घरगुती मदतनीसांसंबंधी चर्चा

Submitted by भरत. on 13 August, 2018 - 10:25

स्तनपानाचा धागा पेड मॅटर्निटी लीव्हकडे वळला. पेड मॅटर्निटी लीव्हवरील चर्चेचा धागा घरगुती मदतनीसांना देण्यात येणारा मोबदला, त्यांच्या सुट्या यांकडे वळला.
तर हा धागा त्या चर्चेसाठी.
हा धागा अन्य कुठे वळला, तर पुढे पाहू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाचवी नाही सहावी वेळ होईल ही या विपर्यासाला उत्तर द्यायची. स्ट्रॉ मेन्स ऑर्ग्युमेण्ट प्रमाणे मागील पानावरून पुढे हा विपर्यास सुद्धा चालू आहे.

वेळेवर कामावर येणारी मेड हवी असल्यास आठ तासाची पूर्ण वेळ कामवाली बघावी. पाच जणात शेअर करणे ही पळवाट आहे. याचे विवेचन मागे केलेले आहे. पुन्हा नाही करणार. पाच सहा जणात शेअर केलेली मदतनीस आपल्याच घरी पहिली यावी ही अपेक्षा चुकीची आहे.

पाच सहा जणात शेअर केलेली मदतनीस आपल्याच घरी पहिली यावी ही अपेक्षा चुकीची आहे.<
अजिबात नाही. जर बोली ठरताना तिची वेळ ठरलेली असेल तर तिने तीच वेळ दुसर्‍याला देऊ नये हे सिंपल कामाचे एथिक्स आहेत.

मी फ्रिलान्सर आहे. एक काम घेतले असता मधे दुसरे आले तर पहिल्या कामाला द्यायचा वेळ लक्षात घेऊनच पुढच्या कामाच्या वेळा डिफाइन कराव्या लागतात. तेच गणित आहे इथे.

टॉयलेट वापरू देणे हा मुद्दाच कसा होऊ शकतो हे मला अजून कळलेले नाही.
माणूस आहे जावे लागणारच. बायकांना तर कितीतरी त्रास असतात. ती राहते त्या वस्तीत/ तिच्या घरात योग्य सोय नसेल तर तिने रोज माझ्याकडचे वापरावे खुशाल. काहीच हरकत नाही. पण माझ्या घरात जी घरातल्या सदस्यांसाठी शिस्त आहे टॉयलेटची ती पाळावी एवढीच अपेक्षा आहे. ती टॉयलेट वापरते ते साफ करावे ही अपेक्षा नाही पण तिचे झाल्यावर मी जाऊन फ्लश करणार नाहीये ते तिचे तिनेच करायला हवे.

तुम्ही पुरुषांच्या ऑब्झर्वेशन शक्ती, सह-अनुभूती आणि घरात involve असण्यावर संशय घेताय,
तुमचा निषेध >>
अहो पुरुषांचे सोडा, लग्न व्हायच्या आधी मुलींना (आई संभाळते सगळे म्हणुन)/ बायकांना ( सासू संभाळत असेल तर) सुद्धा हे सगळे इशुज फेस करावे लागत नाहीत आणि तितके निकडीनी जाणवत नाहीत.
जाउ द्या, म्हणतात ना ' जावे त्याच्या वंशा....

रच्या पुरुषाने मेडच्या कामात जास्त लक्ष घालण्याचे साइड इफेक्ट्स पण असतील.>>>>>>>>>>>>
चीप बीप नाही काही..... नॉर्मल काळजी घेण्याची गोष्ट आहे हि.
कॉलेज ला असताना flat भाड्याने घेऊन राहत होतो, आणि एक बाई केर लादी करायला यायची, तेव्हा आई ने तंबी दिलेली,
बाई घरात असे पर्यंत flat चा दरवाजा पूर्ण वेळ उघडा असला पाहिजे आणि तू hall मध्ये बसलेलला असला पाहिजेस.

{इथे अन्यायाबद्दल जाण असणारे किती लोक बायांबरोबर प्रायमरी स्टेक होल्डर आणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून रोज काम करतात?}
अनु, हा फाउल आहे. तो तुम्ही पुढे एक्स्टेंड केलाय.
तुम्ही नेहमी दोन्ही किंवा सगळ्या बाजू समजून घेता/ लिहिता, याबद्दल i admire you. म्हणून हे तुम्हांला लिहितोय. अन्य कोणाला लिहिलं असतंच असं नाही.

स्त्री विरूद्ध पुरूष या वळणाला आपला पास. आतापर्यंतची चर्चा लिंगनिरपेक्ष चालू होती. कायदेही लिंगनिरपेक्ष आहेत.
मदतनीस आणि एम्प्लॉयर यांच्यात झालेली बोली कायद्यात बसत नसेल तर त्याला काही एक अर्थ नाही. त्यामुळेच किमान वेतनाचा मुद्दा कळीचा आहे. आपण ते देऊ शकत नाही हे पण सांगून झालेले आहे.
मी इथे कुठल्याही एम्प्लॉयरच्या विरोधात नाही तर मदतनीसांचे हक्क काय काय आहेत आणि त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या आहेत का एव्हढाच नरेटिव्ह आहे....
माझ्याकडे येणारी कामवाली ही चार घरची कामे करून येते. त्यामुळे मी सुद्धा कायदा मोडतो याची मला कल्पना आहे. उद्या कायदा कडक झाला तर मी घरी कामे करीन (हे ही झालेले आहे). पण त्यामुळे मला मुलांचा अभ्यास घेता येणार नाही आणि त्यांच्या ट्यूशन्स व इतर अ‍ॅक्टिव्हिटीज साठी वेळ देता येणार नाही. त्यासाठी मला रिक्षेवाले लावावे लागतील. हा खर्च मेड मुळे वाचतोय माझा. सो तक्रार नाही.

Submitted by नीधप on 17 August, 2018 - 13:40
टॉयलेट वापरू देणे हा मुद्दाच कसा होऊ शकतो हे मला अजून कळलेले नाही>>>>>>>>>>>>

ताई , मागच्या पानावर पाहतोय ना लोकांना इश्यू आहे त्या बद्दल.

प्लीज डोंट बी जज्मेन्टल, कोणी करते ते बरोबर कि चूक हे ठरवण्यासाठी चर्चा करू नको या, आपल्या गृहीतकाची दुसरीबाजू तपासण्यासाठी करूया

थोडेसे अवांतर पण माझ्या एका बाईनी , शेजार च्यांचा ड्राय्व्हर तिच्या मागे आहे टाईप तक्रार केली होती. मी ती फारच गंभीर पणे घेतली होती, मला तिची काळजी वाटली . आणि खूपच सीरीयसली घेऊन मी शेजारच्या काकूंना सांगितलेच शिवाय त्या ड्राव्ह्यवर ला योग्य समज मिळेल असेही पाहिले. नंतर ४/५ महिन्यांनी मला हीच बाई स्वतःहुन त्याच्यबरोबर सतत गुल्गुलु बोलताना आणि फिरायला जाताना दिसायला लागली. मलाच ते पाहून तोंड्घाशी पडल्यासारखे वाटले. Uhoh
अता या अनुभवामुळे नविन कुणी बाईनी मला असे काही सांगितले तर मी कितपत त्या प्रकरणात लक्ष घालेन , मला शंका वाटते.

ok दुसरा मुद्दा घेतो
कामाचे तास आणि रजा घेणे,
वर निधप म्हणाल्या तसे जो स्लॉट आधी ठरला असेल त्या स्लॉट ला चिकटून राहणे आवश्यक आहे, पण कधी आपल्याच गरजेप्रमाणे आपण लौकर किंवा उशीरा यायला सांगतो , तशीच निकड बाकीच्या मालकांची सुद्धा असू शकते , हे लक्षात घेतले पाहिजे.
पण कोणत्याही परीस्थिती मध्ये फोनवर पूर्वसूचना देणे मस्ट, आजकाल whtsapp च्या जमान्यात पूर्वसूचना कशी देऊ हा प्रश्न पडायला नको.

प्रत्येक घरी महिन्याच्या २ सुट्ट्या कबूल असतात, जर सगळ्या कामावर तिला त्याचं दिवशी सुट्टी मिळाली तर तिला पूर्ण दिवस फ्री मिळू शकतो. आता ६-७ घरातील गैरसोय न होणारा दिवस मिळणे आणि त्या दिवशी सुट्टी मिळणे कित्ती सोपे असेल नाही?

त्यात ४ घरी सुट्टी मिळाली - ३ घरी नाही मग लौकर येऊन ठरवलेल्या स्लॉट च्या बाहेर येऊन कामे करून देणे ( रुटीन चुकल्याने आपली चिडचिड) किंवा न सांगता दांडी मारणे (मग चिडचिड आणि तक्रार).
सकाळी येत नाही सांगायला फोन आला कि हा मुद्दा आपण विचारात घेतो का?

पूर्वी कामाला रामा गडी असायचे तसे हल्ली नसतात का? ( का नसतात? ) हा सरळ साधा प्रश्न आहे. कुतूहल म्हणून विचारतेय. कारण ' मदतनिसांच्या ' समस्या या ' मदतनीस बायकांच्या' समस्या दिसत आहेत. ( विशेषत: टॉयलेट. पुरुषांना रस्त्यारस्त्यांवर राइट टु पी असतोच. ) जेव्हा रामा गडी असायचे तेव्हा त्यांना घरातले पुरुष हॅंडल करायचे की बायकाच करायच्या?
यात चर्चेला फाटा फोडण्याचा उद्देश नाही. कारण मला आता चर्चेचा उद्देशच कळेनासा झालाय. मदतनीस बायकांना बेसिक सोयी पुरवल्या पाहिजेत यावर इथे सर्वांचं एकमत दिसतंय. मदतनीस बायकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन कुणी काम केलं असेल तर इथे लिहा. जेणेकरून त्यांची नेमकी बाजू कळेल.

मुंबई ला आमच्याकडे गडी होता,
दुपारी कपडे भांडी केर लादी आणि रात्री फक्त भांडी असा २ वेळी यायचा. आई/ आजी त्याच्या बरोबर interact करायचे.

हे सगळे गडी जिन्याच्या landing वर, जिन्याखालच्या खोल्यांमध्ये , गच्ची च्या पसेज मध्ये एक trunk आणि वळकटीचा संसार घेऊन राहायचे, जेवण कुठल्यातरी कामावरच व्हायचे (स्पेसिफिकली गुजराती वगैरे जिकडे खूप भांडी असायची) आंघोळ , प्रातर्विधी ची माहिती नाही

टॉयलेट वापरू देणं...? हा मुद्दा माझ्या डोक्यात पण येऊ शकत नाही कधी Uhoh
माझ्या घरी बाहेरून आलेली कोणतीही व्यक्ती मग ते पाहुणे असोत, मित्र मंडळी असोत अथवा माझी मद्तनीस. त्यांना त्या क्षणी (माझ्या घरात असताना) आलेल्या निसर्गाच्या हाकेला ओ देण्याचा पुर्ण अधिकार आहे. फक्त त्यांनी स्वच्छ्ता पाळावी हे नक्की.

सिमबा, fyi,
5 घरी काम करणाऱ्या बायका सगळीकडे एका वेळी सुट्टी घेतात.अमक्या घरी एकदा तमक्या एकदा असे नाही.महिन्यात 2 सुट्ट्या(कधीकधी 3) त्या घेतात आणि आदल्या दिवशी सर्व घरांना 'येणार नाही' म्हणून सांगतात.

बाकी '6 किंवा 7 घरातली सोय/गैरसोय बघून त्याप्रमाणे सुट्ट्या ठरवतात' वगैरे समज आमच्या एरियात तरी खरा नाही.आणि असावा अशी अपेक्षाही नाही.त्यांच्या गावी जायच्या बुकिंग नुसार सुट्ट्या ठरतात.
सध्याच्या मावशी मोठी सुट्टी असेल तर 1 आठवडा आधी सांगतात.मग आम्ही नातेवाईक बाहेर डिनर, स्वतःचे काही कुठे 1 किंवा 2 दिवस जाणे जमले तर त्या स्लॉट ला प्लॅन करतो ☺️☺️

बायकांवर अन्याय होतात.त्याबद्दल दुमत नाही.
इथे फक्त बायकांतर्फे अनेक कारणांनी (ट्रेंड नसणे/काम आवडत नसणे/डिटेल काम केल्यास समोरच्याच्या अपेक्षा वाढून कामाचा वेळ वाढणे/काम मिळवण्या साठी प्रत्येक घरी 'लवकर येते' अशी कमिटमेंट देऊन नंतर काही घरी उशीर करावा लागणे) कामावर अन्याय कसा होतो हे सांगण्याचा प्रयत्न आहे.त्यांना कामावर ठेवणाऱ्या बायकाही माणूस(ह्युमन) असतात.या सर्व गोष्टी समजून, कधी कुरकुरत, कधी प्रेमाने आयुष्य चालू असतेच.

.त्यांना कामावर ठेवणाऱ्या बायकाही माणूस(ह्युमन) असतात.या सर्व गोष्टी समजून, कधी कुरकुरत, कधी प्रेमाने आयुष्य चालू असतेच.>>>>>>
द्या टाळी Happy
येहीच तो , तुम्ही विषयच बंद केला

सर्व चर्चा वाचून ती किती एकतर्फी आहे याची जाणीव झाली. म्हणजे मायबोलीवर कोणीच कामवाली बाई सदस्य नाही जी स्वतः employee म्हणून तिची बाजू मांडू शकेल. सुदैवाने तिची बाजू घेणारे सदस्य आहेत पण मायबोलीचा परीघ अजून किती वाढण्याची गरज आहे याची जाणीव झाली. विशेषतः जेव्हा रेडिट सारख्या सो मि वर एखादा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव वाचायला मिळतात. तसे अजून मायबोलीवर होत नाही.

<<कामवाली बाई सदस्य नाही>>
काही कामवाल्या बायका वाचत होत्या. एक दोन पाने वाचल्यावर म्हणाल्या, मूर्ख आहेत सगळे नि थांबल्या वाचायचे. इथे लिहिण्यात (भांडण्यात) एव्हढा वेळ घालवण्यापेक्षा घरकाम स्वतःच केले तर सगळेच प्रश्न सुटणार नाहीत का? असे म्हणाल्या.
वर म्हणाल्या, आम्ही यांच्या घरी दिवसातले दहा तास काम करतो नि पुनः घरी येऊन आमचे घर चालवतो. आम्हाला नाही वेळ असल्या फालतू वादविवादात पडायला. या आयतोबांना काय होते स्वतःच्याच घरचे काम करायला. फुक्कट दुसर्‍याच्या नावाने बोंब मारायची.
जा सगळ्या इंग्लंड अमेरिकेत. म्हणजे समजेल कामवाली बाई ठेवणे हे काय असते!! झक मारत स्वतः कामे कराल!

माफ करा हे लिहीलेले अत्यंत एकतर्फी आहे.
लहानपणापासून अंगमेहेनतीचे काम म्हणजे कमीपणा अशी भारतीय संस्कृती!
कुणि वरच्या वर्गाचे कुणि खालच्या वर्गाचे! खालच्या वर्गाच्या लोकांनी घरे साफ करणे, स्वैपाक करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, बागकाम अशी कामे करायची. ती जर आपण केली तर भारतीय संस्कृती खड्ड्यात! लोक काय म्हणतील?
वरच्या वर्गातल्या लोकांनी पहाटे उठून डोंबिवली नि इतर दूरवरच्या ठिकाणाहून फोर्ट वगैरे इथे येऊन ऑफिसात येऊन बसायचे नि संध्याकाळी परत तोच प्रवास करून परत घरी जायचे. वेळ मिळेल तसे मायबोली, मिसळपाव, फेसबूक, व्हाट्स अ‍ॅप इ. ठिकाणी लिहीणे , फोनवर बोलणे (कधी कामाचे सुद्धा!) अशी सगळी कामे करणे हेच आयुष्य. लोकलची गर्दी किंवा गाडीने जाणे येणे असेल तर ट्रॅफिक चा त्रास.
त्यात पुनः मोलकरणींच्या तक्रारी हेच केव्हढे मोठे काम.

तर हे असेच चालायचे झाले.

नंद्या ४३ प्लस १०० . मला ह्या बायकांच्या स्टॅमिना चे फार कौतूक आहे. चार वाजता उठून सर्व स्वैपाक करून दुरून कुठून तरी, दिवा मुंब्रा कामाला येतात. तब्येतीचे फार हाल असतात. पाळीच्या दिव सा तही तेव ढेच काम हेलथ केअर्ची बोंब. परत इमोशनल इशूचे काय करतात कोण जाणे. माझी एक जु नी बाई मुंब ईतच ठेवली होती लादी केर फक्त ८०० रु. मग तिला जायला सांगित ले तसे दोन तीनदा इतर बायांबरोबर रिमाइंडर पाठवले आठशे रु. राहिलेत म्हणून एक दिव स आलीच सुट्टी होती तरी तेव्ढ्या पैशासाठी दुरून आली. लगे च देउन् टाकले
तंबाखू खाउन तोंड आले होते तर लावाय्ला मध दिला. अंगात शक्ती आहे तो परेन्त हे कामे कर णार ह्यांच्या निवृत्तीचे काय? नो पेन्शन. सुना हाकलून देत असतील. परत आमच्या सारखे पब्लिक आटोमेट करून कामच नाहीसे कर णार. त्याच्या नजरेतून आपण फक्त एक आर्थिक रिसोर्स आहोत. बाकी जीवन त्यांचे वेगळेच आहे असते.
आपले आपण काम केले की फिट पण राहतो. थकवा येतो पण वो चलता है.

बहुतेक बायकांच्या बाबतीत नवरा दारूडा असणे, मारझोड करणे असे प्रकार असतात. दारूच्या व्यसनामुळे या बायकांना अशी कामे करावी लागतात. खरे तर चटकन बाई मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आमच्या आताच्या बाईला नव-याने मारहाण केली आणि शिवीगाळ केल्याने ती जिथे राहत होती तिथल्य सोसायटीने त्याला कामावरून हाकलून दिले. त्या सोसायटीने वॉचमनची केबीन रहायला दिली होती. ती काढून घेतली. दोन लहान मुलं घेऊन ती गावाला गेली. नव-याने राहण्याची व्यवस्था झाली असा मेसेज पाठवल्यावर परत आली तर जिन्याखालची जागा. त्याचे भाडे साडेतीन हजार. ते ठिकाण आमच्या सोसायटीपासून चालत पाऊण तासाच्या अंतरावर आहे. हे सगळं दिव्य करून दोन लहान लेकरांना घेऊन ती येते. एक दोन अडीच वर्षांचं आणि दुसरं चार वर्षांचं.

बहुतेकींच्या समस्या डोकं सुन्न करणा-या असतात. हात ऊसने पैसे नेहमी लागतात. पगरातून कापून घ्या म्हणतात. बरेचदा पगार घरी नेणे त्यांना परवडत नाही. कारण नवरा दारूसाठी पैसे मागतो. त्याची स्वतःची कमाई कुठे जाते हे कधीच समजत नाही. जुन्या घरी बाईने तिचा पगार सहा सहा महीने न घेता एकदम घ्यायला सुरूवात केली. कारण सेम. मग तिला वडिलांनी बँकेत खाते उघडून दिले. व्यवहार शिकवले. पण प्रत्येक वेळी माझ्या बायकोला तिच्या सोबत जावे लागतेच. तेव्हढा आत्मविश्वास नाही. बँकेत खाते उघडून दिल्यानंतर परिस्थिती सुधारली तिची. त्यात नव-याच्या डोक्यावर परिणाम झाला, घरच्यांनी तिला बाहेर काढले ही इष्टापत्ती ठरली. आता चांगली परिस्थिती आहे. माझी बायको बचत गट चालवते. तिला कर्ज देऊन एक जागा मिळवून दिली. आता कॉलेजच्या मुलांचे डबे आणि खानावळ असे उत्तम चालले आहे तिचे. मुलांना खाजगी इंग्लीश मेडीयमच्या शाळेत घातले आहे.
असो. अवांतराबद्दल क्षमा.

Pages

Back to top