Submitted by आ.रा.रा. on 27 June, 2018 - 01:33
![potato wedges](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/10/25/potatowedges.jpg)
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
२ बटाटे
स्पायसेस चॉइसनुसार.
क्रमवार पाककृती:
दोन मध्यम बटाटे चिरून पाण्यात थोडा वेळ भिजवून मग कोरडे करून घ्यावेत.
त्याला उपवासी लोकांसाठी फक्त जिरं, मीठ, मिरची, कोथिंबीर, लिंबू अन तूप लावावे
अनुपवासी लोकांनी आलं लसूण पेस्ट, धणेपूड, हळद अॅड करावी, हवे तर तुपाऐवजी तेल.
एयर फ्रायर सेटिंग्ज :
२०० डिग्री प्रीहिट ३ मिनिटे,
भांड्याला तेल्/तुपाचा ब्रश/स्प्रे लावून त्यात वेजेस टाकून १० मिनिटे
यानंतर बाहेर काढून एकदा हलवून घेणे. हवे असल्यास आवडीचे चीज किसून टाकणे.
पुढील ८ ते १० मिनिटे १६० डिग्रीवर, जसे कडक हवे तशाप्रमाणे
हे मसाला
अन हे उपवासाचे :
एन्जॉय!
वाढणी/प्रमाण:
एकास दोन बटाटे.
माहितीचा स्रोत:
मी
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
झकास ! एकदम तोंपासु आणि पिझा
झकास ! एकदम तोंपासु आणि पिझा हट वगैरे च्या पोटेटो वेजेस च्या तोंडात मारणारे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनुपवासी शब्द आवडला
Sahich. Mast presentation.
Sahich. Mast presentation. Aajcha menu fix aahe. Baki Fries khayla kay mala muhurt lagat nahi:)
अरे वा मस्तच
अरे वा मस्तच
उपवास नाही ठेवत तरी दोन्ही ट्राय करणार
मस्तये! एक डिश ईकडे पाठवा!
मस्तये! एक डिश ईकडे पाठवा!
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त दिसतयं !
मस्त दिसतयं !
जबरी !
जबरी !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण माझ्याकडे एअर फ्रायर नैय्ये
तुमच्याकडे येऊ काय खायला?
मीही दक्षिणाचाच प्रश्न
मीही दक्षिणाचाच प्रश्न विचारणार होते, की इतका कुटाणा कोण करणार? त्यापेक्षा तुम्हीच एकदा बोलावून खायला घाला (त्याबरोबर तुमच्या इतर व्हेज रेसिपी केल्यात तरी चालेल..)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त तोंपासु प्रकरण दिसतंय पण ते
मस्त आहे!!
मस्त आहे!!
तोंपासु. लाळगाळु प्रकरण आहे
तोंपासु. लाळगाळु प्रकरण आहे हे.
एअर फ्रायर नाही पण आता पॅन मधे करणं आलं.
वरदा, दक्षिणा.
वरदा, दक्षिणा.
माझ्याकडे येऊन खायला ऑल्वेज वेल्कम!
माबोवर प्रकटदिन साजरा करीन तेव्हा मोठी पार्टी ठेवीन त्यात तुम्हा दोघींसाठी हे नक्की ठेवीन.
अन हा अजिबात कुटाणा नाहिये. अक्षरशः २-४ मिनिटात बटाटे कापून मसाला लावून होतात, तोपर्यंत एफ्रा प्रीहीट होतो, त्यात बटाटे ढकलले की झाकण लावून बाकी कामे करायला (माबो फुंकायला) मोकळे. दहा मिनिटांनी अर्धा मिनिट पॅन हलवायची, पुन्हा झाकण बंद केले की शेवटची घंटी वाजेपर्यंत पहायचे काम नाही.
जबरदस्त!! मी नॉनव्हेज प्रेमी
जबरदस्त!! मी नॉनव्हेज प्रेमी किंवा नॉनव्हेज खाऊ नसल्याने माश्यावर फारसा जीव जडला नाही, पण कारले आणी पोटॅटो चिप्सने मार डाला. सगळेच फोटो कातिल आहेत. शेवट चा फोटो कमाल आहे.
माबोवर प्रकटदिन साजरा करीन
माबोवर प्रकटदिन साजरा करीन तेव्हा >>> म्हणजे पुढल्या जन्मीच बहुदा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एअरफ्रायर नाहीये घरी आणि इतर इतकी गॅजेट्स असताना आणायची सध्या इच्छा नाही, त्यामुळे ए.फ्रा. असलेल्या मित्रमैत्रिणीला कुणाला तरी फर्माईश करावी लागेल. जौदे. तोपर्यंत तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून इथे लिहा, आम्ही वाचतो
एंड प्रॉडक्ट मस्त दिसतायत.
एंड प्रॉडक्ट मस्त दिसतायत. अनुपवासाचे जास्त टेम्प्टिंग दिसतायत.
Ekadam zakas.
Ekadam zakas.
मस्त तोपासू आहे हे.
मस्त तोपासू आहे हे.
मी विचार करतीये की हे मावे मध्ये कनवेक्षण मोडवर करता येईल का
एकदम मस्त! तोंपासू!
एकदम मस्त! तोंपासू!
मावे मध्ये कनवेक्षण मोडवर
मावे मध्ये कनवेक्षण मोडवर करता येईल का
<<
नक्कीच. ग्रील मोड वापरा. बेकिंग शीट वर पसरून ठेवा. केले की सांगा.
ग्रील मोड वापरा. बेकिंग शीट
ग्रील मोड वापरा. बेकिंग शीट वर पसरून ठेवा. केले की सांगा.>> धन्यवाद. एकदा करून बघेन
आ.रा.रा शेवटी इथे दहा पाच
आ.रा.रा शेवटी इथे दहा पाच लोकांना तरी घ्यायलाच लावणार एअर फ्रायर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी दिसतंय हे!!
बटाटे ऑटाफे. हे असे खरपूस
बटाटे ऑटाफे. हे असे खरपूस बटाटे तर फारच मस्त लागतात.
ग्रील मोड वापरा. बेकिंग शीट
ग्रील मोड वापरा. बेकिंग शीट वर पसरून ठेवा. केले की सांगा.>>> नक्की करेन अन जमल्यास फोटो पण टाकेन (अर्थात चांगले झाले तर), थँक्स☺️
बिन उपवासाचे एकदम टेम्टिंग
बिन उपवासाचे एकदम टेम्टिंग आहेत.
भाहारीही!
भाहारीही!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> आ.रा.रा शेवटी इथे दहा पाच लोकांना तरी घ्यायलाच लावणार एअर फ्रायर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाहा!
भार्री...
भार्री...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एफ्रा घ्यावा'च' काय?
नुसते आपल्या त्या ह्याचे कितीतरी प्रकार जमतील. आणिक आपले ते हे असतील तर अजूनच...
चीज, चिली
ऑरेगानो, चीज
गार्लिक चीज
पेरीपेरी
पेपर
चिलीफ्लेक्स चीज
चिलीऑईल
मृण नी लिहिलेला चिमिच्युरी पण
मस्त दिसत आहेत. पण या
मस्त दिसत आहेत. पण या कामाकरता किती वीज लागते? त्यापेक्षा झटकन तळणे सोपे आणि स्वस्त नाही का? तौलनिक अभ्यास कोणी केला आहे का?
विचारायचं कारण असं की मध्यंतरी बेक्ड करंज्यांची लाट आली होती, तेव्हा मला हे जाणवलं होतं. एकावेळी अव्हनमध्ये जितक्या करंज्या बेक होतात आणि त्यांना खुसखुशीत व्हायला जितकी वीज द्यावी लागते, त्यापेक्षा खूपच कमी वेळात दुप्पट करंज्या तळून होतात आणि तेलही जास्त लागत नाही त्यांना.
इथे हेल्थपेक्षाही माझा कन्सर्न वीजेच्या वापराबाबत आहे.
रसभंग करायचा हेतू नाही. हे मस्तच दिसत आहे
खायलाही भारी असेलच.
तौलनिक अभ्यास कोणी केला आहे
तौलनिक अभ्यास कोणी केला आहे का?
<<
होय.
मलाही वाटायचं की वीज भरपूर लागेल, महाग पडेल, पण ते तसे नाही.
हे असे ऑकेजनल ओव्हन्/मावे/एफ्रा वापरून एकंदर वीजबिलात फार फरक पडत नाही, अन तेल व तूप एक्झॅक्टली १-१ चहाचा चमचा प्रत्येक वेळी.
शिवाय इंधन म्हणूनगॅसचा हिशोब करायला हवाच ना? गॅस फॉसिल फ्युएल आहे. लिमिटेड रिसोर्स. वीज काही प्रमाणात का होईना सौर्/जल/वायु इ. पासून मिळतेय.
आ.रा.रा शेवटी इथे दहा पाच
आ.रा.रा शेवटी इथे दहा पाच लोकांना तरी घ्यायलाच लावणार एअर फ्रायर << त्यातली एक मी असणार आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
भारी दिसतायत. मस्त
भारी दिसतायत. मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजच ईनऑर्बिट मॉलला गेलेलो
आजच ईनऑर्बिट मॉलला गेलेलो तेव्हा हे बटाटे वेजेस मॅक डी च्या मेन्यूवर न्यू आयटम म्हणून झळकत होते. मॅक डी मला लहान मुलांचे खाणे वाटत असल्याने मी त्यावर फक्त नजर टाकून चिकन विकन खायला पुढे गेलो. पण नेक्स्ट टाईम कधी बायको सोबत असताना ट्राय होतीलच.. फोटोतले मस्त दिसत आहेत
Pages