बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आस्ताद आता इथपर्यंत आलाय कि मी जिंकलो नाही तरी चालेल, पण मेघाला जिंकू देणार नाही. टोकाची कट कारस्थानं हा करतोय , पण नाव सगळे मेघाचं घेत आहेत. आणि मेघाने ऍलर्जी सांगितली नाही म्हणे, अरे पण श रा ने सांगितलेली ना, तरी तुम्ही काय केले. त्याचा गैरफायदाच घेतला ना.

मांजरेकरांना कोणाला घराबाहेर काढायचा अधिकार असेल तर , त्यांना कोणाला ठेवायचे कोणाला काढायचे हे ते ठरवत नसतील कशावरून? मला आधी ते चॅनेल ठरवतं असं वाटायचं, पण आता ते स्वतःच काबुल करत आहेत कि त्यांना तसा अधिकार आहे , म्हणेज धन्यच.

ती ममांची पॉवर जाम विनोदी आहे.
राजेश आणि विकास (famous youtubers/big boss reviewers, Sai’s Mom threatened to sue them after last week’s episode review . ) हे दोघे जे बोलले पॉवर बद्दल या लिंक मधे हहपुवा , ११:४० ते १२:४० नक्की पहा, too hilarious Rofl

https://youtu.be/vN5TKll8lhM

नवं नाव द्या शो ला

आपला मराठी भीक बाॅस

भिकार शो, महाभिकार होस्ट आणि भिकारोत्तम आ, रे, पु, स

अस्तादनं स्मिताला बोलावून " हे बघ, तुझा डावा मेंदू आणि उजवा मेंदू इथे टेबलावर पडलेत" हे सांगणं म्हणजे अत्यंत किळसवाणा एमसीपीपणा कळस होता. काळेसरांचं मत काय आहे यावर? किती छान संस्कार केलेत मुलावर ते दिसून येतंय शो मधे.

स्मिता अस्तादबद्दल बरोबर बोलली की आपण महान आहोत हे दाखवण्यासाठी दुसर्याला लहान दाखवून देण्याची गरज नसते.

स्मिता, तुझा विचार एकदम बरोबर आहे पण हे कोणाच्या बाबतीत? तर जे खरंच महान असतात त्यांना असली घाणेरड्या पातळीवर येण्याची गरज नसते

अस्तादसारख्यांनाच असली गलिच्छ थेरं करावी लागतात आणि त्यासाठी ते साॅफ्ट टारगेट निवडतात किंवा झुंडींनं गुंडशाही करतात..

आता सगळे मिळून मेघाला पुन्हा एकदा काॅर्नर करणार आणि जर तिने तोंडावर ताबा नाही ठेवला तर ती सरळ बाहेर जाणार. रेशमला जिंकण्यासाठी फक्त मेघा हा एकच अडसर आहे. बाकी सगळे मग easy targets आहेत. मेघाने मौनव्रत धारण करणे.

गणितात बेरजेची समीकरणं असतात ना, जसं ३+४=७, तशी बिबाॅच्या घरातली काही समीकरणं -
१)खूप लो फिल करणे + घरात निगेटिवीटी जाणवणे= बिग हग
२) तू माझं कौतुक कर + मी तुझं कौतुक करतो = बिग हग
आपापल्या परीने यात भर घाला. + च्या मागे पुढे काही असलं तरी उत्तर एकच आलं पाहिजे ‘बिग हग‘
Wink

Submitted by योग on 9 July, 2018 - 04:16>> पोस्ट आवडली

बिबॉ च्या घरात आलेले पाहुणे, कालचे लेटर बघून असे वाटतेय की रेशम इथे कशीही दिसो पण कदाचित एक माणूस म्हणून नक्की चांगली असेल, तसे आधीही तिचे अन सईचे भांडण असताना सुद्दा तिने सईला बरे नसताना नेहमीच प्रेमाने जवळ केले आहे, काही झाले तरी मेघा इतके वैयक्तिक बोलली नाही , माणसे जोडणे अन जपणे तिला चांगलेच जमते, अन हल्ली तर खेळतेय ही छान, सो आहेत तिचे जिंकायचे चान्स.

हा, पण माझे मत स्मितालाच, मग ती हरू वा जिंको☺️

Megha may win the Big Boss Trophy but has lost every other thing in the process.. तीच्या बरोबर कुणीच काम करायला मागणार नाही हे नक्की. she is back to where she started... alone! sad!
>>> हे असले भविष्य तुम्ही फुकटात सांगता की चार्ज करता यांच्यासाठी?

या आठवड्यात मेघा नॉमिनेट असेल, शरा सोडल्यास तिला कुणीही सपोर्ट करणार नाही. सगळे पुन्हा एकदा तिच्यावर तुटून पडणार, ती कॅप्टन होणार नाही आणि मुख्य म्हणजे तिला प्रेक्षकांची सहानुभूती वाढत जाणार.

अरे, सर्वांना कामं मिळतात, जास्त चॅनेल देते. त्याचप्रमाणे tv 18 वाले चित्रपट पण काढतात. तिथेही घेतील. दुसरे पण बोलावतील. ते उद्या एकत्र काम पण करतील दुष्मनी इथे असली तरी. आपण काही सांगू शकत नाही.

Checkout Which actress does Sharmishtha look like? on Voot https://go.voot.com/szBUnt3XoO

सै- पु गेल्यापासून मेघा-शरा-स्मिता ट्रायो जुळतोय वाटतं. भारी मजा करतायत.

VB - परत तुमचा आयडी दाजी ने हॅक केल्यासारखा वाटतोय >>> च्रप्स , तुमची भाषा अन बोलण्याची पद्धत पाहता मी नेहमी तुम्हाला इग्नोर केलेय, सो, कृपया यापुढे तुम्हीसुद्धा तसेच करा, मला वाद आवडत नाही. फक्त माझे मत मांडते तेही भरपूर वेळ हाताशी असेल तर

@योग तुमचा प्रतिसाद आवडला. शेवटचा Oxymoron तर एकदम मस्तच...

आस्तादला लोकं (आणि इथले बरेचजण) शिव्या घालतात पण मेघाची पाताळयंत्री कारस्थाने सोयीस्कर रित्या विसरतात. कुठलाही टास्क व्यवस्थित कसा खेळायचा नाही याचेच धडे मेघा देत होती. किंबहूना प्रत्येक टास्क मागे चोर्‍या, लबाडी कशी करावी येथेच तिचे डोके चालत होते.

@मित
ममां मला ओरडले + तुला नाही ओरडले = बिग हग
ममां मला नाही ओरडले + तुला मात्र ओरडले = बिग हग
ममांनी माझे कौतूक केले +ममांनी तुझे कौतूक केले = बिग हग
.
.
.
ममां मला खूप ओरडले + ममां तुला पण ओरडले = बिग + लॉग हग

२४ तासातलं आपल्याला फक्त दीड तासाचं दिसतं. वूटवरही तेवढंच दिसतं साधारणपणे. उरलेल्या वेळात त्यांना आजचा भांडणाचा टॉपिक हा हा आहे, तुम्ही अशी अ‍ॅक्टिंग करायची आहे हे सांगत असतील आणि कोणी काय बोलायचं याचं स्क्रीप्टपण मिळत असेल याची मला परत एकदा खात्री पटली आहे.

या आठवड्याच्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये विजयी टीममधल्या ४ जणांना जर कॅप्टन्सी मिळणारच नव्हती तर त्यांना डिस्कस करायचं नाटक कशाला करायला लावलं आणि मग भांडणाचा ड्रामा. सगळं फक्त आणि फक्त टीआरपी साठी. आणि आपण बसतो इथे एकमेकांसाठी भांडत.

Megha may win the Big Boss Trophy but has lost every other thing in the process.. तीच्या बरोबर कुणीच काम करायला मागणार नाही हे नक्की.>> काय गरज आहे तिला कुणाबरोबर काम करण्याची? तिचहि प्रोडक्शन आहे ना? नं कि बोललाच ना शेवटी थोडे दिवस तुझ्या पैशावर माझेहि घर चालले आहे म्हणुन.. उलट जर आता तिने काहि करायच म्हटल्यावर तिच्याबरोबर काम करायला मला वाटतं लोकांची लाईन लागेल...
परिस्थिती तिची नक्कीच चांगली असेल पण कसलाच माज तिच्या वागण्या बोलण्यात कधी दिसला नाहि. तिचा खोटारडेपणा नाहि तर तिच्यामुळे होणारी विरुध्द गटाच्या मनातील अस्थिरता हे प्रत्येकांच्या देहबोली अन कृतीतुन दिसतेय.

मेघाने कोणत्या टास्क मध्ये चोरी केली आहे? (हे मला खरंच माहित नाही)
आणि कोणी कोणत्या टास्कमध्ये लबाडी केली नाही? सगळेच नियम हवे तसे फिरवत आलेत आहेत.
सगळेच प्लांनिंग्ज प्लॉटटींग करत आहेत, मेघाने केले तर ती पाताळयंत्री.. आणि आस्ताद ने केलं तर किंगमेकर?
मेघाने टास्क मध्ये , टास्क जिंकण्यासाठी ,लूप होल्स शोधून ते वापरले.
आस्तादने नेहमीच ग्रुप फोडा,बायकांवर आरडा ओरडा , दमदाटी (मी त्याला आत्तापार्यंत एकही पुरुषावर आवाज चढवून बोलताना पाहिलेलं नाही) हेच करत आलाय. (वरती सानी यांनी लिहिलंच आहे ) सुरुवातीलासुद्धा विरुद्ध टीम मध्ये मित्र आहेत म्हणून तो त्यांच्याच बाजूने खेळलाय , आणि तेच मेघाने केलं तर तो म्हणतोय खोटारडी आहे. पब्लिक विसरते का हे? मेघा पत्र वाचून दाखवताना पण कसे expressions देत होता.
माणूस म्हणून अतिशय नीच वाटतो तो .

अस नाहि.. सत्यवादि राजा हरिश्चंद्र जर कुणी घरात असेल तर तो आस्ताद काळे.. अन डबल ढोलकि दुसरी माणसं तो सोडुन

या आठवड्याच्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये विजयी टीममधल्या ४ जणांना जर कॅप्टन्सी मिळणारच नव्हती तर त्यांना डिस्कस करायचं नाटक कशाला करायला लावलं आणि मग भांडणाचा ड्रामा. सगळं फक्त आणि फक्त टीआरपी साठी. आणि आपण बसतो इथे एकमेकांसाठी भांडत.>>>> मी पण सहमत आहे. कोणतेही भांडण मर्यादेबाहेर जात असेल तर ते जागच्या जागी थांबवण्याचा बिबाॅकडे ऑप्शन आहेच. किंवा एडिट करून आम्हाला न दाखवण्याचा पण आहे. मुळात कॅप्टनसीचा टास्क वेगळाच करायचा होता तर ते गृप डिस्कशन फक्त भांडणे लावण्यासाठीच होतं. बिबाॅने "एॅक्शन" म्हटलं आणि लागले सगळे कामाला. मेघाने रे आ विरूद्ध बोललेल्या गोष्टी आक्षेपार्ह होत्या, त्याही एडिट करता आल्या असत्या. ममां सांगतात पर्सनल होऊ नका. पण खरंच जर पर्सनल गोष्टी बाहेर दाखवायच्या नसतील तर कात्री लावा की रेकाॅर्डींगला.

सत्यवादि राजा हरिश्चंद्र जर कुणी घरात असेल तर तो आस्ताद काळे.. >>>> भावना, आस्ताद सोडून अजून दोन आहेत की सत्यवादी...सई-पुष्की...ते पण 'कायम' खरंच बोलत आलेत. म्हणून तर दुसर्या लोकांना सतत खोटारडे म्हणतात.

मेघाला बाहेर सपोर्ट आहे. यावेळी मला वाटते, शराला वोट कमी मिळुन ती बाहेर जाणार. आणी मेघा एकटी पडणार. शेवटच्या आठवड्यात, आ रे पु स चा धुडगुस विरुद्ध मे एकटी. मेघा ने आता तोन्ड नको उघडायला. आणि स पु ला ही लाडीगोडी लावाय्ची काही गरज नाही.

सत्यवादी...सई-पुष्की...ते पण 'कायम' खरंच बोलत आलेत. >>> हो चिन्मयी अगदि...
खरच मला कळत नाहि.. कश्याला तिने अजुनहि त्या दोघांच नाव घ्याव...

कारण मला वाटतं मेघाचं सैबरोबर खरोखरचं बाँडींग झालं असावं.. पुष्कीचं सोडा पण सैला ती कधी सोडेल असे वाटत नाही.
शेवटचा आठवडा खरेच गंमतीदार असणारे..

सईला कधी कधी खरंच मेघासोबत बोलायंच असतं असं वाटतं. पण पुष्की लगेच आपलं 'चांगुलपणा'च हत्यार बाहेर काढतो. " नाही, तू जा बोल तिच्याशी. I m fine. मी स्ट्राँग आहे." हेच चार वेळा बोलतो. मग सईची इच्छा मरते मेघाशी बोलायला जायची. पुष्की सईला मेघाकडे जाऊन देणारच नाही. सई कितीही आंधळेपणाने त्याला फाॅलो करत असेल तरीही. May b he has trust issues. सतत गोंधळलेला. इकडे तिकडे बघत. कुठलंही firm statement न करता.

काल पत्रवाचनातली गंमत पाहिली का? सईने पुष्कीला लिहिलं होतं, ’तुझा हात मी कधीच सोडणार नाही’ आणि पुष्कीने लिहिलं होतं, ’हा शो संपल्यावर मी तुला मिस करेन’. म्हणजे तो त्याच्या वाटेवर जाणार आहे हे उघड आहे, ही बया का त्याच्या मागे लागली आहे हेच मला कळत नाहीये! इतक्या हिन्ट्स येत आहेत, उघड दिसत आहे, तरी त्याच्या मागे मागे करतेय वेडी!

आस्त्या हलकट आहे. स्मिताची सतत लिटरली खिल्ली उडवत असतो. तिने त्याला एकदा तरी खाडकन उत्तर द्यायला हवंय, पण बिचारी इतकी साधी आहे, की तिच्या तेही लक्षातच येत नसेल!

Pages