/साडी आहे हे त्याला माहीत असते का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
७. नवरा स्वतःच्या कपड्यांसोबत तुमचे कपडे पण मशीनला लावतो का/ धूतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
८. धूतल्यावर ते वाळत घालतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
९. वाळल्यावर तो ते काढून घडी करुन तुमच्या कपाटात ठेवतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
१०. हे सर्व तो त्याच्या आई वडीलांसमोर, मित्रांसमोर करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
११. नवरा "तसला" काही उद्देश नसताना कंबर, डोकं, हात, पाय दाबून देतो का? हो:- अधिक १ , नाही:- ऊणे १०
१२. तू किती दमतेस असे मनापासून म्हणताना "निस्वार्थपणे" जवळ घेतो का? हो:- अधिक १ , नाही:- ऊणे
१०
१३. तुम्ही कधी माहेरी किंवा ट्रिपला गेल्यास त्याला मनातल्या मनात आनंद होतो का? हो:- ऊणे ५ , नाही:- अधिक ५
१४. तुम्ही कधी माहेरी किंवा मैत्रिणींसोबत ट्रिपला गेल्यास तो कामशिवाय फोन करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
१५. फोन केल्यास तुमच्या भीतीने औपचारीकता म्हणून न करता खरेच आठवण येत असते म्हणून करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
१६. शुद्धीत असताना सुद्धा तुम्हाला मिस यू, लव्ह यू असे मेसेज करतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
१७. घरुन ऑफिसला आणि ऑफिसवरुन घरी असे वर्षातील कमीत कमी ९९% दिवस करतो का?हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
१८. ऑफिस सुटल्यावर सरळ घरी येतो की चौकात, टपरीवर मित्रांकडे असे स्टॉप्स घेत घेत येतो ? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
१९. आलोच ५ मिनिटात असे म्हणून खरेच ५ मिनिटात येतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५
२०. कुठे आहात असे विचारल्यावर कुठे आहे ते खरे खरे सांगतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५
२१. न सांगता स्वयंपाकात मदत करतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५
२२. एखाद्या वेळेस तुम्ही घराबाहेर असाल तर स्वतः होउन स्वयंपाकाची तयरी किंवा पुर्ण स्वयंपाक करतो का किंवा निदान जेवण बाहेरुन तरी मागवतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५
२३. स्वयंपाक केला तर बेसिन मधे भांड्यांचा ढिगारा करुन ठेवतो कि खरकटे काढून विसळून ठेवतो? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५
२४. त्याला पुसायची फडकी आणि स्वयंपाकाची फडकी यातील फरक कळतो का? हो:- अधिक ५, नाही:- ऊणे ५
२५. तुमच्या स्वच्छतेच्या व्याख्येप्रमाणे त्याला किचन स्वच्छ ठेवता येते का? हो:- अधिक १०, नाही:- ऊणे ५
२६. तुमच्या स्वयंपाकाला नावं ठेवण्याचा उद्धटपणा तो करतो का? हो:- ऊणे ५, नाही:- अधिक ५
२७. स्वतःच्या आईच्या हातच्या चवीचे कौतुक न सांगता तो वर्षातून ५०% वेळा तरी जेवतो का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
२८. त्याच्या मोबाईलचे आणि सर्व अॅप्सचे पासवर्ड तुम्हाला दाखवले आहेत का? हो:- अधिक ५ , नाही:- ऊणे ५
२९. ते पासवर्ड्स बदलल्यास तो स्वतःहुन सांगतो का? हो:- अधिक १० , नाही:- ऊणे १
३०. घरातले वातवरण टेन्स झालेले असताना किंवा तुमचे भांडण झालेले असताना एखादा पाणचट का होईना जोक करुन वातावरण हलके करायचा प्रयत्न करतो का? हो:- अधिक १० , नाही:- ऊणे ५
३१. तुम्हाला हसतमुख ठेवायचा प्रयत्न करतो का?हो:- अधिक १० , नाही:- ऊणे १०
३२. त्यात यशस्वी होतो का? हो:- अधिक १० , नाही:- ०
स्पर्धेचे नियम.
१. स्त्रीयांनी स्वतःच्याच नवर्याचे मुल्यांकन करणे अपेक्षित आहे.
२. गुण लिहिताना लग्नाला किती वर्षे झाली हे लिहावे.
३. प्रश्ननाचे टंकलेखन करायला कामवार ठेवलेला माणूस सेमी ईंग्रजी वाला आसल्याने शुद्धलेखनातल्या चूका काढू नये.
४. सर्व स्पर्धकांनी ईथे प्रामणिकपणे आपल्या पतीचे किंवा स्वतःचे एकुण गुण लिहिणे अपेक्षित आहे. कोणाचे गुण खोटे आहेत असे आढळल्यास माबो वर जाहीर अपमान करण्यात येईल.
५. वरील प्रश्न सोडून तुम्हाला काही प्रश्न या स्पर्धेत असवे असे वाटत असेल तर ते प्रतिसादात लिहावे. पुढील वर्षीच्या स्पर्धेत ते विचारात घेतले जातील
६. पुढच्या श्रावणी सोमवारी आदर्श पत्नी स्पर्धेची घोषणा करण्यात येईल.
७. दोन्ही स्पर्धांचे विजेते श्रावण संपल्यावर घोषित करण्यात येतील.
उणे गुण मिळवायला कोणती मुख्य
उणे गुण मिळवायला कोणती मुख्य कारणे असावीत?
(धागा काढावा का?)
+९३ आलाय स्कोअर !!!!!!!!!!!
+९३ आलाय स्कोअर !!!!!!!!!!!
लग्नाला ४ वर्ष पूर्ण आणि
लग्नाला ४ वर्ष पूर्ण आणि माझ्या नव-याला चक्क ४० गुण मिळतायत. हायला बराच बरा आहे की माझा नवरा. काठावर तरी का होईना पास झालाय.
लग्नाला २२ वर्षे झाली
लग्नाला २२ वर्षे झाली
स्वमूल्यांकन: १४६ (मलाही धक्काच बसला - पुन्हा आकडेमोड केली)
सौ: ७७ (हा खरा निकाल - किंबहुना निकालच लागला म्हणायचा)
दोन गोष्टी लक्षात आल्या :
१. सुबह का भुला शाम को घर नहीं आ सकता - एकदा बट्टा लागला कि तो कायमचाच (राजसी ह्यांचा प्रतिसाद आधीच वाचायला हवा होता)
२. पूर्वग्रह (prejudice) आणि पुनरावृत्ती प्रभाव (recency effect) हे काही फक्तं अपरेसलला लागू होतात असे नाही. इथे पण तीच परिस्थिती आहे. परवाच ३० मिनिटात येतो सांगून दीड तासाने आलो ना...
पण ७७ काही वाईट नाही... हे ही दिवस जातील...
@भोजराज, "हेही दिवस जातील "
@भोजराज, "हेही दिवस जातील " हे सुखाच्या अन दु:खाच्या दोन्ही प्रसंगी लागू होते. परंतू तुम्हाला गुण वाढवण्यासाठी शुभेच्छा.
जेव्हा जेव्हा मायबोली उघडतेय.
जेव्हा जेव्हा मायबोली उघडतेय...
हा धाग्याचे शिर्षक मी ..."बिचारे पती स्पर्धा" असेच वाचतेय
बिचारे पती स्पर्धा
बिचारे पती स्पर्धा
बिचारे पती स्पर्धा ठेवता येईल
बिचारे पती स्पर्धा ठेवता येईल ! हाकानाका.
@पाथफाईंडर - शुभेच्छांबद्दल
@पाथफाईंडर - शुभेच्छांबद्दल धन्यवाद. सकाळी गुणांचा (स्वमूल्यांकन) कागद पाहिल्यावर सौं. ची प्रतिक्रिया: "भ्रमाचा भोपळा फुटला"
Does not look like its going to get any better any sooner
वरील आदर्श पतीसाठीचे प्रश्न
वरील आदर्श पतीसाठीचे प्रश्न हे बिचारे पतीसाठीचे असेच वाटतात. माझे स्वमूल्यांकन १० च्या आतच येतेय. माझे मी आदर्श पती असल्याचा गैरसमज दूर झाला. बरे झाले बायको माबोवर नाही आहे ते.
मी शेवटुन पहिला.
मी शेवटुन पहिला.
२. तुमचे मागील ५ वर्षातील
२. तुमचे मागील ५ वर्षातील वास्तव्य कुठे आहे? भारताबाहेरः- ऊणे २०, भारतातील एका शहरातः- ऊणे ५, भारतातील एका गावातः- अधिक १०, भारतातील एका खेड्यातः- अधिक २५......
यामागचे लॉजिक कळले नाही. शहरात राहणे 'पाप' आहे का? -५ कशासाठी???
अशाने तर ऋन्मेऽऽषला -१५ करावे लागतील. (त्याची 'दक्षिण मुंबईत ३ घरे आहेत!!!)
रच्याक, अविवाहित मुलांसाठी
रच्याक, अविवाहित मुलांसाठी नाही का एखादी स्पर्धा???
साधारण पणे लग्नाला कमी वर्षे
साधारण पणे लग्नाला कमी वर्षे झाली असतील तर गुण जास्त आहेत असं वाटतंय कारण एकमेकांच्या कलाने घेणे चालू असते ना।। जसजसे लग्नाचे लोणचे मुरत जाते तसे दोघेही एकमेकांच्या आवडीचा फार सा बाऊ करत नाहीत उलट एकमेकांना जसे आहेत तसे accept करतात।
माझ्या नवऱ्याचा स्कोर 14 आणि लग्नाला वर्षे 8 ।
@ बेफिकीर 26 वर्षे लग्नाला बापरे। आपलं वय विचारू का ?
@ वि.मुलगा, तुम्ही काढा अविवाहित मुलांसाठी लिस्ट।
लग्नाला ८ वर्षे झाली.
लग्नाला ८ वर्षे झाली.
स्कोअर : - १३
चक्क १०८ गुण मिळालेत!
चक्क १०८ गुण मिळालेत!
मस्त आहे हे!
भन्नाट आहे हे सगळं!
भन्नाट आहे हे सगळं!
स्वयंमूल्यांकन : +४१
स्वयंमूल्यांकन : +४१
प्रतिसाद सुद्धा मस्तच आहेत.
प्रतिसाद सुद्धा मस्तच आहेत.
आज पुन्हा वाचल आणी खळखळून
आज पुन्हा वाचल आणी खळखळून हसलो
स्कोअर : (- ५५ )
स्कोअर : (- ५५ )
माझा नवरा तुम्ही दिलेल्या प्रश्ना नुसार आदर्श नसला तरि मला तो आहे तसाच आवडतो.
बोलुन बोलुन माझा जीव खातो तरिही मला तो आहे तसाच आवडतो.
Pages