या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –
“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”
- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)
याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५
- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५
याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –
1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.
2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”
3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.
4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.
5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.
6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.
7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.
अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’
१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.
२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.
३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.
४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.
उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.
मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!
औरंगजेब हा इतका उघड
औरंगजेब हा इतका उघड हिंदुद्वेष्टा असूनही हे अनेक राजपूत सरदार त्याचे मांडलिक का राहिले? तुम्हीच म्हणताय की त सरदार औरंगजेबासाठी महत्त्वाचे होते. तरीही?>>> स्वधर्माबद्दल स्वाभिमान नसेल त्यांना म्हणून राहिले.. म्हणून तर राणा प्रताप आणि शिवाजी महाराज उजवे ठरतात.. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले म्हणून तो औरंग्या महाराष्ट्राच्या मातीत मेला आणि पुढे भारताच्या बहुतांश प्रदेशात मराठ्यांनी राज्य केले.. इतका सगळा इतिहास असून तुम्ही औरंगजेब, अफजलखान, टिपू सुलतान यांचेच भक्त राहणार आयुष्यभर...
विक्षिप्त मुलगा, तुम्ही
विक्षिप्त मुलगा, तुम्ही इतिहासाचं पाठ्यपुस्तक शोधणार होतात. कुठवर आलंय?>>> २००२ सालचे पुस्तक शोधायचे आहे, गेल्या आठवड्यातील वर्तमानपत्र नव्हे!
बरं ७८% गुणांच्या जोरावर वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी शोधा.>>> तुमचे मायबोलीकर मित्र शाळेचा एक निकालही सांभाळू शकत नाही, आणि माझ्याकडून सुमारे १६ वर्षांपूर्वी शिकलेले आठवण्याची अपेक्षा!!! चांगले आहे!!!
विक्षिप्त मुलगा, तुमच्याकडे
विक्षिप्त मुलगा, तुमच्याकडे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, म्हणून प्रगतीपुस्तकं शोधताय का?
<औरंगजेब हा इतका उघड
<औरंगजेब हा इतका उघड हिंदुद्वेष्टा असूनही हे अनेक राजपूत सरदार त्याचे मांडलिक का राहिले? तुम्हीच म्हणताय की त सरदार औरंगजेबासाठी महत्त्वाचे होते. तरीही?>>> स्वधर्माबद्दल स्वाभिमान नसेल त्यांना म्हणून राहिले.. म्हणून तर राणा प्रताप आणि शिवाजी महाराज उजवे ठरतात.. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले म्हणून तो औरंग्या महाराष्ट्राच्या मातीत मेला आणि पुढे भारताच्या बहुतांश प्रदेशात मराठ्यांनी राज्य केले.. इतका सगळा इतिहास असून तुम्ही औरंगजेब, अफजलखान, टिपू सुलतान यांचेच भक्त राहणार आयुष्यभर...>
औरंगजेब आदींचे भक्त? हेही भाजपच्या सध्याच्या पद्धतीला अनुसरूनच आहे म्हणा.
स्वधर्माबद्दल स्वाभिमान नसेल
स्वधर्माबद्दल स्वाभिमान नसेल त्यांना म्हणून राहिले.. म्हणून तर राणा प्रताप आणि शिवाजी महाराज उजवे ठरतात.. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले म्हणून तो औरंग्या महाराष्ट्राच्या मातीत मेला आणि पुढे भारताच्या बहुतांश प्रदेशात मराठ्यांनी राज्य केले.. इतका सगळा इतिहास असून तुम्ही औरंगजेब, अफजलखान, टिपू सुलतान यांचेच भक्त राहणार आयुष्यभर...![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 19:48
>> ह्या लेखाद्वारे द्वेष कसा पसरवतो आहोत त्याचे स्वतःच पुरावे दिलेत बघा तुम्ही.. भाषा आणि आरोप बघा...
आँ? महाराजांबद्दल चारच ओळी
आँ? महाराजांबद्दल चारच ओळी होत्या हे तुम्हांला बरं आठवतंय.
इथे आम्हाला अख्खं पुस्तक आठवतंय.
विक्षिप्त मुलगा, तुमच्याकडे
विक्षिप्त मुलगा, तुमच्याकडे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, म्हणून प्रगतीपुस्तकं शोधताय का?>>>
तुमच्याच मायबोलीकर मित्राने मला 'इतिहासाच्या तासाला टंगळमंगळ करत होतास का?' वगैरे प्रश्न विचारले होते. त्याचे उत्तर होते ते.
असो. आपल्याशी शाब्दिक खेळ करत बसायला माझ्याकडे वेळ नाही.
जय महाराष्ट्र!!!
स्वधर्माबद्दल स्वाभिमान नसेल
स्वधर्माबद्दल स्वाभिमान नसेल त्यांना म्हणून राहिले.. म्हणून तर राणा प्रताप आणि शिवाजी महाराज उजवे ठरतात
>> हा हा हा, म्हणूनच शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांना भारतीय मुस्लिमांविरुद्ध हिंदूंना पेटवायला वापरता येते... असे सांगा की.
आणि स्वधर्माबद्दल स्वाभिमान नसलेल्यांचीही सुन्नत औरंगजेबाने केली नाही? घोर आश्चर्य....
लेखकाच्याच विधानांवर आधारित.... संदर्भासाठी लेखकाचा लेख आणि प्रतिसाद वाचावे.
१. औरंगजेब हा हिंदू सरदार स्वधर्माच्या रक्षणासाठी उलटतील म्हणून घाबरला आणि त्यांना हिंदूच ठेवले.
२. औरंगजेबाकडचे हिंदू सरदार हे स्वधर्माभिमानी नव्हते....
वरील पैकी नक्की काय खरे?
विमुभौ, तुम्ही इतके हुशार
विमुभौ, तुम्ही इतके हुशार आहात इतिहास भुगोलात.. २००२ म्हणजे फार जुनेही नाही. मी वर दिलेली माझ्या अभ्यासाला असलेल्या पुस्तकाची लिंक दीली आहे ते पुस्तक तीस वर्षे जुने आहे... तुम्हाला २००२ चे सापडंना.... बोलून फसलेत का महाराज?
ते सोडा आता. बरं नेमका कोणता इतिहास होता तुम्हाला सातवीला ज्यात इतके मार्क्स मिळालेत.. ते तरी सांगा..
अहो, पण त्यामुळे इतिहासात
अहो, पण त्यामुळे इतिहासात राजांबद्दल चारच ओळी होत्या हा दावा खरा ठरत नाही ना?
(प्रफुल मोड ऑन)
मेऽऽऽन क्या है? राजांचा इतिहास शिकवला होता की नाही?
षा मी विचारलेल्या प्रश्नांचा विचार करा. त्यातले दोन मुद्दे तर ताजेच आहेत.
राजस्थानच्या ताज्या संदर्भपुस्तकात लोकमान्य टिळकांना भारतीय दहशतवादाचा जनक म्हटलंय.
गुजरातच्या पाठ्यपुस्तकात दादोजी कोंडदेवना राजांचे आजोबा केलंय.
आज फुल्ल एन्टरटेनमेंट झाली
आज फुल्ल एन्टरटेनमेंट झाली बुवा.... रविवार सार्थकी लागला. नैतो काय करावे सुटीचे प्रश्नच पडला होता..![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
परांजपे भाऊ
परांजपे भाऊ
औरंग्याने काय काय केले त्याचे कौतूक कुणाला नाही मी आधी काय विचारले त्यावर बोला.
मला एक कळत नाही हि संघोटी लोक मुघल वगैरेंवर द्वेषपुर्ण बोलतात ठिक आहे समजू शकतो परंतू तब्बल 150 वर्ष भारताला लुटणार्या अत्याचार करणार्या इंग्रजांविरूध्द मात्र चकार एक विरूद्ध शब्द का बोलत नाही?
मालकांविरुद्ध कसे बोलतील?
मालकांविरुद्ध कसे बोलतील? त्यांच्यामुळे तर पोटापाण्याला लागले ना?
अहो इंग्रज तर भिकारीच होते
अहो इंग्रज तर भिकारीच होते अहो.. त्यांना शिव्याच घालतो.. त्यांच्यामुळे चापेकर, कान्हेरे, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांच्यासारखी थोर माणसे हुतात्मा झाली.. इंग्रजांच्या विरुद्ध कायमच बोलणार आणि बोलत राहणार.. प्रश्न हा आहे की तुम्ही मुघलांच्या विरोधात कधी बोलणार का!? का तुम्हाला पैसा पाकिस्तानमधून येतो मुघलांचे समर्थन करायला..
कारण पाकिस्तानच्या एका संकेतस्थळावर ब्रिगेडचे गोडवे गायलेत चक्क..
शाळेत राजांचा इतिहास शिकावलाच
शाळेत राजांचा इतिहास शिकावलाच पण हे सांगितले का की औरंगजेबाने मंदिरात गाय कापली आणि मंदिरे पाडून मशिदी बांधल्या!? तो इतिहास कसा जाणूनबुजून लपवला शाळेतल्या पुस्तकात!?
{प्रश्न हा आहे की तुम्ही
{प्रश्न हा आहे की तुम्ही मुघलांच्या विरोधात कधी बोलणार का!? का तुम्हाला पैसा पाकिस्तानमधून येतो मुघलांचे समर्थन करायला..}
चालू द्या हं तुमचं. मला तर साक्षात मोदीजीच मायबोलीवर मराठीत लिहिताहेत असं वाटू लागलंय.
चाफेकर ते सुखदेव यांच्या रांगेत बसावं असं आदरणीय नथुराम गोडसेजींना का नाही वाटलं, तेही लिहा कधीतरी
तुम्हाला हे द्वेषपुर्ण
तुम्हाला हे द्वेषपुर्ण लिहायला संघातून पैसा मिळतो की भाजपा देतेते सांगा पाहू
ebalbharati.in
ebalbharati.in
ह्या लिंकवर सगळी पाठ्यपुस्तके मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. गरजवंतांनी शोध घ्यावा.. आणि ते काहीओळींचे शिवाजी महाराज शोधून द्यावेत.. प्लिज.
मी आताच चौथीचे श्री शिवछत्रपती हे पुस्तक डाउनलोड केले..
सांगितले का की औरंगजेबाने
सांगितले का की औरंगजेबाने मंदिरात गाय कापली आणि मंदिरे पाडून मशिदी बांधल्या!?>>>>
हो शिकवले ना, सोमनाथचे मंदीर किती वेळा लुटले व ते लुटत असताना तेथील पंडीत प्रतिकार करण्याऐवजी होमहवन करून मुघलांना पराभूत करायचे प्रयत्न करत होते हेही शिकवले हो![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
प्रश्न हा आहे की तुम्ही
प्रश्न हा आहे की तुम्ही मुघलांच्या विरोधात कधी बोलणार का!?
>> तेच विचारतोय रे मघापासून तुला, का उठाठेव इतकी. मुघल मरुन आता तीनशे वर्षे झालीत. का कबरीतून बाहेर काढताय?
का तुम्हाला पैसा पाकिस्तानमधून येतो मुघलांचे समर्थन करायला..
>> वॉव.... देअर यु आर मिस्टर हेटमाँगर... तुझी वैचारिक कुवत स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.
इथे मुघलांचे समर्थन कोण्या बावळटाने केले? साधे प्रश्न विचारले तर थेट 'पैसा पाकिस्तानातून येतो' का? अरे तिथे स्वतःची धुवायला पाकिस्तानकडे पैसा नाही.
तुम्हाला मात्र भारताबाहेर बसलेले संघी डूकरं भारत तोडण्यासाठी पैसे पुरवतात का?
हो शिकवले ना, सोमनाथचे मंदीर
हो शिकवले ना, सोमनाथचे मंदीर किती वेळा लुटले व ते लुटत असताना तेथील पंडीत प्रतिकार करण्याऐवजी होमहवन करून मुघलांना पराभूत करायचे प्रयत्न करत होते हेही शिकवले हो Rofl
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
नवीन Submitted by दत्तू on 13 May, 2018 - 20:26
दत्तू, त्यांना स्वधर्माबद्दल
दत्तू, त्यांना स्वधर्माबद्दल स्वाभिमान नसेल...![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
लेखकाच्याच विधानांवर आधारित..
लेखकाच्याच विधानांवर आधारित.... संदर्भासाठी लेखकाचा लेख आणि प्रतिसाद वाचावे.
१. औरंगजेब हा हिंदू सरदार स्वधर्माच्या रक्षणासाठी उलटतील म्हणून घाबरला आणि त्यांना हिंदूच ठेवले.
२. औरंगजेबाकडचे हिंदू सरदार हे स्वधर्माभिमानी नव्हते....
वरील पैकी नक्की काय खरे?
अय्या! म्हणजे यांच्या
अय्या! म्हणजे यांच्या मुलानातवंडांना 2018 मध्ये भारताच्या रक्षणासाठी यज्ञ केला गेला ते शिकवणार.
छत्रपत्री शिवाजी महाराज यांचा
छत्रपत्री शिवाजी महाराज यांचा जन्म १६०३मध्ये झाला. दादोजी कोंडदेव हे महाराजांचे आजोबा होते आणि त्यांचा जन्म झाला तो शिवनेरी राजवाड्यात!’ ही माहिती छापली आहे गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या सातवीच्या सोशल सायन्स या विषयाच्या पुस्तकात! इतिहासाचे बेमालूम चुकीचे संदर्भ दणक्यात ठोकणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्या राज्यातील शाळांमध्ये मुळातच चुकीचा इतिहास शिकवला जातो, हे यामुळे सिद्ध झाले आहे. छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेची यावर भूमिका काय असेल, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.
गुजरातच्या पाठ्यपुस्तक मंडळाने २०१३मध्ये प्रकाशित केलेले सातवीचे हे दुसऱ्या सत्राचे सोशल सायन्सचे पुस्तक आहे. त्यास शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचीही मान्यता आहे. ‘मोगल साम्राज्याचा सुवर्णकाळ आणि ऱ्हास’ या सहाव्या प्रकरणात पान क्रमांक ५९वर मोगल साम्राज्यास आव्हान देणाऱ्या राज्यकर्त्यांचा एकेका परिच्छेदात परिचय करून देण्यात आला आहे. त्यात शिवाजी महाराजांविषयी माहिती देताना या चुका करण्यात आल्या आहेत.
*शिवाजीच्या नावाने अस्मिता जागवणारे आणि गर्व, माज वगैरे करणारे शिवसेना-भाजप आता यावर काही कारवाई करणार की नाही? की मिठाची गुळणी धरून लाचारीने मिंध्या बिळात लपणार?*
जगदीश जेट
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/gujrat-maharashtr...
परांजपे जरा मोदीच्या राज्यात जाऊन इतिहास शिकव बरं तिथे जास्त गरज आहे..
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
https://www.facebook.com
https://www.facebook.com/socialmodyssey/videos/1439500646176103/
लेखकमहोदय तिकडे ज्यांना
लेखकमहोदय तिकडे ज्यांना ब्रिगेडी म्हणतात, त्यांनाच इथे पाकी एजंट म्हणतात.
राणा प्रतापवर आलेच ाााााहात, तर त्यांची लढाई कोणाशी झाली?
समोर लढणारे सैनिक कोण होते? मुघल की रजपूत?
रजपूतच होते तर ते धर्मयुद्ध कसे?
बापरे गदारोळ झाला इथे.
बापरे गदारोळ झाला इथे.
भिकरचोट शिव्या वैगरे दिलेल्या
भिकरचोट शिव्या वैगरे दिलेल्या चालतात का मायबोलीवर?
भिकरचोट ही शिवी आहे का? नक्की
भिकरचोट ही शिवी आहे का? नक्की काय अर्थ आहे त्याचा?
Pages