साहित्य : एक वाटी तांदळाचे पिठ , अर्धी वाटी रवा , पाऊणवाटी दही , चवीपुरते मिठ , तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल , एक चमचा मोहरी , एक चमचा जीरे ,चवीनुसार दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने.
कृती : प्रथम एका पातेल्यात तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.
डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून ठेवावे.
गॅसवर एका मोठ्या कढल्यात तडका फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी व जिरे टाकून दोन्ही चांगले तड तडल्यावर त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने घालून २-३ मिनिटे चांगले परतून घावे आणि ही तडका फोडणी ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.
आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.
हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.
फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खास असा खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.
जागूचीच पाककृती परत इथे
४ वर्षे जुनी जागूची इथेच मायबोलीवर प्रकाशित झालेली पाककृती परत इथे आपल्या नावाने का देण्यात आली आहे?
https://www.maayboli.com/node/51705
जागुचीच रेस्पी आहे.
जागुचीच रेस्पी आहे.
(No subject)
फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक
फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खास असा खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.>>> अगदी या सहीत!
जागुचीच रेस्पी आहे.>>> हो
जागुचीच रेस्पी आहे.>>> हो
नेहमी छान छान रेसेपी देता आज काय झाले जागुचीच रेसेपी टाकली?
व्हय काका ये तो मेरीच रेसिपी
व्हय काका ये तो मेरीच रेसिपी है.
जाउबाईंची कोकणातली आजी झाली
जाउबाईंची कोकणातली आजी झाली की.
मी नाव बघून च इकडे कमेंट
मी नाव बघून च इकडे कमेंट करायला आले... तर चाणाक्ष लोकांनी आधीच इथे येऊन चोरी पकडली आहे.....
काका अहो निदान पाकृ टाकायच्या आधी चेक तरी करत जा की कुठून आणि कोणाची रेसिपी घेऊन टाकताय ते...
म्हणजे कोकणातील आजी म्हणजे
म्हणजे कोकणातील आजी म्हणजे जागू का ☺️
की जाउबाई म्हणजे तांबे☺️
मायबोली व्यतिरिक्त इतर
मायबोली व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून कॉपी करून, वाक्यात जरा फेरफार करून टाकावे. शीर्षक तर बदलावेच बदलावे.