२ पिकलेली केळी
२ अंडी (खात नसाल तर वगळू शकता)
१ वाटी ओट्स ची पावडर
अर्धी वाटी दूध
१-२ चमचे गुळाची पावडर
१ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स
१ चिमूट बेकिंग सोडा
अर्धा चमचा बेकिंग पावडर
चिमूटभर मीठ
एका बोल मध्ये २ पिकलेली केळी एकजीव करून घ्या
त्या मध्ये २ अंडी मॅश करून घ्या. आता ह्यात वरचे सगळे जिन्नस टाकून मिश्रण एकजीव करा.
मिश्रण फार पातळ नाही आणि घट्ट पण नाही असे झाले पाहिजे. कोरडं वाटत असेल तर अजून दूध घाला.
आता लोखंडी तव्यावर थोडं तेल टाकून गोल आकाराचे पॅनकेक्स करा. (तेलाऐवजी बटर किंवा साजूक तूप पण वापरू शकता)
दोन्ही कडून छान भाजून घ्या.
मेपल सिरप , मध किंवा चॉकलेट सिरप बरोबर सर्व्ह करा. (वरून स्ट्रॉबेरी, ब्लुबेरीज , आवडत असलेल्या फळांचे काप घालू शकता)
मस्त चवीचे हेल्दी पॅनकेक्स तयार.
हे पॅनकेक्स पटकन तयार होतात.
तुम्हाला आवडत असेल तर ह्या मध्ये १ छोटा चमचा दालचिनी पावडर पण घालू शकता.
ओट्स पावडर नसेल तर कणिक वापरू शकता.
लहान मुलांना पण खायला एक वेगळा हेल्दी पर्याय.
(No subject)
मस्त दिसतायत
मस्त दिसतायत
खूप दिवसांनी ओट्सची रेसिपी
खूप दिवसांनी ओट्सची रेसिपी आली.
छान दिसतायत.
आज बनवून पहिला,
आज बनवून पहिला,
छान झाला होता,
बायकोच्या सुचनेप्रमाणे आता कधीतरी केळ्या ऐवजी फणस वापरून ट्राय करणार आहे:)
मस्त आहे रेसिपी
मस्त आहे रेसिपी
थँक्स सिम्बा , अमितव , जाई.आज
थँक्स सिम्बा , अमितव , जाई.
आज बनवून पहिला, छान झाला होता, >>>> मस्त .
फणस वापरून केला कि कळवा कसा लागतो ते.