Submitted by अविका on 19 June, 2018 - 05:08
मुंबईत २३ जूनपासून प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून बंदीनंतर पहिल्यांदा पिशवी आढळल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा पिशवी आढळल्यास दहा हजार, तिसऱ्यांदा पिशवी आढळल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने ठरवला आहे. पण प्लास्टिक बण्द म्हणाजे नक्की काय ? फक्त प्लास्टिकच्या पिश्व्या की घरचे रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तुपण उदा. पाण्याच्या बाटल्या, डबे ई.
याबद्द्ल जर कुणी निट समजावु शकेल तर बरे होईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केवळ carry bag वर बंदी आहे की
केवळ carry bag वर बंदी आहे की कपड्याच्या दुकानातून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांंवर (ज्या जाड असतात आणि महिनोन्महिने वापरल्या जातात) सुद्धा बंदी आहे?
जर मला महत्वाचे कागदपत्र पावसाळ्याच्या दिवसात कुठे घेऊन जायचे असतील तर कसे न्यावे???
चांगले प्रश्न आहेत . मलाही
चांगले प्रश्न आहेत . मलाही उत्तरे हवी आहेत .![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
घरातल्या सर्व प्लास्टिकच्या पिशव्यांं काढून टाकल्या
पण ऐन पावसाळ्यात काही अडचणी येणारच .
लेकाचे शाळेचे दप्तर , माझी लॅपटॉप बॅग वॉटर्प्रूफ नाही .
ट्रेन्,मेट्रो, बस मधून प्रवास करताना , सहसा ओल्या छत्रीचे पाणी टपकून चिखल होउ नये म्हणून ती नीट प्लॅस्टीक पिशवीत टाकायची माझी सवय असते . आता कापडी पिशवीत टाकावी लागेल . आशिर्वाद आट्याच्या पिशव्या चालतील का ?
लेकाचे लॉक अण्ड लॉकचे डबे काय करावे ? टापर्वेअरच्या पाण्याच्या बाटल्या, ग्लासेस ?
आता सगळीकडे कपड्यांचे सेल चालू होतील , पावसाची (न येण्याची) वेळ्/दिवस बघूनच खरेदीला निघावेका ?
पुण्यात आहे प्लास्टिक बंदी ..
पुण्यात आहे प्लास्टिक बंदी .. सध्या तरी कुठलाही दुकान असणारे लोक कॅरीबॅग देत नाहीत, कापडी किंवा कागदी बॅग बाळगावी लागत आहे. dmart वाल्यांनी diposable bags देण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांची quality खूप वाईट आहे. सध्यातरी पाण्यापासून रक्षणासाठी जुन्या प्लास्टिक पिशव्या जपून ठेवल्या आहेत मी
आम्ही कॅरीबॅग वापर बंद केला.
आम्ही कॅरीबॅग वापर बंद केला. सर्व ओला कचरा कंपोस्ट करतो. बाहेर जाताना गाडीत कायम कापडी पिशवी असते.
डिग्रेडेबल प्लास्टिक बॅग डस्टबिन ला आणि जुन्या साध्या प्लास्टिक बॅग डब्यात पातळ भाजी असेल तर तो डबा एका प्लास्टिक मध्ये गुंडाळून डबा पिशवीत ठेवायला वापर होतो.
जुन्या कॅरीबॅग ठेवलेली मोठी पिशवी घरी आहे. त्यातल्या पिशव्यांचे विणकाम करुन एक मोठा बाऊल तयार करण्याचा विचार आहे.खूप पिशव्या खपवता येतात एकावेळी.त्यात मोठे काही ठेवता येते घरी.
https://www.allfreeknitting.com/Knit-Tote/Knitted-Plastic-Grocery-Bags
पण तितका वेळ हवा घरी.
(अर्थात टेट्रा पॅक, धान्याच्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या याचे पर्याय सरकार काय करणार हा प्रश्न आहेच.)
जर मला महत्वाचे कागदपत्र
जर मला महत्वाचे कागदपत्र पावसाळ्याच्या दिवसात कुठे घेऊन जायचे असतील तर कसे न्यावे???
नवीन Submitted by विक्षिप्त_मुलगा on 19 June, 2018 - 16:34
<<
ह्या Folder File Pouch चा वापर करा यापुढे, सध्या तरी ह्यावर बंदी नाही
फक्त प्लास्टिकच्या पिश्व्या
फक्त प्लास्टिकच्या पिश्व्या की घरचे रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तुपण उदा. पाण्याच्या बाटल्या, डबे ई.
याबद्द्ल जर कुणी निट समजावु शकेल तर बरे होईल.
<<
हि प्लास्टिक बंदी सरसकट सर्व प्लास्टिकच्या वस्तुंवर नाही तर ५० मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या ज्या कॅरीबॅग मिळतात त्यावर आहे. यापुढे भाजी घेताना, मटण-चिकन आणताना दिल्या जाणार्या काळया, पिवळ्या, हिरव्या वगैरे रंगाच्या व ५० मायक्रॉंन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या देताना/बाळगताना कोणी आढळल्यास तो व्यक्ति शिक्षेस पात्र होईल.
तसेच येत्या काही काळात ह्या प्लास्टिक पिंशव्यांसोबतच थर्माकोलची ताटे, ग्लास, चमचे, रस्त्यावर लागणारे फ्लेक्स, प्लास्टिकचे झेंडे ह्यावर देखिल बंदी आणायचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे.
(No subject)
भारतात पनिशमेंट पेक्षा
भारतात पनिशमेंट पेक्षा इन्सेन्टिव्ह पद्धत जास्त चांगली चालेल असे वाटते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नियम पाळणे जराही अवघड झाले तर पब्लिक नियम मोडून अधिकृत दंडाच्या कमी रक्कम कोणालातरी लाच देऊन पळवाट काढतात.
हे ट्रॅक करणे कठीण पडते.
प्लास्टिक बाळगायला ५००० दंड असेल तर छोटे विक्रेते तपासणी करायला आलेल्यांना ५०० रु बिना पावती देतील.
खूप मोठे विक्रेते असले तर तपासणी पथकावर हल्ला करतील (फेरीवाले केस मध्ये असे झाले होते नुकतेच. बेकायदा वाळू उपसा पथकांबरोबर नेहमीच होत असते.)
'तुमच्याकडचे/कुठूनही गोळा केलेले १ किलो नियमबाह्य प्लास्टिक जवळच्या यंत्रात जमा करा आणि १०० रु मिळवा' अशी काही योजना मनपाने काढावी
पर्यावरण दिनी आलेल्या पानभर
पर्यावरण दिनी आलेल्या पानभर जाहिरातींतही वरच्या फोटोतला मजकूर होता. म्हणजे ज्याचा वापर एकदाच होतो,अशा प्रत्येक (प्लास्टिक) वस्तूवर बंदी.
आता बहुतेक सगळं पॅक्ड, ब्रँडेड सामान प्लास्टिकमध्येच येतं. त्याचं काय होणार कळलेलं नाही. दुधाच्या पिशव्यांसाठी एक रुपया चार्ज लावून ती परत केली की आठाणे परत अशी एक योजना असल्याचंही वाचलेलं.
अनु, एक किलो प्लास्टिकला शंभर रुपये फार जास्त असावेत.
म्हणजे २० मायक्राॅन ची पिशवी
म्हणजे २० मायक्राॅन ची पिशवी चालणार नाही.. आत्ताच एक दुकानदार अशी पिशवी गार्बेज बॅग म्हणून खपवत होता.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
https://twitter.com
https://twitter.com/cmomaharashtra/status/982523360570691584
कोणत्याही प्लास्टिक पिशवीवर बंदी आहे.
![plastic.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u27927/plastic.jpg)
Exhibition and guidance by
Exhibition and guidance by BMC on ban on plastic :-
Date : 22nd to 24th June
Venue : NSCI, Worli
Time : 9 am to 6 pm
Demo on how to destroy plastic, how to dispose off or reuse plastic, what are the alternatives for plastic.
वेष्टन म्हणून असलेलं
वेष्टन म्हणून असलेलं प्लास्टिक कसं बंद करतील हे लोक? आणि पायरी पायरीने हळूहळू केलं तर काहीतरी शक्य होईल. डोक्यावर साधं हेल्मेट घालायची सक्ती फसते ते आख्या राज्यात संपूर्ण बंदी कशी काय राबवतील? जुगाडू लोक काय काऊ क्लुप्त्या करतील, कोर्ट केसेस होतील.. चांगल्या विषयाची वाट लागू नये.
अमितव,
अमितव,
इलेक्शन येताहेत. नवी कुरणं नको शोधायला?
एकदाच वापरात येणार्या डीस्पोजेबल वस्तू हे वाचूनच प्रचण्ड हसलो.
आता पुन्हा काचेच्या सिरिंजेस वापरायला सुरुवात करायची अन इतरही स्टराईल डिस्पोजेबल आयटम्स सोडून द्यायचे आदेश कधी येतात ते पहायचे.
झुगारून द्या बंदी.... कोण
झुगारून द्या बंदी.... कोण बघतेय तसेही...
कुणी पोटात प्लास्टिक जाऊन मेलेल्या पक्ष्यांचे फोटो व्हाट्सअप्प वर टाकले की निषेध करणारे आपण व 5000 रु द्यावे लागतात म्हणून प्लास्टिक पिशवी ठेवणे बंद करण्यापेक्षा 500 रुपये देऊन सुटका करून घेणारे पण आपणच.
साधनाताई,
साधनाताई,
कचरा फेकण्यासाठी ज्या प्लॅस्टीकच्या पिशव्या वापरातात, त्या बायोडिग्रेडेबल असतात. (किमान बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलसाठी ज्या वापरल्या जातात त्या.)
पाषाणयुग, ताम्रयुग, लोहयुग अशी युगे झाली, तसे आज प्लॅस्टिकचे युग आहे.
हजारो प्रकारे प्लॅस्टिक वापरात आहे, व नवनवे वापर शोधले जात आहेत.
या प्लॅस्टीकचे योग्य रिसायकलिंग करायचे, की सरसकट बंदी घालून जनतेला वेठीस धरायचे, यावर सरकारच्या अकलेची लेवल दिसते, असे मला तरी वाटते.
तेव्हा बंदी झुगारायची गरज पडण्यापेक्षा बावळट बंद्यांचा रतीब घालणे सरकारने बंद केले तर बरे होईल.
नोट बंदी.
गुटखा बंदी.
हायवेजवळ दारू बंदी.
प्लॅस्टिक बंदी.
प्रत्येक बंदीतून किती चंदी जमवली ते पहा बरे?
हे लोक कायदेच असे मुद्दाम बनवताहेत की ते पाळताच येऊ नयेत, अन मग त्याआडून लोकांनाच त्रास देऊन भ्रष्टाचार वाढवता येईल.
साभार मटाhttps://m
साभार मटा
https://m.maharashtratimes.com/editorial/marathi-infographics/miscellane...
मला बंदी बरोबर वाटते.
मला बंदी बरोबर वाटते.
अंमल बजावणी होताना भ्रष्टाचार वगैरे मुद्दे बरोबर आहेत. पण कुठेतरी सुरुवात करायला हवी.
सर्वात महत्वाचे म्हणजे 'हे नाही तर त्याला पर्याय काय' या प्रश्नांची योग्य उत्तरे सर्व बॅन केलेल्या गोष्टींबाबत बॅन करणार्यांकडे तयार हवीत.
सरकार काहीतरी सुधारायचे प्रयत्न करतं, चुकतं, कधी बरोबर येतं, जिथे मला शक्य आहे तिथे मी गेट अलाँग करणार.
(No subject)
मला ही बंदी काही दिवसांचा
मला ही बंदी काही दिवसांचा तमाशा वाटतेय.
आमच्या घरचेही संभ्रमात आहेत. काय ठेवावे आणि काय काढावे.
पण मी त्यांना सांगितलेय की आधीच लोड घेऊ नका. या बंदीचे नियमही नोटाबंदीसारखे दरदिवशी बदलत शिथिल होत जातील.
आताच मी आमच्या कचरयाच्या
आताच मी आमच्या कचरयाच्या काळ्या पिशव्या पाहिल्या. 51 माईक्रॉनच्या होत्या. बंदी बहुधा 50 माईक्रॉनपर्यंत आहे. बरोबर एक जास्त बनवून पिशव्या मार्केटमध्ये रेडी आहेत.
50 माईक्रॉन >>> हे कसे
50 माईक्रॉन >>> हे कसे ओळखायचे, कोणती पिशवी किती मायक्रोन ची आहे ते,.
(No subject)
लोकहो,
लोकहो,
गार्बेज बिन लायनर्स कॅरीबॅग म्हणून वापरायला सुरुवात करा पाहू.
बाकीच्या पळवाटा हळूहळू सांगतो
बाकीच्या पळवाटा हळूहळू सांगतो
WA विद्यापिठातील ज्ञानानुसार
WA विद्यापिठातील ज्ञानानुसार वेष्टन म्हणून ओरिजिनल मॅन्यु. ने पॅक केलेल्या सगळ्या प्रकारच्या पिशव्या यातुन वगळल्या आहेत.
विद्यापिठातील ज्ञानानुसार
विद्यापिठातील ज्ञानानुसार वेष्टन म्हणून ओरिजिनल मॅन्यु. ने पॅक केलेल्या सगळ्या प्रकारच्या पिशव्या यातुन वगळल्या आहेत.---- मग अशा वेस्टनांचे काय करायचे? अश्या पिशव्यांचा पुनर्वापर केला तर चालणार आहे का?
MPCB उर्फ महाराष्ट्र पोल्युशन
MPCB उर्फ महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाची वेबसाईट पहा अमितवा
बाप रे ! मोठाच निर्णय दिसतोय.
बाप रे ! मोठाच निर्णय दिसतोय. तोही असा तडकाफडकी? आहे त्या इन्वेन्टरीचे काय करतील आता? पर्यायी (कागदी, पुठ्ठ्याच्या) वस्तूंची आता मागणी वाढून तुटवडा होणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.रा.रा म्हणतात तसे दवाखान्यात हॉस्पिटलात वापरायचे आयटेम्स सिरिंजेस, ग्लव्ज, वगैरे वगळायला हवे होते यातून.
रेस्टॉ. मधून फूड टेक आउट साठी काय वापरतील आता? की आपले भांडे घेऊन जायचे?
आ.रा.रा म्हणतात तसे
आ.रा.रा म्हणतात तसे दवाखान्यात हॉस्पिटलात वापरायचे आयटेम्स सिरिंजेस, ग्लव्ज, वगैरे वगळायला हवे होते यातून.>>>
त्यावर बंदी नाहीच आहे! Disposable items मध्ये त्यांनी प्लास्टिक/ थर्माकोल च्या प्लेट्स, ग्लासेस, चमचे इ. वर बंदी घातली आहे, वैद्यकीय क्षेत्रातील Disposable items वर बंदीचा उल्लेखही नाही.
Pages