मलेशीया

Submitted by सुनिल परचुरे on 12 October, 2009 - 08:27

मि आणि माझा मित्र प्रशांत राव एका अ‍ॅडफिल्मच्या शुटिंग करता कोलालांपुरला गेलो होतो.मलेशिया एवढा छोटा देश आहे तरि त्यांचि गेल्या दहा पंधरा वर्शातलि प्रगति स्तिमित करणारि आहे.मोठमोठे रस्ते,स्कायक्रॅपर्स्,मोनोरेल्,जगप्रसिद्ध ट्विन टॉवर्,स्वच्छ्ता,शिस्तबद्ध ट्रॅफिक पाहिल कि वाटत मुंबइच शांघाय नाहि झाल, निदान कोलालांपुर तरि होउदे.
अ॓अरपोर्टवर उतरल्यापासुनच आपण युरोपियन देशात आहोत कि एशियन हेच कळेना.अरायव्हल पासुन बाहेर पडायला लोकलगाडि आहे.अ॓अरपोर्ट ते केएल सिटि जायला प्रशस्त रोड्, आजुबाजुला खुप झाडि आहे.आम्हाला पोहोचल्यावर अर्धा दिवस मोकळा होता. आम्हि टॅक्सिने केएल टुर अ‍ॅरेंज केलि.
प्रथम आम्हि बाटु केव्ह्सला गेलो.सिटिपासुन ह्या १३ कि.मि.लांब आहेत.आपल्या डोळ्यासमोर केव्ह्स म्ह्ट्ल्या कि अजंता एलोराच्या पेंटिंग्स किंवा मुर्तिकाम असलेल्या लेण्या येतात.पण जेव्हा २७२ पायर्‍या चढुन गेल्यावर श्रि सुब्रमण्यमस्वामिंचि मुर्ति पाहिलि आणि ह्रुदय उचंबळुन आले.
1.JPG2.JPG5.JPG4.JPG3.JPG6.JPG07.JPG004.JPG

त्याच रस्त्यावर डार्क केव्ह्स आहेत.त्या करता स्पेशल टुर्स बुक कराव्या लागतात.आत २ कि.मि.चा रस्ता आहे जो वटवाघळ ,मोठे कोळि आणि साप ह्यांनि भरलेला आहे. तिथे अजगर गळ्यात घालुन फोटो काढता येतो. प्रशांतचा हा फोटो.
08.JPG

तिथुन आम्हि केएल टॉवरला आलो.शहरात असुनहि आजुबाजुला खुप झाडि आहे.हल्लि बर्‍याच शहरात असे उंचउंच कम्युनिकेशन टॉवर्स असतात.ह्याचि उंचि ४२१ मिटर आहे.वरुन शहराचे छानच दर्शन होते.

001.JPG003.JPG

नंतर आम्हि जगप्रसिद्ध पेट्रोनास टॉवर्स ला गेलो.४५२ मिटर उंच,८८ मजले असलेला जगातिल उंच ट्विन टॉवर आहे.ह्यालाच केएलसिसि टॉवर्स हि म्हणतात.सोमवार सोडुन बाकि सर्व दिवस हा टुरिस्ट लोकांना पाहण्यास सकाळि ८.३० ते ५.०० उघडा असतो.दिवसभरात फक्त १७०० माणसांनाच सोडतात.त्यामुळे सकाळि लवकर जाउन तिकिट बुक करणे महत्वाचे.छोटे छोटे ग्रुप नेतात.प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या रंगाचि तिकिटे असतात. त्यामुळे आम्हाला जेव्हा कळले कि आम्हाला जवळ्जवळ २ तासाचा अवधि आहे तेव्हा आम्हि चालत ५ मिनिटावर असलेल्या अ‍ॅक्वेरियमला भेट दिलि.सिंगापुरच्या सेंतोसामधिल अ‍ॅक्वेरियमसारखेच हेहि आहे.

09.JPG10.JPG

तिथुन आम्हि परत टॉवरला आलो.आधि सर्वांना एक दहा मिनिटाचि फिल्म दाखवतात.टॉवरबद्दल सगळि माहिति देतात.नंतर सर्वांना लिफ्ट्ने अक्षरशहा एक मिनिटात ४१ व्या मजल्यावर नेतात.तिथे दोन्हि टॉवर्सना जोडणारा स्कायवे केला आहे .जमिनिपासुन जवळ्जवळ ५५० फुटावर आपण उभे असतो.तिथुन बघताना किति फोटो काढु असेच होते.
DSC01290.JPG11.JPG12.JPG005.JPG

संध्याकाळि मोनोरेलनेहि प्रवास केला.
02.JPG01.JPG
एवढ सगळ बघितल्यावर मलेशियातलि बाकिचि सर्व ठिकाण बघण्याचि ओढ लागलि नसति तरच नवल.

गुलमोहर: 

मस्त फोटो. Happy मधे थोडी जागा सोडा आणखी चांगले दिसतील. मलेशियाला मी गेलो तेव्हा मिनारा, पेट्रोनस बघीतले होते, बटु केव्हस बघता आल्या नव्हत्या. आम्ही लंकावीला गेलो होतो. अप्रतिम निळा समुद्र व सगळीकडे हिरवाई असलेला मलेशिया देश फारच सुंदर आहे.