मैत्रिणींनो! सावधान!!
"तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते का? मी मदत करु शकते" अशा अर्थाची मराठी आंतरजालावर अनेक दिवसांपासून एक छोटेखानी सुचवणी फिरते आहे. त्या चार ओळींच्या लेखात खास महिलांना आवाहन केले जात आहे. केवळ मायबोलीच नव्हे तर मिसळपाव संकेतस्थळावरही हा लेख आला होता. त्यात कोणीतरी डॉक्टर असल्याची बतावणी करुन महिला सदस्यांना जीमेलवर चॅटवर यायला सांगत आहे. एवढेच नव्हे तर कित्येक स्त्री सदस्यांना व्यक्तिगत मेल आयडीवर 'मी तुमचे लेख वाचले, मला खुप् आवडले, आपण चॅट करु शकतो का' अशा अर्थाचे मेल पाठवले आहेत. एकाच व्यक्तीकडून अशा प्रकारचे मेल्स आल्याची दोन्ही संस्थळावरच्या अनेक महिला सदस्यांनी कळवले आहे. हे सर्व मागच्या गेल्या सात ते आठ दिवसांत घडले आहे.
या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असे वाटल्याने मी व माझ्या पत्नीने याचा छडा लावायचे ठरवले. त्यातून आम्ही त्या जीमेल आयडीवर चॅटमधून संपर्क साधला. त्यातून त्या व्यक्तीने आपली ओळख नीटपणे दिली नाही. आम्ही विचारले की नक्की कशाबद्दल आहे हा लेख? तुम्ही काय मदत करता? तर त्यावर ती विचारत होती की तुमचा आधीचा इंजेक्षनचा अनुभव काय आहे, तो सांगा मग मी पुढे सांगते. म्हणजे नीटपणे काही सांगत नव्हती.
त्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असल्याचे सांगितले पण क्लिनिकचा पत्ता व मोबाइल नंबर देण्यास टाळाटाळ केली. सदर व्यक्ती "जूहू व ठाणे इथे माझे क्लिनिक आहे व माझा नवराही डॉक्टर आहे, आम्हाला एक दोन वर्षांची मुलगी आहे" अशी बतावणी करते. या व्यक्तीने आम्हाला सर्व डिटेल्स मागितले, जसे तुमचा फोटो द्या, नाव, कुठे जॉब करता, इत्यादी सर्व खोदून चौकशी केली. आम्हाला बघायचेच होते की हे प्रकरण नेमके काय आहे म्हणून आम्ही सर्व सत्य माहिती दिली. परंतु आम्ही जेव्हा साधा क्लिनिकचा पत्ता आणि मोबाईल नंबर मागितला तर आधी पुरेशी ओळख होऊ द्या एकमेकींची, मग पत्ता, फोन देते असे म्हणाली. पण आम्ही विचारले की डॉक्टरला क्लिनिकचा पत्ता द्यायला कशाला ओळख वगैरे लागते, तुम्ही पत्ता द्या, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटू. तेव्हा ती म्हणाली की "मी विकेंडला क्लिनिकला नसते, उद्या बँगलोरला कॉन्फरन्सला जायचे आहे अशी थातूरमातूर कारणे दिली. शेवटी आम्ही क्लिनिकच्या पत्त्यासाठी अडून बसल्यावर "माझी मुलगी झोपेतून उठली आहे आणि तिला झोपवून परत येते" असे म्हणून ही व्यक्ती जी ऑफलाइन झाली आहे ते गेल्या चार दिवसांपासून परत आलेली नाही. ह्या व्यक्तीने जो स्वतःचा फोटो म्हणून आम्हाला दाखवला, त्या फोटोची फेसबुक प्रोफाईलसुद्धा फेक असल्याचे आढळले आहे.
स्पर्शिका जोशी नावाची कोणीही व्यक्ती गायनॅकॉलॉजिस्ट असल्याचे आढळून आलेले नाही. त्या व्यक्तीने ठाण्यातल्या 'माहेर' क्लिनिक चा पत्ता दिला आहे तर त्या माहेर क्लिनिकशी कोणत्याही स्पर्शिका जोशींचा संबंध नाही आहे.
स्पर्शिका जोशी असे नाव घेऊन कोणी तुम्हाला चॅट वर यायचे आमंत्रण देत असेल तर कृपया सावध रहा. हा काहीतरी खूप मोठा स्कॅम आहे. ज्यात आपल्यासोबत काही चुकीचे घडल्यास कदाचित तुम्ही कोणाला सांगूही शकणार नाही. तेव्हा परत एकदा आवाहन कृपया सावध राहा, कोणत्याही मेल्स ला, चॅट इन्विटेशनला फशी पडू नका.
अॅडमीन व वेबमास्तरांना विनंती की सदर आयडी मायबोलीवरुन स्त्री आयडींना संपर्क करत आहे त्यामुळे तुमच्या पातळीवर याबाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.
सदस्यांपैकी कोणी सायबर गुन्हेगारी संदर्भात मदत करु शकत असेल तर कृपया पुढाकार घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा असे वाटते.
हो माझ्याही एका माबोकर
हो माझ्याही एका माबोकर मैत्रिणीला आलीये ही मेल. आणि कहर म्हणजे ती अद्याप फक्त वाचनमात्र आहे, एक ओळीचाही प्रतिसाद कधी कोणाला दिला नाही, लेख तर फार लांबचा.
तिलाही तुमचे लेखन आवडले वगैरे आणि संपर्क साधा अशी विनंती आहे. हा काहीतरी भामटेगिरी चा प्रकार आहे
आम्हाला बघायचेच होते की हे
आम्हाला बघायचेच होते की हे प्रकरण नेमके काय आहे म्हणून आम्ही सर्व सत्य माहिती दिली.>>पायवर कुर्हाड का म्हणुन?
पब्लिक डोमेनवर उपलब्ध असलेली
पब्लिक डोमेनवर उपलब्ध असलेली हो...
हे म्हणजे असे असते बघा.
.
पब्लिक डोमेनवर उपलब्ध असलेली
पब्लिक डोमेनवर उपलब्ध असलेली हो...>>
तरीही..
हा आय्डी (स्पर्शिका) बॉट असेल
हा आय्डी (स्पर्शिका) बॉट असेल का?
बॉट नाही.
बॉट नाही.
नमस्कार अल्पना ताई,
नमस्कार अल्पना ताई,
छान लिहिता तुम्ही. मायबोली
वरचे तुमचे लेखन वाचले.
तुमच्याशी गप्पा मारायला
आवडेल मला. मी डॉक्टर
स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला
असते.
मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे
संपर्क करू शकता. म्हणजे आपण
बोलू.
धन्यवाद ,
डॉक्टर स्पर्शिका जोशी.
M.D. D.G.O.
स्त्री रोग तज्ज्ञ
मुंबई
"}}}}}} मला ही वरची मेल आली संपरकामधून.
मी रेसीपी शिवाय फारसे काही लिहिले नाही . हल्ली तर ।माबोवर प्रतिसाद पण कमी असतात. मी काढलेल्या कुठल्याही धाग्यावर या आयडी ची प्रतिक्रिया नाही. अशात माझा कोणताही धागा वर आला नाही... यामूळे मला ही शंका आली.
चौकशी केल्यावर असे मेसेज अजून काही जणीना आल्याचे कळाले.
या आयडीकडून मलाही ईमेल आली
या आयडीकडून मलाही अशीच ईमेल आली आहे - काहीच दिवसांपूर्वी. अमूक एक लेख आवडला, चॅट वर बोलू वगैरे वगैरे. तो प्रकार आणि तो आय्डी संश्यास्पद असल्याचे लगेचच कळत होते त्यामुळे काहीही रिप्लाय दिला नाही तिला.
हा बाफ काढून इतरांना सावध केल्याबद्दल धन्यवाद.
कित्येक स्त्री सदस्यांना
कित्येक स्त्री सदस्यांना व्यक्तिगत मेल आयडीवर 'मी तुमचे लेख वाचले, मला खुप् आवडले, आपण चॅट करु शकतो का' अशा अर्थाचे मेल पाठवले आहेत>>>>>
मलाही इमेल आली. माझ्या ब्लॉगवर मी मुकतीच एक पोस्ट टाकली होती तिचा रेफरंस घेऊन छान लिहिता तुम्ही, हँगाउटवर बोलुया वगैरे इमेल होती. मी मायबोलीवरील दोन धागे पाहिले होते त्यामुळे अनुल्लेख करणारच होते. काही रिप्लाय केला नाही मात्र माझ्या मैत्रिणींना हे सांगितल्यावर त्यातील काही जणींना देखील अशी इमेल आल्याचे कळले.
अनुल्लेख जरी केला तरी खूप चीडचीड झाली. ही स्पर्शिका व्यक्ती खरोखरीची स्त्री व गायनॉकॉलॉजिस्ट असली असे मानले तरीदेखील ही विकृती वाटतीय. त्यातून ती व्यक्ती स्त्री/डॉक्टर नसेल ह्याची पण खात्री आहे त्यामुळे अजुन खालच्या लेव्हलची विकृती!
तुम्ही छडा लावण्याचा प्रयत्न केलात व हा लेख लिहिलात त्याबद्दल धन्यवाद. मला ह्याबद्दल कुठे लिहू कळत नव्हते.
अरे बापरे
अरे बापरे
याबद्दल काहीच माहित नव्हते.
वॉर्निंग दिल्याबद्दल आभार _/\_
मलाही सेम इमेल आला आहे.
मलाही सेम इमेल आला आहे.
दक्षिणा, जागू, अश्विनी के, ललिता प्रीति , मनीषा लिमये यांनाही सेम इमेल आला आहे
प्रकरण संशयास्पद नक्कीच आहे
२०१२ साली याहू चॅट रूम्स बंद
२०१२ साली याहू चॅट रूम्स बंद झाल्या.
त्यापूर्वी याहूवर चॅट करणार्या लोकांना m1 m2 m3 माहिती असेलच.
तिथे व इतर कित्येक अॅडल्ट याहू चॅट्सवर ही स्पर्शिका जोशी आयडी एक्झॅक्टली हेच "इंजेक्शनची भीती" व स्वतः एमडी डिजीओ गायनॅकॉलॉजिस्ट, २ वर्षाचं बाळ, २९ वर्षे वय इ. सांगून चॅटायला येत असे. मेल आयडीला उत्तर नसे. फीमेल आयडीला घोळात घेऊन 'इन्जेक्शन' वगैरे बद्दल लघळ बोलणे. त्यापुढे मात्र हे असेच बाळ झोपवून येते करून गायब होत असे.
या आठवणी नंतर इथे धागे काढायला लागली तेव्हा मात्र समहाऊ माझ्या डोक्यातून ही आठवण हरवलेली होती. याहू चॅटवर स्पेशली मराठी चॅटवर असलेल्या इथल्या लोकांना हे आठवू शकते.
मलाही सेम इमेल आला आहे.
मलाही सेम इमेल आला आहे.
दक्षिणा, जागू, अश्विनी के, ललिता प्रीति , मनीषा लिमये यांनाही सेम इमेल आला आहे
प्रकरण संशयास्पद नक्कीच आहे
>>>>हे म्हणजे असे असते बघा.
>>>>हे म्हणजे असे असते बघा. जनजागृती करतोय त्याबद्दल एक शब्द नाही आणि भोचकपणा करायला एक पायावर तयार..
तुम्हालाही असे अनुभव येतात हे पाहून हसू आले.
अवांतराबद्दल क्षमस्व!
========
तुमच्या लेखातील ह्या स्पर्शिका जोशी ह्यांनी मलाही कुठेतरी संपर्क केल्यासारखे आठवते. त्यांचे मी नम्रपणे आभार मानल्याचेही आठवते.
पण त्या जे काही करत आहेत त्याचा हेतू काय आहे?
बाय द वे.
बाय द वे.
डॉ. स्पर्शिका जोशी नावाच्या एक स्त्री डॉक्टर खरेच आहेत, पण त्या एमडी मेडीसीन आहेत, व पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. त्या गायनॅकॉलॉजिस्ट नाहीत. व त्यांचा या गोंधळाशी काहीही संबंध नाही, असे नोंदवू इच्छितो.
मलाही सेम विपू आली आहे. सजग
मलाही सेम विपू आली आहे. आणि मेल पण आला आहे.
सजग केल्याबद्दल धन्यवाद.
हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद
हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद
हा आयडी इथे दिसतोय.
हा आयडी इथे दिसतोय.
https://www.maayboli.com/user/68624
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
1 आठवडा 2 दिवस
असं दिसतंय.
https://www.maayboli.com/user/68624/followers
यांच्या चाहत्यांमध्ये निल्सन हा एक आयडी दिसतोय.
https://www.maayboli.com/user/54717
आणि निल्सन यांचा सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
4 वर्ष 9 months दिसतोय.
स्वतः स्पर्शिका मात्र निल्सन यांच्या चाहत्यांच्या यादीत नाहीत. कदाचित निल्सन त्यांना व्यक्तिशः ओळखत असतील.
चैला!
चैला!
बिपिनचंद्रूभौ एकदम करमचंद मोडात!
मोबाईल वरून मायबोली पाहताना
मोबाईल वरून मायबोली पाहताना अभावितपणे चाहते व्हा वर क्लिक होऊ शकते.
अरे मलाही मेल आलीये .
अरे मलाही मेल आलीये . मायबोलीच्या एडमीन टीम पैकी एकाशी संपर्क साधला होता त्या संदर्भात पण तिथून काहीच रिप्लाय आला नाही . एका मायबोलीकरिणीशी याबाबतीत बोलूनही झालं . मी काही त्यामेलला रिप्लाय केला नाही
ही ती मेल
===============================================
नमस्कार जाई,
छान लिहिता तुम्ही. मायबोली
वरचे तुमचे वेग वेगळे लेख
वाचले.
तुमच्याशी गप्पा मारायला
आवडेल मला. मी डॉक्टर
स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला
असते.
मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे
संपर्क करू शकता. म्हणजे आपण
बोलू.
धन्यवाद ,
डॉक्टर स्पर्शिका जोशी.
M.D. D.G.O.
स्त्री रोग तज्ज्ञ
मुंबई
===============================================
वेमानी /एडमीनने या बाबतीत त्वरित लक्ष घालावे .विकृत आयडी दिसतोय
हेला, तुमचे शतशः आभार एवढी रिस्क घेतल्याबद्दल आणि इथे लिहिल्याबद्दल
मला या बाईंनी स्वतःचं वय ५०
मला या बाईंनी स्वतःचं वय ५० सांगितलं.
त्यांनी माझ्या 'अनुभव' अंकातल्या ईमेल आयडी वर मेसेज पाठवला होता. अनुभवमधल्या इतरही काही लेखिकांना त्यांचं ईमेल मिळालं आहे.
मी त्यांना ऑनलाईन चॅटबद्दल काही dos आणि donts सांगितले आणि वाटेला लावलं.
त्यांनी इंजेक्शन देण्यापूर्वी लावण्याच्या काहीतरी लोकल अनेस्थेशीया लोशनवर रिसर्च केलाय म्हणे.
{{{
{{{
बिपिनचंद्रूभौ एकदम करमचंद मोडात!
नवीन Submitted by आ.रा.रा. on 13 July, 2018 - 21:33 }}}
काय करणार? वजन वाढू नये म्हणून रात्रीच्या जेवणात नुसतंच सॅलड खातोय. त्यातही किडनी / यूरीन स्टोनची भीती असल्याने काकडी टोमॅटो बाद. उरता उरली गाजरं... ती खाऊन वेगळं काय होणार?
मलाही सेम अनुभव आला.
मलाही सेम अनुभव आला. संपर्कातून तिनं मेल पाठवला होता ज्यावर आणि नंतर फोटोही मागितला.ती गोष्ट क्रीपी वाटली म्हणून मी तिला पुन्हा कॉंटैक्ट करू नकोस म्हणून खडसावलं.तेव्हा बंद झाली ती..
ललिताताई तिने मला 45 yrs वय सांगितलेल...
हेला सर तुमचे खूप सारे धन्यवाद...
मलाही आलाय मेल.... फेक आहे हे
मलाही आलाय मेल.... फेक आहे हे लक्षात आलंच होतं.
मलाही इमेल आली आहे पण आयडी
मलाही इमेल आली आहे पण आयडी फेक वाटल्यानुळे डिलीट मारुन विसरले. आणि इंजेक्शनची भिती वाटत नसल्यामुळे पुढे जायचा प्रश्नच येत नाही, नाही का?
सगळ्यांच्या मेलचा मजकूर
सगळ्यांच्या मेलचा मजकूर सारखाच असला तरी सुरूवातीला प्रत्येकीचं नाव घेऊन संबोधलं आहे. ' हर्षा ताई, जुई ताई'etc. बराच वेळ घेऊन केलेली करामत दिसतेय.
अय्यो, मलाही आलाय सेम ईमेल.
अय्यो, मलाही आलाय सेम ईमेल. चॅट करायची इच्छा नव्हती म्हणून एड केलं नाही
अॅडमिनने त्यांचा इंजेकशनची
अॅडमिनने त्यांचा इंजेकशनची भीती वाटते आहे का? https://www.maayboli.com/node/66677 हा धागा उडविला आहे आधीच.
Pages