Submitted by Meghana1 on 11 July, 2008 - 05:26
५/६ वर्षाच्या मुलांमध्ये भाषा, गणित ह्या विषयांची गोडी वाढावी म्हणून काय करता येईल?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या आसपासच्या स्कूल
आमच्या आसपासच्या स्कूल डिस्ट्रिक्टमधे के जी मधे लेटर साउंडस अन साइट वर्डस शिकवतात. पहिलीत मग मोठे शब्द वाचायला शिकवतात. तिसरी पर्यंत स्पेलिंग उच्चाराप्रमाणे लिहिलं तरी चालवून घेतात. ज्या गोष्टी पुढे शाळेत शिकतील त्या आधीपासून घरी शिकवायचा खटाटोप कशाला ?
त्यापेक्षा इतर कितीतरी गोष्टी ज्यांच्यावर शाळेत पुरेसा भर दिला जात नाही त्या घरी शिकवाव्यात.
पोस्ट ऑफिस, बँक, लायब्ररी, डॉक्टर ऑफिस, ग्रोसरी स्टोअर मधे घेऊन जाताना त्याबद्दल माहिती द्यावी, एन्व्हायरनमेंटल प्रिंट - म्हणजे भवतालचे शब्द - याकडे लक्ष द्यावं. दुकानांची नावे, रस्त्यांची नावे, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम दिशा, स्ट्रीट साईन्स चे आकार( शेप अॅन्ड साइझ दोन्ही) अन रंग, स्पीड लिमिट, ठिकाणांमधली अंतरं, तिथे जायला लागणारा वेळ, घरांचे नंबर्स, आसपास दिसणारे वेगवेगळे आकार , पॅटर्न्स, या सगळ्यांबद्दल माहिती द्यावी, प्रश्न विचारावेत. स्कूल बसेस किती दिसल्या, बीटल गाड्या किती दिसल्या या सारखे खेळ खेळावेत. यूपीएस, फेडेक्स चे ट्र्क्स,गॅस स्टेशनचं, बँकेचं नाव, डंकिन डोनट, मॅक डी सारख्या दुकानांच्या साईन्स ओळखायला शिकवाव्या. ओळखीच्यांचे फोन नंबर, बर्थ डे शिकवावेत.
मिती, तिला उद्या परवा
मिती, तिला उद्या परवा भेटिनच्,तेव्हा सगळे विचारून सांगिन.
शोनू,सद्ध्या तिला पुस्तकांमधे भरपूर गोडी आहे,म्हणून ती शिकत असेल तर शिकवायचे असे आहे, आणि just to give a head start. तशा मी तिला बाकिच्या अनेक गोश्टी (हे कसे लिहायचे?) शिकवत असते.पण
तुम्ही सांगितलेल्या अनेक गोश्टी मला सुचल्या नव्हत्या.मी त्या पण सांगीन्.धन्यवाद.
नमस्कार मन्डळी, माझा मुलगा
नमस्कार मन्डळी, माझा मुलगा अडीच वर्षाचा आहे. त्याला थॉमस चे भयन्कर वेड आहे म्हणजे अगदी शाळेतून आला किन्वा कुठून बाहेरून आला की लगेच त्याला ती train डोळ्यासमोर लागते ...आम्ही पार वैतागलो आहोत...तो एका जागी बसत नाही त्यामुळे त्याच्या शाळेतून्ही तक्रार आहे...तो अभ्यास कसा करणार? स्मरणशक्ती खूपच छान आहे, शिवाय आकलनही चान्गले आहे पण नादीष्ट आहे...त्याचा नाद कसा कमी करावा काहीच कळत नाही.मी अमेरिकेत असते , नौकरी करत नाही पण घरात सगळे स्वतःच करवे लागते त्यामुळे पूर्णवेळ त्याच्याबरोबर बसता नाही येत शिवाय त्याला जर सान्गितले कि असे कर , हे नको करु तर अगदी शान्तपणे तो मला म्हणतो, "मम्मा जा स्वयपाक करा"...मी अगदी हात टेकलेत त्याच्यापुढे...plz help me
माझा mail id..mswapna13@yahoo.co.uk आहे..दाद मलाही तुमच्या वहिनीचे प्रयोग कळवा plz help me
स्वप्ना, तुम्हाला मा बो
स्वप्ना, तुम्हाला मा बो आयडीवर मेल पाठवलीय. तसेच तुमच्या विपु मध्येपण लिहीलेय.
स्वप्ना- काहीतरी गॅप वाटते
स्वप्ना- काहीतरी गॅप वाटते आहे. त्याच्या वागणुकीचे निरीक्षण करुन टिपणं तयार केल्यास बरे पडेल. तो एका जागी का बसत नाही? लवकर समजतं (आकलन होतं) म्हणून, म्हणजे त्याला दर वेळेस नविन काहीतरी हवं असतं का ? की हायपरअॅक्टिव्हीटी ? की घरात अलिकडे काही ताण निर्माण झाला आहे ? की त्याला ती शिक्षणपद्धती आवडत नाही ?
१. रोज ५ मिनीट याप्रमाणे वेळ वाढवत नेणे. क्रेयॉन्स आणि कागद घेऊन एका जागी बसून चित्र (?) काढणे. साधारण महिन्याभरात शेप्स काढेपर्यंत प्रगती होऊ शकेल. आणि हळू एका जागी बुड लावून बसायची सवय लागेल.
२. बाहेर बागेत वगैरे घेऊन जाऊन प्रत्येक गोष्टीचे नाव सांगुन, त्याला पाहिजे तेवढा वेळ त्या वस्तुला हात लावू देऊन शब्द शिकवणे.
३. ब्रुनो आणि पेप्पर आणि बबल्स या कॅरॅक्टर्सची छोटेखानी ७-८ पानांची पुस्तकं मिळतात. त्यातली चित्र मोठ्ठी असल्यामुळे पोरांना लगेच समजतात. त्यात बबल्स ब्रश वापरुन दात घासायला लागतो, ब्रुनो भिंतीवर चित्र काढतो मग आई समजावून सांगते, ब्रुनो खेळणी लोळत ठेवतो मग आजोबा घसरुन पडतात, मग तो खेळणी आवरुन ठेवायला शिकतो वगैरे वगैरे. ही पुस्तकं सतत अवती भवती ठेवल्यानी खूप फायदा होतो. त्याचा मुड असला की पाच मिनीटं आपण त्याच्यासोबत वाचावे, पानापानावरची गोष्ट सांगावी. हळूहळू तो वाचायला लागेल.
४. आपण सगळी कामं सोडून बोर्ड गेम्स खेळत बसावे. पझल्स लावत बसावे. मुलं हळूहळु लावायला शिकतात.
५. मोठ्ठ्या लेगोच्या ठोकळ्यांना काय म्हणतात ते आठवत नाही, पण ते तसले मोठ्ठे ठोकळे आणुन ट्रेन करायला शिकवता येईल. हळूहळू इतर गोष्टीही करता येतील. मग विमान, मग एकेक करत सगळी वाहनं.
६. ओंकार, प्रार्थना आणि संगीत यानी हळूहळू मुलं (आणि पालक)शांत व्हायला मदत होते.
७. आपल्यासोबत पोळपाट लाटणं वगैरे घेऊन, कणकेशी खेळू देऊन स्वयंपाक करणे. प्रत्येक फळ, भाजी हाताळायला देऊन त्याच्याशी खेळू देऊन त्याचं नाव सांगणे.
८. सतत काहीना काहीतरी मोजत बसणे- आगगाडीचे डबे, बॉलचे टप्पे, दोरीवरच्या उड्या, चमचे, पाय-या, मुरमुरे, फुलं, क्रेयॉन्स, डब्बे, वगैरे वगैरे. रात्री झोपताना पाढे म्हणणे वगैरे. यानी आकड्यांची सवय होईल.
९. मुलांची उर्जा ( एनर्जी) चॅनलाईज करावी लागणार. त्याचा कल बघून एखाद्या आवडणा-या खेळात गुंतवणे. त्याची उर्जा योग्य प्रकारे खर्च होईल. जबरदस्ती करु नये.
एकदा तुम्हाला अंदाज आला की त्याला काय आवडतय की शाळेत तसे सांगता येईल म्हणजे त्यानुसार तेही तसं करु शकतील. मॉंटेसरी शिक्षणपद्धती सगळ्याच मुलांना सूट होत नाही.
स्वप्ना अडिच वर्षाच्या
स्वप्ना अडिच वर्षाच्या मुलाकडून एकाजागी बसायची अपेक्षा करणे मला तरी अवाजवी वाटते. तसेच या वयात एकाच गोष्टीचे वेड जसे थॉमस बर्याचवेळा असते. माझ्या मुलाला पू बेअरचे होते. इतक्या लहान वयात अभ्यासाची काळजी करू नका. त्याच्या बरोबर भरपूर वेळ घालवा. अगदी घरातील कामे बाजूला ठेऊन. माझा मुलगा तान्हा असताना मी नोकरी करायची पण ती नोकरी सुटल्यावर मी त्याच्या बरोबर भरपूर खेळायची/वाचायची. काही वेळा सकाळचा पसारा दुपारी ३-४ वाजले तरी तसाच पडलेला असायचा. मग क्लिन अप च गाणं लाऊन तो खेळणी आवरणार मी माझी कामं करणार असं चालायच. थोडा मोठा झाल्यावर त्याला धुतलेले कपडे सॉर्ट करणे, भांडी पुसणे वगैरे कामे द्यायची. वरती रैना यांनी खूप छान सुचना दिल्यात.
स्नेहा१, माझ्या ओळखीचे लोक
स्नेहा१, माझ्या ओळखीचे लोक hooked on phonics वापरायचे. मी माझ्या मुलाला नुसतच गोष्टी वाचून दाखवायची. नंतर तो माझ्या बरोबर रिबस वाली पुस्त़क वाचायला लागला. त्याच्या शाळेत Saxon Phonics होते. त्याचा खूप फायदा झाला.
रैना, शोनू...धन्यवाद. असं
रैना, शोनू...धन्यवाद. असं साईड शिक्षण चालु असतच. तुमच्यामुळे अजुन काही आयडियाज मिळाल्या. लहान वयात मुलांची खुप नविन गोष्टी आत्मसात करायची कॅपॅसिटी असते, एनर्जीही भरपुर असते. त्यामुळे ताण येउ न देता काही नविन शिकली तर चांगलं.... माझ्या मुलीला stories ऐकायला फार आवडतं आणि सारखं TV, comp वर cartoons बघण्यापेक्षा ज्या काही दुसर्या गोष्टी करता येतील त्यापैकी एक - वाचन. अर्थात फार मोठे शब्द आत्ता नाही तरी कधीतरी वाचेल, तर ते कसे शिकवावे...स्पेलिंग प्रमाणे की साउंड प्रमाणे?....स्नेहा तुला वेळ होईल तेव्हा कळव.
@स्वप्ना...स्वातीला अनुमोदन...अडिच वर्षाच्या मुलाकडून एकाजागी बसायची अपेक्षा करणे मला तरी अवाजवी वाटते>>>>घरातली कामं राहुदेत बाजुला, मुलाला वेळ दे...दोघं मिळुन काही physical activities पण करा जसं डान्स, पकडापडी, लपाछपी घरातल्याघरात पण एन्जॉय करतात मुलं.
धन्यवाद रैना, नलिनी,स्वाती..,
धन्यवाद रैना, नलिनी,स्वाती.., मी तुम्ही सान्गितलेले सगळे उपाय अगदी नेटाने करेन..तुम्हा सगळ्याच्या मदतीमुळे आणि धीरामुळे मला एकदम उत्साह आला आहे.पुनःश्च धन्यवाद सगळ्याना
नमस्कार सगळ्याना, मला हा
नमस्कार सगळ्याना,
मला हा प्रश्ण कुठे टाकावा हे कळत नाहीये,मुलान्शी सम्बन्धीत म्हणून इथे टाकतेय.
माझी मुलगी ३ वर्षाची आहे,आत्ताच प्लेस्कूल ला जाउ लागली आहे.इथे यु एस मधे ५ वर्षा पर्यान्त मुलान्ना म्हणे लिहिता आलच पाहीजे अस compulsory नाहीये.पण मी तिला घरी शिकवतेय लिहायला.भारतात गेल्यावर पन्चाइत नको.तर अडचण अशी की ती कधी उजव्या हातात पेन पकडते तर कधी डाव्या.कागदावर लिहिताना तिच्या डाव्या हाताला चान्गली grip असते,पण फळ्यावर खडू ने लिहिताना उजवा हात वापरते.मधेच कधीतरी उलटेही होते.चित्र रन्गव्ताना तर गम्मतच करते,उजव्या बाजुच चित्र उजव्या हातात क्रेयोन ने तर डाव्या बाजुच डाव्या हाताने.;) गोन्धळ होतोय तिचा.
मला कळत नाही की तिला कुठल्या हातानी सवय करू.आत्ता सुरवात आहे म्हणून्.पुढे हस्ताक्षर चन्गल याव यासाठी आत्तापासून कळजी घ्यायला हावी ना!
-तोषवी.
बापरे! तीन वर्षांच्या मुलीला
बापरे! तीन वर्षांच्या मुलीला लिहायला? त्यांची मोटर स्किल्स डेव्हलप नको का व्हायला?
माझी मुलं खूप मोठी आहेत. पण माझ्या आठवणीप्रमाणे मी त्यांच्या हातात क्रेयॉन द्यायचे आणि कागद. आणि त्यांना हवं तसं हवं ते रेघाटू द्यायचे कागदावर.
स्वप्ना, अडीच वर्षांचा मुलगा
स्वप्ना, अडीच वर्षांचा मुलगा एका ठिकाणी बसेल हे शक्य नाही. तुम्ही त्याच्याबरोबर रैनाने सुचवले तसे खेळ खेळा. आणि त्याला थॉमस आवडणे गैर नाही. माझ्या जावेचा २ वर्षाचा मुलगा सारखा हनुमान, कुंग्फू पांडा आणि तेनालीरामा बघतो. इतका, की त्या आईला काहीच दुसरे बघता येत नाही.
तोषावी, मला अजुन मूल नाहीये,
तोषावी, मला अजुन मूल नाहीये, पण मी स्वतः लेफ्टी आहे. तिला कुठल्याही प्रकारे जबरदस्ती करू नका.. आणि डाव्या हातानेदेखील अक्षर टपोरे मोत्यासारखे येते. (माझे आहे..
)
कितव्या वर्षी लिहायला शिकवायचे हे इथल्या आयांनाच माहीत.. मला त्याचे उत्तर नाही देता येणार..
आर्च ,अग अगदि लिहायला म्हणजे
आर्च ,अग अगदि लिहायला म्हणजे सगळ नाही ग्,मी तिला सध्या standing line /sleeping line/slanting line अस शिकवतेय्.आणि त्याचीच प्राक्टिस्.इथे प्रे स्कूलर्स साठी ची पुस्ताके आणलीत्,त्यात असेच प्रकार आहेत्.आणि मग H,L,T, I अशी सोपी अक्षर ....पण तिला लिहिताना कोणत्या हातानी लिहाव ते कळत नाहीये.तिला कुठल्या तरी हातात ग्रिप यावी म्हणून तिला कुठल्याही १ हातात पेन्/क्रेयोन धरायला सान्गातेय्,पण तिला ते उमगतच नाहीये.
@रैना काय छान टिप्स दिल्यास ग्,मुलीवर प्रयोग करुन बघते.
BSK,हो मला तिने कोणत्याही १ हाताने लिहिल तरी चलणार आहे,डाव्खुरे तर नशीब्वान असतातः)
मला वाटते तिला क्ले ( कल्र्रड
मला वाटते तिला क्ले ( कल्र्रड नोन टॉक्सीक) खेळायला देउन पहा...कुठला हाताने कम्फर्तेबल वाटते ते तिचे तिला ठरवू द्या....काही जण दोन्ही हाताची प्रॅक्टीस ठेऊ शकतात्..माझी जाऊ जेवताना उजवा हात वापरते पण बाकी सगळी कामे ..लिहिणे पण ...डाव्या हातावे करते!!..तसेही असेल तिचे..तिला फक्त वेळ द्या!!!
फुलराणी माझे तसेच आहे..
फुलराणी माझे तसेच आहे..
लहानपणी मी काही काळ दोन्ही हातांनी लिहू शकत असे, हे मगाशी लिहायला विसरले..
तोशवी अगदी माझी मुलगी (वय ५
तोशवी अगदी माझी मुलगी (वय ५ वर्ष) अशीच दोन्ही हाताने लिहीते सध्या. ब्रश करताना पण बर्याचदा डावा हात येतो पुढे ब्रश धरायला. चित्र काढताना ज्या बाजुच चित्र तोच हात वापरते पण शाळेचा अभ्यास करताना उजवा हात. तिच अधुन मधुन b d, 9 १ ह्यामधे गोंधळ होतो स्पेलिंग लिहीताना. comb च स्पेलिंग मधेच comd लिहिते. असा गोंधळ बर्याच जणांचा होतो का ह्या वयात? बाकी प्रगती व्यवस्थीत आहे वाचन, चित्र, गाणी, नाच सगळ्याची आवडही आहे.
कविता, माझा मुलाचे असे
कविता, माझा मुलाचे असे व्हायचे. जसा मोठा होत गेला तसा b d चा गोंधळ होणे थांबले. इथे तसे ५-६ वर्षाच्या मुलांकडून फार अपेक्षा करत नाहीत. आता खेळायला, लिहिताना उजवा हात वापरतो. पण भांडी घासणे, अंड फेटणे वगैरे साठी दोन्ही हात वापरतो.
सगळ्याना धन्यु! बरका! तुमच्या
सगळ्याना धन्यु! बरका!
तुमच्या सुचना लक्षात ठेवीन.
हो हो b d 9 १ अशी गम्मत तर
हो हो b d 9 १ अशी गम्मत तर बरीच मुल कर्तात न!
मझ्या मुलीची गम्मत म्हनजे, ती बरेचदा आकडे /अन्क उलटे वाचते.म्हणजे ३४ आसेल तर forty three mhanate....;)
तोशवी तिला दोन्ही हात वापरू
तोशवी तिला दोन्ही हात वापरू द्या. एवढ्या लहान वयात ग्रीप तशी कमीच असते. जाड क्रेयॉन्स वापरुन बघा तसेच पेन, पेन्सिल साठी पण स्लीव असते ग्रीप यावी म्हणून. सुरवातीला नुसते कागद, क्रेयॉन्स द्या व तिला काय हवे ते गिरगीटू द्या. हळू हळू तिचेच तिला उमगेल. जो पर्यंत तिचे तिला कळत नाही तो पर्यंत शिकवण्याचा आग्रह नसावा. मोटर स्किल साठी तिला छोटी भांडी, ताटल्या पुसणे वगैरे कामे खेळ म्हणून द्या. घरी पीठाचा प्ले डो करता येतो. तो खेळायला द्या. लेगोशी खेळूद्या. फाइन मोटर स्किल डेव्हलप झाल्याशिवाय लिहायला शिकवू नका.
तोशवी तू लिहिलायस ३४ च ४३ तसा
तोशवी तू लिहिलायस ३४ च ४३ तसा गोंधळ गेल्या वर्षी पर्यंत सानिका करत होती आता हळु हळु प्रमाण कमी झालय. चला म्हणजे मला वाटत होत अस फक्त तिचच होत की काय. सगळे तसच करतात म्हणजे काळजी नको करायला. (तिच्या वर्गातल्या मुलांपैकी काही आयांना पण मी हे विचारल होत पण काहिंनी अस काही लक्षात नाही आलय अस सांगितल काहिंनी अस कधीच नाही केल अस सांगितल तर काही म्हणजे फक्त १ जण म्हणाली तिची मुलगी पण असच गोंधळते. म्हणुन कळत नव्हत नक्की अस बर्याच जणांच होत कि नाही ते)
तिला छोटी भांडी, ताटल्या पुसणे वगैरे कामे खेळ म्हणून द्या. >>> अगदी अगदी स्वाती मी हि असच करते (माझ पण काम होत तिचा व्यायाम होतो
कविता , सहीच की मग्!माझी पण
कविता , सहीच की मग्!माझी पण सनिकाच्!बहुदा सगळ्या सनिका च हा गोन्धळ करत असाव्यात्,हे हे हे..
बर स्वाती आज छानपैकी जाडे करेयोन्स्/किवा जाडे मार्केर्स ...तिला पेनाच जास्त प्रेम आहे पेन्सिली पेक्षा..
अमेरिकेतल्या पालकांनो हे
अमेरिकेतल्या पालकांनो हे वाचा
http://www.nytimes.com/2009/09/28/opinion/28farley.html
मला माहित नव्हतं की अशा टेस्ट मधे ओपन एंडेड प्रश्न असतात म्हणून
शोनू, दुव्याबद्दल धन्यवाद.
शोनू, दुव्याबद्दल धन्यवाद. माझ्या मुलाला आणि त्याच्या वर्गातील बहूसंख्य मुलांना गेल्या वर्षी ईंडियानाच्या टेस्ट मधे अशा ओपन एंड प्रश्नांना ४ पैकी ० किंवा १ गुण मिळाला होता. ही सर्व मुले अॅक्सिलरेटेड प्रोग्रॅम मधली होती. सध्या माझ्या मुलाची टीम वाय प्रेस साठी हे असे टेस्टिंग आणि स्पेशल एड मुले यावर स्टोरी करतायत.
sorry, उत्तर द्यायला चांगला
sorry, उत्तर द्यायला चांगला उशीर झाला..स्वाती, रिबस म्हणजे कोणती पुस्तके?
मिती, मैत्रिणीकडे भारतातील पाहुणे आहेत्,त्यामुळे ती खूप बिझी आहे.तिने लिहून दिले की मी कळवीन.
तिच्याकडे educators मधले चार्टस पाहिले,site words चे.तुमच्याकडे हे दुकान आहे का माहित नाही, पण असल्यास जरूर बघ्.सगळ्या वयाच्या मुलांसाठी छान चार्टस आहेत्,सगळ्या subject चे.अगदी abcd,words,science, geography सगळेच...
रिबस म्हणजे शब्दांच्या जागी
रिबस म्हणजे शब्दांच्या जागी चित्र , चिन्ह असते. त्यामुळे आपण गोष्ट वाचताना मधे जे चित्र येते त्याचा उच्चार मुल करते. मुलांचा सहभाग असल्याने त्यांना एकत्र गोष्ट वाचल्याचा आनंद मिळतो. त्यांना वाचताना मजा येणे महत्वाचे. अभ्यासाचे ओझे वाटले तर मग वाचनाची आवड नाही निर्माण होत. माझा मुलगा शाळेत जे फोनिक्स शिकवायचे त्याला अभ्यास समजायचा पण आम्ही एकत्र वाचायचो ती त्याच्यासाठी गोष्ट असायची, अभ्यास नाही.
http://abcteach.com/directory/basics/rebus/ या साईटवर बघा. गूगल केल्यास इतरही साईट मिळतील.
स्वाती, धन्यवाद...लेकीला रिबस
स्वाती, धन्यवाद...लेकीला रिबस च्या गोश्टी आवडल्या...आणि तुम्ही दिलेली लिन्क पण मस्त आहे....
आमची मुलं वाचतच नाहीत असे
आमची मुलं वाचतच नाहीत असे म्हणणार्या पालकांसाठी - मंगला गोडबोलेंचा लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतील लेख.
असा गोंधळ बर्याच जणांचा होतो
असा गोंधळ बर्याच जणांचा होतो का ह्या वयात?<<<<< कविता, माझा मुलगा आत्ता पर्यंत अस करत होता.. ( तो पावणे सहा वर्षाचा आहे ) b ला d म्हणण, j उलटा काढण, on हे no म्हणून वाचण... मलाही खूप काळजी वाटली, पण आता आपोआप बरोबर करतोय... सो नथिंग टू वरी.
Pages