Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या "गाली गाली".. चा अनुभव
ह्या "गाली गाली".. चा अनुभव मी ही पहिल्यान्दा घेतला तेव्हा तो माझ्या साठी ही कल्चरल शॉक होताच
झाले असे की ग्योथे इन्स्टिट्युट मधे कोर्स करताना बेन्झ च्या एका अतिशय वरिष्ठ अधिकार्याशी माझी चांगलीच मैत्री झाली. ते काकाच तेव्हा ६० एक वर्षाचे होते, त्यांनी आणि त्यांच्या बायकोने मला तेव्हा ल मेरेडियन ला जेवायला बोलावले होते.. मी त्या जर्मन काकुंना पहिल्यांदाच भेटणार होतो...त्यात ते ल मेरेडियन, माझी अवस्था म्हणजे पु.लं.नी अपुर्वाई मध्ये लिहिलेल्या माँजिनी मध्ये पहिल्यांदा जाणार्या पु. लं. सारखी झालेली; आणि तिथे गेल्यावर ती ५८ वर्षाची आणि माझ्य एवढीच धिप्पाड असलेली जर्मन काकु आली की एकदम "गाली गाली" करायला... मी गंडलेलो, माझं पक्कं असलेलं जर्मन गंडलेलं म्हणजे हे सगळं थेरोटिकली वाचलेलं पण असं प्रॅक्टिकल कुणी अनुभवलं होतं तेव्हा
हे दार उघडणे मजेशीर असते.
हे दार उघडणे मजेशीर असते.
माझ्यासाठी एका कलिग ने दार उघडले.मग मी पुढे जाऊन त्याच्यासाठी पुढचे दार उघडले, मग त्याने पुढे जाऊन तिसरे दार उघडले. (हो तीन दारे होती एका कॉमन कॉरीडॉर मधून शॉप फ्लोर ला जाऊन तिथून दार उघडून एका डिपार्टमेंट मध्ये.)
मग मी त्या जागी नवी असल्याने त्याच्यासाठी उघडायला चौथे दार शोधत होते ते त्याला कळलं आणि त्याने हसून नाही म्हणून मान डोलावली.
हो आणि नाही चा गोंधळ वेगळाच. परदेशी लोकांचं म्हणणं असं की तुम्ही भारतीय लोक मान हलवता तेव्हा हो म्हणता की नाही तेच कळत नाही. मग ते विचारतात 'इज दॅट यस ऑर नो?'
मी शेवटच्या दिवशी कँटीन डिपॉझिट परत घ्यायला गेले होते. तेव्हा कँटीन काऊंटर ची बाई आतल्याला जर्मनीत ओरडून : "ते बुटकं डिपॉझिट घ्यायला आलं आहे, हिशोब कर रे!" तिला माहितीच नाही की 'ते बुटकं' मागचा १ वर्षं जर्मन शिकत होतं तेव्हा बारीक पण होते (मनात हुंदका).उंची तेव्हा इतकीच आहे.रुंदी वाढली.
ऑफीस मधल्या एका सहकार्याला
ऑफीस मधल्या एका सहकार्याला मुलगी झाली. विचारंती कळाल की त्याचे लग्न नाही झाले. नंतर कळाले की लग्न केल्यावर कायद्यानुसार बायको नवर्याच्या आणि नवरा बायकोच्या संपत्तिमधे अर्धा भागीदार असतो / असते. म्हणून हे लोक लग्न करत नाहीत. बर्याचदा हॉटेलात बिल वेग वेगळे देतात. दोन मुले असतील तर एका मुलाच नवरा आणि दुसर्या मुलाच बील बायको देते. अरे....
इथे ग्रोसरी स्टोअरमधे एका
इथे ग्रोसरी स्टोअरमधे एका वस्तूची किंमत दाखवली होती त्यापेक्षा जास्त स्कॅन झाली. मी त्याबद्दल विचारले असता काउंटरवरच्या व्यक्तीने कस्टमर सर्विस काउंटरवर रिसीट आणि वस्तू दाखव ते नीट सेटल करतील असे सांगितले. मी कस्टमर काउंटरवर काय झाले ते सांगितल्यावर त्यांनी लगेच खात्री केली आणि ' सॉरी,तुला त्रास झाला, आमच्या पॉलिसीनुसर या वस्तूची तुला आम्ही काहीच किंमत लावणार नाही' असे सांगून बिलातून रक्कम वजा करुन नवीन रिसीट दिली. माझ्यासाठी हा कल्चरल शॉक होता. मला खरे तर मीच लेबल वाचण्यात चूक नाही ना केली एवढेच जाणून घ्यायचे होते, माझी चूक नसेल तर फारतर किमतीतला फरक लक्षात घेवून जास्तीची रक्कम परत देतील असे वाटले होते. 'आमच्या सिस्टिमची चूक' असे कबूल करुन झालेल्या त्रासाबद्दल माफी मागणे, वाढीव किंमत लावली गेली म्हणून वस्तू फ्री देणे या प्रकाराने मलाच अवघडल्यासारखे झाले.
मस्त किस्से!! वाचून गंमत
मस्त किस्से!! वाचून गंमत वाटली.
मी न्यू जर्सीत राहते. इथे मॉल मधे मुलासाठी carousel च्या लाइनमधे तिकेट काढायला उभी होते. तेव्हा तिथल्या बाईने सांगितले कि special मुलांसाठी तिकिट काढायची गरज नाही, ते कधीही आणि कितीही वेळा येऊ शकतात. तेव्हा सुखद धक्का बसला. त्यानंतर बर्याच दिवसांनी जेव्हा तिकडे गेले होते त्यावेळी मला तिकिट काढायला सांगितले कारण काही पालक त्यांच्या मुलांना स्पेशल असल्याचे नाटक करायला सांगतात आणि पैसे बुडवतात. त्यामुळे त्यांनी ती सेवाच बंद केली. हे माझ्यासाठी जास्त धक्कादायक होते. तिकिटाचा दर एका मुलासाठी $३ त्याबरोबर एक पालक असेल तर त्यांच्यासाठी तिकिट नव्हते. तरिही
काही पालक त्यांच्या मुलांना
काही पालक त्यांच्या मुलांना स्पेशल असल्याचे नाटक करायला सांगतात आणि पैसे बुडवतात. >>> काय? बाप रे! अवघड आहे हे!
लॅगोसला पोचलो आणि ऑफिसमध्ये
लॅगोसला पोचलो आणि ऑफिसमध्ये जाउन चार्ज घेतला तेव्हा अर्धा अधिक दिवस संपला होता. त्या दिवशीच ऑफिसमधल्या सगळ्यांशी रीतसर ओळख झाली होती.
दुसर्या दिवशी सकाळीच ऑफिसमध्ये शिरल्यावर सेक्रेटरीने विचारले " How was the night, Sir?' तेव्हा झालेला गोल्ड्फिश अजुन आठवतोय.
नायजेरियात हे असं विचारणं अगदी कॉमन आहे हे पण अजुन गेले ४ वर्ष काही पचनी पडलेलं नाहीय.
हे अतीच आहे
हे अतीच आहे
तोष, काय उत्तर दिलंत ते खर खर
तोष, काय उत्तर दिलंत ते खर खर सांगा बघू,
स्पेशल मुले म्हणजे काय? सगळी
स्पेशल मुले म्हणजे काय? सगळी मुले आई-वडिलांसाठी स्पेशलच असतात.सॉरी, समजले आता. https://youtu.be/G9n8Xp8DWf8
<<< ऑफीस मधल्या एका
<<< ऑफीस मधल्या एका सहकार्याला मुलगी झाली. विचारंती कळाल की त्याचे लग्न नाही झाले. नंतर कळाले की लग्न केल्यावर कायद्यानुसार बायको नवर्याच्या आणि नवरा बायकोच्या संपत्तिमधे अर्धा भागीदार असतो / असते. म्हणून हे लोक लग्न करत नाहीत. बर्याचदा हॉटेलात बिल वेग वेगळे देतात. दोन मुले असतील तर एका मुलाच नवरा आणि दुसर्या मुलाच बील बायको देते. अरे....>>>
आवडले ब्वा आपल्यालातर हे!
कोणता देश?
मजा आली किस्से वाचून.
मजा आली किस्से वाचून. रस्त्यावरून जाताना अनोळखी लोकं हाय/हॅलो करतात हे इतर अनेकजणांसारखच माझ्यासाठी पण सुखद आश्चर्य होतं. तेवढंच आश्चर्य शेजारच्या इटालियन काकू बागेत दोन झुडपांमध्ये पडलेल्या थोड्या गॅपमधून घुसून गप्पा मारायल्या आमच्या बाजूला यायच्या याचं वाटलं होतं. इथे कसं सगळ्या भेटीगाठी आधी ठरवूनच होतात हेच ऐकलेलं असतं कायम.
रस्ते क्रॉस करताना 'बाजूचं ट्रॅफिक थांबत नाही' अशा अर्थाचा काही बोर्ड आहे/नाही याची खात्री करून मगच रुबाबात रस्ता क्रॉस करावा. रच्याकने, आपल्या भारतीय परवान्यावर 'Driving is a Privilege, Not a Right.' छापलेलं असतं पण फॉलो फार थोडे लोकं करतात.
मला बसलेला सर्वात मोठा शॉक म्हणजे चप्पल आणि जेवणाचा डबा एकाच पिशवीत ठेवताना बघितलं तेव्हा. एकुणच आपल्याकडे वस्तूंना पाय लावू नये हा नियम जितक्या काटेकोरपणे पाळतात त्याच्या विरुद्ध परिथिती इथे दिसते.
चप्पल बुटांचा माझ्यासाठी पण
चप्पल बुटांचा माझ्यासाठी पण शॉक होता . हे अमेरिकन्स बाहेरच्या चप्पल बूट ना काढता तसेच घरभर फिरतात .
एकदा मी एका स्टोर मधुन बरीच
एकदा मी एका स्टोर मधुन बरीच खरेदी केली त्यात एक लॅम्प पण होता. सामान घेउन जातांना तो लॅम्प तिथेच राहुन गेला. घरी गेल्यावर लक्श्यात आले. नुकतेच अमेरिकेत आले असल्यामुळे ३०/४०$ चे नुकसान झाल्याचे खुप वाईट वाटले. २/३ दिवसांनी परत त्या दुकानात गेल्यावर विचार केला की एकदा काउंटर वर विचारुयात. काउंटर वरच्या बाईला झालेला प्रकार सांगितला तर तिने मला कस्ट्मर सर्विस कडे जायला सांगितले. तिथे माझ बोलण ऐकुन तिथ्ली बाई म्हणाली तुला कोणता लॅम्प ते आठवत का? मी हो म्हणाले तर तिने मला तो आतुन आणायला सांगितला. मी आणल्यावर ती म्हणते ओके. मला २ मिनीट काही कळलच नाही. मग तिच दॅटस ऑल म्हणाल्यावर मी बाहेर आले.
असाच शॉक मला रिसेन्ट्ली ऑनलाईन शॉपिंग मधे बसलेला पण तो कल्चरल म्हणता येणार नाही कारण आता ह्या कल्चरची सवय झाली आहे. २५०$ ची शॉपिंग ८ दिवस झालेत तरी मिळाली नव्हती म्हणुन कंप्लेन केली तर त्यांनी परत एकदा ती ऑर्डर पाठउन दिली. आणि २ दिवसांच्या अंतरावर मला एकच ऑरडर दोनदा मिळाली. परत कस्ट्मर सर्व्हीस ला फोन करुन परत कसे पाठउ विचारले तर किप ईट उत्तर आले.
ईथल्या रिट्र्न पॉलीसी चा एक मोठा कल्चरल शॉक होता ज्याची आता सवय झाली आहे.
नवं घर घेतलेलं तेव्हाचा शॉक.
नवं घर घेतलेलं तेव्हाचा शॉक.
एका शुक्रवारच्या रात्री भरपूर स्नो पडला. शनिवार आहे उठू आरामात आणि मग करु ब्लो करुन करुन आळसात पडलेलो तर मुलगा धावत काही तरी सांगत आला. खिडकीतुन बघतो तर शेजारिण आमचा ड्राईव्हवे साफ करत होती. धावत खाली आलो तर म्हणाली सकाळी दिसला नाहीस, तुला/ बायकोला बरं नसेल वाटलं. तू स्नो ब्लोअर घेतलास का नाही माहित न्हवतं.. गाडी बाहेर काढायची वेळ आली तर कसा काढशिल म्हणून साफ करत होते. डोंट वरी माझ्याकडे ब्लोअर आहे अँड मला आवडतो स्नो ब्लो करायला.
अक्षरशः कंठ दाटून आलेला आय मिस दोज नेबर्स हिअर.
आपण स्नो ब्लो करताना शेजारच्याचा इथला शॉवल करणे, कमीत कमी त्याचा साईड वॉक तरी साफ करणे हे फार नॉर्मल आहे कॅनडात.
मध्यंतरी मी ही ऑनलाईन ब्लाऊज
मध्यंतरी मी ही ऑनलाईन ब्लाऊज ऑर्डर केला होता. आल्यावर घालून बघितल्यावर साईझला लहान आहे हे कळलं. ऑनलाईन स्टोअर होतं त्यामुळे त्यांचा मेलिंग अॅड्रेस नव्हताच मग कस्टमर सर्विसला ‘अॅड्रेस पाठवा, ब्लाऊज परत पाठवायचा आहे‘ अशा दोन, तीन मेल टाकल्या. त्याला फायनली महिन्याभराने उत्तर आलं की आम्ही रिफंड करतो, ब्लाऊज परत पाठवायची गरज नाही. वी डोंट वाँट यु टू गो थ्रू हॅसल‘
आम्हांला क ल्चरल शॉक दोनदा बसला. एकदा भारतातून टोक्योत गेल्यावर आणि टोक्योतून अमेरिकेत आल्यावर. (इथे सगळ्याला कसा वेळ लागतो आणि सरकारी काम कशी पटापट होत नाहीत हे बघून)
ते इथे पण आहे की. आम्ही २
स्नो ब्लो करताना शेजारच्याचा इथला शॉवल करणे >> ते इथे पण आहे की. आम्ही २ जागा बदललया पण दर वेळी स्नो स्टॉर्म च्या वेळी एकमेकाला मदत करणारेच शेजारी भेटले . देसी, नॉन देसी सगळेच.
स्ट्रीट वर काही नग असताताच अर्थात साफ न करणारे.
अमेरिकेत आल्यावर बसलेला आणखी
अमेरिकेत आल्यावर बसलेला आणखी एक शॉक म्हणजे कित्येक दुकानांची/ पब्लिक प्लेसेसची दारं उघडायला अॅक्सेसिबल उंचीवर ऑटोमॅटिक डोर ओपनरचं बटण अजिबातच नसणे.
हा रीटर्न वाला अनुभव इथे अ
हा रीटर्न वाला अनुभव इथे अॅमेझॉन वर आला आहे.
बायकोनं काही टॉप्स का बॉटमवेअर मागवलं होतं. फिटिंग नीट नव्हतं तर परत केलं, त्याचे पैसे आलेत परत (कार्ड पे केलेलं तर त्याच कार्डवर पैसे परत आले). त्यानंतर काही दिवसांनी कुरीअर बॉय शॉपिंग अमाउंट इतकाच डिडि देऊन गेला घरी. मी नंतर अॅमेझॉन वर कस्ट्मरकेअर शी बोललो तर म्हणे आम्हाला सिस्टिम मध्ये कुठलंही रेकॉर्ड दिसत नाहीय... सो तो ठेवा तुम्हीच.
दुकानांची/ पब्लिक प्लेसेसची
दुकानांची/ पब्लिक प्लेसेसची दारं उघडायला अॅक्सेसिबल उंचीवर ऑटोमॅटिक डोर ओपनरचं बटण >>> हा काय प्रकार आहे? व्हील चेअर साठी दरवाजे उघडायचे बटण असते ते का?
रीटर्नचा आणखी एक धक्का म्हणजे
रीटर्नचा आणखी एक धक्का म्हणजे काहीतरी परत करायला गेलेलो तर खर्च केलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे परत दिले. विचारलं तर सांगितलं की तुम्ही जेव्हा घेतलंत तेव्हा सेल चालू होता, आता किम्मत वाढली आहे सो आत्ताच्या किम्मतीने परत करतो आम्ही.
व्हील चेअर साठी दरवाजे
व्हील चेअर साठी दरवाजे उघडायचे बटण असते ते का? >> हो. बे एरिआत तरी अनेक ठिकाणी हे नाहीये.
>>आता किम्मत वाढली आहे सो
>>आता किम्मत वाढली आहे सो आत्ताच्या किम्मतीने परत करतो आम्ही. <<
यु गाट्टुबी किडिंग हियर! रिटर्न्सला रिसिट लागते किंवा आय्टमच्या टॅग आणि वापरलेल्या क्रेडिट कार्डवरुन ते ट्रँझॅक्शन शोधुन काढतात. हा प्रकार जवळजवळ अशक्यच, पण वर रिटर्न न करायला लागलेले अनुभव वन्टाय्म एक्सेप्शन असु शकतात पण नॉर्म नाहि. मात्र, ३० दिवसात वस्तुची कमी झालेली किंमत काहिहि खळख्ळ न करता अॅडजस्ट केली जाते - हा नॉर्म.
सगळ्या रिटेलर्सचं बजेट असतं - रिटर्न्स, स्लिपेज, वेस्टेज इ. करता. वर फुकट मिळालेल्या वस्तु त्या बजेट अंतर्गत राइटऑफ होतात. यात फक्त एक धोका म्हणजे तुमचं नांव/अॅड्रेस लॉग केला जातो. पुढे अशा बाबतीत हॅबिच्युअल प्रकार आढळला तर त्या व्यक्तिला लाइफटाइम बॅन केलं जातं...
चप्पल-बुटांवरून आठवलं: मी
चप्पल-बुटांवरून आठवलं: मी ऑक्सफर्डला असताना आमच्या ६ जणांच्या शेअर्ड घरात एक इटालियन मुलगी होती माझ्या शेजारच्या रूममधे. ती बया संध्याकाळी मस्त आंघोळ करायची, मग खाली किचनमधे यायची आणि पहिलं काम काय करेल? कचरा टाकणे. एकदा तर डोक्याला टॉवेल वगैरे बांधून आली आणि कचर्याची भरलेली पिशवी खांद्यावर टाकून घेऊन गेली. दुसरी ब्रिटिश मुलगी भाज्या चिरताना कचर्याचा डबा ओट्यावर ठेवायची. शिवाय ह्या मुली सिंकमधे भांडी धुताना सगळं सिंक पाण्याने भरून त्यात भांडी विसळायच्या!
एकदा फ्रान्समधे असताना आमच्या लॅबमधे एका मुलीचं प्रेझेंटेशन होतं. मी आणि माझा मित्र (तिथेच भेटलेला भारतीय मुलगा) गेलो अटेंड करायला. सगळं प्रेझेंटेशन झालं, प्रश्न वगैरे पण संपायला आले तसं तिनं एकदम तिचा (वरून घातलेला) टॉपच काढला. अर्थात, आत स्पॅगेटी टॉप होता, पण असं सगळ्यांसमोर केलेलं मी पहिल्यांदाच पाहिलं. माझा मित्रपण चपापला एकदम. मग आम्ही जाम हसलो आमच्या ऑफिसमधे जाऊन.
व्हील चेअर साठी दरवाजे
व्हील चेअर साठी दरवाजे उघडायचे बटण असते ते का? >> हो. बे एरिआत तरी अनेक ठिकाणी हे नाहीये. >>> इथे बघितलं आहे बटण सगळीकडे.
स्नो आवरून देणारे शेजारी
स्नो आवरून देणारे शेजारी बरेच कॉमन असावेत. आमचे पण होते एक शेजारी. उन्हाळ्याच्या दिवसांत यार्ड वर्क करताना दिसलं कुणी तर घरी बनवलेली २-४ रोपं देणं पण कॉमन आहे बरच.
वरच्या रिटर्न्स प्रकारातला
वरच्या रिटर्न्स प्रकारातला कल्चरल शॉक म्हणजे वापरलेल्या गोष्टीही परत करता येणे. हे ही रिटेलर/ कॉस्ट्को इत्यादी त्यांच्या आखून दिलेल्या बजेट प्रमाणे इंप्लिमेन्ट करत असतील. म्हणजे काही गोष्टींकरता मुद्दाम प्रमोशनल ऑफर असते की वापरून बघा, नाही आवडलं तर परत करा. ह्यात किती लोक परत करतील ह्याची रिस्क कॅल्क्युलेटेड असते.
अर्थात वर राजने म्हंटलंय तसं ह्या प्रत्येक बाबींनां लिमीट असेल. कदाचित आपण सवयीने /मुद्दम करत नाही वरचेवर म्हणून क्वचित होतं तेव्हा सुखद धक्का बसतो.
कमोडच्या आसपास आरामात टेकून
कमोडच्या आसपास आरामात टेकून वगैरे बसणे , उलटी आली कि कामोडात तोंड घालून उलटी करणे(हे प्रत्यक्ष नाही पाहिलेले) , पण ते कितीही स्वछ असले तरी मला हा शॉकच वाटतो
कल्चरल शॉक्स,
कल्चरल शॉक्स,
म्हणलं तर गम्मतजम्मत म्हणलं तर आयुष्याच्या ठरलेल्या साच्यांना ताडकन तोडून आपल्याच कक्षा रुंदवणारे आय ओपनर प्रसंग. चारआणे आमचेही, पायरी पायरीने मला कसे कल्चरल शॉक बसले अन मी त्यातून कसा बहरत गेलो त्याची ही कथा.
पायरी एक - फर्ग्युसन रोड वर पोरगी सिगरेट पिताना दिसणे
ती तिच्या पैशाने पितेय, मी कोण तिला जज करणारा
पायरी दोन - हॉट शॉट्स घातलेली पोरगी
साधारणतः बाप्याने घालायची फुल साईज अंडरपॅन्ट असते तितकीच असणारी जीन्सची चड्डी घातलेली पोरगी कुमठेकर रोड वर पाहणे भयानक कल्चरल शॉक होता, त्यात ती ललना एका प्रसिद्ध साड्यांच्या दुकानात त्यात चड्डी बनियन (हॉटशॉट-टॅंक टॉप) परिवेशात वेगळ्या वेगळ्या पैठण्या ट्राय करत होती. पण परत तिला असेल कम्फर्टेबल आपण कश्याला वखवखल्यागत पाहावे हे कक्षा रुंदवणारे ज्ञान मला मिळाले.
विड
गावात "गांजा" म्हणून हाड हाड केली जाणारी, फडाच्या मधोमध एखाद झाड लावून ज्याची पानं घरातल्या दमेकरी म्हाताऱ्याकोताऱ्यांना विडीत गुंडाळून दिली जात अश्या वनस्पतीला "रिक्रियेशनल ड्रग" "विड" "जॉईंट" म्हणत बॉब मार्लेची आठवण काढत कोट्याधीश घरातली पोरे फुंकतात हे पाहून खरंच हादरलो होतो. एका बंगाली मैत्रिणीला विचारले असता "बोका इससे लाईफ स्लो हो जाता है" म्हणाली होती.
थोडक्यात, रुरल अर्बन डिव्हाईड , गावात सगळं सोनं शहरात सगळं गु असं काहीही नसतं, सर्वदूर पळसाला पाने तीनच हे त्या कल्चरल शॉक मधून मिळालेलं महाज्ञान.
एक अनुभव काढून टाकलाय
>> कामोडात तोंड घालून उलटी
>> कामोडात तोंड घालून उलटी करणे
त्यातली ड्रेनेज सिस्टीम च अॅडिक्व्टेट असते. लॉजिकल रीझन आहे.
Pages