Submitted by मनिम्याऊ on 17 August, 2018 - 14:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
कमळाचे फुल १ (लोटस) ( वॉटर लिली नाही)
ओल्या नारळाचा चव 1 वाटी
हिरव्या मिरच्या 2
आलं 1 इंच
जिरे 1 टीस्पून
मीठ 1 टीस्पून
साखर चिमूटभर
क्रमवार पाककृती:
कमळफुलाच्या पाकळ्या वेगळ्या करून त्या दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.
पाकळीच्या देठाजवळचा पिवळसर पांढरा भाग काढून टाका.
मग इतर सर्व साहित्य आणि पाकळ्या मिक्सर मधून भरड वाटून घ्या.
कमळाची चटणी तयार आहे.
वाढणी/प्रमाण:
2
अधिक टिपा:
शक्यतो गुलाबी कमळाच्या पाकळ्यांचा वापर करावा.
याच पाककृतीप्रमाणे मीठ, मिरच्या आणि जिर्या ऐवजी साखर आणि गुलकंद वापरून गोड चटणी बनवता येते.
माहितीचा स्रोत:
आमच्या घरची छत्तीसगढी कामकरी बाई.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे फुल
हे फुल

2 साहित्य

3 . पाकळीचा तळाशी दिसणारा भाग काढून टाकणे

4. तयार चटणी

अरे भारीच नॉव्हेल्टी आयटम आहे
अरे भारीच नॉव्हेल्टी आयटम आहे की! आंबट असतात का कमळाच्या पाकळ्या?
अरे भारीच की!
अरे भारीच की!
)
आधी कविता आहे समजुन उघडणार न्हवतो... (किंवा चटणीची कमळाला उपमा असेल समजुन ताबडतोब उघडणार होतो.
हा प्रकार माहितच नव्हता. कसं
हा प्रकार माहितच नव्हता. कसं लागते? आम्ही गुलमोहरांच्या फुलांची भाजी करतो. ती मस्त गोडसर कडू लागते.
धन्यवाद.
धन्यवाद.
<<कसं लागते? आम्ही गुलमोहरांच्या फुलांची भाजी करतो. ती मस्त गोडसर कडू लागते.>>
गोडसर कडू + किंचित सुगंधी.
इन्टरेस्टिंग.
इन्टरेस्टिंग.
खाण्याची फुलं म्हणजे एक केळफूल आणि दुसरी हादग्याची फुलं ऐकून आहे. कमळाचं नवीनच कळलं.
कधीच ऐकलेलं नाही हे प्रकरण.
कधीच ऐकलेलं नाही हे प्रकरण. चटणी गुलबट होईल असं वाटलं होतं.
अरे मला वाटले २०१९ इलेक्षन चा
अरे मला वाटले २०१९ इलेक्षन चा काहीतरी अनेलिसिस आहे . ये तो सच्ची मुच्ची चटणी है.
फुलाचा फोटो किती गोड आहे.
फुलाचा फोटो किती गोड आहे.
खातात हे ऐकलं नव्हतं
एक्दम नवीन पदार्थ,
एक्दम नवीन पदार्थ,
गुलमोहोराच्या फुलांची भाजी पण नवीन आहे माझ्या साठी,
शाली प्लिज रेसिपी टाका ना,
सिम्बा, रेसिपी टाकेन. फोटो
सिम्बा, रेसिपी टाकेन. फोटो मात्र नाही. गुलमोहोर आता हिरवे झालेत.
नवीनच रेसिपी. पण एवढं सुंदर
नवीनच रेसिपी. पण एवढं सुंदर फुल मिक्सरमधे भरडायला लावायचं म्हंजे काहीतरीच हो.
मग पाटा वरवंट्यावर भरडा.
मग पाटा वरवंट्यावर भरडा.
पण एवढं सुंदर फुल मिक्सरमधे
पण एवढं सुंदर फुल मिक्सरमधे भरडायला लावायचं म्हंजे काहीतरीच हो.>>> खरंय. फिशटॅंकमधला सुंदर मासा काढून फ्राईंग पॅनमधे टाकताना जसे वाटेल ना तसे वाटेल हे फुल मिक्सरमधे फिरवायला.
अमा
अमा
एवढ्या छान नाजूक फुलाची चटणी केल्यामुळे अतीव दुःख झाले..
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
<<खाण्याची फुलं म्हणजे एक केळफूल आणि दुसरी हादग्याची फुलं ऐकून आहे. कमळाचं नवीनच कळलं>>
याव्यतिरिक्त शेवगा, हेटी, गावठी गुलाब तसेच अमलताशच्या फुलांचे edible पदार्थ बनतात.
थोडेसे अवांतर.. आमचा प्रदेश
थोडेसे अवांतर.. आमचा प्रदेश म्हणजे मध्य भारत हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला प्रदेश. ब्रिटिश अमदानीत CP & Berar प्रांत. ( https://en.m.wikipedia.org/wiki/Central_Provinces_and_Berar )

घनदाट जंगले, पशू संपदा, खनिजे , वनस्पती विविधता असलेल्या या प्रदेशाच्या सीमा उत्तरेस सागर-जबलपूर पासून दक्षिणेस हैदराबाद संस्थानापर्यंत तर पश्चिमेस बुलढाण्यापासून पुर्वेस बस्तरपर्यंत होत्या. यात भूगोलाच्या दृष्टीने बघितल्यास पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, बालाघाट, सातपुडा पर्वतरांगा, दंडकारण्य आणि छत्तीसगढ असे विभाग पडतात. हा प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून सुधा ओळखल्या जातो.
तर सांगायचा मुद्दा हा की इथे कमळाच्या फुलांची भरपूर उपलब्धता आहे. या वनस्पतीचा प्रत्येक भागाचा काहीना काही उपयोग होतो. कमळाच्या पानामध्ये शिजवलेला भात ही आणखीन एक डेलिकसी. तसेच बियांपासून बनवलेल्या मखाण्यांची खीर खूप पौष्टिक असते.
कमल काकडी म्हणजे lotus shoots / stem ची भाजी करतात किंवा नुसतेच तळून स्नॅक्स म्हणून खातात.
असो.
खरतरं मध्य भारताच्या एकंदरीतच समाज जीवन आणि संस्कृतीबद्दल खूप लिहिण्यासारखं आहे. इथली घनदाट जंगले, भेडाघाट- चित्रकोट सारखे प्रचंड धबधबे, पचमढी- चिखलदरा ही पर्यटन स्थळे, चंद्रपूर-ब्रह्मपुरीतील प्राचीन मंदिरे, इटियाडोह- नवेगावबांधसारखे जलाशय यांबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच. पुढे कधीतरी या सगळ्यांवर लिहिण्याची इच्छा आहे. पण माझा आळशीपणा आडवा येतोय ना.
बघू जमलं तर..
आळशीपणा आडवाच येणार ना, ऊभा
आळशीपणा आडवाच येणार ना, ऊभा कसा येईल?
तुम्ही लिहा खरच यावर. आवडेल वाचायला.
आळशीपणा आडवाच येणार ना, ऊभा
आळशीपणा आडवाच येणार ना, ऊभा कसा येईल? >>
मनिम्याऊ, खरंच लिही गं. हे वरचं वर्णन वाचून प्रचंड उत्सुकता लागलीय जाणून घ्यायची.
वरच्या पोस्ट मध्ये उल्लेखलेल्या पाकृ पण दे आता.
आळशीपणा उभाच येतो आणि आडवा
आळशीपणा उभाच येतो आणि आडवा करून जातो.
मानिम्याऊ, नक्की लिहा.
बाकी मलाही कमळाचं फुल खातात
बाकी मलाही कमळाचं फुल खातात हे माहितीच नव्हतं. मखाण्यांबद्दल पण अगदी हल्लीच कळलंय तर फुलं खातात ते कुठे माहित असणार.
रेसिपी चांगली आहे.
वॉव! अशी काही रेसिपी असू शकते
वॉव! अशी काही रेसिपी असू शकते असा विचारही केला नव्हता. चव खूप काही वेगळी लागते का? आंबटपणा असतो का कमळफुलांच्या पाकळ्यांत?
स्वयंपाकात बरीच फुलं वापरली जातात. त्यावर इथे मीच काढलेला एक धागा आहे.
स्वयंपाकघरातील फुलं : https://www.maayboli.com/node/46432
<<चव खूप काही वेगळी लागते का?
<<चव खूप काही वेगळी लागते का? आंबटपणा असतो का कमळफुलांच्या पाकळ्यांत?>>
आंबट नसतात कमळाच्या पाकळ्या. साधारण तुरट ते कडसर अशी मधलीच चव असते. म्हणुनच नारळ घालून चवीला balance करायचे.
भारीच! पण जिवावरच येईल कमळाचं
भारीच! पण जिवावरच येईल कमळाचं फूल मिक्सरमध्ये घालताना. अर्थात तुम्ही म्हटलंय त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील तर नाही येणार जिवावर.
कोकणात कुड्याच्या फुलांची पीठ पेरून स्वादिष्ट भाजी होते. कुडा= कुटज.
छानच मनिम्याऊ...
छानच मनिम्याऊ...
मीपन मध्य भारतातलीच गं.. कितीही एक्स्प्लोअर केलं तरी कमीच आहे.. मध्यंतरी एक लेखमाला लिहायचा विचार केला होता मी पण बेंगल ते काम..
तूच लिही आता..
आणि अरे हो...
आणि अरे हो...
मस्तच आहे गं पाकृ..
धन्यवाद निधी, वावे, मामी,
धन्यवाद निधी, वावे, मामी, मानवदा आणि टीना.
(लेखमालेचं मनावर घ्यायलाच हवं आता.)
इंटरेस्टिंग रेसिपी.. कमळफूल,
इंटरेस्टिंग रेसिपी.. कमळफूल, पान , देठ ह्यांच्या पाक्रुंचा उल्लेख वाचून उत्सुकता वाटतेय की कसं बनवत असतील. विडियो सकट डिटेलवार लिहा प्लीज पाक्रु
ल मिक्सरमधे भरडायला लावायचं
पण एवढं सुंदर फुल मिक्सरमधे भरडायला लावायचं म्हंजे काहीतरीच हो.>>> +१.
परवा मी एबीपी माझा वर
परवा मी एबीपी माझा वर खाद्याभ्रमंती मधे गोंड समाजातील एका माउलीने केलेली लाल मुंग्यांची चटणी बघितली... आदीवासी भागात खाण्यासाठी जे जे उपलब्ध असेल त्याची चटणी बनवुन भाताबरोबर खातात असे त्या प्रोग्रॅम मधे सांगितले. कमळ फुले पण तिकडे मुबलक असावीत.
Pages