Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सई फक्त लोकान्चा युज करुन
सई फक्त लोकान्चा युज करुन घेणारी आहे! मतलबी! पुष्किला सान्गकाम्या करुन माकड बनवुन ठेवलाय!
नन्कि ने परत जाता जाता शराच्या डोक्यात विष पेरलय.
अरे दुसरी टीम डिस्कस करुन स्ट्रॅटेजी आखत नाही का? दर वेळी मेघाच्याच टिमवर का आरोप होतो?
बरे ती ऐकत नाही अस तिच्याही टिमचे म्हणतात. तिच्या डोक्यात खरेच कॅल्क्युलेशन सुरु असतात. आस्तादला मत देतानाही तिचे काही असतील कॅलक्युलेशन आणि ते चुकले. बरे, एखादे वेळी आराखडे चुकतात.
खरच एकदा तरी हेका सोडुन पु स चे ऐकुन त्यान्च्या मताप्रमाणे होउ द्याय्ला हवे होते. मग कोण किती चुकते ते कळले असते.
वीकेंडचा डाव फक्त आणि फक्त
वीकेंडचा डाव फक्त आणि फक्त मेघा कशी चूक हे दाखवुन चॅनेल ने खुप टीआर्पी मिळवला.
मेघाशिवाय बिग बॉस बोअर होईल की काय याची त्यांनापण भिती वाटत असावी.
कॅप्ट्नसी टास्क चा आणि विनिंग टीम मधल्या डिस्कशन चा काहीही संबंध नव्हता मग ती भांडणं एडीट का नाही केली ? .... कारण वीकेंडचा डाव मद्धे बोलायला काहीच विषय नव्हता..मेघा ने तो मिळवुन दिला .सासु सुन टास्क मद्धे मेघा सोडुन कोणीच काही उल्लेखनीय काम केलं नाही मग बोलणार तरी कशावर ना...
सासु सुन टास्क उग्गीच केला...मिळालेल्या हिर्यांचा उपयोग शून्य
बिबॉ गंडलय फुल असं वाटतय...काही ताळमेळच नाहीये टास्क मद्धे...
मांजरेकर पर्सनल होण्यावरुन मेघा ला इतकं बोलले....तेच बाकी कोणाला कधीही बोलले नाहित...
मेघा तेच तेच बोलत होती पण बाकी सगळे पण तेच तेच बोलतात त्याचं काय..
रेशम - कित्ती खोटारडी आहे ना...कित्ती खोट बोलते ना
सई - पुष्की, मेघा मला म्हणत होती "यरलव" ...काय बोलतेय बघ..अॅक्सेपट्च करत नाही..
आ - हिलाच सगळं कळत.
पु - ती ऐकुनच घेत नाही. मान्यच करत नाही...
गेला आठवडा हे लोक पण तेच तेच बोलत आहेत की...
आणि ममां काही गोष्टींवर बोलतील असं वाटत होतं ..उदा.
१. आ ने मेघा ला आईवरुन शिवी दिली त्याचा उल्लेख पण नाही.मेघा ला छपरी म्हणाला आस्ताद ते पण एका वाक्यात आटपलं ममां नी.
२. सगळे एकदम मेघावर तुटुन पडले याचा उल्लेख अतिशय प्रेमाने " ते खुप अग्ली होतं" एवढच...नॉट फेअर ममां.
३. शमा ला सतत दुसर्याच्या डोक्याने खेळते म्हणतात मग सासु सुन टास्क मद्धे सगळे जण आस्त्या च्या डोक्याने खेळले त्याचा का नाकी उल्लेख केला.
असो...मेघा चुकली हे खरं आहे..पण बाकी कोणीही तिथे धुतल्या तांदळासारखे नाहित..सगळे बॅकबिचिंग करतात, गेम प्लॅन करतात, एकमेकांवर आरडाओरडे करतात, तेच तेच पण बोलत बसतात,स्वतः च्या टीम शी डिसलॉयल होतात वगैरे वगैरे..
स्मिताला ग्रुपपासुन
स्मिताला ग्रुपपासुन तोडाय्ला हवे. पण ती लॉयल आहे. काल बिबॉने कोणाला मिस करशील विचारले, तर म्हणाली, रेशमताई. बिबॉनेच खरे तर तिला कॅप्ट्न होउ दिले नाही. त्यान्ना फक्त ती 'बेबी डॉल' म्हणुन हवी आहे.
एकदा झाली असती तर तिच्यातही कॉन्फिडन्स आला असता. किन्वा मग शेवटी, ऐन वेळी गेम फिरवतील. आणि दोन्ही टिम सोडुन तीच विनर होईल.
काल तो येडा नन्की म्हणतो, तिच्याकडे नुसते पहावेसे वाटते. अन म्हणे मनातल्या मनात हसत असतो मी.
आणि खरच तो कितीदा तिच्याकडे टक लावुन बघताना दिसलाय.
मेघाने कोणत्या टास्क मध्ये
मेघाने कोणत्या टास्क मध्ये चोरी केली आहे? (हे मला खरंच माहित नाही)
आणि कोणी कोणत्या टास्कमध्ये लबाडी केली नाही? सगळेच नियम हवे तसे फिरवत आलेत आहेत.
सगळेच प्लांनिंग्ज प्लॉटटींग करत आहेत, मेघाने केले तर ती पाताळयंत्री.. आणि आस्ताद ने केलं तर किंगमेकर?
मेघाने टास्क मध्ये , टास्क जिंकण्यासाठी ,लूप होल्स शोधून ते वापरले.
आस्तादने नेहमीच ग्रुप फोडा,बायकांवर आरडा ओरडा , दमदाटी (मी त्याला आत्तापार्यंत एकही पुरुषावर आवाज चढवून बोलताना पाहिलेलं नाही) हेच करत आलाय. (वरती सानी यांनी लिहिलंच आहे ) सुरुवातीलासुद्धा विरुद्ध टीम मध्ये मित्र आहेत म्हणून तो त्यांच्याच बाजूने खेळलाय , आणि तेच मेघाने केलं तर तो म्हणतोय खोटारडी आहे. पब्लिक विसरते का हे? मेघा पत्र वाचून दाखवताना पण कसे expressions देत होता.
माणूस म्हणून अतिशय नीच वाटतो तो .
<<
+११११११११
मला वाटलं मीच लिहिलेय पोस्ट इतके अनुमोदन !
पुष्कि हरिश्चन्द्राचा अवतार ज्याला मेघाच्या डिसिव्हिंगचा राग येतो, त्या सो कॉल्ड डिसिव्हिंगमुळेच दोन्हीवेळा कॅप्टनशिप मिळालीये त्याला आत्ता रिसेन्ट्ली आणि झेंडे लपवले त्यावेळीही , म्हणून थोबाडावर बारा वाजलेत पुष्किच्या !
पत्रवाचन मधे नंकि चे मुद्दे अजिबात आवडले नसले तरी लिहिण्याची शैली त्याची सर्वात बेस्ट होती आणि आस्तादचं सो कॉल्ड पत्रलेखन सर्वात भंगार , सई पुष्किचे तर मी फॉरवर्ड केले!
बाकी आज मेघा - सई लग्नाला चालल्यासारख्या का नटल्या होत्या आणि स्मिता प्रॉम नाइटला चाल्ल्या सारखी !
सई तर पोक्तं बाई सारखी दिसत सारखी, अचानक १० वर्षांनी मोठी झाल्या सारखी
रेशम अॅज ऑलवेज घरगुती सलवार कमीझ मधे !
सईला कधी कधी खरंच मेघासोबत
सईला कधी कधी खरंच मेघासोबत बोलायंच असतं असं वाटतं. पण पुष्की लगेच आपलं 'चांगुलपणा'च हत्यार बाहेर काढतो. " नाही, तू जा बोल तिच्याशी. I m fine. मी स्ट्राँग आहे." हेच चार वेळा बोलतो. मग सईची इच्छा मरते मेघाशी बोलायला जायची. पुष्की सईला मेघाकडे जाऊन देणारच नाही. सई कितीही आंधळेपणाने त्याला फाॅलो करत असेल तरीही. May b he has trust issues. सतत गोंधळलेला. इकडे तिकडे बघत. कुठलंही firm statement न करता. >> +१
आस्ताद आणि सई अतिशय गर्विष्ठ , चुगलखोर व्यक्ति आहे. काल त्याने english मधे एक टोमणा मारला मेघाला आणि कुत्सितपणे म्हणाला तुला कितपत कळेल शन्काच आहे. He thinks he has knowledge of everything.
Submitted by योग on 9 July,
Submitted by योग on 9 July, 2018 - 04:16>>
परफेक्ट पोस्ट..
रच्याकने अजून कोण म्हणलं नाही फोन कॉल्स फेक असतात..का यावेळी आपल्या माणसाचं कौतुक झाले त्यामुळे..
अन प्रत्येकवेळी ममां नी आ रे यांनाच बोललं पाहिजे ही अपेक्षा असते भक्तांची..मे ला जरा कमीच बोलले ममां चांगला झापयला पाहिजे होतं.. हिला काय करायचंय कोण कुठे झोपते ते..पण मग स्त्री दाक्षिन्य आडवे येते ना..विनर मनी सेम पाहिजे त्यात भेदभाव नाही झाला पाहिजे..फक्त होस्ट नी अन स्पर्धकांनी ओरडताना लक्षात ठेवायचं..
वरच्या एका पोस्टमध्ये एक ऍड करायचा राहिलेय..
भिकारेस्ट प्रेक्षक..
वरच्या एका पोस्टमध्ये एक ऍड
वरच्या एका पोस्टमध्ये एक ऍड करायचा राहिलेय..
भिकारेस्ट प्रेक्षक..>>>> सगळेच???
Submitted by मी चिन्मयी on 9
Submitted by मी चिन्मयी on 9 July, 2018 - 12:29
>>>भक्त कॅट्यागिरीतले सगळेच..
(No subject)
>>मेघाने कोणत्या टास्क मध्ये
>>मेघाने कोणत्या टास्क मध्ये चोरी केली आहे? (हे मला खरंच माहित नाही)
आणि कोणी कोणत्या टास्कमध्ये लबाडी केली नाही? सगळेच नियम हवे तसे फिरवत आलेत आहेत.
सगळेच प्लांनिंग्ज प्लॉटटींग करत आहेत, मेघाने केले तर ती पाताळयंत्री.. आणि आस्ताद ने केलं तर किंगमेकर?
मेघाने टास्क मध्ये , टास्क जिंकण्यासाठी ,लूप होल्स शोधून ते वापरले.
आस्तादने नेहमीच ग्रुप फोडा,बायकांवर आरडा ओरडा , दमदाटी (मी त्याला आत्तापार्यंत एकही पुरुषावर आवाज चढवून बोलताना पाहिलेलं नाही) हेच करत आलाय. (वरती सानी यांनी लिहिलंच आहे ) सुरुवातीलासुद्धा विरुद्ध टीम मध्ये मित्र आहेत म्हणून तो त्यांच्याच बाजूने खेळलाय , आणि तेच मेघाने केलं तर तो म्हणतोय खोटारडी आहे. पब्लिक विसरते का हे?
अगदी अगदी!
चोरी तर रेशमने पण केली होती, झेंडेपण लपवले होते नको तिथे..... आस्ताद तर मधले कित्येक टास्क विरुद्ध टीमच्या बाजूनेच खेळलाय.... फेअर फेअर म्हणवणाऱ्या पुष्करनेही गुपचुप आस्तादला बादलीत पाणी ओतायला लावले..... सईने पण अगदी घरातुन चिकटपट्टी आणून त्या वाळूच्या टास्कमध्ये फनेल बंद केले होते.... मग कुठल्या बेसीसवर हे मेघावर आरोप करतात?
आणि हे असे नियमातले लूपहोल शोधून खेळणे म्हणजेच युक्तीने खेळणे!
मग मेघाचे चुकते कुठे? तिचे डोके बाकीच्यांपेक्षा जास्त चालते हा काय तिचा दोष आहे?
तिच्या डोक्यात सतत तेच चालू असते म्हणे! अरे मग तुम्ही काय इथे झोपा काढायला आलाय का? जिंकायचे तर सगळ्यांना आहे आणि मग त्या जिंकण्यासाठी एखाद्याने विशेष प्रयत्न केले तर त्याला चक्क पाताळयंत्री म्हणता?
मेघाचे पार्टनर फुटले आणि त्यांनी तिला expose केले तर ही होस्टची जबाबदारी आहे की समोरच्या पार्टीचे पण काही पत्ते ओपन करुन त्यांना काबूत ठेवायचे.... गेम फेअर ठेवणे ही होस्टची जबाबदारी असते!
मेघाला वाईटसाईट विशेषणे लावून तिचे मोराल खच्ची करणाऱ्या इतर स्पर्धकांचे पायही तितकेच मातीचे आहेत.... ते मेघाला माहीत नसेल म्हणून ती त्यांना बोलू शकत नाही पण प्रेक्षकांना नक्कीच सगळे माहीत आहे.... म्हणूनच हा इतका प्रचंड सपोर्ट दिसतोय मेघाला (इथे सोशल मिडीयाचे दाखले देत नाही बर का!..... फक्त या धाग्यावरचा सपोर्ट बघा!)
असो!
मेघा ही कुणी आदर्श नाहीये आणि एक प्रेक्षक म्हणून आम्हाला तिच्याकडून सर्वगुणसंपन्नतेची अजिबात अपेक्षा नाहीये
बहुसंख्य प्रेक्षक तिला सपोर्ट करतात तिच्या बेधडकपणासाठी, तिच्या स्ट्रीटस्मार्टनेसाठी, सेलेब स्टेटसपुढे न दबता जिद्दीने खेळण्यासाठी, तिच्या हुशारीसाठी, तिच्या एनर्जीसाठी, तिच्या गट्ससाठी!
ती कधीच उगाच इगो कुरवाळत बसलेली नाही, ती पटकन सॉरी म्हणून टाकते, भांडणानंतरही आपणहून मैत्रीचा, समझोत्याचा हात पुढे करते!
इतके करुनही घरातले सगळे तिच्या विरुद्ध जाण्याला दोन कारणे असू शकतात: १ या स्पर्धेचा फॉर्मेट.... सर्वात आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्याला घालवायच्या सगळेच मागे असतात.... बाकीच्यांच्या विजयात ती नक्कीच एक मोठा अडसर आहे आणि हे बाकी एकूण एक स्पर्धकांनी अनेकोनेक वेळा मान्य केलेले आहे!
२ मेघाचा थोडा आक्रमक स्वभाव.... सई आणि पुष्करवर तिने ठेवलेला अतिविश्वास आणि तिचे फसलेले काही आडाखे
पण या सगळ्या गुणदोषांसकट प्रेक्षकांनी तिला स्विकारलेले आहे आणि ते तिला सपोर्ट करतायत!
स्वरूप, पोस्ट अतिशय उत्तम आहे
स्वरूप, पोस्ट अतिशय उत्तम आहे. खूप छान मांडलीत.
मेघा ही कुणी आदर्श नाहीये आणि
मेघा ही कुणी आदर्श नाहीये आणि एक प्रेक्षक म्हणून आम्हाला तिच्याकडून सर्वगुणसंपन्नतेची अजिबात अपेक्षा नाहीये
बहुसंख्य प्रेक्षक तिला सपोर्ट करतात तिच्या बेधडकपणासाठी, तिच्या स्ट्रीटस्मार्टनेसाठी, सेलेब स्टेटसपुढे न दबता जिद्दीने खेळण्यासाठी, तिच्या हुशारीसाठी, तिच्या एनर्जीसाठी, तिच्या गट्ससाठी!
ती कधीच उगाच इगो कुरवाळत बसलेली नाही, ती पटकन सॉरी म्हणून टाकते, भांडणानंतरही आपणहून मैत्रीचा, समझोत्याचा हात पुढे करते!
>>> परफेक्ट! मस्त पोस्ट, स्वरुप.
योग मागच्या पानावरची तुझी
योग मागच्या पानावरची तुझी पोस्ट अतिशय आवडली.
कालचा भाग अर्ध्याहून अधिक बुडला आहे त्यामुळे ते पत्र वाचन वगैरे वूट वर पहावे लागणार आहे.
ही खालची पोस्ट सोमिवर फेमस
ही खालची पोस्ट सोमिवर फेमस झालीये. कोणी लिहिलेय माहीत नाही पण बर्याच ठिकाणी दिसली. एकदम चपखल आहे....... आनंद घ्या.
कोणीही जिंकू दे... हा गेम मेघा एकहाती घेऊन गेलीये...
मेघासमर्थक बोलतात मेघाविषयी
मेघाविरोधक बोलतात मेघाविषयी
महेश मांजरेकर बोलतो मेघाविषयी
फोनकाॅल्स येतात मेघाविषयी
रेशम आस्ताद बोलतात मेघाविषयी
पुष्कर सई बोलतात मेघाविषयी
प्रेक्षक पोस्ट करतात मेघाविषयी
जिंकणे हरणे मॅटरच करत नाय आता...मेघा छा गयी है यार... जिगरा लागतो जिगरा अख्खा शो हलवून टाकायला !!! Megha is the winner!
>>जिगरा लागतो जिगरा अख्खा शो
>>जिंकणे हरणे मॅटरच करत नाय आता...जिगरा लागतो जिगरा अख्खा शो हलवून टाकायला
आस्ताद मोड ऑनः
हे तर काहीच नाही.
आम जनता मोड ऑनः
जि़ंकणे हरणे मॅटर करत नाही हे कळायला ८०+ दिवस लागले.. अरे देवा! रेशम पहिल्या दिवसापासून हेच बोलत होती.. तेव्हा मात्र ती 'माजोरडी' होती.. सगळीच गंमत आहे बुवा.
रच्याकने: स्वताचे प्रॉडक्शन 'हाऊस' असलेल्या लोकांना २५ लाखासाठी किती आटापिटा करावा लागतो नाही.. सगळी रे गँग ची काँस्पिरसी आहे..! आणि ममा त्यांना शामिल आहेत.
नंदकिशोर राहायला हवा होता,
नंदकिशोर राहायला हवा होता, त्याच्यामुळे जरा मजा येत होती शो मध्ये
आता काय मी मेघाची बडबड, स्वार्थी सईचे रडणे, रिकाम्या रेशमची तडफड
>>नंदकिशोर राहायला हवा होता,
>>नंदकिशोर राहायला हवा होता, त्याच्यामुळे जरा मजा येत होती शो मध्ये
+१००.. खरेच.. त्या 'वटवट' वृक्षा खाली बसून मंद ऊसासे सोडणार्या शरा पेक्षा शरा पेक्षा याचे स्वताचे तडके मस्त होते.. शून्य कंटेंट देणार्या आ ऊ ला ईतके दिवस फुकट पोसले बि बॉ ने.. पंप मारायचा सोडून व लावालाव्या करायचे सोडून त्यांनी काहीच केले नाही.. नंकी त्यापेक्षा नक्कीच खूपच डीझर्विंग होता. पण त्याची 'पेड' लोणावळा आर्मी नसल्याने बिचारा बाहेर गेला. पण खरेच मने जिंकून गेला. बि बॉ मधून गेलेल्या लोकांनी बरेच कमावले आहे... अपवाद एकच असेल.
बाजारात नविन चिक्की आलीये म्हणे: लोणावळा मेघा चिक्की.
" ये जो पब्लिक है ये सब जानती
" ये जो पब्लिक है ये सब जानती है... " या गाण्याने सुरुवात झाली तेव्हाच कळले होते रोख कुणावर आहे ते.
आज आस्ताद ने मेघा चा सो कॉल्ड 'गिल्ट' आणि 'स्टॅटर्जी' चा डोलारा अक्ष्ररशः क्षणात ऊध्वस्त केला.. केवळ तीन मुद्द्यात, ८० दिवसातील सर्व गेम, स्टॅटर्जी, विश्वासार्हता व मोरालिटी चा आणलेला आव सर्व कोलमडून पडला.
मेघा ला दुधाची अॅलर्जी आहे हे तर बिग बॉस ला ही माहित नाही... सही पकडे है दोस्त! खेळ खल्लास..!
खरे तर बिग बॉस व ईतर स्पर्धकांपासून हि बाब लपवून ठेवल्याने तिला डिस्क्वालीफाय करायला हवे. This is way beyond than guilt and strategy blunder..! Shame on her...
आणि शरा ला वेलची ची अॅलर्जी आहे हे आम्हाला सर्वाना ती आली त्या पहिल्याच दिवशी माहित होते हे आस्ताद ने सांगितल्यावर तर अगदीच केविलवाणी अवस्था झाली मेघाची... big loser..! शेवटी हे ओढून ताणून घात्लेले नकाब ऊतरणाच होते.. मेघा ने मात्र स्वताच्या अती शहाणपणा पायी हा नकाब स्वताच ऊतरवला.. damage is already done and too late to salvage!
मेघा ही व्यक्ती हे अती मह्त्वाकांक्षा व अती शहाणपणा यामूळे एखाद्या व्यक्तीचे किती नुकसान होवू शकते याचे ऊत्तम ऊदाहरण आहे. आज्च्या घडीला घरातील ज्या व्यक्तींबरोबर ८० दिवस घालवले त्यातील एकही व्यक्ती तिच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. कुठल्याही क्षणी स्वताच्या स्वार्थासाठी स्वताच्या मित्रांना फसवणार्या व्यक्तीचे आयुष्यात कुणीच नसते. 'ऐसे दोस्त से दुष्मन बेहतर' असे आता तीच्याबद्दल सार्वत्रिक मत आहे.. फारच केविलवाणा प्रकार!
आणि ५ आठवड्यापूर्वी आलेली शरा आता हिच्या मनाच्या कप्प्यात? कैच्याकै! Rofl शरा ने यावर विश्वास ठेवणे म्हणजे तर मूर्खपणाची परिसीमाच.. watch out Sharaa.. Megha is going to use you for next remaining days... nothing more..! नंकी ने देखिल बाहेर गेल्यावर तीला हेच सांगायचा प्रयत्न केलाय. पण ऊपयोग व्हायचा नाही. मी माझा गेमच खेळते आहे. ईतपत पटवून देण्यातच तिची मजल आहे...
असो.
बाकी फोन कॉल्स तर सर्वच फेक असतात .. मेघा च्या सपोर्ट चे असो वा तीच्या विरुध्द! नाही का लोक्स? Proud तेव्हा फोन कॉल्स ना काही विशेष अर्थ नाही. ऊसगाव वरून आला काय किंवा लासलगाव वरून आला काय. Proud
पण आत्ता आताच अगदी भारताबाहेरून फोन येवू लागले की.. गंमतच आहे. पि आर एजंसी जोरात कामाला लागलेली दिसते. Wink
आज ममा फारच संयम ठेवून बोलत होते, मेघाशी... चेहेर्यावर व एकंदर देहबोलीत.. मेघाविषयी असलेली अविश्वासार्हता अगदी स्पष्ट दिसत होती. पण करतात काय... सगळेच चालवून घ्यायला लागणार. आणि मेघा ला जास्ती रागवायचं नाही बर का.. जगबुडी नाही झाली तरी लोणावळा तर बुडेल ना, मग?
शेवटी सगळे फिक्स आहेच नाही का? म्हणजे स्मिता, नंकी सोडून दुसरेच कुणी कॅप्ट्न झाले की. Happy तेव्हा पुढील आठवड्यात शरा जाणार आणि मग फिनाले मध्ये ईकडचे तीन, तिकडचे तीन असे मस्त फेवरेट सहा राहणार.. मजबूत टी आर पी, मजबूत धंदा.!
एक नक्की: ईंडस्ट्री मधिल सर्वांना स्मिता बरोबर काम करायची उत्सुकता असणार.. she may not win Big Boss Trophy but she has won every heart and every person with her dignified behavior and humility. A true loyal team player and gem person.. rare qualities! Kudos! She will go long way... in life.
Megha may win the Big Boss Trophy but has lost every other thing in the process.. तीच्या बरोबर कुणीच काम करायला मागणार नाही हे नक्की. she is back to where she started... alone! sad!
माझे वैयक्तीक मत मात्र पुष्कर ला. well played dude! आणि of course आस्ताद had said he would like to be a King Maker.. he has played that part really well..
रच्याकने: "एकेमेकांच्या झिंंज्या ऊपटा पण पर्सनल होवू नका" हे वाक्य Oxymoron या संज्ञेचे मराठी मधिल सर्वात महान ऊदाहरण म्हणून विकीपिडीयात नोंदले जावे. It sums up the entire Big Boss Marathi season!
योग शब्दा शब्दाला अनुमोदन.
योग शब्दा शब्दाला अनुमोदन.
मायबोलीचे नाव बदलून मेघाबोली
मायबोलीचे नाव बदलून मेघाबोली ठेऊ या का ?
आजच्या प्रोमोत मेघा असे
आजच्या प्रोमोत मेघा असे म्हणताना दिसतेय की स्मिता व शराला गाडीतून उतरू देऊ नका. त्या वीक कंटेस्टन्ट्स आहेत, त्या आपल्याबरोबर नॉमिनेशनमध्ये असलेलं चांगलं असा तिचा होरा. स्मिता कुठल्या अँगलने वीक वाटते काय माहित मेघाला?
लोणावळा मेघा चिक्की >>>
लोणावळा मेघा चिक्की >>> haha
चोरी तर रेशमने पण केली होती,
चोरी तर रेशमने पण केली होती, झेंडेपण लपवले होते नको तिथे..... आस्ताद तर मधले कित्येक टास्क विरुद्ध टीमच्या बाजूनेच खेळलाय.... फेअर फेअर म्हणवणाऱ्या पुष्करनेही गुपचुप आस्तादला बादलीत पाणी ओतायला लावले..... सईने पण अगदी घरातुन चिकटपट्टी आणून त्या वाळूच्या टास्कमध्ये फनेल बंद केले होते.... मग कुठल्या बेसीसवर हे मेघावर आरोप करतात?
आणि हे असे नियमातले लूपहोल शोधून खेळणे म्हणजेच युक्तीने खेळणे!
मग मेघाचे चुकते कुठे? तिचे डोके बाकीच्यांपेक्षा जास्त चालते हा काय तिचा दोष आहे?
तिच्या डोक्यात सतत तेच चालू असते म्हणे! अरे मग तुम्ही काय इथे झोपा काढायला आलाय का? जिंकायचे तर सगळ्यांना आहे आणि मग त्या जिंकण्यासाठी एखाद्याने विशेष प्रयत्न केले तर त्याला चक्क पाताळयंत्री म्हणता?<<<
+++११११ लाख लाख अनुमोदन!
>>तिच्या डोक्यात सतत तेच चालू
>>तिच्या डोक्यात सतत तेच चालू असते म्हणे! अरे मग तुम्ही काय इथे झोपा काढायला आलाय का? जिंकायचे तर सगळ्यांना आहे
मेघा सोडून सगळे झोपा काढायलाच आलेत... नक्कीच! तीच फक्त जिंकायला आली होती... पण आता म्हणे जिंकणे हरणे मॅटर करत नाय!
दुर्दैवाने काही जणांनी हात पाय मोडून घेतले.. नाहितर मुंबई पुण्यातील जीव घेण्या ऊकाड्यात बि बॉ च्या घरात मस्त ऐश होती की सगळ्यांची. फुकट AC, हेल्दी नाश्ता, फुकट जेवण, गप्पा टप्पा, गॉसिपींग, फुकट धुरांडी, फुकटचे हग्स,,परत फुकटची प्रसिध्दी, .... वाह, अजून काय हवे! वेडेच आहेत सगळे ऊगाच जिंकायच्या मागे लागलेत.. मेघा ला जिंकू देत ना.
मेघा-पु-सै परत एकत्र .
मेघा-पु-सै परत एकत्र ..पाहा आजच्या भागात...
अरे काय चल्लय काय...
बी बॉ आहे का जोक....
पुष्कर बाळ त्याने जे काहि म्हटलं ते सगळं विसरा वगैरे म्हणत आहे अशी क्लीप आहे.
मेघा चं स्वप्न दाखवताय्त का काय बि बॉ मधे आता
कालचा एपिसोड पण एकदम बोरिंग.
कालचा एपिसोड पण एकदम बोरिंग. तो मुखवट्यांचा गेम दाखवलाच नाही का ? ( की मी चुकून फॉरवर्ड केल)?) तसंही काही मिस केले असे वाटण्यासारखे नसावे त्यात.
ती पत्रं कसली पुचाट होती. एक तर तेच तेच तेच आणि प्रेडिक्टेबल वाटले सगळेच आणि निम्म्या लोकांना ४ वाक्य मराठीत लिहिता आली नाहीत ? त्या रेशम ला पण. कशाला घ्यायचा मग हा टास्क? त्यातल्या त्यात आस्ताद आणि नंकिने चांगले लिहिले.
ममां ला तरी धड कुठे बोलता येते म्हणा. साधे साधे शब्द बोलताना अडखळतो.
मेघा-पु-सै परत एकत्र ..पाहा
मेघा-पु-सै परत एकत्र ..पाहा आजच्या भागात...
अरे काय चल्लय काय..>> पुष्कर बालक म्हनतोय की मला सोडू नका ,आज nomination टास्क म्हनून परत एकत्र का की त्याला भीति वाटत होती मेघा आपल नाव करेल nominate ??? पुढे टास्क मधे मेघा च का ऐकतोय मग ,स्वतच्या डोक्याने आख ना गेम प्लान .खूप insecure मानुस ,आधी म्हणायच की मी माझ्या हिमतीवर लढेन नन्तर परत फुस्स
पहा बरं उलट्या आणि जुलाब होत
पहा बरं उलट्या आणि जुलाब होत असतानाही दुडूदुडू धावणारं बाळ ... कित्ती कित्ती स्ट्रॉंग असावं ना माणसानी आणि ह्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी कित्ती मूर्ख असावं.
आणि हे तर काहीच नाही जेव्हा task quit केला जातो तेव्हाचे expressions पहा.
कुठून आणतेस इतकी energy आणि दुसऱ्या मिनिटाला भाग्यश्री ला सांगण्यात येत कि मला बेकार loose motions चालू झाले आहेत. म्हणजे इतरांना किती मूर्ख समजावं !!! खरं तर कोणाचं डोकं माझ्याइतकं चालत नाही हा घोर गैरसमज (हे बोलून दाखवलाय बरं का तिने बऱ्याच वेळा.. )
कीव करावीशी वाटते खरंच अश्या लोकांची .. बरं हा मुद्दा घेऊन ३ दिवस bigg boss च्या घरात ती आणि बाहेर सो. मि. वर तिचे समर्थक भांडत होते... अन्याय झालाय म्हणे तिच्यावर ... ती विरुद्ध सगळं घर .. ती वाघीण आहे, पुरून उरेल सगळ्यांना ... हि वाघीण आहे असं वाटतं का अशी सगळी मज्जा पाहून.. वरच्या स्वरात जोरजोरात आरडाओरडा केला कि वाघीण असता का ... खऱ्या वाघिणीची दया येतेय मला आता ..
सतत credit घेणारे, मी मी करणारे असे कित्ती तरी लोक आपल्या आजूबाजूला , ऑफिस मध्ये असतात. तसाच किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच असा हा एक नमुना. त्यामुळे घरातले जर सगळे तिच्याविरुद्ध गेले तरी ते साहजिकच आहे. कोण सतत कोणाचा तरी शहाणपणा ऐकून घेईल.
इथे ऋतुजा बद्दल खूप वाचलं... काय तर म्हणे villain group च्या हिंसक खेळण्यामुळे ती गेली. तो एपिसोड पाहावंच सगळ्यांनी एकदा.. टास्क संपायच्या वेळी स्वतःच जाऊन त्या फुलांच्या ताटव्यात उडी मारली कि हो तिने.. तिथे तोल जाऊन विटांवर पडली
आत्ताच voot वरचा banner video पाहिला. 'Megha-Pushkar Reunite?' of course हो ... आता दोन आठवडे राहिलेत फक्त. त्यामुळे जे स्वार्थी आहेत ते स्वतः चा स्वार्थ पाहणार आणि बाकीचे घरी जाणार. ह्यात स्मिता जाऊ नये असं मनापासून वाटतं आणि तीच जिंकावी अशी खूप इच्छा आहे. She deserves it. ती जिंकली ना तर अती आत्मविश्वासू,गर्विष्ठ, प्रेक्षकांना गृहीत धरणाऱ्या आणि इतरांना weak समजणाऱ्याना (धाडेना) धडा मिळेल.
दिप्ती मस्त पोस्ट. मेघा अगदी
दिप्ती मस्त पोस्ट. मेघा अगदी सुरूवातीला मला अजिबातच आवडायची नाही. मध्यंतरी खूप आवडायला लागली.
परत एकदा गेल्या आठवड्यातले तिचे टॅन्ट्रम्स पाहून तिचा फारच राग यायला लागला होता. स्वत:च बोललेलं स्वत:च्याच बोलण्याने अथवा कृतीने खोडून काढते ती.
स्वत:च बोललेलं स्वत:च्याच
स्वत:च बोललेलं स्वत:च्याच बोलण्याने अथवा कृतीने खोडून काढते ती.>+११२१
दीप्ती छान लिहिलेय, दूध प्यायचा टास्क संपल्यावर ती भाग्यश्री ला सांगत पण होती की मी मुद्दाम वेळ काढत होते
Pages