चिकन - १ किलो ( Skin काढून ) ,
तेल - १ मोठी वाटी ,
कांदा - २ मोठे चिरून थोडे तेलावर भाजून पेस्ट केलेली ,
लसूण - २ मध्यम आकाराचे गड्डे ,
हिरव्या मिरच्या - ४ ,
अद्रक / आलं - बोटाच्या २ पेरा एवढा तुकडा ,
(आलं ,लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा डोल - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले ,
जिरे - १ चमचा ,
दगडफूल ( प्रमाण बोटाची २ पेर ) ,
कलमी - बोटाएवढा १ तुकडा ,
मिरे - ८ ते १० ,
लवंग - ५ ते ६ ,
विलायची - ३ ,
धने - १० ग्रॅम किंचित तेलात भाजून (+दगडफूल + मिरे + लवंग + विलायची + कलमी +जिरे ) बारीक केलेले ,
हिरव्या मेथी च्या ८ १० काड्यांची पाने बारीक चिरून ,
कोथिंबीर बारीक चिरून ,
तिखट ,
हळद ,
मीठ .
चिकन ३ पाण्यात धुवून घ्यावे . त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे . ३ ते ४ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे .
शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय भाज्यांमध्ये तेलाची तर्री ठेवत असल्यामुळे तेल जास्त टाकतात ) .
तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी , धने आणि इतर जिन्नस असलेली पेस्ट घालून परतावे , त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी .
त्यात बारीक चिरलेली मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून मग ६ चमचे तिखट , दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवून घेताना टाकलेल्या मिठाचा अंदाज घ्यावा ).
आता त्या फोडणीत १/२ पेला पाणी टाकून झाकण ठेवावे . २ मिनिटात फोडणी आणि त्यातले तेल (तर्री ) वेगळे
झालेले दिसेल . त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे . २ ते ३ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे .
आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे . ५ मिनिटांनी वाढावयास घ्यावे .
विदर्भात चिकन मधे रस्सा हा घट्ट न ठेवता पातळ ठेवतात . घट्ट रस्सा ठेवायचा असल्यास मसाल्यांचे प्रमाण कमी करावे .
इथे लोक तेज खातात (तिखट नाही) म्हणून प्रत्येकाच्या चवीप्रमाणे मसाले आणि तिखट कमी जास्त करावं … पहिला घास घेतल्यावर ठसका लागून पाणी प्यायची वेळ आल्यास माझ्यावर नाव नाही रे बा !
माहितीचा स्रोत:
आप्पाजी (आईचे वडील)
varhadi chicken
वॉव. दगडीफूल म्हणजे काय?
वॉव.
दगडीफूल म्हणजे काय?
दगडीफूल म्हणजे काय?>> https:/
दगडीफूल म्हणजे काय?>> https://www.maayboli.com/node/49326?page=3 या पानावर रायगड्ने फोटो दिलाय बघा
@रायगड धन्यवाद.
@रायगड धन्यवाद.
टिना कुठे राहते ते शोधलं
टिना कुठे राहते ते शोधलं पाहिजे आता Wink>> पेठेत पेठेत
(No subject)
>>>टिना कुठे राहते ते शोधलं
>>>टिना कुठे राहते ते शोधलं पाहिजे आता Wink>> पेठेत पेठेत Lol<<<<
म्हणजे आजूबाजूचं हॉटेल पहावं लागणार का तुमच्या घरी दुपारी येताना..
टिना, ते सुक जरा दोन प्लेट
टिना, ते सुक जरा दोन प्लेट पाठवून दे जरा......
पाठवू नका.
पाठवू नका.
रेस्पी टाका.
टीच अ मॅन टु फिश.
हायला, टीना तुला बॅन केलं
हायला, टीना तुला बॅन केलं पाहिजे... कसले खतरनाक फोटो आहेत!!
Pages