भानवले (एक पारंपारिक डोसा)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2011 - 03:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो गव्हाचे पिठ
पाव किलो तांदळाचे पिठ
गुळ अंदाजे
ओल खोबर
वेलची पुड
जायफळ पुड
चिमुटभर मिठ
खायचा सोडा किंवा पापड खार अर्धा चमचा (ऑप्शनल)
तेल

क्रमवार पाककृती: 

रात्री गव्हाचे पिठ व तांदळाचे पिठ डोश्याच्या पिठाप्रमाणे पातळ भिजवुन ठेवावे. साकाळी त्यामध्ये गुळ (पाव किलोपेक्षा जास्तच लागेल. ढवळताना गुळाचा चांगला वास आला पाहीजे)वेलची पुड, जायफळ पुड व ओल खोबर, चिमुटभर मिठ स्पंजी होण्यासाठी हवा असल्यास खायचा सोडा किंवा पापड खार घालाव. हे मिश्रण एकजिव कराव.

आता पुर्वी हे भानवले करण्यासाठी काईल वापरायचे. ह्ल्ली काईल नामशेष झाल्याने आपण नॉनस्टीक तव्यात करु शकतो. हे मिश्रण नॉनस्टीक तव्यावर थोडस तेल लावुन डोश्याप्रमाणे पसरवायच. href="https://picasaweb.google.com/lh/photo/8XCKWYjGbslxZQ1YZ9gbFsMM2PFlhrYpf6...">

मग तव्यावर ताट ठेवुन चुर्रर... आवाज येई पर्यंत वाफवायचे भानवले. (ताटावर साचलेली वाफ तव्यात पडते तेंव्हा चर्ररर आवाज येतो. शिट्टी नाही देत ताट किंवा तवा :हाहा:) आता ताट काढुन १० एक सेकंद थांबायच म्हणजे वाफ जाउन भानवल्यांच्या कडा सुटतात व तो सहज पलटता येतो.
हा बघा पलटला.

पलटलल्यावर २-३ मिनीटे ठेउन त्याची चपाती प्रमाणे घडी घालुन भानवले ठेवावेत.
हे हे झाले तयार.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक हवाच.
अधिक टिपा: 

भानवले व चवळीची भाजी, भानवले व मटण तसेच चहा भानवले अगदी पारंपारीक टेस्टी टेस्टी कॉम्बीनेशन आहे.
गोड असुनही ते मटण व चवळी च्या भाजीबरोबर छान लागतात.
मी सोडा किंवा पापडखार न वापरता केले.
गव्हाचे पिठ थोडे जास्त घेतले तरी चालते.

माहितीचा स्रोत: 
मावस बहीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ho ka ..

आज आमच्याकडे आहेत. अगदी किचनमध्ये उभी राहून टाईपतेय. लेकाला नेहमीच्या डोश्यांपेक्षा हे जास्त आवडतात.

Pages