स्पर्शिका जोशी, scam की सत्य?

Submitted by हेला on 13 July, 2018 - 11:15

मैत्रिणींनो! सावधान!!

"तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते का? मी मदत करु शकते" अशा अर्थाची मराठी आंतरजालावर अनेक दिवसांपासून एक छोटेखानी सुचवणी फिरते आहे. त्या चार ओळींच्या लेखात खास महिलांना आवाहन केले जात आहे. केवळ मायबोलीच नव्हे तर मिसळपाव संकेतस्थळावरही हा लेख आला होता. त्यात कोणीतरी डॉक्टर असल्याची बतावणी करुन महिला सदस्यांना जीमेलवर चॅटवर यायला सांगत आहे. एवढेच नव्हे तर कित्येक स्त्री सदस्यांना व्यक्तिगत मेल आयडीवर 'मी तुमचे लेख वाचले, मला खुप् आवडले, आपण चॅट करु शकतो का' अशा अर्थाचे मेल पाठवले आहेत. एकाच व्यक्तीकडून अशा प्रकारचे मेल्स आल्याची दोन्ही संस्थळावरच्या अनेक महिला सदस्यांनी कळवले आहे. हे सर्व मागच्या गेल्या सात ते आठ दिवसांत घडले आहे.

या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असे वाटल्याने मी व माझ्या पत्नीने याचा छडा लावायचे ठरवले. त्यातून आम्ही त्या जीमेल आयडीवर चॅटमधून संपर्क साधला. त्यातून त्या व्यक्तीने आपली ओळख नीटपणे दिली नाही. आम्ही विचारले की नक्की कशाबद्दल आहे हा लेख? तुम्ही काय मदत करता? तर त्यावर ती विचारत होती की तुमचा आधीचा इंजेक्षनचा अनुभव काय आहे, तो सांगा मग मी पुढे सांगते. म्हणजे नीटपणे काही सांगत नव्हती.

त्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असल्याचे सांगितले पण क्लिनिकचा पत्ता व मोबाइल नंबर देण्यास टाळाटाळ केली. सदर व्यक्ती "जूहू व ठाणे इथे माझे क्लिनिक आहे व माझा नवराही डॉक्टर आहे, आम्हाला एक दोन वर्षांची मुलगी आहे" अशी बतावणी करते. या व्यक्तीने आम्हाला सर्व डिटेल्स मागितले, जसे तुमचा फोटो द्या, नाव, कुठे जॉब करता, इत्यादी सर्व खोदून चौकशी केली. आम्हाला बघायचेच होते की हे प्रकरण नेमके काय आहे म्हणून आम्ही सर्व सत्य माहिती दिली. परंतु आम्ही जेव्हा साधा क्लिनिकचा पत्ता आणि मोबाईल नंबर मागितला तर आधी पुरेशी ओळख होऊ द्या एकमेकींची, मग पत्ता, फोन देते असे म्हणाली. पण आम्ही विचारले की डॉक्टरला क्लिनिकचा पत्ता द्यायला कशाला ओळख वगैरे लागते, तुम्ही पत्ता द्या, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटू. तेव्हा ती म्हणाली की "मी विकेंडला क्लिनिकला नसते, उद्या बँगलोरला कॉन्फरन्सला जायचे आहे अशी थातूरमातूर कारणे दिली. शेवटी आम्ही क्लिनिकच्या पत्त्यासाठी अडून बसल्यावर "माझी मुलगी झोपेतून उठली आहे आणि तिला झोपवून परत येते" असे म्हणून ही व्यक्ती जी ऑफलाइन झाली आहे ते गेल्या चार दिवसांपासून परत आलेली नाही. ह्या व्यक्तीने जो स्वतःचा फोटो म्हणून आम्हाला दाखवला, त्या फोटोची फेसबुक प्रोफाईलसुद्धा फेक असल्याचे आढळले आहे.

स्पर्शिका जोशी नावाची कोणीही व्यक्ती गायनॅकॉलॉजिस्ट असल्याचे आढळून आलेले नाही. त्या व्यक्तीने ठाण्यातल्या 'माहेर' क्लिनिक चा पत्ता दिला आहे तर त्या माहेर क्लिनिकशी कोणत्याही स्पर्शिका जोशींचा संबंध नाही आहे.

स्पर्शिका जोशी असे नाव घेऊन कोणी तुम्हाला चॅट वर यायचे आमंत्रण देत असेल तर कृपया सावध रहा. हा काहीतरी खूप मोठा स्कॅम आहे. ज्यात आपल्यासोबत काही चुकीचे घडल्यास कदाचित तुम्ही कोणाला सांगूही शकणार नाही. तेव्हा परत एकदा आवाहन कृपया सावध राहा, कोणत्याही मेल्स ला, चॅट इन्विटेशनला फशी पडू नका.

अ‍ॅडमीन व वेबमास्तरांना विनंती की सदर आयडी मायबोलीवरुन स्त्री आयडींना संपर्क करत आहे त्यामुळे तुमच्या पातळीवर याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.

सदस्यांपैकी कोणी सायबर गुन्हेगारी संदर्भात मदत करु शकत असेल तर कृपया पुढाकार घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरली वांगी सिद्धसाधक योकुस काही विशेष मेल आला का? ( मामी यांच्या तर्कावरून जोशीबाई कुणी माणूसच/पुरुषच असावा.)

एकूण हिंदी खबरे चानेलवाल्यांच्या शब्दांत सांगायचे तर भंडाफोड हो गया है।

FB Online (Marketplace) - खरेदीचा किस्सा
मायबोलीवर जाहिराती दाखविल्या जात आहेत त्यात shopiiee20 या ऑनलाइन दुकानाची जाहिरात आणि इतरही जाहिराती पाहिल्या, त्यावर आधारित एक माझा किस्सा ( shopiiee20 या साईटला बदनाम करायचा माझा कोणताच हेतू नाही मी केवळ जाहिरात बघून मला आलेला अनुभव कथन करू इच्छिते)
मी shopiiee20 या ऑनलाइन दुकानाची जाहिरात बघून त्यात दागिने खरेदी करू पाहत होते पण COD ची फॅसिलिटी नाही आहे तर आधी पेमेंट करायचे आहे. यामुळे मी transaction रद्द केले. कारण यापूर्वी मला फार मोठा फटका अश्या ऑनलाइन खरेदीत आला आहे.
indianethnichonline.com या site वरून साडी आणि ड्रेस ची खरेदी केली मी इतकी खुश होते कि मला आवडणारी साडी डिस्काउंट मध्ये मला मिळत होती. मी ऑनलाइन पैसे पेड केले, मला पैसे पेड झाल्याचे कन्फर्मेशन विथ ऑर्डर नंबर चा मेसेज आला. ही खरेदी मी सप्टेंबर मद्ये (यावर्षीच) केली होती पण आजतागायत मला त्या प्रॉडक्ट्स ची डिलिव्हरी झाली नाही. मी शोधाशोध केली असता ती site फ्रॉड असून असे कितीतरी लोकांना त्यांनी फसवले आहे. मी तरीही खूप प्रयत्न केले पण सगळे फेल. ते लोक नवी नवी site क्रिएट करतात आणि फ्रॉडचा गवगवा झाला किंवा त्यांना हवी असलेली रक्कम गोळा झाली कि ती साईट बंद करून पुन्हा नव्याने सुरु. आतापर्यन्त मी त्यांच्या सर्व FB पेजेसवर शिव्याची लाखोली वाहिली मला ब्लॉक केले आणि सो ऑन.... मी फक्त ऑफिशियल पोलीस कम्प्लेंट करू शकली नाही कारण मला भीती वाटली कि नवरा ओरडेल. बाकी रक्कम ५००० हजाराच्या खाली होती म्हणूंन मीही आता नाद सोडला आहे. तरी प्लीज कोणीही अश्या शॉपिंग साईटच्या भरीस पडू नका.

मी shopiiee20 या ऑनलाइन दुकानाची जाहिरात बघून त्यात दागिने खरेदी करू पाहत होते पण COD ची फॅसिलिटी नाही आहे तर आधी पेमेंट करायचे आहे. यामुळे मी transaction रद्द केले.>>> वाचलात!!! खरोखर fraud साईट आहे ती. खुशाल बदनामी करा!

एखादी website खरी आहे की fraud हे कसे शोधावे?
who.is या website वर जाऊन आपल्याला ज्या website ची खात्री करून घ्यायची आहे त्या website चे नाव टाकावे. मग तेथे आपल्याला ती website कधी सुरु झाली (Registered On) आणि कधीपर्यंत तिची नोंदणी आहे (Expired On) या तारखा दिसतात. Genuine sites या अनेक वर्षे सुरु असतात. त्यांची Expired On तारीख अगदी पुढच्या महिन्यातली दिसली तरी हरकत नसते. ते पुन्हा renew करून घेतात. मात्र fraud website अवघ्या एका वर्षासाठी नोंदणी केलेल्या असतात. खालील data पहा, म्हणजे लक्षात येईल.

website_0.jpg

चांगली माहिती विक्षिप्त मुलगा.

अजनबी किती वाईट अनुभव.

मी online shopping कधीच करत नाही. नवरा amazon, फ्लिपकार्ट वरुन करतो कधीतरी. कपडे कधीच मागवले नाहीत पण यावेळी माझी एक मैत्रीण जी मायबोलीकर आहे तिने ट्रेडिंग सुरु केलं म्हणून मी तिच्यातर्फे काही shopping केलं ड्रेसेसचं. मला चांगला अनुभव आला आणि भाचीचा ड्रेस जरा tight वाटला तर replacement हि लगेच करून मिळाली. या सर्वांची कॅश on डिलिव्हरी करायची होती. डिलिव्हरी charges वेगळे द्यावे लागले नाहीत. किंमतही मला ok वाटली.

थँक यु विक्षिप्त_मुलगा.
https://indianethniconline.com या साईट वर मेंन प्रॉडक्ट मॉडेल आपली कोठार्यांची सून उर्मिला कानेटकर होती. मी तिच्या FB पेज वर सुद्धा मेसेज टाकला कि तुम्ही या साईटसाठी मॉडेलिंग करता का? जर करत नसाल तर ते तुमच्या फोटोचा गैरवापर करत आहेत. यावर काहीच रिप्लाय मला मिळाला नाही. पण या साईटच्या नावाशी साधर्म असलेली सेम साईट मात्र जेन्यून असल्याचा दावा करते. मी तिलाही कॉन्टॅक्ट केले असता आमचा याच्याशी काहीच संबंध नाही असा ऑटो जनरेट मेसेज मिळाला.

@वि_मु केवळ एक वर्षच ओथराइझेशन घेतलं साइटला म्हणजे बोगस आहे अशी शंका घ्यायची का?

@वि_मु केवळ एक वर्षच ओथराइझेशन घेतलं साइटला म्हणजे बोगस आहे अशी शंका घ्यायची का?
नवीन Submitted by Srd on 28 November, 2020 - 07:52

एखादा महोत्सव (क्रीडा, कला, संगीत, तांत्रिक) उदा. Mumbai Marathon 2021, IIT Bombay Techfest 2020-21, Sunburn etc. यांच्यासाठी एक वर्षच ऑथोरायझेशन समजू शकतो, कारण तिथे तो इव्हेंट संपण्याची नेमकी तारीख माहिती आहे, त्यानंतर त्या वेबसाईटचा तसाही काही उपयोग नाही. परंतु shopping वेबसाईटला फक्त एक वर्षच??? म्हणजे एक वर्षात तुमचा धंदा बंद पडणार आहे याची तुम्हाला इतकी खात्री आहे?????

@विक्षिप्त_मुलगा @Ajnabi आपली माहिती इतरांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. पण मला वाटते या धाग्यापेक्षा ती खालील ग्रुपवर दिल्यास एकत्र संकलन होईल

https://www.maayboli.com/node/60501

<< (Registered On) आणि कधीपर्यंत तिची नोंदणी आहे (Expired On) या तारखा दिसतात. Genuine sites या अनेक वर्षे सुरु असतात. >>
एकदम चुकीची माहिती. एखादी साईट नुकतीच सुरू झाली याचा अर्थ ती फ्रॉड आहे, असा होत नाही.

उबो सहमत.
अनेक नवीन बिझिनेस निघत असतात.
रजिस्ट्रेशन पिरियड कमी ठेवण्याची कारणे वेगळी असू शकतात. आम्ही दोन वर्षांपूर्वी कंपनी स्थापन केली. पहिल्यांंदा डोमेन रजिस्टर केला एक वर्षासाठी, कोणता रजिस्ट्रार कसा असेल (बंडल ऑफर असते, डोमेन रजिस्ट्रेशन, मेल, वेबपेज वगैरे) सर्व्हिसेस कशा असतील याची खात्री नसते म्हणुन कमी कालावधी घेतला होता. आणि झाले तसेच, सर्व्हिसेस, सुविधा आवडल्या नाहीत, दुसऱ्या वर्षी डोमेन दुसऱ्या रजिस्ट्रारकडे शिफ्ट केला आणि परत एक वर्षच कालावधी निवडला. जर हा दुसरा सर्व्हिस प्रोव्हाइडर आवडला तर पुढल्या रिन्यूअल ला तीन वर्षे कालावधी घेण्याचा विचार करू.
(डोमेन रजिस्ट्रार एक आणि मेल, वेब सुविधा पुरवणारा दुसरा असेही करता येते, पण त्यात आपल्याला नेम सर्व्हर मेंटेन करावा लागतो त्यामुळे सगळे एकाकडे असणे सोपे जाते)

एक वर्ष डोमेन घेतला असेल तर फ्रॉड असेलच असे नाही तरीही तो एक चांगला मापदंड आहे. जवळ्पास ९० टक्के बिजनेस पहिल्या वर्शी बन्द पडतात. त्यामुळे वर्शानुवर्शे चालत आलेल्या डोमेन्स वरून खरेदि करण्यात शहाण्पण आहे. खास करून तुम्ही कोणती अ‍ॅड बघून खरेदी करत असाल तर.
डोमेन हा तसा एक कमी खर्चिक प्रकार आहे. स्पेशल डोमेन नसेल तर साधारण २५०० रुपयात २-३ वर्षाची मेम्बर्शिप येते, त्यामुळे तेव्ढा घेऊन ठेवायला काहिच हरकत नसावी. होस्टिन्ग आणि मेल्स सेपरेट घेता येतात आणि नेम सर्वर चेंज करणे काही कठीण नाही. जर का फुल फ्लेज वेब साईट नको असेल आणि केवळ landing page बनवायचि असतील तर होस्टिंग तुम्हला एकदा पेमेंट केल्यास आयुश्यभर मिळू शकते. त्यामुळे ऑनलाईन दुकान टाकणे नक्कीच खर्चिक नाहिय.

Pages