‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 03:11

aurangzeb-1.jpg

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!

www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिकारचोट टायटलबद्दल निषेध.

२०१९ च्या निवडणुकांसाठी मुसलमान हिंदू असं भांडण पेटवण्यासाठी ओकलेल्या गरळाचा स्वच्छ भाग आहे हा लेख अन लेखक.

"लेख" वाचला.

अ‍ॅडमिन. छुप्या स्वरुपात माबोच्या वापर करुन दोन समाजांमध्ये धार्मिक द्वेष पसरवणार्‍या ह्या लेखकावर कारवाई व्हावी अशी विनंती करतो.

भिकारचोट टायटलबद्दल निषेध>>>> वेमा तुम्हाला विनंती आहे आरारा यांच्या अपशब्दाची वेळीच दखल घ्यावी.

भिकारचोट टायटलबद्दल निषेध.>>

माझे टायटल नाही आहे हे.. कवी भूषण म्हणतो असे!! तुमचा अभ्यास कमी आहे त्याला मी काय करू?? आणि यात वाद कुठे आला? जे खर आहे ते पुराव्यानिशी मांडले आहे!

अ‍ॅडमिन. छुप्या स्वरुपात माबोच्या वापर करुन दोन समाजांमध्ये धार्मिक द्वेष पसरवणार्‍या ह्या लेखकावर कारवाई व्हावी अशी विनंती करतो.>>

यात धार्मिक द्वेष कुठून आला?? औरंगजेबाने जे केले ते सांगितले!! म्हणजे औरंगजेबाने जे केले ते खरे सांगितले तर तो धार्मिक द्वेष!! वा रे आपला न्याय!

अ‍ॅडमिन. छुप्या स्वरुपात माबोच्या वापर करुन दोन समाजांमध्ये धार्मिक द्वेष पसरवणार्‍या ह्या लेखकावर कारवाई व्हावी अशी विनंती करतो.>>

यात धार्मिक द्वेष कुठून आला? आणि हल्लीचा मुसलमान समाज सुद्धा शिवाजी राजांना मानतो ना मग राजांचा जो शत्रू होता त्याचे खरे स्वरूप समोर आणले तर खुपते कशाला??

औरंग्या कसा होता हे सगळ्यांना माहीत आहे मग पुन्हा तेच सांगून उपयोग काय?
शिवाजी महाराजांपुर्वी बाबर पासून ते औरंग्या पर्यंत मुघल व त्या आधी खिल्ज्जी वगैरे बरेच राजे येऊन गेले त्यामुळे "होता शिवाजी म्हणून" हे बोलणे अतिशयोक्तिचा भाग आहे शेवटी ते कवी "भुषण" आहे कवींमध्ये स्तुती करताना नको तितके वाहत जामे स्वाभाविक आहे. रंजक भाग असतो. खरे इतिहासकार अशा भुषणांकडे बघून इतिहासाचे अवलोकन करत नाही. शिवाजी महाराजांचा पराक्रम सर्वोच्च कोटीचा होता यात दुमत नाही. पण त्यांच्याआधी हिंदूधर्म होता त्यांच्यानंतर देखील राहीला..
बाबर हुमायुम अकबर जहांगीर शाहजहां यांच्यानंतर औरंग्या आला. मग याचा अर्थ असा घेणार का की त्या राजांनी हिंदूबद्दल सहिष्णुता दाखवली? फक्त औरंग्याने अत्याचार केले? सुंता तर त्या राजांच्या काळात झाली असतीच ना.. का झाली नाही? काय कारण असेल? एकतर ते राजे सहिष्णुत होते माना नाहीतर ते असहिष्णुत होते व सगळ्याच हिंदूंची सुंता झाली मान्य करा...

बघा कसे जमते..

मुघल राजे सहिष्णू नव्हतेच.. कोण म्हणते मुघल सहिष्णू होते.. या देशात फक्त हिंदू सहिष्णू होते म्हणून तो समाज टिकून राहिला.. आणि संपूर्ण हिंदूंची सुंता करणे शक्यच नव्हते कारण अनेक हिंदू नोकरी करत होते याच शाह्यांकडे.. शक्य असते तर शिवाजी राजांनीपण तेच केले असते पण त्यानी तसे न करता यांना विरोध केला..

कवी असला तरी तात्कालिक समाजाचे प्रतिनिधित्व त्यातून दिसून येते. ते कसे नाकारणार.. राजांची स्तुती असली तरी औरंगजेबाचे अत्याचार ही तर सत्य घटना मांडली आहे त्याने आणि हे पुराव्यांनी सिद्ध होते..

पुन्हा तेच तेच सांगावे लागते याचे कारण तुम्हाला वरच्या कमेंट मध्ये दिसून येईल...

मिर्झाराजे जयसिंग आणि समस्त राजस्थान, उत्तरप्रदेश, बंगाल गुजरात पंजाब ह्या भागातले हिंदु राजे, सरदार, मनसबदार आणि संस्थानं हिंदूच कशी राहिली? सोयीचा इतिहास काढणार्‍यांना इतिहासकार नाही आगलावे म्हणतात....

तुम्हाला वाटत असेल मोदी पंतप्रधानप्दावर बसून काहीही ऐतिहासिक फेकाफेक करतो मग तुमची पण घाण ऐकून घेतली जाईल.... तर ऐका समाजात द्वेष पसरवून निष्पापांमध्ये दंगली घडवणार्‍यांनो तुमचे निष्पापांच्या चिता पेटवून आपल्या पोळ्या भाजायचे दिवस संपलेत आता....

मुघल राजे सहिष्णू नव्हतेच.. कोण म्हणते मुघल सहिष्णू होते.
>>> हीच हीच... हीच उठाठेव कशासाठी चाललीये आहे डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजराने सांगावे..

कशासाठी ही उठाठेव?>> आपल्याला काय त्रास?? खरा इतिहास मांडल्यावर त्रास कशाला व्हायला हवा.. मग असे तर लिहायलाच नको.
आज औरंगजेब आणि अफजलखान यांच्यासारख्या लोकांचे उद्दतीकरण चालू आहे त्यामुळे त्यानी काय केले हे लोकांना कळायला हवे म्हणून उठाठेव. यात विरोध करण्यासारखे काय आहे?

औरंगजेबाने मंदिरे तोडली हे सांगितले तर धार्मिक द्वेष कसा? म्हणजे त्याने केले हे काही नाही आणि त्याने केले हे सांगितले तर धार्मिक द्वेष!!

अरे जोकरा!! तुला संदर्भ देऊन सुद्धा इतिहास समजत नसेल तर मी काय करू!! हिम्मत असेल तर विधाने खोडून काढ.

कशासाठी ही उठाठेव?>>>> उठाठेव कसली, जे आहे ते लिहिलंय त्यांनी, इतिहास म्हणून वाचा, दंगलीचा संबंध का जोडताय या लेखासोबत, लोकं काय मूर्ख आहेत का हा लेख वाचून तलवारी चाकू घेऊन रस्त्यावर उतरायला, आता इतिहास पण सगळ्यांना गोड गोड वाटेल तोच लिहायचा का, तो एक बावळट आरारा टायटल भिकरचोट आहे बोलतोय, कोणाला भिकरचोट बोलतोय नक्की कळू दे, तुमच्यासारखे अर्धवट डोक्याच्या लोकांमुळेच दंगली घडतात मूर्खानो.

त्याचे खरे स्वरूप समोर आणले तर खुपते कशाला??>>>

खरे स्वरूप समोर आणायला औरंग्याचे कारस्थान लपलेे आहे का? आवेश असा दाखवत आहे जसे आपण कुणाला ठावूक नसलेली गोष्ट सांगत आहे.. जी गोष्ट इतिहासाच्या पुस्तकात 6-7 वी ला शिकवली होती ती आती पुन्हा सांगून तुम्ही काय साधणार ते सांगा? पुन्हा औरंग्याला थडग्यातुन काढून फाशी देणार? कि त्यांच्या वारसांना भरचौकात चाबकाचे फटके देणार? की अजून कुणाचा सत्कार करणार?
काय करणार आहे ते एकदा काय ते स्पष्ट कराच बघू, तुमचे धाग्यांचा विषय उगळून झिजलेल्या लाकडासारखे आहे.. जुने रगडून तुम्हाला काय मिळणार? नविन काही माहीती असेल तर नक्की शेअर करा त्यात आम्हालाही रस येईल.. पण तेच जुनी कॅसेट कुठले विशिष्ट हेतू ठेऊन वाजवणार असाल तर त्यात तुमचे व तुमच्या लेखनाचे नुकसान आहे.. बाहूले बनण्यापेक्षा बाहूला बनवायला शिका चांगले राहील

आज औरंगजेब आणि अफजलखान यांच्यासारख्या लोकांचे उद्दतीकरण चालू आहे
>> कोण करतंय ही उठाठेव? कोणी करत नाहीये... तुमच्यासारखे लोक जाणून बुजून अशा चर्चा घडवून आणून धार्मिक धृविकरण करत आहेत... शिवाजी राजे आणि औरंगजेब मरुन साडेतीनशे वर्ष झालीत पण तुम्ही लोक त्या दोघांचा वापर करुन आज वातावरण पेटवण्याचा जीव खाऊन प्रयत्न करत आहात... आणि इतिहासकार म्हणवतात स्वतःला.

मिर्झाराजे जयसिंग आणि समस्त राजस्थान, उत्तरप्रदेश, बंगाल गुजरात पंजाब ह्या भागातले हिंदु राजे, सरदार, मनसबदार आणि संस्थानं हिंदूच कशी राहिली? सोयीचा इतिहास काढणार्‍यांना इतिहासकार नाही आगलावे म्हणतात...>>

मग अनेक हिंदुचे धर्मांतर का करून घेतले?? देवळे पाडायची काय गरज होती.. ते हिंदू राहिले कारण औरंगजेबाला त्याची गरज होती. मिर्झाराजाला पण मारलेच की त्याने

कोण करतंय ही उठाठेव? कोणी करत नाहीये... तुमच्यासारखे लोक जाणून बुजून अशा चर्चा घडवून आणून धार्मिक धृविकरण करत आहेत... शिवाजी राजे आणि औरंगजेब मरुन साडेतीनशे वर्ष झालीत पण तुम्ही लोक त्या दोघांचा वापर करुन आज वातावरण पेटवण्याचा जीव खाऊन प्रयत्न करत आहात... आणि इतिहासकार म्हणवतात स्वतःला.>>

तुम्हाला डोळे मिटून बघायचे असेल तर मी काय करू!! जरा औरंगजेब आणि अफजलखान यांच्या कबरीवर जाऊन पहा!! तिथे काय चालू आहे!! ज्या अफजलखानाचे मुंडके राजगडला पुरले त्याच्या नावाने उरूस भरतो.. हे उदात्तीकरण नाही तर काय!!

अरे जोकरा!! तुला संदर्भ देऊन सुद्धा इतिहास समजत नसेल तर मी काय करू!! हिम्मत असेल तर विधाने खोडून काढ.
नवीन Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 15:07

परांजप्या, असल्या धमक्या आणि षड्डू ठोकण्याचा पांचटपणा नकोस रे करु..काही उपयोग नाही त्याचा. तुझा बुरखा फाटलाय आता. डोळे मिटून दूध पिणे बंद कर, दिसतंय सगळं.

जमलं तर दत्तु आणि मी काय विचारत आहे त्याचे उत्तर दे... हिंमत वगैरे आपल्या बायकोपुढे जपून ठेव दाखवायला....

उदात्तीकरण तर स्वातंत्र्य लढ्यात भाग न घेणार्या rss चीपणहोत आहे, नथुरामाची पण आता होत आहे, मग काय करायचे?

उदात्तीकरण तर स्वातंत्र्य लढ्यात भाग न घेणार्या rss चीपणहोत आहे, नथुरामाची पण आता होत आहे, मग काय करायचे?

दत्तू साहेब कुणी काय लिहायचे हे आपण कसे सांगणार? आपल्याला पटला नसेल तर संदर्भ देऊन विरोध करा अथवा कमेंट न करण्याचे स्वातंत्र्य आहे की!!

ज्या अफजलखानाचे मुंडके राजगडला पुरले त्याच्या नावाने उरूस भरतो.. हे उदात्तीकरण नाही तर काय!!
>> नथुरामच्या नावाने मंदिर आणि पुतळे उभारायची तयारी चालली आहे... काय म्हणतो याबद्दल?

उदात्तीकरण तर स्वातंत्र्य लढ्यात भाग न घेणार्या rss चीपणहोत आहे, नथुरामाची पण आता होत आहे, मग काय करायचे?>> लिहा की तुम्ही कुणी अडवले आहे.. मी अडवले का आपल्याला?? बिनधास्त पुरावे मांडून खुशाल लिहा!!

बघा ह्या भामट्याचा खरा चेहरा कसा समोर आला. खर्‍या इतिहासकारांची भाषा अशी नसते. हे आगलावे आहेत. परांजप्याच्या सर्व प्रतिसादातली भाषा आणि सूचकता बघा....

जमलं तर दत्तु आणि मी काय विचारत आहे त्याचे उत्तर दे... हिंमत वगैरे आपल्या बायकोपुढे जपून ठेव दाखवायला....>>

स्वतःचे नाव लावायला सुद्धा ज्यांना लाज वाटते त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कुणी का देईल!!

Pages

Back to top